The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टॅलिनच्या सत्तेच्या हव्यासात त्याच्या सख्ख्या मुलाचा बळी गेला होता

by द पोस्टमन टीम
16 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सत्तापिपासू लोकांमधील संघर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो. कधी कधी या निष्पाप लोकांमध्ये माथेफिरू सनकी हुकुमशहांचे जवळचे नातेवाईकही असू शकतात. याकोव्ह झुगाशविली हा असाच एक तरुण जो विसाव्या शतकातील सर्वांत शक्तिशाली व्यक्तीचा मुलगा होता, तरीही त्याला आत्मह*त्या करून आपले आयुष्य संपवावे लागले.

सोव्हिएत युनियनचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलिनचा हा सर्वांत मोठा मुलगा. एवढ्या शक्तिशाली व्यक्तीचा मुलगा असूनही याकोव्हला आत्मह*त्या करावी लागली. कधीकधी अशा शक्तीशाली लोकांचे नातेवाईक असणे हीच एक मोठी दुर्भाग्याची गोष्ट असते. याकोव्हच्या वाट्याला हेच दुर्भाग्य आले. स्टॅलिनचा मुलगा असण्याची किंमत त्याला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली.

जर्मनीमधील बर्लिनपासून ३० किमी अंतरावर साचेसेनहोसेन इथे छळछावणी उभारण्यात आली होती. या छावणीत यु*द्धात पकडलेल्या रशियन सैनिकांना कैद करून ठेवण्यात आले होते. जवळपास दोन वर्षे हे कैदी आपल्या नशिबाचा कौल कोणत्या बाजूने पडणार याची वाट बघत दिवस ढकलत होते.

त्यांच्या या परिस्थितीला त्यांचा नेता जोसेफ स्टॅलिनच जबाबदार होता. ज्याने त्यांना या यु*द्धात ढकलून तर दिले पण त्यांना पुरेशी आणि आधुनिक शस्त्रास्त्रे देखील पुरवली नाहीत.



कैद्यांचे जीवन जगणे असह्य झालेल्या अशाच एका तरुण कैद्याने एका संध्याकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आपले आयुष्य संपवले. यु*द्धाचा निकाल काय लागेल, कोण हरेल कोण जिंकेल याच्याशी त्याला काही देणे-घेणे नव्हते.

हा तरुण म्हणजेच रशियाच्या तोफखान्याचा प्रमुख आणि रशियाच्या प्रमुख नेत्याचा मुलगा याकोव्ह झुगाशविली.

याकोव्हचा जन्म १८ मार्च १९०७ रोजी बोर्जी येथे झाला. याकोव्ह जॉर्जियातच मोठा झाला. सोव्हिएतच्या राजधानीपासून हे शहर बरेच लांब होते. त्यामुळेच स्टॅलिन आणि याकोव्हमध्ये कधीच प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले नाहीत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९४१ साली जर्मन सैन्याने सोव्हीएत युनियनवर ह*ल्ला केला. त्यामुळे सोव्हिएतच्या सर्वच नेत्यांचे लक्ष फक्त यु*द्धावर केंद्रित झाले. स्मॉलेंस्कच्या यु*द्धभूमीवर लढलेल्या या लढाईत रशियाचे २,५०,००० सैनिक मृत्यूमुखी पडले. याच यु*द्धात स्टालिनचा मुलगा याकोव्ह देखील होता.

१९४१च्या या ह*ल्ल्यात जर्मन सैन्याने याकोव्ह झुगाशविली याला कैद केले आणि त्याला सॅचेसेनहौसेन येथील छळछावणीत ठेवण्यात आले. या छळछावणीत अनेक रशियन यु*द्धकैदी होते.

आधीच स्टॅलिनसारख्या क्रू*र पित्याच्या सहवासात राहिलेल्या याकोव्हची मानसिकता फारशी चांगली नव्हती. याकोव्हचे एका ज्युईश महिलेसोबत संबंध होते. जे स्टॅलिनला अजिबात मान्य नव्हते आणि त्याने दोघांना एकमेकांपासून विलग केले. स्टॅलिनचा आपल्या मुलाचाही तिरस्कार करत असे. या प्रेमभंगानंतर याकोव्ह आतून खचून गेला.

“माझा मुलगा इतका भेकड आहे की तो आत्मह*त्या करण्यासही सक्षम नाही,” अशा शब्दात स्टालिन त्याची नेहमी हेटाळणी करत असे. स्टालिनचे हे हेटाळणीयुक्त शब्द याकोव्हचा सातत्याने पिच्छा करत राहिले.

यामुळे पितापुत्रांमधील अंतर आणखीनच वाढत गेले. म्हणूनच कदाचित त्याने आत्मह*त्येचा पर्याय निवडला असेल.

जर्मनीमधील छळछावणीत याकोव्ह ब्रिटीश आणि जर्मन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. या छळछावणीत असतानाच त्याला केटीन फॉरेस्ट ह*त्याकांडाची माहिती मिळाली. या ह*त्याकांडाची क्रू*र कथा ऐकल्यानंतर आधीच त्याची मानसिक अवस्था आणखीनच ढासळली. या ह*त्याकांडाने त्याला असे काही पछाडून टाकले की तो पूर्णतः निराशेत डुंबून गेला आणि याच निराशेच्या गर्ततेत असताना त्याने आत्मह*त्या केली.

याकोव्ह हा स्टॅलिनचा मुलगा आहे, हे माहित असूनही जर्मन सैन्याने त्याच्यासमोर ना*झी अधिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव त्याने फेटाळून लावला. मात्र, जर्मन सैन्याला आपलाच प्रपोगंडा पुढे रेटायचा असल्याने त्यांनी याचा अगदी उलटा प्रचार करून याकोव्हने शरणागती पत्करल्याचा खोटा प्रसार सुरु केला. हा अपप्रचार पसरवण्यासाठी त्यांनी खोटी पत्रके छापून वाटली.

याकोव्ह झुगाशविली याच्या कैदेबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. काहींच्या मते स्टॅलिनने आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला सोडवण्यासाठी त्याने दोनदा योजना आखल्या पण, दोन्ही योजना अपयशी ठरल्या. यु*द्धाच्या शेवटी स्टॅलिनने याकोव्हचा मागमूस काढण्यासाठी त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले. परंतु या कथांना तसा कोणताही ठोस पुरावा नाही.

१९४३ साली स्टालिनगार्डच्या यु*द्धात सोव्हिएत सैनिकांनी मार्शल फ्रेडरिक वॉन पॉल्स याला कैदेत टाकले. जर्मन सैन्याने मार्शल यांच्या बदल्यात याकोव्हला सोडण्याची तयारी दाखवली. परंतु, स्टॅलिनने याला नकार दिला.

“एका सैनिकासाठी मी मार्शलला सोडणार नाही. याकोव्ह हा एकटाच माझा मुलगा नाहीये, माझे असे लाखो मुले आहेत जी जर्मनीच्या कैदेत आहेत. तुम्ही त्या सगळ्यांनाच सोडणार असाल तर ठीक आहे. नाही तर, त्या लाखो रशियन मुलांचे जे काही होईल तेच याकोव्हचेही होईल.” असे त्याचे शब्द होते.

हे शब्द एका अगतिक पित्याचे आहेत की एका क्रू*र सत्ताधीशाचे आहेत हेच कळत नाही. स्टॅलिनला मात्र आपल्या मुलाला होणाऱ्या त्रासाशी काहीही देणेघेणे यातून स्पष्ट होते.

कदाचित कैद्यांची अशी अदलाबदल करत राहिल्याने लोकांचा विश्वास उडेल किंवा आपण एक कमकुवत नेते आहोत हे दिसू नये म्हणून त्यांनी चर्चेचा पर्याय फेटाळून लावला असेल. याकोव्हची कैद आणि त्यावर स्टॅलिनची प्रतिक्रिया याबाबत आज बऱ्याच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात.

स्टॅलिनचा मुलगा असण्याची किंमत फक्त याकोव्हलाच नाही तर स्टॅलिनच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे नातेवाईक असण्याची किंमत मोजावी लागली. स्टॅलिनची दुसरी पत्नी नादेज्जा हिने देखील १९३२मध्येच आत्मह*त्या केली होती.

सत्तेसाठी स्टालिनने आपल्या कुटुंबांची आणि देशवासीयांचीही पर्वा केली नाही. सत्तेची नशा माणसाला कोणत्या पातळीवर नेऊ शकते हे पाहण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतीय सैन्यात दाखल झालेल्या राफेलचं नामकरण या व्यक्तीच्या नावावरून होणार आहे

Next Post

पुण्यातील या उद्योजकाने सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्याचा विडा उचललाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पुण्यातील या उद्योजकाने सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्याचा विडा उचललाय

शापूरजी साक्लतवाला: भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेला ब्रिटीश खासदार

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.