म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरामध्ये जितके क्रूर हुकुमशहा होऊन गेले त्याच्यात हिटलरचे नाव सगळ्यात वरती येतं. ३ कोटी ज्यू लोकांचे शिरकाण करणारा हा क्रूरकर्मा आजही त्याच्या काळ्या कर्तृत्वामुळे जगभरात कुप्रसिद्ध आहे. मुख्यत: याच हिटलरमुळे जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले होते. ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य मावळला आणि जगाच्या पटलावर अमेरिका नावाच्या महासत्तेचा उदय झाला होता.

हिटलरने ३० एप्रिल १९४५ रोजी पत्नी इव्हा ब्राऊन सह आत्महत्त्या केली. मरण्यापूर्वी हिटलरने स्वत: सांगितले होते की माझ्या मृत्यनंतर माझे शरीर जाळून टाका. हिटलर हा ख्रिश्चन होता पण त्याला स्वत:ला ख्रिस्ती धर्माप्रमाणे दफन करून घ्यायचे नव्हते तर हिंदू धर्माप्रमाणे स्वत:चे शरीर अग्नीत दहन करायचे होते, ही एक आश्चर्याची गोष्ट होती.

त्याच्या मृत्यला आज 75 वर्षे झाली परंतु तरीही काही लोकांना असे वाटते की हिटलर हा जर्मनी मध्ये मेलेला नव्हता.

hitler in marathi
हिटलर आणि पत्नी इव्हा ब्राऊन

१९३३ साली या नाझी भस्मासुराचा उदय झाला. जर्मनीला पहिल्या युद्धात भयानक मोठी हार पत्करावी लागलेली होती. वर्सेलीसच्या तहामध्ये अत्यंत अपमानकारक अटी जर्मनीला पत्कराव्या लागलेल्या होत्या. त्याचा राग हिटलरच्या मनात अमाप होता. जेंव्हा त्याची नाझी पार्टी सत्तेत आली तेंव्हा त्यांनी इतर राजकीय पार्ट्यांचे अस्तित्व बऱ्यापैकी दाबले अथवा उध्वस्त केले होते. जर्मनीला पुन्हा तिचे वैभव मिळवून द्यायचे याच इराद्याने हिटलर सत्तेत आला होता.

माईन काम्फ हे आत्मचरित्र त्याने तुरुंगात असताना लिहिले होते. त्यात त्याने फ्रांस बद्दल असलेला राग तसेच ज्यू लोकांनी जर्मन शुद्ध आर्यन वंशामध्ये केलेली भेसळ या दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला.

जेंव्हा हिटलर १९३३ साली सत्तेत आला तेंव्हा त्याने त्याची युद्धखोरी दाखवून दिली. १९३९ साली जर्मन फौजा पोलंड मध्ये घुसल्या. त्यानंतर हिटलर ने फ्रांस, डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम या देशावर हल्ले करणे सुरु ठेवले.

पण त्यांनतर १९४५ सालापर्यंत जर्मनी पूर्णपणे पराभवाच्या खाईत लोटला गेलेला होता. १९४३ साली सोव्हिएत युनियनने स्टालिनग्राड मध्ये घुसलेल्या जर्मन फौजांचा पूर्ण पराभव केलेला होता. जुलाई १९४४ मध्ये जर्मन सैन्यातील काही अधिकाऱ्यांना फोडून त्यांना हिटलरच्या हत्येचा कट रचण्यासाठी मित्रराष्ट्रानी मजबूर केलेले होते परंतु तो कट काही कारणाने फसला.

हिटलर ने त्यावेळी जवळजवळ ५००० निष्पाप जर्मन लोकांना स्वत:च्या हत्त्येचा कट रचल्याच्या खाली मारून टाकले होते.

जेंव्हा सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्राचे सैन्य हिटलरला शोधत होते त्यावेळी मात्र हिटलर अचानक गायब झाला. काही लोकांच्या मते तो आल्प्स पर्वत रांगेत जावून लपलेला होता. १९४५ साली अमेरिकन सैन्याला खबर लागली की  ३ लाख नाझी सैन्य हे आल्प्स पर्वतात लपून बसले आहे आणि ते पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

या बातमीने मित्रराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळाले. जर्मन प्रचार प्रमुख गोबेल्स त्यावेळी रेडीओ वरून नाझीचे काम फक्त ठार मारणे आहे असा संदेश देत होता पण या बातम्या खोट्या होत्या. ना हिटलर न त्याचे सैन्य आल्प्स पर्वतात लपले होते.

हिटलर बर्लिन मध्येच एका बंकर मध्ये लपून बसलेला होता. १९४५ साली मित्रराष्ट्राच्या फौजा जर्मनी मध्ये घुसल्या होत्या आणि जर्मनीचा बराच भाग त्यांनी काबीज केला होता ते पाहून आपला पराभव निश्चित झाला आहे याची हिटलर ला खात्री पटली.

हिटलरचा स्वत:चा फ्युरर बंकर म्हणून एक बंकर होता. त्याचा एरिया २७०० स्क्वेअर फीट इतका होता, त्यात हवा, पाणी, अन्न या सगळ्यांची सोय केलेली होती.

त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला कितीही सल्ले दिले तरी हिटलर आपला बंकर आणि जर्मनी सोडून जायला तयार नव्हता. त्याला खबर लागली होती की सोविएत युनियनच्या फौजा त्याला पकडून त्याला पिंजऱ्यात डांबून संपूर्ण देशातून त्याची वरात काढणार आहेत. त्यामुळे त्याचा आत्मसमर्पण न करण्याचा निश्चय पक्का होता.

Adolf Hitler's Bunker
हिटलरचे बंकर (फोटो – टाईम)

२२ एप्रिल १९४५ ला हिटलरने त्याच्या २ स्वीय सहायकांना बोलावून घेतले. मित्रराष्ट्राच्या फौजा हिटलरच्या बंकर पर्यंत येण्यासाठी बर्लिन मधल्या अनेक तळघराना धडका देत होत्या. हिटलरने त्याच्या दोन्ही स्वीय सहायकांना बंकर मधून बर्लिनला जायला सांगितले.

२९ एप्रिल १९४५ ला हिटलरने १६ वर्षापासून त्याच्याबरोबर राहत असलेल्या इव्हा ब्राऊन बरोबर लग्न केले. ब्राऊन जेंव्हा १७ वर्षांची होती तेंव्हा तिची आणि हिटलर ची पहिली भेट झाली होती. हिटलरने जेंव्हा बंकरचा आश्रय घेतला तेंव्हा देखील इव्हा ब्राऊन त्याच्या बरोबर होती. साधारणपणे एप्रिलच्या सुमारास हिटलरला त्याचा मित्र इटलीचा हुकुमशहा बिनितो मुसोलिनीच्या हत्येची खबर लागली. त्याचवेळी त्याचा आत्महत्त्या करण्याचा विचार जवळजवळ पक्का झाला.

आत्महत्येच्या रात्री हिटलरने त्याचे शेवटचे जेवण घेतले. त्याच्या बरोबरच्या लोकांना जर्मनीला परत जायला सांगितले. जितके लोक त्यांच्या बरोबर होते प्रत्येकाला हिटलरने शांत आवाजात सांगितले “ मी आता स्वत:ला गोळी झाडून घेणार आहे”

त्यानंतर इव्हा ब्राऊन आणि हिटलरने स्वत:ला त्यांच्या रूम मध्ये बंद करून घेतले. इव्हा ब्राऊन आणि हिटलर दोघांनीही जिभेखाली सायनाईडची गोळी ठेवली त्यांनतर हिटलरने स्वत:कडच्या पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्त्या केली.

त्यांच्या मृत्युनंतर दोघांचीही शरीरे बंकरच्या बाहेर आणण्यात आली होती. हिटलरच्या शेवटच्या इच्छेनुसार दोघांचीही शरीरे पेट्रोल टाकून जाळण्यात आली. हिटलरची आणि त्याच्या जवळच्या लोकांची इच्छा होती की हिटलरचे शरीर देखील शत्रूच्या हातात पडू नये पण हिटलरचे बंकर उध्वस्त करायला आलेल्या सोव्हिएत युनियनच्या लोकांना अर्धवट जळालेली बॉडी मिळाली होती.

तरीही याच्यानंतर हिटलर जिवंत असल्याच्या बातम्या अनेक वर्षे फिरत राहिल्या होत्या. त्यांनतर हिटलर आर्जेन्टिना मध्ये राहत असल्याच्या वावड्या देखील उठल्या होत्या पण अमेरिकेच्या FBI ने याचा तपास करून या बातम्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले होते.

अशा रीतीने मृत्यनंतर देखील हिटलरच्या नावाभोवती चे गूढ आजदेखील कायम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

3 Comments
  1. अरुण कोर्डे says

    हिटलरने देह दफन न करता दहन करावा असं सांगितलं कारण आपल्या देहाची विटंबना होईल ही भीती त्याला वाटत असावी. त्यात हिंदू किंवा ख्रिस्ती धर्माचा संबंध येत नाही. नाहीतर हिंदूंबद्दलचे त्याचे उदार विचार त्याच्या जिवंतपणी जगाला दिसले असते. पण तसं झालेलं दिसत नाही. हिंदूंचं नुसत्या अनुमान नेही समाधान होतं. असं नेहमीच दिसत आलं आहे.

  2. Omkar Mungekar says

    अपरिचित आणि गोपनीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  3. Prachi says

    Very Nice Information.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!