The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सशांची शिकार करायला गेलेला नेपोलियन सशांकडून स्वतःच शिकार होता होता राहिला..!

by द पोस्टमन टीम
4 January 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


झाडाचे पान पाठीवर पडल्यावर आभाळ पाठीवर पडले म्हणून पळत सुटणाऱ्या सशाची गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेलच. ही आणि अशा इतर गोष्टी वाचल्यावर ससा हा एक भित्रा प्राणी आहे असाच कोणाचाही समज होईल, हो ना? पण वास्तवातले ससे मात्र असे नसतात बरं का!

कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या, मऊमऊ आणि मोठ्या कानांच्या या सशाने इतिहासात एक यु*द्धही केले होते आणि ते जिंकलेही होते. तेही कोणासोबत, तर जगज्जेत्या नेपोलियन बोनापार्टसोबत! जगज्जेत्या नेपोलियनवर इटुकल्या पिटुकल्या सशांनी कशी मात केली, जाणून घेऊया या लेखातून.

रशिया आणि फ्रेंच यांच्यातील यु*द्धाची अधिकृत सांगता झाल्याचे घोषित करण्यासाठी नेपोलियनने १८०७ साली थिस्लिट करारावर स्वाक्षरी केली. यु*द्धबंदीच्या या घोषणेनंतर जल्लोष तर व्हायलाच हवा. म्हणून नेपोलियनने आपल्या सगळ्या दरबारी लोकांसाठी एक मेजवानी द्यायचे ठरवले आणि मेजवानीत खास सशाचे मटनच ठेवायचे असेही ठरवले गेले.

राजा महाराजांना शिकारीची आवडही असतेच आणि नेपोलियन याला अपवाद नव्हता. यु*द्धबंदीचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने सशाच्या मटणाची मेजवानी द्यायचे ठरवले होते, आता यासाठी शिकार तर करावी लागणार होतीच. नेपोलियनच्या दरबारातील एक सरदार अलेक्झांडर बर्थियरने आपल्या बागेत भरपूर ससे असून राजाने तिथे शिकारीसाठी यावे असे बढाईपूर्ण आमंत्रण दिले.

या बर्थियरने पॅरीसच्या बाहेरील एका बागेमध्ये राजासाठी शिकारीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. पण मुळात त्या बागेत ससेच नव्हते, तरीही राजासमोर आपण दिलेला शब्द खोटा ठरू नये म्हणून बर्थियरने काही ससे विकत आणले आणि ते या बागेत सोडले.

बर्थियरने नेमके किती ससे आणले याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही जणांच्या मते बर्थियरने शेकडो ससे आणले होते तर काहींच्या मते त्याने तब्बल तीन हजार ससे आणले होते. हे सगळे ससे आणून त्यांना एका पिंजऱ्यात बंद करून ठेवले.



नेपोलियन आपल्या लवाजम्यासह ठरल्या वेळी या बागेमध्ये हजर झाला. शिकारीसाठी लागणारी सगळी शस्त्रे आणि ती चालवणारी माहितगार माणसेही त्याच्यासोबत होतीच. यु*द्धाच्या धकाधकीनंतर अशी मौज राजासाठी गरजेची होतीच. ही सगळी मंडळी बागेत येताच बर्थियरने आपल्या सेवकांना पिंजऱ्यातील बंद ससे सोडण्याचा हुकुम दिला. पिंजरा उघडताच सगळे ससे इकडे तिकडे धावू लागले. राजाला आणि त्याच्यासोबत आलेल्या सैनिकांना वाटले की आता ससे घाबरून इकडे तिकडे पळतील आणि ते त्यांचा पाठलाग करून एकेक ससा मारून आणतील. पण, तसे काहीच झाले नाही.

माणसांना पाहून घाबरण्याऐवजी ते सगळे ससे त्यांच्याच दिशेने येऊ लागले. ससे असे आपल्याकडे येताहेत म्हणजे शिकार स्वतःहून चालून येत असल्याचे पाहून राजा आणि त्याचे सोबतीही काही काळ आनंदले. ससे थेट राजाच्याजवळ आले त्या सगळ्या सशांनी राजाच्या पायाभोवती गराडाच घातला. आता मात्र राजाची चांगलीच भंबेरी उडाली. सोबतच्या सैनिकांनी त्या सशांच्या पाठीवर चाबकाचे फटकारे ओढायला सुरूवात केली पण ससे काही केल्या मागे हटत नव्हते. ते राजाच्या अंगावरच धावून जाण्याच्या प्रयत्न करू लागले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सशांच्या या ह*ल्ल्यातून नेपोलियन कसाबसा सुटला आणि आपल्या बग्गीत जाऊन बसला इतर सैनिकही सशांच्या अशा विचित्र वागण्याने थोडेसे गोंधळले होतेच. नेपोलियन बग्गीत जाऊन बसला तरी सशांनी बग्गीतही उडी घेण्याचे प्रयत्न केले पण सगळ्याच सशांना काही हे जमले नाही. शेवटी नेपोलियन कसाबसा त्या सशांच्या तावडीतून निसटला.

राजाचे नशीब चांगले म्हणून सशांनी त्याला जाऊ दिले नाही तर हे सगळे ससे जर पॅरिस शहरात शिरले असते तर काय झाले असते कल्पना करा.

पण जंगली ससे तर भित्रे असतात ना मग हे ससे इतके धीट कसे निघाले? बर्थियरने आपल्या बागेत ससे तर मागवले पण आपण मागवलेले ससे जंगली आहेत की पाळीव याची त्याने काहीच चौकशी केली नाही. त्याच्या नोकरांनी आणलेले ससे हे जवळच्याच एका शेतकऱ्याच्या शेतातून आणले होते, ते पाळीव होते. त्यामुळे त्यांना माणसात वावरण्याची सवय होती.

या सशांना पिंजऱ्यातून बाहेर सोडण्यात आले तेव्हा त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती आणि हे ससे बराच काळ उपाशी होते. त्यांना वाटले नेपोलियन त्यांच्यासाठी खुराक घेऊन आला आहे म्हणून ते नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्याकडे धावत आले. आता बिचाऱ्या सशांना काय माहिती आपण ज्याच्या अंगावर अशा उड्या मारतोय तो फ्रांसचा राजा नेपोलियन आहे. फक्त खाण्याच्या आशेने त्यांनी या माणसांवर अशी झेप घेतली. झाल्या प्रसंगाने मात्र नेपोलियनचा चांगलाच पारा चढला. बिचारा बर्थियर करायला गेला एक, पण झाले तिसरेच. एकटा नेपोलियन सोडला तर सगळ्यांचीच हसून हसून पुरेवाट लागली होती.

आणि अशाप्रकारे पॅरीसमधल्या सशांनी तरी ‘भित्रा ससा’ हे विशेषण तकलादू ठरवले!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘झी फाइव्ह’वर असलेले ‘हे’ चित्रपट अजिबात चुकवू नका..!

Next Post

इकडे लोक टीका करत राहिले आणि तिकडे गौतम अदानींनी हजारो करोडोंचं साम्राज्य उभारलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

इकडे लोक टीका करत राहिले आणि तिकडे गौतम अदानींनी हजारो करोडोंचं साम्राज्य उभारलं

भारताने दिलेल्या गीर गाईंमुळे ब्राझिलची अर्थव्यवस्था उभी राहिली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.