The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी दक्षिण न्यूझीलंडमध्ये राज्य करणारा हा पक्षी नामशेष का झाला यावर आजही वाद आहेत..!

by Heramb
10 February 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्याला असे अनेक प्राणी माहित असतील, ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व जवळ जवळ संपत आले आहे. अगणित प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं अस्तित्व तर कायमचं संपलेलं आहे. आजवर ५० लाख प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे न्यूझीलंडमधील मोआ पक्षी. लाखो वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये ‘मोआ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या, शहामृगासारख्या पक्ष्यांच्या नऊ प्रजाती अस्तित्त्वात होत्या. त्यांच्या नामशेष होण्यामागे अनेक कारणे आहेत, शिवाय याविषयी अनेक मतमतांतरे देखील आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेण्याआधी मोआ पक्ष्यांबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

शहामृगसदृश मोआ पक्षी

मोआ हा इतिहासातील कदाचित सर्वांत उंच पक्षी. त्याची उंची सुमारे ३ मीटरपर्यंत असल्याचे मानले जाते. न्यूझीलंडमध्ये अनेक वर्षांपासून हे पक्षी राहत होते. तिथे त्यांचं अस्तित्व नेमकं कधीपासून होतं, आणि नेमके ते कुठून आले हे निश्चितपणे सांगता येत नाही. अलीकडे झालेल्या एका जेनेटिक संशोधनातून मोआ हे पक्षी दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या टिनामोउशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मोआ हा पक्षी टिनामोउचाच वंशज असल्याचे मानले जात आहे.

काही कारणाने ते न्यूझीलंडमध्ये आले तेव्हा सुरुवातीला त्यांना कोणताही धोका नव्हता, कोणत्याही प्रकारचे शिकारी प्राणी त्याठिकाणी नव्हते, यामुळे मोआ पक्ष्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. यानंतर सुमारे ६०० वर्षांपूर्वी ते अचानक नामशेष झाले. नामशेष झालेल्या वन्यजीवांपैकी अगदी अलीकडच्या काळात नामशेष झालेल्या जीवांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांचे नामशेष होणे आणि या बेटांवर मानवाचे आगमन होणे म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा क्षण.

बेटावर आलेल्या मानवाचं सॉफ्ट टार्गेट – मोआ

आजवर झालेल्या अनेक संशोधनांमधून ‘मोआ म्हणजे तिथे आलेल्या माणसांसाठी अन्नाचा चांगला स्रोत होता. त्यामुळे त्यांनी मोआ पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली. त्यांच्या पंखांचा वापर कपडे बनवण्यासाठी तर हाडांचा वापर भाल्याचे टोक आणि विविध दागिने तयार करण्यासाठी केला जात असे’ हे समोर आले आहे. मोआ पक्ष्यांचे आयुर्मान जेमतेम ५० वर्षे असत, तर ते पक्षी वर्षाकाठी केवळ २ अंडी देत असत. वर सांगितलेल्या हिं*स्त्र मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची संख्या कमी होऊ लागली.

परंतु फक्त मानवाच्या हस्तक्षेपामुळेच हे महाकाय पक्षी या बेटावरून नामशेष झाले होते की रोग आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ते आधीच संपण्याच्या मार्गावर होते हा प्रश्न सर्वांसमोरच होता. मोआ पक्ष्यांच्या जीवाश्मांवर केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, मोआ पक्षी नामशेष होण्यामध्ये माणसाचाच हातखंडा असल्याचे आढळून आले आहे.



संशोधनाचे निष्कर्ष आणि मतभेद

स्पेनमधील बार्सिलोना येथील इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजी येथील उत्क्रांतीवर संशोधन करणाऱ्या जीवशास्त्रज्ञ कार्लेस लालुएझा-फॉक्स यांनी एक रिसर्च पेपर सादर केला, ते म्हणतात, “कोणत्याही नैसर्गिक कारणांमुळे नाही तर मानवी हस्तक्षेपामुळे झाल्याचे सिद्ध होते..!” साधारण ९ हजार ते १३ हजार वर्षांपूर्वी, जेव्हा मानव जगभर पसरू लागला तेव्हा मेगाफॉनाच्या अनेक प्रजाती मॅमॉथ, मास्टोडॉन आणि मोआ यांसारख्या महाकाय प्राण्यांचे नष्ट होण्याचे कारण म्हणजे त्यांची मोठ्या प्रमाणात होणारी शिकार.

काही शास्त्रज्ञांनी मात्र अशा पक्ष्यांच्या नष्ट होण्यामागे नैसर्गिक कारणे असल्याचा देखील दावा केला आहे. या नैसर्गिक कारणांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, रोगराई आणि हिमयुग इत्यादींचा समावेश आहे.

कोपनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोर्टेन अलेनटॉफ्ट यांनी कार्लेस यांच्या या नैसर्गिक कारणामुळे मोआ पक्षी संपुष्टात येण्याच्या संशोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्राचीन काळात तिथे असलेल्या लोकांनी मोआ पक्षांची शिकार करून मांसभक्षणाबरोबरच त्यांची अंडी देखील खाल्ली हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी सिद्ध केले होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१२ ते २५० किलोग्रॅम वजनाच्या मोआ पक्ष्यामुळे तिथे आलेल्या मानवासाठी मोठ्या प्रमाणात भोजन उपलब्ध झाले होते. ॲलेनटॉफ्ट म्हणतात, “तेथील आर्किऑलॉजिकल साईट्सवर तुम्हाला पक्ष्यांच्या हाडांचे प्रचंड ढीग दिसतील, जर अशा प्राण्यांची त्यांच्या जीवनाच्या हरेक टप्प्यावर शिकार झाली तर त्यांचे नामशेष होणे क्रमप्राप्त आहे!”

डिनोर्निस रोबस्टस आणि इतर चार प्रजातींमधील २८१ मोआ पक्ष्यांचा डीएनए वापरून, ॲलेनटॉफ्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गेल्या ४ हजार वर्षांतील अनुवांशिक अभ्यास केला होता. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील पाच विशिष्ट ठिकाणांवरून मोआ पक्ष्यांची हाडे गोळा करण्यात आली, त्यांचे वय साधारणतः सुमारे ६०० वर्षांपेक्षा जास्त आहेत. संशोधकांनी हाडांमधील माइटोकॉन्ड्रियल आणि न्यूक्लियर डीएनएचे विश्लेषण केले आणि चार प्रजातींच्या अनुवांशिक विविधतेचे परीक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला.

प्राण्यांची संख्या जसजशी कमी होत जाते, तसतसे त्यांची अनुवांशिक विविधता संपून जाते. परंतु शास्त्रज्ञांच्या टीमने केलेल्या विश्लेषणात मोआ पक्षी कायमचे नैसर्गिकरित्या नष्ट होतील अशी चिन्हे कुठेही दिसली नाहीत. खरं तर, पक्ष्यांची संख्या त्यांच्या नामशेष होण्यापूर्वी ४ हजार वर्षांमध्ये स्थिर होती, त्यांनी नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेसच्या कार्यवाहीमध्ये ऑनलाइन अहवाल दिला.

ज्यावेळी त्याठिकाणी मानवी वस्ती वाढू लागली, तेव्हा देखील डी रॉबस्ट या प्रजातीची संख्या तिथे वाढताना दिसत होती. काही कारणाने, २०० वर्षांत मात्र हे पक्षी नाहीसे झाले. ॲलेनटॉफ्ट म्हणतात, “त्यांच्या जीन्समध्ये त्यांच्या नामशेष होण्याची काही शक्यता दिसत नव्हती. खरंतर मानवी वस्ती झाल्यानंतर देखील काही काळ मोआ पक्षी तिथे होते, पण कालांतराने ते नामशेष झाले.”

कारण काहीही असलं तरी पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा एक भाग असलेला हा पक्षी कायमचाच नामशेष झाला आहे हे निश्चित..! मोआ पक्षाच्या या उदाहरणावरून माणसानेच आपले शहाणपण दाखवून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा आज आपण जे प्राणी प्रत्यक्षात पाहत आहोत ते पुढच्या पिढ्यांना फक्त फोटोज आणि व्हिडीओजमध्ये पाहावे लागतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वाईन ऐकूनही माहित नसलेले हे लोक काही दशकांपासून जगातील सर्वोत्तम वाईन ग्लास बनवतायत..

Next Post

रिलायन्सने १३०५ करोड रुपयांचा नफा कमवून एक रुपयाही टॅक्स भरला नव्हता, मग हे नियम आले..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

रिलायन्सने १३०५ करोड रुपयांचा नफा कमवून एक रुपयाही टॅक्स भरला नव्हता, मग हे नियम आले..!

२००८च्या महामंदीत बंद पडायला आलेल्या क्रॉक्सची आज जगभर चलती आहे..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.