The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डायनासोर्सच्याही आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांना शास्त्रज्ञांनी जिवंत केलंय

by Heramb
23 January 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपल्या सूर्यमालेत आजवर फक्त पृथ्वीवरच जीवन आढळून आलं आहे. पृथ्वीवरचं संपूर्ण जीवन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. विश्वातील एवढ्या संकटांशी लढून पृथ्वीवरचं जीवन आजवर सुरक्षित आहे. त्यातही चमत्कारिक जीवन म्हणजे समुद्री जीवांचं. पाण्याच्या खाली कित्येक हजारो फुट्सवर राहणारे जीव जंतू करोडो वर्षे जगतात.

तर त्यांच्यातले स्टारफिश, तर्दीग्रेडसारख्या जीवजंतूंना अमरत्व प्राप्त झालेले असते. समुद्री जीवनाबद्दल अलीकडेच आणखी काही आश्चर्यकारक शोध लागले आहेत. त्या प्राचीन सूक्ष्मजीवांच्या शोधाबद्दलच आजचा हा विशेष लेख..

या शोधांमधील निष्कर्षांनुसार, करोडो वर्षांपूर्वी समुद्राखाली गाढले गेलेले सूक्ष्मजंतू पुनरुज्जीवित होत आहेत. हे सूक्ष्मजंतू सुमारे १०१.५ दशलक्ष वर्षांपूर्वी, टायरॅनोसोरस रेक्सच्याही आधी समुद्राच्या तळाशी गाढले गेले होते. ज्यावेळी हे सूक्ष्मजंतू समुद्रात गाढले गेले तेव्हा या ग्रहावर स्पायनोसोरस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाल , मांसाहारी डायनासोर्सचे राज्य होते. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. खंड बदलले, पृथ्वीचे महासागर वाढले, आणि प्रथमच मानव उत्क्रांत झाला. जपानी प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी हे सूक्ष्मजीव पुन्हा जिवंत केले आहेत.

प्राचीन सूक्ष्मजीवांचा शोध

या रिसर्च टीमने ड्रिलशिप जॉडिज रिझोल्युशनवर असताना समुद्राच्या तळापासून गाळाचे अनेक नमुने गोळा केले. हे नमुने ‘साऊथ पॅसिफिक गायर’च्या २० हजार फूट खोल अंतरावर असलेल्या तळापासूनही खाली, ३२८ फुटांवर होते. पॅसिफिक महासागराच्या या भागात फार कमी ऑक्सिजन आहे आणि कोणत्याही जीवसृष्टीसाठी कमी पोषक तत्वे आहेत. जगाच्या दुर्गम भागात हे सूक्ष्मजीव कसे जगू शकतात हा संशोधनाचा विषय होता.

याशिवाय शास्त्रज्ञांच्या मते आणखी एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची आवश्यकता होती ते म्हणजे ‘सूक्ष्मजंतू अन्न नसतानाही आयुष्य किती काळ टिकवून ठेवू शकतात?’ यावर जपान एजन्सी फॉर मरीन-अर्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवांबद्दलच्या संशोधन अहवालाचे प्राथमिक लेखक युकी मोरोनो संशोधन करीत आहेत.



सूक्ष्मजंतूंचे पुनरुज्जीवन

या १०१.५ दशलक्ष वर्षे जुन्या गाळाच्या नमुन्यांमध्ये सापडलेले हे सूक्ष्मजीव जेव्हा जेव्हा पोषक तत्वे आणि ऑक्सिजन अचानक उपलब्ध होतात तेव्हा जागृत होऊ शकतात असे त्यांच्या निष्कर्षांवरून दिसून आले आहे. सुरुवातीला या सूक्ष्मजीवांच्या आयुष्याबद्दल मोरोनो यांनाही शंका होती. परंतु जेव्हा त्यांनी या सूक्ष्मजीवांना पोषक तत्वे दिल्यानंतर त्यांची हालचाल मोरोनो यांना दिसून आली. सापडलेल्या सूक्ष्मजीवांपैकी ९९.१ टक्क्यांपर्यंतचे सूक्ष्मजीव जिवंत होते आणि आवश्यक पोषक तत्वे ग्रहण करण्यासाठी तयारही होते. 

या प्राचीन सूक्ष्मजीवांना आधुनिक सूक्ष्मजंतूंपासून होणार्‍या कोणत्याही प्रदूषणापासून वाचवण्यासाठी रिसर्च टीमने अत्यंत निर्जंतुक वातावरणात नमुने उघडकीस आणले. दूषित घटकांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेल्या एका लहान नळीद्वारे केवळ प्राचीन सूक्ष्मजीवांना पोषक तत्त्वे खायला देऊन हा प्रयोग करण्यात आला. पेशींनी वेगाने प्रतिसाद दिला. त्यांनी नायट्रोजन आणि कार्बनचे त्वरित सेवन केले. त्यामुळे ६८ दिवसांत या पेशींची संख्या चौपट झाली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

एरोबिक बॅक्टेरिया हे ऑक्सिजनद्वारे श्वासोश्वास करणारे असतात. या पेशी सर्वांत मजबूत असून त्या पुन्हा जिवंत होण्याची शक्यता असते. हे प्राचीन सूक्ष्मजंतू लहान हवेच्या बुडबुड्यांवर आपले जीवन जगत होते. परंतु त्यांच्या उल्लेखनीय दीर्घकाळ जगण्याचे खरे रहस्य त्यांच्या मेटाबॉलिक रेटमध्ये आहे. मेटाबॉलिक रेट कमी वेगवान असल्याने ते एवढी वर्षे टिकू शकतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंग्रज काळात दुभाषे इतके बदमाश होते की नंतर त्या शब्दाचा अर्थच खोटारडा असा झाला

Next Post

खचाखच भरलेल्या मैदानावर एक मोठं विमान येऊन थांबलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

खचाखच भरलेल्या मैदानावर एक मोठं विमान येऊन थांबलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला

बंगालच्या गावातील हाताने शटलकॉक्स बनवण्याची कला चीनमुळे धोक्यात आलीये..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.