The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजही अनेक वैज्ञानिक त्यांचे वायरलेस इलेक्ट्रीसिटीचे स्वप्न सत्यात उतरवायच्या प्रयत्नांत आहेत..!

by द पोस्टमन टीम
20 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 8 mins read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


“वर्तमान त्यांचे आहे. भविष्य, ज्यासाठी मी खरोखर काम करतो ते माझे आहे.” – निकोला टेस्ला

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात नेटवर्क ही अशी गोष्ट झालीय, ज्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. 2G, 3G पासून सुरु झालेला हा प्रवास 4G, 5G पर्यंत कसा आला हे कळालं देखील नाही. भारतात २०१२ साली, Airtel ने 4G तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा प्रयोग केला त्यानंतर, २०१५ मध्ये Reliance Jio ने यात प्रवेश करून सर्व समीकरणेचं बदलली, आणि आता वायरलेस 5G च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत.

नेटवर्किंगमध्ये झपाट्याने होत जाणारी प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु, वायरलेस तंत्रज्ञानाची कल्पना केव्हा आणि कशी अस्तित्वात आली? याचा विचार केला तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल.

साधारण २०व्या शतकात, वायरलेस ऊर्जेचं स्वप्न डोळ्यात ठेवून अहोरात्र मेहनत घेणारं एक असामान्य नेतृत्व होऊन गेलं. आधुनिक अल्टरनेटिंग करंटच्या (AC) डिझाईनमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे निकोला टेस्ला यांनी आपल्या प्रयोगांनी अवघ्या जगावर भुरळ पाडली. जे भविष्य आपण अनुभवत आहोत, त्यासाठी अनेकदा अपयश येऊन देखील ते शेवटपर्यंत झटत राहिले. ज्या कल्पनेचं बीज त्यांनी रोवलं, त्याचं हळूहळू वटवृक्षात रूपांतर होतंय.

“वर्तमान त्यांचे आहे. भविष्य, ज्यासाठी मी खरोखर काम करतो ते माझे आहे” हे निकोला टेस्ला यांचे उद्गार आज सार्थ ठरले असं म्हटलं, तर वावगं ठरणारं नाही. ज्या भविष्यासाठी त्यांनी संपूर्ण वर्तमान पणास लावलं, अशा महान वैज्ञानिकाच्या आयुष्यावर एक कटाक्ष टाकूया.

निकोला टेस्ला हे अमेरिकेतील महान संशोधकांपैकी एक होते. त्यांचा जन्म १८५६ साली क्रोएशियाच्या स्मिलजान गावात एका सर्बियन कुटुंबात झाला; वडील मिलुटिन हे सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चचे पुजारी होते आणि आई, डुका मँडिक स्वतःच्या घरगुती उपकरणांची संशोधक होती. लहानपणापासूनच, त्यांच्या जिज्ञासू आणि चिकित्सक वृत्तीचे, सभोवतालच्या लोकांना कोडे पडत असे.

टेस्ला यांनी १८७३ साली रियलस्च्युले, कार्लस्टॅड, ग्राझ, ऑस्ट्रिया येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि प्राग विद्यापीठात शिक्षण घेतले. तेथे त्यांनी प्रोफेसर अर्न्स्ट मॅक यांच्यासोबत काम करून वेव्ह मेकॅनिक्सचे (आणि अप्रत्यक्षपणे AC) ज्ञान वाढवले. सुरुवातीला भौतिकशास्त्र आणि गणितात प्राविण्य मिळवण्याचा त्यांचा मानस होता, पण लवकरच त्यांना विजेचे आकर्षण वाटू लागले आणि त्यांनी १८८१ मध्ये बुडापेस्टमधील एका टेलिफोन कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.

अमेरिकेला जाण्यापूर्वी, टेस्ला पॅरिसमधील ‘कॉन्टिनेंटल एडिसन’ कंपनीत सामील झाले, जेथे त्यांनी डायनॅमोची रचना केली. १८८३मध्ये स्ट्रासबर्गमध्ये असताना त्यांनी खाजगीरित्या इंडक्शन मोटरचा प्रोटोटाइप तयार केला आणि तो यशस्वीपणे चालवला. या मूलगामी उपकरणाचा प्रचार करण्यात युरोपमधील कोणालाही स्वारस्य नसल्यामुळे, टेस्लाने न्यूयॉर्कमध्ये थॉमस एडिसनसाठी काम करण्याची ऑफर स्वीकारली. नायगारा फॉल्सपासून निर्माण होणाऱ्या विद्युतक्षमतेचा वापर करण्यासाठी, अमेरिकेत येण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते.

निकोला टेस्ला यांनी जनरेटर, मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मरची पॉलीफेस आधुनिक AC प्रणाली विकसित केली आणि या प्रणालीवर ४० मूलभूत यूएस पेटंट्स मिळवले, जे जॉर्ज वेस्टिंग हाऊसने विकत घेतले आणि अमेरिकेला टेस्ला प्रणालीचा पुरवठा करण्याचा निर्धार केला.

एडिसनला त्याचे डीसी साम्राज्य गमावायचे नव्हते आणि त्यामुळे दोघांमध्ये कडवट यु*द्ध सुरू झाले. हे AC आणि DC मधील प्रवाहांचे यु*द्ध होते. टेस्ला-वेस्टिंगहाऊस शेवटी विजयी झाले कारण AC हे असे उत्कृष्ट तंत्रज्ञान होते जे अमेरिका आणि अवघ्या जगाच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरले.

टेस्लाने त्यांच्या मोटर्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्सचा परिचय एका क्लासिक पेपरमध्ये केला, “अ न्यू सिस्टीम ऑफ अल्टरनेटिंग करंट मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स” जो त्यांनी १८८८ साली ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स’समोर दिला.

जॉर्ज वेस्टिंगहाऊस हे एक सर्वात प्रभावित उद्योगपती आणि शोधक होते. एके दिवशी त्यांनी टेस्लाच्या प्रयोगशाळेला भेट दिली आणि जे पाहिले ते पाहून ते थक्क झाले. टेस्लाने एक मॉडेल पॉलीफेस प्रणाली तयार केली होती ज्यामध्ये एक पर्यायी करंट डायनॅमो, स्टेप-अप आणि स्टेप-डाउन ट्रान्सफॉर्मर आणि दुसऱ्या टोकाला एसी मोटर होते. अमेरिकेतील विजेच्या देशव्यापी वापरासाठी टेस्ला आणि वेस्टिंगहाऊस यांच्यात परिपूर्ण भागीदारी सुरू झाली ती इथूनच.

फेब्रुवारी १८८२ मध्ये, टेस्लाने फिरणारे चुंबकीय क्षेत्र शोधून काढले, हे भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्व AC वापरणाऱ्या जवळपास सर्व उपकरणांचा आधार आहे. टेस्लाने विद्युत उर्जेची निर्मिती, प्रसारण, वितरण आणि वापरासाठी AC इंडक्शन मोटर आणि पॉलीफेस सिस्टीमच्या बांधकामासाठी चुंबकीय क्षेत्र फिरवण्याचे तत्त्व उत्तमरित्या उपयोगात आणले. विसाव्या शतकात, अल्टरनेटिंग करंट ऊर्जेचे मुख्य स्रोत बनले; या कामगिरीने जग बदलले. त्यांनी १८९५ साली नायगारा फॉल्समध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प तयार केला, जो AC प्रणालीचा अंतिम विजय होता.

जागतिक वृत्तपत्रांमध्ये या कामगिरीची व्यापक चर्चा झाली आणि टेस्लाची जगभरात नायक म्हणून प्रशंसा झाली. ते अनेक क्षेत्रात अग्रगण्य होते. १८९१ साली त्यांनी ज्याचा शोध लावला, ती टेस्ला कॉइल आज रेडिओ, दूरदर्शन संच आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अल्टरनेटिंग करंट इंडक्शन मोटरचा शोध, हा आजवरच्या दहा महान शोधांपैकी एक मानला जातो.

फ्लोरोसेंट लाइट, लेसर बीम, वायरलेस कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल एनर्जीचे वायरलेस ट्रान्समिशन, रिमोट कंट्रोल, रोबोटिक्स, टेस्ला टर्बाइन आणि व्हर्टिकल टेक ऑफ एअरक्राफ्ट या शोधांचं श्रेय निकोला टेस्ला यांना जातं. ते रेडिओ आणि आधुनिक इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन सिस्टमचे जनक आहेत. सेंच्युरी मॅगझिनने टेस्ला यांची विद्युतविरहीत तारेविषयीची तत्वे प्रकाशित केली. फेब्रुवारी १८९३ मध्ये त्यांनी फ्रँकलिन इन्स्टिट्यूटसमोर दिलेली वैज्ञानिक व्याख्याने विशेष लोकप्रिय झाली. टेस्ला यांची वायरलेस विजेची संकल्पना महासागरातील जहाजांना उर्जा देण्यासाठी, यु*द्धनौका नष्ट करण्यासाठी, उद्योग आणि वाहतूक चालवण्यासाठी आणि संपूर्ण जगभर तात्काळ दळणवळण पाठवण्यासाठी वापरली गेली. त्यावेळी अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांनी त्यांची मुलाखत घेतली; त्यात पृथ्वीवरील सर्व उद्योग चालविण्यासाठी वायरलेस ऊर्जा पुरवण्यासाठीच्या नवीन प्रणालीचे त्यांनी वर्णन केले. 

निकोला टेस्ला हे विसाव्या शतकातील अमेरिकन प्रेसमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक व्यक्तिमत्व होते. लाइफ मॅगझिनच्या सप्टेंबर १९९७ च्या विशेष अंकानुसार, टेस्ला गेल्या १००० वर्षांतील १०० सर्वात प्रसिद्ध लोकांपैकी एक होते. मानवी इतिहासाचा प्रवाह वळवणाऱ्या महापुरुषांपैकी ते एक आहेत. त्यांच्या शोधांना आणि दृष्टीला लोक, वैज्ञानिक समुदाय आणि अमेरिकन प्रेस यांनी व्यापक स्वीकृती दिली.

टेस्ला यांनी प्रख्यात जनरल इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंटरसाठी लिहिलेले आत्मचरित्रात्मक लेख, “माय इन्व्हेन्शन्स” या पुस्तकात संग्रहित केले आहेत. त्यांना तरुणपणापासूनच व्हिज्युअलायझेशनची तीव्र शक्ती आणि प्रचंड स्मरणशक्तीची जणू काही देणगीच प्राप्त होती. आजीवन बॅचलर म्हणून ते काहीसे अलिप्त राहिले आणि आपली संपूर्ण शक्ती विज्ञानासाठी वाहून घेतली.

१९३१ साली त्यांच्या ७५व्या वाढदिवशी, ते टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकले. या प्रसंगी, त्यांना अल्बर्ट आइनस्टाईनसह विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील ७० हून अधिक अग्रगण्यांकडून अभिनंदन पत्रे मिळाली. टेस्ला यांचे ७ जानेवारी १९४३ रोजी हॉटेल न्यू यॉर्करमध्ये निधन झाले, त्यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे ते तेथे राहिले होते.

रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका (RCA)चे अध्यक्ष कर्नल डेव्हिड सरनॉफ यांच्या मते, “विद्युत विज्ञानातील निकोला टेस्लाची कामगिरी ही अमेरिकेला स्वातंत्र्य आणि संधीची भूमी म्हणून संबोधित करणारी आहे. टेस्लाचे मन एक मानवी डायनॅमो होते जे मानवजातीच्या फायद्यासाठी फिरत होते.”

निकोला टेस्ला यांचा एकंदरीत जीवनप्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि आव्हानात्मक असा होता. ८१ व्या वर्षीही, त्यांनी “गुरुत्वाकर्षणाचा डायनॅमिक सिद्धांत” पूर्ण केल्याचा दावा केला; जो कधीही प्रकाशित नाही झाला. त्यांच्या नवकल्पनांबद्दल आजदेखील बोललं जातं. 

दुर्दैवाने, निकोला टेस्ला यांचे जागतिक स्तरावर विद्युविरहित ऊर्जा तयार करण्याचे स्वप्न स्वप्नंच बनून राहिले. पण, त्यांच्या संकल्पनेमुळे आज नेटवर्किंग आणि ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. एका शोधनिबंधानुसार, 5G नेटवर्कच्या निर्मात्यांनी नकळतपणे एक “वायरलेस पॉवर ग्रिड” बनवले जे बनवण्यात टेस्ला यांना विसाव्या शतकात अपयश आले होते. पण, या वायरलेस प्रणालीमध्ये ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्यामुळे, हवामान संकटाची निकड लक्षात घेता याचे समर्थन करणे अविवेकी ठरेल.

सद्यस्थितीत, तंत्रज्ञानातील काही त्रुटींमुळे ही प्रणाली जागतिक स्तरावर येण्यास काही अवधी लागेल परंतु, जर संशोधकांनी हवेतून वीज एकत्रीत करण्याचे अधिक कार्यक्षम मार्ग शोधले, तर निकोला टेस्ला यांचे वायरलेस उर्जेचे स्वप्न साकार होऊ शकेल. काळानुसार झालेली, विज्ञान आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रांतील प्रगती नक्कीच विलक्षण आहे. ज्या पायाभूत सुविधा आपल्याला अगदी सहजपणे उपलब्ध होताहेत त्यासाठी कित्येकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, याचं भान राखून पुढे वाटचाल करायला हवी. आजच्या घडीला, आधुनिक नेटवर्किंग सोबतच “माणसांतील नेटवर्क” सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट करून टिकवून ठेवू अशी आशा करायला हरकत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

मोजक्या भांडवलावर सुरु केलेली ही कंपनी आज त्या क्षेत्रातील “ब्रॅण्ड” आहे..!

Next Post

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.