भारतीय सैन्यात दाखल झालेल्या राफेलचं नामकरण या व्यक्तीच्या नावावरून होणार आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


फ्रांसच्या डिसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण झाला आणि काळ, २९ जुलै २०२०ला ५ राफेल विमानांनी भारतात प्रवेश केला. भारतातील हवाई दलात दाखल होणाऱ्या या लढाऊ विमानाला भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया यांचे नाव दिले जाणार आहे.

देशातील पहिल्या राफेल विमानाचा टेल नंबर असणार आहे, आरबी-०१.

२९ जुलै रोजी भारतात दाखल झालेल्या पहिल्या पाच राफेल विमानाच्या मागच्या बाजूला आरबी-१ ही अक्षरे असणार आहेत.

एअर मार्शल आरकेएस भदौरिया हे हवाई दलाचे २६वे हवाई प्रमुख आहेत. राकेश भदौरिया हे उत्तर प्रदेश महील आग्रा येथील आहेत. पुण्यातील राष्ट्रीय सरंक्षण अकादमी (एनडीए) मधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. बांग्लादेश येथील कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

जून १९८०मध्ये ते भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये दाखल झाले. त्यांना “स्वॉर्ड ऑफ ऑनर” हा सम्मान मिळाला आहे.

हवाई दलात त्यांनी तब्बल चार दशकांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

या चार दशकात त्यांनी चार हजार दोनशे पन्नास तासांपेक्षा अधिक काळ त्यांनी “फिल्डवर” म्हणजे एअर स्पेसमध्ये घालवला आहे. त्यांनी मिग-२१ सारखी २६ विविध प्रकारची लढाऊ विमाने आणि हवाई जहाज चालवली आहेत.

याशिवाय ते एअर स्टाफचे चीफ असिस्टंट, वरिष्ठ एअर स्टाफ अधिकारी, डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ आणि दक्षिण एअर कमांडचे हवाई प्रमुख अधिकारी देखील राहिले आहेत.

“तेजस”सारख्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या (एलसीए) निर्मितीतही भदौरिया यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या विमान जोडणीचे काम नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटर (एनएफटीसी) येथे झाले आहे. भदौरिया या विमानाचे टेस्ट पायलट होते. एनएफटीसीमध्ये ते प्रोजेक्ट डायरेक्टर असल्याने एलसीए प्रोजेक्ट त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाला.

राफेलच्या खरेदी व्यवहारासाठी भारताच्या वतीने जी टीम बनवण्यात आली होती, त्यातही भादौरीयांचा समावेश होता. या भारतीय निगोशिएटींग टीमचे ते अध्यक्ष होते.

राफेल डीलचा व्यवहार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भारत आणि फ्रांस या देशांमध्ये सप्टेंबर २०१६ साली राफेल फायटर जेट्सच्या खरेदीचा करार करण्यात आला. ५८,००० करोड रूपयात ३६ रायफल फायटर जेट्स खरेदी करण्यात आले.

हे रायफल जेट्स अधिक शक्तीशाली शस्त्रास्त्रे अगदी मिसाईलदेखील वाहून नेऊ शकतात. हवाई दलाने या लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. मे २०२० पर्यंत ही लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल होतील अशी अपेक्षा होती. मात्र कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर आता ही राफेल्स लष्करात दाखल होण्यास आणखी थोडा अवधी लागला.

शेवटी २९ जुलै २०२० रोजी राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. हा दिवस भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस ठरला आहे.

राफेल करार आणि खरेदीवरून देशात बराच गोंधळ झाला होता. कॉंग्रेसने पंतप्रधान श्री. मोदी  आणि इतरही भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राफेलवरून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. पण, कोर्टाने पंतप्रधान श्री. मोदी आणि या व्यवहारातील इतर भागीदारांना क्लीन चीट देऊन या व्यवहारात कोणताच भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले.

सुरुवातीला अंबाला एअर फोर्स स्टेशनवर हे एअरक्राफ्ट तैनात करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अंबाला एअर फोर्स स्टेशन हे भारतीय हवाई दलातील सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असाणारे हवाई स्टेशन असल्याचे म्हटले जाते. अंबाला एअरफोर्स स्टेशन हे भारतीय हवाई दलातील सर्वात जुन्या स्टेशनपैकी एक आहे. या हवाई स्टेशनला १०० वर्षे जुना इतिहास आहे.

१९१९ साली रॉयल एअर फोर्सने या हवाई तळावर ९१ स्क्वॅड्रनची स्थापना केली होती. ब्रिटीशांच्या काळापासून हे हवाई तळ हवाई दलातील एक प्रमुख तळ आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय वैमानिकांना याच विमानतळावर प्रशिक्षण देण्यात आले होते.

२९ जुलै रोजी राफेलची विमाने या अंबाला विमानतळावर उतरल्यानंतरचा क्षण हा अंबाला विमानतळाच्या इतिहासातील सुवर्णक्षणांपैकी एक आहे.

८ ऑक्टोबर २०१९ रोजी पॅरीस येथून सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पहिले राफेल लढाऊ विमान ताब्यात घेतले. ८ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस आहे.

राफेल विमानांना तातडीने हवाई दलात सामावून घेण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी भारतीय हवाई दलाने केलेली आहे.

राफेल तांत्रिकदृष्ट्या सर्वात आधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते. या विमानाला तशी २१२५ किमी इतका वेग आहे. कमाल ६५,६२० फुटावरून हे विमान उड्डाण करू शकते. १८५० किमी पर्यंत (दुहेरी ३७०० किमी) हे विमान हल्ला करू शकते.

राफेलकडे अणू क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. चीन आणि पाकिस्तानकडील विमानांमध्ये अशी क्षमता असणारी लढाऊ विमाने नाहीत. राफेलमुळे चीन आणि पाकिस्तानवर वचक बसेल असा अंदाज आहे. राफेल शत्रूसाठी कर्दनकाळ ठरणार हे मात्र निश्चित.

दसोच्या वेबसाईटवर राफेलचे वर्णन करताना त्याला ओमानिरोल असे लिहिले आहे. ओमानिरोल म्हणजे सर्वगुणसंपन्न!

भारतीय संरक्षण दलात राफेलचे आगमन झाल्याने भारतीय सैन्याची क्षमता आता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. राफेलचे भारतीय संरक्षण दलात आगमन होण्याचा हा क्षण इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांपैकी एक आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!