The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

by Heramb
4 November 2024
in गुंतवणूक, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२०२० आणि विशेषतः कोरोना काळापासून सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले जात आहेत. या ऑनलाईन शिक्षणामध्ये शाळेपासून ते अगदी विद्यापीठापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश होतो. शिक्षणाबरोबरच अनेक कोर्सेस देखील ऑनलाईन होत आहेत, मग ते टेक्निकल कोर्सेस असो वा अन्य कोणत्याही प्रकारचे. शिक्षण ऑनलाईन झाल्यापासून कोर्सेरा, युडेमी, ग्रेट लर्निंग आणि ईडीएक्ससारखे प्लॅटफॉर्म्ससुद्धा प्रचंड प्रमाणात आपले कोर्सेस विकत आहेत. यामध्ये युट्युब मागे कसं राहील?

सोशल मीडियावरील श्रीमंतीचे मृगजळ 

युट्युबवर अनेक इन्फ्ल्यूएंसर्स आर्थिक सल्ले देतात. अर्थशास्त्राच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात कोणतंही शिक्षण नसतानाही असे अनेक इन्फ्ल्यूएंसर्स युट्यूबवर अनेकदा अगदी मोफत मार्गदर्शन करीत असतात, पण त्याची किंमत अनेक लोकांना आपल्या वैयक्तिक खात्यातून होणाऱ्या प्रचंड नुकसानामधून भरावी लागते.

असे आर्थिक सल्ले देणाऱ्या इन्फ्ल्यूएंसर्सना फ़िन्फ्लुएन्सर्स असेही म्हणतात. हे फ़िन्फ्लुएन्सर्स इन्वेस्ट्मेन्ट्स, इन्शोरन्स, आणि बँकांच्या विविध सेवा तसेच उत्पादने इत्यादी विविध आर्थिक विषयांवर माहिती पुरवतात. आपल्या रिल्स, शॉर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सच्य्या माध्यमातून ते युवक-युवतींना श्रीमंत होण्याचे गाजर दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. 

पण गेल्या काही दिवसांमध्ये देशातील मार्केट नियामक संस्था SEBI (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने अशाच काही फ़िन्फ्लुएन्सर्सना आपल्या जाळ्यात ओढले आहे. याशिवाय ते शेअर्स घेण्यास प्रवृत्त करतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फ़िन्फ्लुएन्सर्सवर अनेक मर्यादा लादल्या आहेत. मध्यंतरी “बाप ऑफ चार्ट”वर सेबीने मोठी कारवाई केली. यामध्ये “बाप ऑफ चार्ट” मोहम्मद नसरुद्दिन अन्सारीला सेबीने विद्यार्थ्यांचे/गुंतवणूकदारांचे सुमारे १७ करोड परत करण्यास सांगितले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू..

‘बाप ऑफ चार्ट’ स्कॅम

गेल्या काही वर्षांत फ़िन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सेबीने त्यांच्या कार्यपध्दत्तीच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली. अनेक अनरजिस्टर्ड सल्लागार देखील या माध्यमातून अनेकांना बँकांच्या किंवा तत्सम आर्थिक संस्थांच्या उत्पादने आणि सेवांबद्दल आर्थिक सल्ले देत असल्याचे लक्षात आले. अशा फ़िन्फ्लुएन्सर्सवर सेबीने कारवाई करण्याचे ठरवले आहे. यातच सेबीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं ते “बाप ऑफ चार्ट”ला.



या कंपनीचा सर्वेसर्वा असलेल्या मोहम्मद नसरुद्दिन अन्सारीने आपल्या ग्राहकांना/विद्यार्थ्यांना मोठी प्रलोभने देऊन सुमारे १७.२ करोड रुपये कमावले आहेत. तो ग्राहकांना आपले काही आर्थिक शिक्षणासंबंधी कोर्सेस खरेदी करायला लावत असे. मग या विद्यार्थ्यांना टेलिग्रामसह इतर प्लॅटफॉर्म्सवरील प्रायव्हेट ग्रुप्समध्ये ॲड केलं जात असे, तिथे त्यांना अशा काही टिप्स दिल्या जात, ज्यान्वये ते सर्व लोक वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करत असत.

२०२१ ते जुलै २०२३ या अडीच वर्षांच्या कालावधीत नसरुद्दिन अन्सारीला मार्केटमध्ये जवळपास ३ करोड रुपयांचा तोटा झाला होता. त्यापैकी २.६४ करोड रुपये त्याने ‘झिरोधा’वर ट्रेडिंग करताना गमावले होते, तर एंजेल वनवर ट्रेडिंग करताना सुमारे २५ लाख.

काही महिन्यांपूर्वी त्याने अनेक ठिकाणी आर्थिक सिक्युरिटीजसंबंधी ऑफलाईन वर्कशॉप्स घेण्यास सुरुवात केली. या वर्कशॉप्सचे “प्रभावशाली” व्हिडीओज् युट्युब चॅनेलवर टाकून त्यांना “लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ८० हजार रुपयांचा प्रॉफिट”, “८५% गॅरंटीने दर महिन्याला ५ ते १० लाख रुपये कमवा” असे टायटल्स देत असे. खरंतर अशा प्रकारच्या टायटल्सना क्लिक बेट्स म्हणतात, म्हणजे हे टायटल्स बघितल्याबरोबर लोकांनी क्लिक केलं पाहिजे असे ते असतात. मग नवे युजर्स तो व्हिडीओ पाहून त्याच्या वर्कशॉप्समध्ये देखील जात असत.

रेझरपे आणि बंचने केलेले खुलासे

रेझरपे एक पेमेंट इंटरफेस आहे. याचा उपयोग नसरुद्दिनने आपल्या आर्थिक शिक्षणाच्या कोर्सेस आणि वर्कशॉप्ससाठी केला होता. रेझरपेने आपल्या प्लॅटफॉर्मवर बंच नावाचं एक फिचर आणलं होतं, ज्यामध्ये विशेषतः ग्राहकाकडून आलेली शैक्षणिक कोर्सेसची यादी विद्यार्थ्यांना दाखवली जाते. त्यामुळे या सगळ्यामध्ये रेझरपे आणि बंच केवळ एक माध्यम म्हणून काम करत होते, तर पडद्याआडून त्यांचे धागे दोरे नसरुद्दिनकडे होते हे स्पष्ट आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सेबीने आपला मोर्चा वळवला ‘बाप ऑफ चार्ट’ नसरुद्दिनकडे. नसरुद्दिन १९ प्रकारचे कोर्सेस किंवा वर्कशॉप्स या प्लॅटफॉर्मवरून विकत होता. हे सर्व कोर्सेस आणि वर्कशॉप्स स्टॉक मार्केट, ट्रेडिंग, अशा सिक्युरिटीजसंबंधी होते. हे कोर्सेस विद्यार्थ्यांनी खरेदी करावेत यासाठी त्याचे टायटल्स “एमएसपीच्या मदतीने तुम्ही सगळं नुकसान भरून काढू शकता. याची आम्ही ९९% गॅरंटी देत आहोत”, “२००-३००% प्रॉफिट कमवा” अशा आशयाचे दिले होते. वास्तविक एवढा प्रॉफिट कधी शक्य नसतोच, तरीही नसरुद्दिन अशी आश्वासने देत होता.

याशिवाय बंच या प्लॅटफॉर्मवर असे काही मेसेजेस् पाठवले गेले, जे त्या विद्यार्थ्यांना गाजर दाखवणारे होते. थोडक्यात सांगायचं झालं तर या कंपनीने सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली आपल्या ग्राहकांना/गुंतवणूकदारांना सिक्युरिटीजमध्ये खरेदी/विक्री करण्यास सांगितले. पुढे बंचने या कोर्सेसची फी ज्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जात आहे त्याचे बँक डिटेल्स देखील पुरवले. बेडूक फुगवून बैल करण्याच्या नादात कंपनीने काही कोर्सेसला “सिक्रेट्स ऑफ डेटा ट्रेडिंग” अशीही नावे दिली होती. काही कोर्सेसची फी ५१ हजार दाखवण्यात आली होती, मुळात ते कोर्सेस ५ ते ६ हजारचेच असत.

या चौकशीदरम्यान ‘बाप ऑफ चार्ट’ गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भाग असल्याचेही समोर आले. कंपनीच्या शेअरहोल्डिंमध्ये सर्वांत जास्त शेअर्स नसरुद्दिनचेच आहेत. नसरुद्दिनशिवाय या कंपनीमध्ये ६ शेअरहोल्डर्स होते. ते सर्वजण कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांच्या संपर्कात राहून कोर्समधील विद्यार्थ्यांना काही सिक्युरिटीज् विकत घेण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून आले. मग ते कोणत्याही माध्यमातून असो, टेलिग्राम ग्रुप असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपल्या संभाव्य विद्यार्थ्यांना उत्तरं देणं असो.

तरबेज अब्दुल्लाह, असिफ इकबाल या दोघांनी ‘बाप ऑफ चार्ट’चे ऑनलाईन मार्केटिंग केले. तर राहुल राव, वामशी जाधव आणि मनषा अब्दुल्लाह यांच्या बँक अकाउंट्समध्ये गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरलेले फीचे पैसे जात असत. नसरुद्दिनसह हे सर्व जण गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअरहोल्डर्स आहेत. असं असलं तरी ‘बाप ऑफ चार्ट’ हा ब्रँड आणि त्याचा संस्थापक नसरुद्दिनवर या ऑर्डरमध्ये मुख्य आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे, गुंतवणूकदार आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विश्वासार्हतेसाठी, त्याच्या विरोधात असे निर्देश देणे सेबीला आवश्यक वाटले.

सेबीने केलेली कारवाई

गुंतवणूकदारांच्या १७.२ कोटींचा परतावा करण्याशिवाय, गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा या कंपनीशी संबंधित अन्य कोणीतीही व्यक्ती आता मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकणार नाही.

या प्लॅटफॉर्मवरून ज्या लोकांनी इन्वेस्ट्मेन्ट्स केल्या त्यांच्यापैकी बहुतांश लोक आज लॉसमध्ये आहेत. ट्विटर (एक्स.कॉम) वर “बीओसी स्कॅम” नावाचे एक पेज तयार करण्यात आले असून त्यावर अनेक जण नासिरुद्दीन आणि संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी करीत आहेत.

सारांश आणि कायदेशीर दृष्टिकोन

अशा कोणत्याही प्रलोभनीय कोर्सेसला किंवा वर्कशॉप्सना बळी न पडता फक्त कायदेशीर आर्थिक सल्लागारांकडे जाऊनच आर्थिक सल्ले घ्यावेत हा या प्रपंचाचा सारांश. पण कायदेशीर सल्लागार म्हणजे नेमके कोण?

सेबी अर्थात ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ या सरकारी आर्थिक नियमन संस्थेद्वारे अशा सल्लागारांना प्रमाणपत्र दिले जाते. सेबीचे प्रमाणपत्र मिळालेल्या सल्लागारांना सेबी-रजिस्टर्ड अडवायजर्स म्हणतात. जे असे सेबी रजिस्टर्ड ॲडवायजर्स असतील फक्त त्यांच्याकडूनच आर्थिक सल्ले घेतले जावेत असे सेबीच्या गाईडलाईन्समधील रेग्युलेशन ३ (३) (आयए) मध्ये म्हटले आहे.

हल्ली असे अनेक फ़िन्फ्लुएन्सर्स आहेत, पण कोणाला फॉलो करायचं, कोणाला नाही याचा विचार करण्याइतपत आपण सक्षम आहोतच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एअर पोर्ट्सच्या लाउंजमध्ये दोन रुपयांत मिळणारी एंट्री बंद होण्याच्या मार्गावर आहे..!

Next Post

तुरुंगात कडक तपासणी केली जाते त्याचं कारण हे दोघे कैदी आहेत..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

तुरुंगात कडक तपासणी केली जाते त्याचं कारण हे दोघे कैदी आहेत..!

अमेरिकेत आजही याचं नाव गद्दारीचं प्रतीक आहे..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.