The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुर्की कॉफीमुळे एका साम्राज्याचा अस्त होऊन एक स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता !

by द पोस्टमन टीम
15 January 2026
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा :फेसबुक | युट्युब 


कॉफी हे सध्या जगभरात पिलं जाणारं एक प्रसिद्ध पेय आहे. कामाचा स्ट्रेस आल्यावर असो अथवा एखादी रोमँटिक डेट, कॉफी एक महत्वाची भूमिका बजावत असते. अनेकांना कॉफी आवडते तर अनेकांना कॉफी अजिबात आवडत नाही. चहाप्रेमी आणि कॉफीप्रेमी यांच्यात शीतयु*द्ध कायम सुरू असतं.

या कॉफीला साम्राज्यवाद व मध्ययुगीन व्यापाराचा मोठा इतिहास आहे. कॉफीमुळे भूतकाळात अनेक घटना घडून गेल्या आहेत ज्यांची साक्ष इतिहास आज देतो आहे.

पण या कॉफीमुळे एक अख्खं साम्राज्य लयाला गेलं होतं, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

आश्चर्य वाटलं असेल ना, की तुम्ही रोज पिता त्या कॉफीमुळे एक अख्खं साम्राज्य कसं लयास गेलं? चला जाणून घेऊ एक रंजक इतिहास..

सोळाव्या शतकाच्या मध्यावधीत तुर्कस्तानात “कावा” नामक कॉफी प्रकार अस्तित्वात होता. त्याकाळी ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं. ऑटोमन साम्राज्याचा विस्तार हा युरोप पासून पर्शियापर्यंतच्या विस्तृत प्रदेशावर होता. त्यामुळे कावा हा कॉफीचा प्रकार सर्वदूर पसरला आणि लोकप्रिय झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ऑटोमन साम्राज्याचा पाडाव होण्यास सुरुवात झाली, त्यात या ‘कावा’ कॉफीने छोटा परंतु लक्षणीय वाटा उचलला होता.



टर्कीमध्ये कॉफीचा प्रवेश सुलतान सुलेमानच्या काळात झाला. त्याने येमेनमध्ये पाठवलेल्या त्याच्या सरदारांनी तिथे कहावा नामक कॉफीचा आस्वाद घेतला.

त्यांना त्या कॉफीची चव इतकी आवडली की त्यांनी ती कॉफी ऑटोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टिटीनोपल अर्थात आजच्या इस्तंबूलला राजदरबारात आणली आणि काही काळातच हा कॉफी प्रकार सर्वदूर प्रसिद्ध झाला.

या कॉफीची लोकप्रियता इतकी होती की ती कॉफी तयार करणाऱ्या लोकांना कॉफी मास्टर म्हणून संबोधले जात असे. या कॉफी मास्टरांच्या हाताखाली काम करायला १० असिस्टंट होते.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

अरेबिका नावाच्या कॉफी बियांपासून अत्यंत बारीक कॉफी पावडरची निर्मिती करण्यात येत होती. हा कॉफी प्रकार बहुतांशी आजच्या इन्स्टंट एक्सप्रेसोशी मिळताजुळता होता. ही कॉफी लहान चिनीमतीच्या भांड्यात लोकांना प्यायला दिली जात असे. त्या कॉफीचा कडवटपणा घालवण्यासाठी सुलेमानच्या पत्नीने तिचा कावा पाण्यासोबत मिक्स करून प्यायली आणि पुढे अश्याप्रकारची कॉफी सर्वदूर प्रसिद्ध झाली. आजही टर्कीत लोक अश्याच प्रकारे कॉफी प्राशन करतात.

मुस्लिमांना या उत्तेजक कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी परवानगी दिली होती, असं लोकांनी गृहित धरलं. पण इस्लामिक दस्तावेजात तसा उल्लेख देखील आढळून आला नव्हता. उलट जाळून तयार करण्यात आलेल्या द्रव्याला हात लावायला मुस्लिमांना सक्त मनाई करण्यात आली होती. परंतु असे असून देखील याचा कुठलाच परिणाम कॉफीच्या मागणीवर झाला नाही.

१५५५ साली दोन सीरियन व्यापाऱ्यांनी इस्तंबूलमध्ये पहिल्या कॉफी शॉपची स्थापना केली. काही काळातच शहराच्या कानाकोपऱ्यात या कॉफीचा खप व्हायला सुरुवात झाली. अगदी काही काळातच हा कॉफी प्रकार संपूर्ण साम्राज्यात प्रसारित पावला.

या टर्कीत नव्याने निर्माण झालेल्या कॉफी शॉप्सच्या रुपात तुर्की लोकांना गप्पा मारायला एक व्यासपीठ मिळालं. या अशाच तुर्की कॉफी शॉपमध्ये लोक तासनतास वेळ घालवू लागले.

राजकारण, समाजकारण आणि अनेक विषयांवर चर्चा घडू लागल्या. या कॉफी शॉपमधूनच तुर्की लोकांच्या मनात असलेला असंतोष बाहेर पडायला व्यासपीठ मिळू लागलं.

सुलतानी राजवटीत महत्वाची पद सांभाळणारी माणसं या कॉफी शॉपमध्ये येणाऱ्या अशिक्षित लोकांना तत्वज्ञान आणि राजकारण समजावून सांगू लागले. इथे घडणाऱ्या चर्चेतून पुढे जाऊन क्रांतीची आणि उठाव करण्याची प्रेरणा तुर्की लोकांमध्ये जागृत झाली. परंतु हे सर्व घडण्याआधी कॉफीच्या स्वरूपात अनेक बदल वेगवेगळ्या राजांनी केले. अठराव्या शतकात या कॉफी शॉपचा धोका तिथल्या राज्यकर्त्याच्या लक्षात आला आणि त्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न देखील केला पण त्या कॉफी शॉपमधून मिळणाऱ्या घसघशीत महसूलामुळे त्याने कारवाई केली नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीत या कॉफी शॉप्सची लोकप्रियता शिगेला पोहचली.

पूर्व युरोपच्या प्रदेशात असलेल्या ख्रिस्तीबहुल भागातील कर्मठ ख्रिश्चन लोकांनी साम्राज्याविरोधात स्वातंत्र्य संग्रामाची घोषणा केली. या सर्व स्वातंत्र्य संग्रामाची योजना या कॉफी शॉप्समध्ये बसून तयार करण्यात आली होती. थेसालोनिकी, सोफिया आणि बेलग्रेडच्या कॉफी शॉप्समध्ये राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांची धोरणं आखली होती.

त्यांच्या कॉफी मिश्रित प्रयत्नांमुळेच १८२१ ला स्वतंत्र ग्रीस अस्तित्वात आलं, पुढे त्याचाच कित्ता गिरवत १८३५ मध्ये सर्बिया अस्तित्वात आलं आणि १७७८ मध्ये बल्गेरिया अस्तित्वात आलं. कावामुळे एक अख्खं साम्राज्य लयास गेलं होतं.

पुढे या कावाचं असंख्य वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर होत राहिलं. ग्रीक – क्रोएशियन – अरेबिक अश्या तीन वेगवेगळ्या पद्धतीत या कावाची निर्मिती झाली. पुढे चीनमध्ये स्पेशल ही कॉफी पिणं सोपं असावं म्हणून कपचा आविष्कार करण्यात आला होता.

तुर्की कॉफी बिन्सच्या मनमोहक आस्वादाने ही कॉफी लोकांना आज पण खुश करते आहे. आज ती जगभर उपलब्ध आहे. पण तिला रोज पिणाऱ्या लोकांना तरी कुठे माहिती आहे की तिच्यामागे एक अख्ख साम्राज्य धुळीस मिळवण्याचा इतिहास आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: EuropeHistoryTurk
ShareTweet
Previous Post

‘स्त्रीत्वाचाच’ त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी ‘राणी रुद्रमादेवी’

Next Post

या कीटकांनी आता उत्क्रांतीच्या रेट्यात थेट कीटकनाशकांना ठेंगा दाखवणं शिकून घेतलंय!

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

या कीटकांनी आता उत्क्रांतीच्या रेट्यात थेट कीटकनाशकांना ठेंगा दाखवणं शिकून घेतलंय!

शेवटपर्यंत अदृश्य राहिलेल्या या क्रू*र खु*न्याने संपूर्ण लंडन शहर हादरवून टाकलं होतं!

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.