The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात येताजाता दिसणाऱ्या विश्रामबाग वाड्याचा इतिहास तुम्हाला माहितीये का…?

by शंतनू परांजपे
26 May 2025
in इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


पुण्यात आल्यानंतर तुळशीबागेत जाणार नाही हे अशक्यच. तुळशीबागेत शिरताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेला कोपऱ्यावर एक मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो. तोच “विश्रामबाग वाडा”.

आज आपण त्याचाच इतिहास जाणून घेऊया.

दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्याठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठी म्हणून वाडा बांधायला घेतला.

या वाड्याच्या बांधकामास सन १८०३ साली सुरुवात झाली व तो सन १८०९ साली संपूर्ण बांधून झाला. या वाड्याच्या बांधकामासाठी २,००,५४० रुपये इतका खर्च आला. शिवाय हौद व मोरी बांधण्यास १४,००० रुपये लागले. वाड्याच्या नैऋत्य दिशेस पुष्करणीचा हौद बांधला त्यास ८,५०० रुपये इतका खर्च आला.



Image result for विश्रामबाग वाडा

हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाड्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ साली पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते. त्यानंतर सन १८२१ साली इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सन १८७९ साली कुणीतरी दुष्ट मनुष्याने या वाड्यास आग लावली. त्यात वाड्याचे समोरचे दोन चौक जळून गेले, पुढे पुण्यातील नागरिकांनी वर्गणी गोळा करून व नगरपालिकेच्या सहाय्याने तो दुरुस्त करण्यात आला. पुढे तो नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला.

Image result for विश्रामबाग वाडा

सध्या वाड्यातील बहुतांश भागात महानगरपालिकेचीच ऑफिसेस आहेत. एक सांस्कृतिक केंद्र आहे, जिथे कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शासकीय ग्रंथालय आहे जिथे, हजारो पुस्तके ग्रंथप्रेमींच्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. पूर्वी पेशवाईच्या अखेरच्या काळातले वैभव म्हणून गणला जाणारा हा वाडा आता मात्र रस्त्यावरील वाहतूक कोंडीची शिकार बनला आहे.

Image result for विश्रामबाग वाडा

 

पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर विश्रामबाग वाड्याला भेट द्यायला विसरू नका!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतीय जंगलात शिकाऱ्यांना सापडला होता खराखुरा मोगली!

Next Post

अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधीनी भारतातील डिजिटल क्रांतीचा पाया रचलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधीनी भारतातील डिजिटल क्रांतीचा पाया रचलाय

या व्यक्तीने 'बेयर फुट कॉलेज'च्या माध्यमातून सोलर इंजिनिअर्सची चळवळ उभी केली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.