The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा वर्षानंतर का होईना पण अमित शहांनी आपल्या अटकेचा बदला घेतलाच

by द पोस्टमन टीम
21 January 2026
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


माजी गृहमंत्री पी चिदंबरम एका गैरव्यवहाराच्या प्रकरणात जेलमध्ये गेले होते. ज्यावेळी त्यांना तुरुंगात घेऊन जात होते, त्यावेळी भाजपा समर्थक अमित शहांच्या अटकेशी त्याची तुलना करत होते. असं म्हणतात, अमित शहांना तुरुंगात टाकण्यात आणि गुजरातमधून तडीपार करण्यात चिदंबरम यांचा मोठा हात होता.

चिदंबरम यांना झालेल्या अटकेनंतर भाजपा समर्थकांनी दावा केला होता की आज त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहेत. यावेळी भाजपा समर्थकांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, जो अमित शहा २०१२ मध्ये गुजरातमध्ये परतल्यावर शूट करण्यात आला होता.

भाजपा समर्थक असा दावा करतात की अमित शहांनी २०१२ मध्ये त्यांच्या या व्हिडिओत जो शेर म्हटला होता तो चिदंमबरम यांच्याशी संबंधित होता. हा व्हिडीओ आणि त्यामागचे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ ..

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, देशात युपीए २ चा शासन काळ सुरु होता. चिदंबरम त्यावेळी गृहमंत्री होते. २००८ साली झालेल्या मुंबई आतंकवादी हल्ल्यांनंतर शिवराज पाटील यांना बाजूला करून चिदंबरम यांच्या गळ्यात गृहमंत्रीपद पडले होते.



त्यावेळी सोहराबुद्दीन शेख एन्काउंटरच्या खटल्यात सीबीआयने अमित शहा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

२५ जुलै २०१० रोजी अमित शहा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. या अटकेच्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी भाजपा कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली होती, यात त्यांनी दावा केला होता की त्यांना सोहराबुद्दीन खटल्यात गोवले जात आहे आणि त्यांच्यावर राजनीतीने प्रेरीत ह*ल्ले चढवले जात आहेत. ते हे देखील म्हणाले होते की हे प्रकरण न्यायपालिकेत टिकू शकणार नाही.

सीबीआयने ज्यावेळी शहांच्या विरोधात अटक वॉरंट काढले तेव्हा शहा चार दिवस बेपत्ता होते. २९ ऑक्टोबर २०१० ला त्यांना जामीन मिळाला. परंतु जामीन मिळाल्यानंतर देखील त्यांच्या गुजरात वापसीवर बंदी आणण्यात आली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

अमित शहा २ वर्षे गुजरात पासून लांब होते. २०१२ च्या गुजरात निवडणुकीपूर्वी त्यांना गुजरातला परतण्याची परवानगी मिळाली. ते गुजरातला परतले आणि त्यांनी एका प्रेस मिटिंगची घोषणा केली, या मीटिंगमध्ये त्यांनी एक शेर म्हटला होता:-

मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लौटकर जरूर आऊंगा

त्या मीटिंगमधील हा शेर म्हणतानाचा व्हिडीओ भाजपा समर्थकांनी चिदंमबरम यांच्या अटकेवेळी व्हायरल केला होता. भाजपा समर्थकांचा असा दावा होता की चिदंबरम यांनी अमित शहांच्या विरोधात रचलेल्या राजकीय षडयंत्राचे फळ त्यांना मिळत आहे.

चिदंबरम यांना जेंव्हा अटक करण्यात आली आणि सीबीआयने त्यांची कस्टडी घेत मनीलाॅंड्रिंग प्रकरणात त्यांची कसून चौकशी केली होती. त्यांना अटक करण्याच्या वेळी देखील खुप मनोरंजक घटनाक्रम घडून आला होता. त्यावेळी काँग्रेस समर्थकांनी दावा केला होता की भाजपा हा पक्ष यासाठी जबाबदार असून अमित शहा सुडाचे राजकरण खेळत आहे.

त्या काँग्रेस समर्थकांना उत्तर देण्यासाठी भाजपा समर्थक अमित शहांचा जुना व्हिडीओ व्हायरल करत होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आज देशातल्या घराघरात भगवद्गीता दिसते ती गोरखपूरच्या ‘गीता प्रेस’मुळे..!

Next Post

इतक्या वर्षांनंतरही काश्मिरी पंडित विस्थापितांचं आयुष्य जगत आहेत

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

इतक्या वर्षांनंतरही काश्मिरी पंडित विस्थापितांचं आयुष्य जगत आहेत

'कामराज प्लॅन'मुळे कॉंग्रेस पक्ष संघटनेत आलेली मरगळ दूर झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.