The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज इंदिराजींच्या ठाम निर्णयामुळेच बांग्लादेश पाकिस्तानाच्या तावडीतून सुटलाय

by द पोस्टमन टीम
27 December 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन भाग पडले. पाकिस्तानमधील या दोन्ही भागांत सतत कुरबुरी होत असत. १९७१च्या दरम्यान पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अराजक माजले होते. पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशमध्ये लष्करी कारवाई सुरु केली होती.

या भागातून लाखोंच्या संख्येने निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या निर्वासितांना अन्न आणि निवारा पुरवणे देखील भारत सरकारसाठी आव्हानात्मक काम होते. यावर कायमचा इलाज करणे भाग आहे, हे इंदिरा गांधीनी ओळखले होते. त्यासाठी त्या कंबर कसून कामाला लागल्या.

१९७१ सालच्या सार्वजनिक निवडणुकांत विजय मिळाला असला तरी इंदिराजींसाठी ही लढाई अगदी अटीतटीची होती. याचवेळी कॉंग्रेसमध्ये फुट पडली होती आणि इंदिरा कॉंग्रेसची ही पहिलीच लढाई होती. या निवडणुकीत “त्यांनी गरिबी हटाव”चा नारा दिला होता.

परंतु सत्तेवर येताच इंदिराजींनी सगळ्यात पहिले हातात घेतले ते पूर्व पाकिस्तानच्या समस्येला.



इंदिरा गांधी १९७१ साली लेहच्या दौऱ्यावर गेल्या तेव्हाच त्यांनी पाकिस्तानसोबत यु*द्ध करण्याची योजना आखली होती. 

पंतप्रधान पदावर असताना इंदिराजी कित्येक वेळा लेह दौऱ्यावर गेल्या होत्या पण, १९७१ सालचा त्यांचा लेह दौरा विशेष होता. यावेळी त्यांनी पाकिस्तानसोबत यु*द्ध करण्याचे मनावर घेतले होते. यावेळी त्या लेहमध्ये सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी गेल्या होत्या. १९७१ साली लेहमध्ये काहीच कारवाई करण्यात आली नव्हती पण तरीही त्यावेळी इंदिराजींनी देशातील सर्वच सैनिकी छावण्यांना भेट दिली होती.

१९७१च्या ऑगस्टमध्ये इंदिराजींनी लेहला भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात त्या सतत पूर्व पाकिस्तान आणि तिथून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विस्थापितांच्या लोंढ्याबद्दल त्या बोलत होत्या. या भाषणातून त्यांनी सूचकपणे सैनिकांना आगामी काळात यु*द्धासाठी सज्ज राहण्याचे संकेत दिले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

१९७१च्या मार्चमध्ये सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांत इंदिराजींना खूप संघर्षाने विजय खेचून आणावा लागला. याच वर्षी मे-जूनच्या दरम्यान पूर्व पाकिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

पूर्व पाकिस्तानमध्ये खू*न-मारामारी आणि अटकसत्र यांना उत आला होता. त्यामुळे लोक देश सोडून भारतात येऊ लागले होते. लाखोंच्या संख्येने देशात येणाऱ्या निर्वासितांची योग्य सोय करणे सरकारसाठी जिकिरीचे काम बनले.

तेंव्हाच त्यांनी ठरवले की, पाकिस्तानच्या या समस्येत हस्तक्षेप करून पाकिस्तानचे तुकडे केल्याशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली.

जुलैमध्येच त्यांचा पाकिस्तानसोबत यु*द्ध करण्याचा निश्चय झाला. ऑगस्टपर्यंत यु*द्धाची तयारी करण्याची त्यांनी योजना आखली होती. हीच इच्छा मनात ठेवून त्या लेहच्या दौऱ्यावर गेल्या. सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी सांकेतिक भाषेत सैनिकांना आगामी काळासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला. त्यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे कौतुक केले.

इंदिराजी लेह दौऱ्यावर गेल्या तेव्हाच भारत आणि पाकिस्तान दरम्यान यु*द्ध होण्याचे संकेत मिळत होते. पाकिस्तान आणि भारतादरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल असे वाटत होते. त्यावेळी पाकिस्तानची सूत्रे सैन्य अधिकारी यांच्या हातात होती.

ऑगस्टमध्ये लेहच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी आपली रणनीती अंमलात आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. सप्टेंबरमध्ये त्या रशियाच्या दौऱ्यावर गेल्या. तिथे राष्ट्रपती लियोनिद ब्रेझनेव यांची भेट घेतली. त्यांच्याशी पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती कशी हाताबाहेर चालली आहे, याबाबत चर्चा केली.

भारत आता गप्प न बसता पाकिस्तानच्या समस्येमध्ये हस्तक्षेप करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. यासाठी रशियाची मदतही मागितली. ब्रेझनेव यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इथेच रशिया-भारत मैत्रीचे नवे पर्व सुरु झाले.

पुढे ऑक्टोबरमध्ये इंदिराजींनी पुन्हा सैनिकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न सुरु ठेवले.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची भेट घेण्याच्या इच्छ्ने त्या अमेरिकेत पोहोचल्या. रिचर्ड यांच्याशीही त्यांनी पूर्व पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. या संबंधात भारत अधिक काळ संयम राखू शकत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

परंतु निक्सन यांनी त्यावेळी इंदिराजींचे म्हणणे एकूण घेतले नाही. इंदिराजी आणि रिचर्ड निक्सन यांची ही भेट फारच अनौपचारिक ठरली. निक्सन आपले म्हणणे ऐकून घेण्याऐवजी आपल्यालाच ऐकवत आहेत हे दिसताच त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसमोर स्पष्टपणे आणि ठामपणे आपला निर्धार व्यक्त केला.

३ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी पूर्व पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई सुरु केली. त्याच दिवशी इंदिराजींनी कोलकत्ता येथे ब्रिगेड परेड ग्राउंडवर एक मोठी रॅली आयोजित केली. या रॅलीला संबोधित करताना त्या खूपच आत्मविश्वासाने बोलत होत्या.

कलकत्त्याहून दिल्लीला परतताच त्यांनी संसदेत पूर्व पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याची कारवाई सुरु झाल्याची माहिती दिली.

इंदिराजींच्या या ठाम आणि कठोर निर्णयामुळे पूर्व पाकिस्तान अलग झाला आणि स्वतंत्र बांग्लादेशाची स्थापन होऊ शकली. स्वतंत्र बांग्लादेशाच्या निर्मितीत इंदिराजींनी दिलेले हे योगदान इतिहास कधीच विसरू शकणार नाही.

ज्या पद्धतीने त्यांनी या यु*द्धाची रणनीती आखली आणि ती यशस्वी रित्या अंमलात आणली ती पाहता त्यांना दिलेली आयर्न लेडी ही पदवी किती सार्थ आहे, याची खात्री पटते. यानंतरही त्यांनी अनेकदा लेह दौरे केले पण, १९७१चा लेह दौरा यासाठी खास होता कारण याच दौऱ्यात पाकिस्तानला धडा शिकवून बंगलादेशच्या निर्मितीची बीजे रोवली गेली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच सिंहगड अनेक पक्ष्यांचं घर देखील जपतोय

Next Post

भारताने जगाला आयुर्वेदिक शाम्पू दिला, त्यांनी त्यात केमिकल मिसळून आपल्यालाच विकला

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

भारताने जगाला आयुर्वेदिक शाम्पू दिला, त्यांनी त्यात केमिकल मिसळून आपल्यालाच विकला

कित्येक पुरस्कार मिळवलेला हा पाकिस्तानी शायर आजही चपला शिवतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.