The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाने ब्रिटनला दुसरं महायुद्ध जिंकून दिलं पण ब्रिटनने त्यांनाच शिक्षा ठोठावली

by केतकी भाले
13 March 2021
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीचा तो काळ. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतरित्या सुरू झाले होते. जपान व इटली जर्मनीच्या बाजुने लढत होते, तर अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, चीन, रशिया ही मित्र राष्ट्रे जर्मनी आणि अक्ष राष्ट्रांविरुद्ध लढत होती.

हिटलर जर्मनीच्या शास्त्रज्ञांना हाताशी धरून अणुबॉम्ब बनवेल आणि साऱ्या जगाचा विनाश करेल ही भीती मित्र राष्ट्रांना सतावत होती. हिटलरची आगेकूच मित्र राष्ट्रांसाठी मोठीच डोकेदुखी बनत चालली होती आणि ही डोकेदुखी आणखी एका कारणामुळे सतत वाढतच चालली होती आणि ते कारण होते – एनिग्मा.

एनिग्मा हे जर्मन शास्त्रज्ञांनी बनवलेले अत्यंत क्लिष्ट असे Encryption Device होते. जर्मनीचे सर्व संदेशवहन या एनिग्मामार्फत होत असे. एनिग्मा सर्व संदेश आधी एका कोडमध्ये बदलत असे आणि मग हा कोड किंवा गुप्त संदेश नियोजित ठिकाणी पाठवला जात असे.

अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर ALAN हा शब्द एनिग्मा मशीनने कोडमध्ये बदलल्यावर कोड मिळत असे : TKMD म्हणजेच पहिले A हे अक्षर T या अक्षराने बदलले गेले आणि दुसऱ्या वेळेस A हे अक्षर M या अक्षराने बदलले गेले. ही कोणत्याही शब्दाच्या Encryption साठी केवळ एक कसोटी झाली. अशा अनेक कसोट्यांचा विचार करता पूर्ण गुप्त संदेश ओळखण्यासाठी अगणित शक्यता असायच्या.



बरं सगळ्या शक्यता तर्काच्या आधारावर पार करून एखादा गुप्त संदेश ओळखता आलाचं तरी एनिग्माच्या सेटिंग्ज रोज मध्यरात्री ठीक १२ वाजता बदलल्या जात असत. म्हणजेच दुसऱ्या दिवशी परत त्या अगणित शक्यतांची चाचपणी करणे आले. या अगणित शक्यता तपासणे हे मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेरचे काम होते. कारण दर वेळेस प्रत्येक अक्षर कोणत्या कोडमध्ये बदलले जाईल हे केवळ आणि केवळ एनिग्मा मशीनच सांगू शकत असे.

अशा या एनिग्मा मशीनचा बिमोड करण्यासाठी नियुक्त करणात आले होते ऍलन ट्युरिंग यांना. कोण होते हे ऍलन ट्युरिंग?

२३ जून, १९१२ ला लंडनमध्ये ऍलन मॅथिसन ट्युरिंग यांचा जन्म झाला. केंब्रिज विद्यापीठातून गणित विषयाची पदवी घेतल्यानंतर ऍलन यांनी अमेरिकेमध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून संशोधनावर काम सुरु केले. १९३६ मध्ये ऍलन यांनी सादर केलेल्या प्रबंधामध्ये “Universal Computing Machine” ची संकल्पना मांडली होती. ही मशीन आज “Universal Turing Machine” म्हणून ओळखली जाते आणि या मशीनला आजच्या आधुनिक संगणकाचा पाया म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मशीन अल्गोरिदमनुसार मांडण्यात आलेली कोणतीही गणिती क्रिया करू शकेल, हे ऍलन यांनी सिद्ध केले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

त्याच दरम्यान पहिल्या महायुद्धात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जर्मनी आतूर झाली होती. जर्मनीचे नवे नवे क्षेपणास्त्रे, पाणबुड्या, लढाऊ विमाने मित्र देशांचे अतोनात नुकसान करत होते. त्यातच जर्मन सरकार आणि सैन्यामध्ये संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एनिग्मा मशीनने मित्र देशांची समस्या अजूनच वाढवली होती. हिटलरला एनिग्माच्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास होता. एनिग्मामार्फत पाठवले जाणारे गुप्त संदेश डीक्रिप्ट करणे हे काम केवळ अवघडच नव्हे तर अशक्य होते.

म्हणूनच हिटलरची घोडदौड रोखण्यासाठी ऍलन ट्युरिंग यांना ब्रिटीश मिलिटरी सर्विसेसतर्फे इंग्लंडमध्ये ब्लेचली पार्क येथे एनिग्मा मशीनचे कोड ब्रेक करण्याच्या प्रोजेक्टवर नियुक्त करण्यात आले होते. ऍलन यांनी एनिग्मा मशीनची यंत्रणा आणि आणि त्याच्या कोणत्याही संदेशाला कोडमध्ये बदलण्याच्या तंत्रावर अभ्यास करून ‘बॉम्ब’ (Bombe) हे मशीन तयार केले.

बॉम्ब हे एक अवाढव्य electro-mechnical मशीन होते. बॉम्ब मशीनमध्ये एकदा इनपुट दिल्यानंतर त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकत होता, तसेच त्या इनपुटवर अनेक क्रिया-प्रक्रिया केल्या जाऊ शकत होत्या.

मित्र देशांसाठी ही यशाची नांदी होती. बॉम्ब मशीनने एनिग्माची संदेश यंत्रणा तोडण्यात यश मिळवल्यामुळे ब्रिटीश सेनेला भरपूर फायदा झाला. जर्मन सेनेच्या बॉम्ब हल्ल्याविषयी अचूक माहिती मिळू लागली. जर्मन पाणबुड्यांमधून पाठवले जाणारे हे संदेश जसे जसे पकडले जाऊ लागले तशी तशी जर्मन पाणबुड्यांची जागा ही निश्चित करता येऊ लागली. त्यानुसार मित्र देश आपली रणनीती बदलू लागले. या सर्वांची परिणीती नाझी जर्मनी व अक्ष देशांच्या पराभवात झाली आणि दुसरे महायुद्ध तब्बल दोन वर्ष आधी संपुष्टात आले.

प्रसिद्ध ब्रिटीश तत्वज्ञ जॅक कोपलंड म्हणतात – “ विसाव्या शतकात संगणकाचा शोध ही एक अतिशय विस्मयकारक घटना आहे. पण त्याहीपेक्षा ऍलन ट्युरिंग यांनी तयार केलेले बॉम्ब मशीन हे आजच्या अत्याधुनिक संगणकाचा आद्य अवतार होते. त्यांनी बॉम्ब मशीनच्या सहाय्याने जर्मनीच्या एनिग्माचा केलेला बिमोड, ही एक महान आणि आश्चर्यकारक घटना होती.”

“Artificial Intelligence” ही संकल्पना सर्वप्रथम ऍलन ट्युरिंग यांनीच मांडली होती. आपले अवघे आयुष्य गणित आणि क्रिप्टोलॉजी या विषयांना वाहिलेल्या ऍलन यांनी मशीनसाठी ट्युरिंग टेस्टच्या माध्यमातून अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली होती जी अगदी मानवी मेंदूप्रमाणेच विचार करून उत्तर शोधून काढेल.

आजच्या दैनंदिन आयुष्यातला भाग झालेला CAPTCHA कोड मधील T हे ट्युरिंग यांच्या कामाच्या गौरवार्थ वापरलेले आहे. या CAPTCHA चा फुल फॉर्म आहे – “Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart“)

आज एक महान गणितज्ञ, तत्वज्ञ, “आधुनिक संगणकाचा जनक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍलन ट्युरिंग यांचा अंत मात्र अतिशय दुर्दैवी म्हणावा लागेल. ऍलनट्युरिंग हे समलैंगिक होते आणि त्या काळात रूढी आणि परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या ब्रिटीश साम्राज्यामध्ये हा एक फार मोठा गुन्हा मानला जाई. ब्रिटीश कायद्याने त्यांना दोन वर्षे तुरुंगवास अथवा संप्रेरकांचा इलाज हे दोन पर्याय दिले होते.

संशोधन आणि सुरु असलेल्या कामांमध्ये तुरुंगवासामुळे अडथळा नको म्हणून ऍलन यांनी संप्रेरकांचा इलाज निवडला. पण हे उपचार सहन न झाल्याने त्यांनी ७ जून, १९५४ रोजी एक सायनाइडयुक्त सफरचंद खाऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या होती की ब्रिटीश संरक्षण यंत्रणांमार्फत केलेला खून होता, याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत.

ऑगस्ट, २००९ मध्ये जॉन ग्रॅहम-कमिंगने ब्रिटीश सरकारविरुद्ध एक मोहीम राबविली ज्यामध्ये मागणी केली गेली होती की, समलैंगिकता हा एक गुन्हा रद्द ठरवून ऍलन ट्युरिंग यांच्याविरुद्ध जो खटला चालवला गेला होता, तो चुकीचा होता आणि त्यासाठी ब्रिटीश सरकारने माफी मागावी. परिणामत: १० सप्टेंबर,२००९ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान – गॉर्डन ब्राऊन यांनी ऍलन ट्युरिंग यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करण्यात आल्याबद्दल जाहीर माफी मागितली.

तसेच २४ डिसेंबर, २०१३ रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने ब्रिटीश राज परिवारातर्फे अधिकृत निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये “ऍलन ट्युरिंग यांना दोषी ठरवण्यात आले ही एक मोठी चूक होती”, असे मान्य करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश राज परिवारातर्फे अश्या प्रकारचे देण्यात आलेले हे केवळ चौथे निवेदन होते.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून बँक ऑफ इंग्लंडने ५० पौंडांच्या नवीन नोटांवर ऍलन ट्युरिंग यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेतला आहे.

बरेच लोक असे मानतात की, सुप्रसिद्ध “Apple” कंपनीने आपला एक घास खालेल्ल्या सफरचंदाचा लोगो हा ऍलन ट्युरिंग यांना श्रद्धांजली म्हणून ठेवला आहे. हे त्याच सफरचंदाचे प्रतीक आहे, जे ऍलन ट्युरिंग यांच्या मृतदेहाजवळ सापडले होते. परंतु ऍपल कंपनीने अजून तरी ही बाब अधिकृतरीत्या मान्य केलेली नाही.

ऍलन ट्युरिंग यांच्या महान कार्यास आणि स्मृतीस समर्पित म्हणून “Turing Robotic Industries” ही कंपनी स्थापन करण्यात आली. “सर्वांत सुरक्षित मोबाईल फोन निर्माण करणारी कंपनी” म्हणून या कंपनीने मान्यता मिळवली आहे.

अगदी गेल्या दशकापर्यंत अपरिचित असलेल्या, दुसऱ्या महायुद्धात अनेक जर्मन पाणबुड्यांना अटलांटिक महासागरात जलसमाधीस पाठवून लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या, या महान गणितज्ञावर आधारित “The Imitation Game” हा अप्रतिम चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. उत्कृष्ट पटकथेसाठी ऑस्कर मिळवलेल्या या चित्रपटाने इतरही अनेक पुरस्कार पटकावले होते.

केवळ रूढी आणि परंपरेच्या विळख्यात अडकून ब्रिटीश साम्राज्याने ऍलन ट्युरिंगच्या कार्याला फारसे महत्व न देता इतिहासातून मिटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी केलेलं महान कार्यचं त्यांना सन्मान मिळवून देण्यास कारणीभूत ठरले आणि हेच कार्य येणाऱ्या पिढ्यांनाही सतत प्रेरणा देत राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: alan turingenigma
ShareTweet
Previous Post

म्हणूनच पालनजी मिस्त्री यांना ‘फँटम ऑफ द बॉम्बे हाउस’ असं म्हटलं जातं

Next Post

आपल्या प्राचीन हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पेहराव कसा होता…?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

आपल्या प्राचीन हडप्पा संस्कृतीतील लोकांचा पेहराव कसा होता...?

आणि हि*टल*रने स्वतःच जर्मनी बेचिराख करण्याचा आदेश दिला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.