The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

by द पोस्टमन टीम
20 April 2022
in ब्लॉग, इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


राजकुमारी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर बॉलिवुड चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या राजकुमारी येतात किंवा मग डिस्नेच्या ॲनिमेशनपटांतील प्रिन्सेस. मोठ्या पडद्यावरील राजकुमारींच्या ऐषोआरामी जीवन जगताना दिसतात. ऐश्वर्य, नोकर-चाकर त्यांच्या पायाजवळ लोळण घालत असल्याचं दिसतं. अगदी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ऐतिहासिक पुराव्यांमध्येही असाच उल्लेख आढळतो.

कदाचित राजकुमारी असं ऐषोआरामी आयुष्य जगतही असतील. पण, जगातील प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. अशादेखील काही राजकुमारी अस्तित्वात होत्या ज्यांनी नाजूकपणा आणि ऐषोआराम सोडून युद्धभूमी गाजवली, अशाही काही राजकुमारी होत्या ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान दिलं, अशाही काही राजकुमारी होत्या ज्यांनी आपली संपत्ती लोकांच्या कल्याणासाठी वापरली.

अशा या अपवाद ठरलेल्या मोजक्या राजकुमारींमध्ये अमृत कौर यांचा समावेश होतो. राजकुमारी अमृत कौर या एक अशी राजकुमारी होत्या ज्यांनी देशसेवा केली. गरीब, दुर्बल, उपाशी आणि आजारी लोकांच्यात जाऊन त्यांनी राजकुमारी असण्याची सर्व बंधनं तोडून टाकली. यानंतरचे परिच्छेद वाचून तुम्हाला राजकुमारी अमृत नेमक्या कोण होत्या आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं आहे, याची पूर्ण कल्पना मिळेल.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सबद्दल तुम्ही कधीनाकधी ऐकलंच असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील सर्व श्रीमंत आणि गरीब नागरिकांना समान व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचं काम एम्स करत आहे. महागड्या आणि अत्याधुनिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणं शक्य नसलेल्या लोकांचं हे हक्काचं ठिकाण आहे. एम्सच्या स्थापनेसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना श्रेय दिलं जातं. त्यांच्या कार्यकाळात एम्सची स्थापना झाली होती. त्यामुळं असं करण्यात काही चूक नाही.

मात्र, ‘फक्त’ नेहरूंनाच एम्सच्या स्थापनेचं श्रेय देणं, हे नक्कीच चुकीचं म्हटलं पाहिजे. कारण एम्सचा पाया पंतप्रधान नेहरूंमुळे नाही तर एका राजकुमारीच्या पुढाकारामुळं रचला गेला होता. ही राजकुमारी दुसरी तिसरी कुणी नसून, अमृत कौर या आहे.

त्यांनी केवळ भारतातील आरोग्यसेवेसाठी प्रमुख सार्वजनिक संस्था स्थापन करण्यास मदतच केली नाही, तर स्वतंत्र भारताच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारीदेखील खंबीरपणे सांभाळली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रशासकीय मंडळाच्या प्रमुख असलेल्या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या. भारतातील महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वुमन वॉरियर्सपैकी त्या एक होत्या. त्यांनी तीस वर्षे महिलांच्या हक्कांसाठी काम केलं.

कपूरथलाच्या राजपुत्राचा धाकटा भाऊ असलेल्या राजा हरनाम सिंग यांच्या घरी २ फेब्रुवारी १८८९ रोजी अमृत यांचा जन्म झाला होता. राजा हरनाम सिंग अवधमधील इस्टेटचं व्यवस्थापन करत असल्यामुळं अमृत कौर लखनऊमध्ये वाढल्या.

हे देखील वाचा

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी ‘मॅकडॉनल्ड्स्’ने ‘ड्राइव्ह थ्रू’ सुरु केला होता..!

सात मुलांपैकी एकुलती एक मुलगी असलेल्या अमृत यांचं शिक्षण इंग्लंडमधील अग्रगण्य संस्था असलेल्या शेरबोर्न स्कूल फॉर गर्ल्समध्ये झालं. त्या अष्टपैलू विद्यार्थीनी होत्या. अभ्यासात हुशार असलेल्या अमृत शाळेच्या हॉकी, लॅक्रोस आणि क्रिकेट संघाच्या कर्णधारही होत्या. शालेय शिक्षणानंतर आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या ऑक्सफर्डमध्ये दाखल झाल्या. त्यामुळं ही तरुण भारतीय राजकन्या जितकी भारताची होती तितकीच एडवर्डियन इंग्लंडचीही होती. कारण, शिक्षणामुळं निर्माण होणाऱ्या सर्व जाणीवा त्यांना इंग्लंडमध्येच मिळाल्या होत्या.

१९१८ मध्ये शिक्षण पूर्ण करून अमृत मायदेशी परतल्या. त्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा देशात राष्ट्रवादी संघर्षाच्या युगाची सुरुवात देखील झाली होती. रौलेट कायद्यामुळं पंजाबमधील लोकांमध्ये व्यापक संताप आणि असंतोष निर्माण झालेला होता.

अमृतसरमध्ये नागरिक आणि ब्रिटिश सैन्यात हिंसक दंगली झाल्या. यानंतर मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. एप्रिल १९१९ च्या भीषण जालियनवाला बाग हत्याकांडामुळं तीव्र निषेधाचं वातावरण वणव्याप्रमाणं पसरलं होतं.

त्याचवर्षी कौरची यांची ओळख त्यांच्या वडिलांचे जवळचे मित्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावशाली सदस्य गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली. समाजसुधारक असलेले गोखले वंचितांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे संस्थापक होते. गोखलेंच्या देशाप्रती आणि लोकांप्रती असलेल्या समर्पणाचा अमृतवर खोलवर प्रभाव पडला. कपूरथलाची ही तरुण राजकुमारी राष्ट्रवादी चळवळीत सामील झाली. विशेष म्हणजे गोखले यांच्यामार्फतच अमृत यांना महात्मा गांधीजींबद्दल माहिती मिळाली.

त्यानंतर अमृत यांनी साबरमती आश्रमात सुरू असलेल्या कामात सामील होण्याच्या आशेनं गांधींना पत्र लिहिलं. पण, आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं अमृत यांना चळवळीत प्रत्यक्ष जाता आलं नाही. त्यांनी कपूरथला येथील घरातूनच दलित महिलांच्या कल्याणासाठी काम करणं सुरू केलं.

१९२६ मध्ये, राजकुमारी अमृत कौर यांनी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली. ही अशा प्रकारची पहिली संस्था होती जी महिलांच्या हक्कांसाठी काम करायची. या संस्थेअंतर्गत त्यांनी परदा, बालविवाह आणि देवदासी प्रथा यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. अमृत कौर यांच्या निर्धारामुळं आणि अथक प्रयत्नांमुळेच सरकारला मुलींचं लग्नाचं वय १४ आणि नंतर १८पर्यंत वाढवणं भाग पडलं.

१९३० मध्ये पालकांच्या मृत्यूनंतर अमृत कौर यांनी शेवटी कपूरथला पॅलेस सोडला. देशभर गाजत असलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सामील होऊन त्यांनी दांडीयात्रेत भाग घेतला. अमृत यांच्या समर्पणानं प्रभावित होऊन ऑक्टोबर १९३६ मध्ये गांधीजींनी त्यांना आपलं खासगी सचिव बनवलं. पंतप्रधान नेहरूंच्या पहिल्या सरकारमध्ये आरोग्य खात्याची ऑफर मिळेपर्यंत कौर या पदावर होत्या.

राजकुमारी अमृत कौर भारतीय स्वातंत्र्याच्या राष्ट्रवादी चळवळीत सक्रिय सहभागी राहिल्या होत्या. पोलिसांच्या क्रूर लाठीचार्जमध्ये अनेक वेळा जखमी होऊनही या राजकुमारीनं धरणं आणि निषेधांमध्ये सहभागी होण्याचं थांबवलं नाही. ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर तुरुंगावासही भोगला. राष्ट्रवादी चळवळीत महिलांचा व्यापक राजकीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम केले.

राजकुमारी अमृत सार्वजनिक जीवनातील महिलांच्या भूमिकेवर इतका प्रबळ विश्वास ठेवत होत्या की त्यांनी या मुद्द्यावर पंडित नेहरूंवर टीका करण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. 

शिक्षण आणि खेळातील महिलांच्या सहभागावर ठाम विश्वास ठेवणाऱ्या कौर यांनी ऑल इंडिया वुमेन्स एज्युकेशन फंड असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून काम केलं. १९४५ मध्ये, त्यांनी लंडनमधील युनेस्को परिषदेत भारताचं अधिकृत प्रतिनिधीत्व भूषवलं. संयुक्त प्रांतातून संविधान सभेसाठी निवडून आलेल्या मोजक्या महिला सदस्यांमध्ये अमृत कौर यांचा समावेश होता. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या त्या खंद्या समर्थक होत्या.

१९४७ मध्ये भारताला कठोर परिश्रमानं स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर भारतातील मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या अमृत कौर या पहिल्या महिला होत्या. देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी ट्युबरक्युलॉसिस असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन कौन्सिल ऑफ चाइल्ड वेल्फेअर, सेंट्रल लेप्रसी अँड रिसर्च इन्स्टिट्युट आणि राजकुमारी अमृत कौर कॉलेज ऑफ नर्सिंगची स्थापना केली.

पण, याही पलिकडे जाऊन त्यांनी एम्सच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली. १९५० मध्ये, कौर यांना वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलं. या प्रतिष्ठित पदावर पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आशियाई व्यक्ती होत्या.

डब्ल्यूएचओसाठी काम करत असताना मिळवलेल्या प्रतिष्ठा आणि इतर देशांच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी एम्सची स्थापना करण्यासाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, पश्चिम जर्मनी आणि यूएसएकडून मदत मिळविली. याशिवाय, त्यांनी शिमल्यातील वडिलोपार्जित वाडा (मॅनोरविल) एम्ससाठी हॉलिडे रिट्रीट आणि परिचारिकांसाठी विश्रामगृह म्हणून दान केला.

एम्स आपली स्वायत्तता कायम ठेवेल याची खात्री राजकुमारी कौर यांनी केली होती. शस्त्रक्रियांपासून वैद्यकीय शिक्षण पुरवण्यापर्यंत एम्स हातभार लावत आहे. येथे प्रवेश मिळवण्याासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जाईल, अशी त्यांनी तरतूद केली होती.

कौर यांना मलेरिया विरुद्धच्या मोहिमेसाठीदेखील स्मरणात ठेवलं जातं. या आजाराने भारतात एका वेळी अंदाजे एकूण दहा लाख लोकांचा जीव घेतला होता. कौर यांच्या नेतृत्वात भारतातील ग्रामीण जिल्ह्यांमधील चार लाख नागरिकांना वाचवण्यात आलं.

१०६१ मध्ये आपल्या १५०व्या स्थापना दिनानिमित्त, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलनं एम्सला जगातील सर्वात प्रतिष्ठित रुग्णालयांच्या यादीत स्थान दिलं. हा भारतासाठी गौरवाचा क्षण होता.

त्यानंतर तीन वर्षांनंतर, ६ फेब्रुवारी १९६४ रोजी राजकुमारी अमृत कौर यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं. अतिशय सुंदर आणि साध्या राजकुमारीनं लग्न केलं नाही. देशातील जनतेलाच त्यांनी आपली मुलं मानून त्यांची सेवा केली. देशातील लाखो महिला आणि रुग्णांच्या भविष्यासाठी राजकुमारी अमृत कौर कायम झटत राहिल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

Next Post

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

25 September 2023
इतिहास

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

16 September 2023
इतिहास

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी ‘मॅकडॉनल्ड्स्’ने ‘ड्राइव्ह थ्रू’ सुरु केला होता..!

9 September 2023
इतिहास

कोलंबस नाही तर यानं पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं होतं!

9 September 2023
इतिहास

इस्राएलमध्ये सापडली १२०० वर्षे जुनी वैभवशाली हवेली..

9 September 2023
इतिहास

या रक्त*रंजित यु*द्धाच्या पाऊलखुणा आजही अंगावर शहारे आणतात..!

9 September 2023
Next Post

'त्या' दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण...

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)