The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“हजार द्या दोन हजार वापस देतो” असं ट्विट बिल गेट्स, एलोन मस्क, ओबामा यांनी केलं होतं

by द पोस्टमन टीम
31 May 2025
in विश्लेषण, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


सध्याचं युग हे “डिजिटल” युग आहे असं म्हणतात. आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲपने जग आपल्या हातावर आणून ठेवलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

यातच अजून एक प्लॅटफॉर्म म्हणजे ट्वीटर (एक्स). अगदी एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यापासून ते मोठमोठे कलाकार, राजकीय नेते, उद्योगपती सगळेच आज ट्वीटर वापरताना दिसतात. आपल्या चाहत्यांशी संपर्क ठेवण्यासाठी हे एक उत्तम साधन सिद्ध झालंय.

पण, कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. तसेच या डिजिटल प्लॅटफॉर्मचे देखील आहेतच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा. त्याबद्दल तुम्ही अगदी १००% खात्री घेऊ शकत नाही. एखादा एक्स्पर्ट तुमचं अकाऊन्ट हॅक करून तुमच्या फोन, लॅपटाॅपमधून माहिती कधीही काढून घेऊ शकतो. तुमच्या फोनवरून कोणालाही त्याला हवा तो संदेश पाठवू शकतो.

जुलै २०२० मध्ये, बिल गेट्स, एलोन मस्क, बराक ओबामा, वॉरन बफे अशा अनेक नावाजलेल्या व्यक्तींचे ट्वीटर अकाउंट्स हॅक करून त्यावरून काही ट्विट्स करण्यात आले.



“प्रत्येक जण मला सांगत आहे की मी या समाजाचे देणे लागतो. मी आज ते परत करतो आहे. तुम्ही मला  $१००० चे बीटकाॅइन पाठवा मी तुम्हाला  $२००० इतक्या किंमतीचे परत पाठवीन. ऑफर फक्त पुढील ३०  मिनिटांसाठीच”, अशा आशयाचे ट्वीट सगळ्यांच्या अकाऊंटवरून करण्यात आले. 

याबाबत ट्वीटरला देखील काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. थोड्याच वेळात सगळ्या अकाउंट्सवरून हे ट्वीट डिलीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉईन्सच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्याबरोबरच बिटकाॅइन म्हणजे काय? ते कसे वापरतात? कसे विकत घेतात? असे प्रश्नं डोकं वर काढू लागलेत, त्यासाठी हा लेखनप्रपंच.

बिटकाॅइन म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या संकल्पनेची पहिली अंमलबजावणी आहे. सातोशी नाकामोटो नावाने या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. पण ही एक व्यक्ती आहे की एखादा ग्रुप आहे याबाबत अजूनही संदिग्धता आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

बिटकाॅइन म्हणजे काय?

बिटकाॅइन एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे, डिजिटल चलन.

याचाच अर्थ हे चलन आभासी आहे, तुम्ही हे बिटकाॅइन खरेदी करायला वापरू शकता पण फार कमी दुकानं आहेत जिथे हे स्वीकारले जातात. बिटकाॅइनला त्याच्या एका विशिष्ट कोडशिवाय काहीच किंमत नाही.

बिटकाॅइन काम कसं करतात?

प्रत्येक बिटकाॅइन ही आपल्या फोनमधल्या ऍपमध्ये सेव्ह केलेली एक फाईल असते. लोकं तुमच्या डिजिटल वाॅलेटमध्ये हे कॉइन पाठवतात आणि तुम्ही पण याच स्वरूपात त्यांना परत करू शकता.

कोणी किती बिटकाॅइन खर्च केले, स्वतःचेच बीटकाॅइन खर्च करताय का या सगळ्या गोष्टींचा एक ट्रॅक ठेवण्यासाठी एक पब्लिक लिस्ट असते. .

बिटकाॅइन विकत कसे घेतले जातात?

तुम्ही तीन प्रकारानं बिटकाॅइन साठवू शकतात.

  • “खरे पैसे” मोजून तुम्ही बिटकाॅइन विकत घेऊ शकता.
  • काही वस्तू विकून त्याबदल्यात बिटकाॅइन घेऊ शकता.
  • तुम्ही कम्प्युटरवर बिटकाॅइन तयार करू शकता.

नवीन बिटकाॅइन कसे तयार करतात?

नवीन बिटकाॅइन तयार करण्याच्या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. यासाठी एक खास हार्डवेअर असलेलं संगणक वापरण्यात येतं. एका फिक्स रेटने बिटकाॅइन तयार केले जातात. थोडक्यात, आपण जसं सोनं खणतो तसेच हे बिटकॉइन खणावे लागतात फक्त संगणकावर.

यासाठी तुमच्या संगणकाला मोठे मोठे काही गणितं सोडवावे लागतात ज्यातून हे बिटकॉइन तयार होतात. त्यातला एखादा तुम्हाला मिळण्याची शक्यता असते.

पण तुम्ही कितीही बिटकॉइन माईनिंग करून शोधू शकता का? तर, नाही!

एकूण बिटकॉइनचा आकडा एकवीस मिलियन एवढा फिक्स केलेला आहे. त्यातले चार मिलियन बिटकॉइन अजून चलनात आले नाहीत.

पण ही प्रक्रिया फार किचकट आहे आणि जर माईनर्सची संख्या वाढली तर ही अजून कठीण होत जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही आत्ता माईनिंग सुरु केलं तर एक बिटकाॅइन कमवायला तुम्हाला काही वर्षं लागतील.

बिटकाॅइन सुरक्षित आहेत का?

बिटकाॅइनचं प्रत्येक ट्रान्सॅक्शन हे ऑनलाईन असतं आणि सार्वजनिक असतं. त्यामुळे यात खोट्या नोटा, बँका लुटणे असा प्रकार नसतो. पण, तुमचं बिटकॉइन वाॅलेट सुरक्षित असेलच असं नाही.

मध्यंतरी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये एका व्यक्तीने असेच बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवा, दर महिन्याला जास्ती टक्क्यांनी परत मिळतील असे सांगून कित्येक लोकांना यात फसवले.

२००९ साली आलेल्या या बिटकाॅइनची किंमत सोन्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. आजच्या घडीला एक बिटकाॅइन म्हणजे जवळजवळ ५६,८७,५१८ रुपये. प्रक्रिया अवघड असल्याने सामान्य लोकं हे घेण्याच्या फार भानगडीत पडत नाहीत. शिवाय, बिटकॉइनच्या सुरक्षिततेवर कायमच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं त्यामुळेही याची फार विश्वासार्हता नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा:फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

केरळमधील या एकट्या माणसाने तब्बल १००० सुरंग विहिरी खोदल्या आहेत

Next Post

या माणसाने भारतात छापील पुस्तकांचा काळ आणला, गालिबच्या कविताही प्रकाशित केल्या

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या माणसाने भारतात छापील पुस्तकांचा काळ आणला, गालिबच्या कविताही प्रकाशित केल्या

मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना 'धर्म' दिला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.