The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

by द पोस्टमन टीम
15 April 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सुरुवातीला निखळ मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख खेळांचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण झालं आहे. क्रिकेटचा तर यामध्ये अगदी वरचा क्रमांक लागतो. क्रिकेटचा उगम आणि विकास सर्वात अगोदर इंग्लंडमध्ये झाला. म्हणूनचं इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं.

लॉर्ड्सनं आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक बदल पाहिले आहेत. क्रिकेट नावाचं वृक्ष याच मैदानावर रुजवण्यात आलं होतं. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, या लॉर्ड्सचा लॉर्ड कोण आहे? या लेखामध्ये आपण लॉर्ड्सच्या मालकाबद्दल जाणून घेणार आहोत.

‘मेरीलबोन क्रिकेट क्लब’ (एमसीसी) या क्लबकडे लॉर्ड्सची मालकी आहे. गेल्या कित्येक दशकांपासून मेरीलेबोन क्रिकेट क्लब लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची देखभाल करत आला आहे. एमसीसी ही संस्था जगभरातील क्रिकेट नियमांचं संरक्षक म्हणून काम करते. क्रिकेटमधील सर्व नियम तयार करणं, रद्द करणं, नियमांमध्ये बदल करणं ही काम एमसीसीच्या नियंत्रणात आहेत. या क्लबमध्ये १८ हजार पूर्णवेळ आणि पाच हजार असोसिएट सदस्य आहेत.

इंग्लंडमधील महत्त्वाकांक्षी उद्योजक थॉमस लॉर्ड यांनी १७८७मध्ये मेरीलबोन क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. त्यांनी मेरीलबोनमधील डोरसेट फील्ड्सवर एक क्रिकेट ग्राऊंड तयार केलं होतं. याच मैदानावर मिडलसेक्स आणि एसेक्स यांच्यात पहिला क्रिकेट सामना खेळवला गेला.



स्थापनेच्या पुढच्याच वर्षी, एमसीसीनं क्रिकेट नियमांची एक संहिता तयार केली. ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या विकेट्स २२ यार्ड्सच्या अंतरावर ठेवल्या पाहिजेत आणि खेळाडूंना कसं आउट केलं जाऊ शकतं याची तपशीलवार माहिती देण्यात आली. हे नियम जगभरातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी स्वीकारले. तेव्हापासून तर आजपर्यंत, एमसीसी जगभरातील क्रिकेटशी संबंधित कायद्यांचा संरक्षक आणि मध्यस्थ आहे.

१८१४ मध्ये एमसीसीनं सेंट जॉन्स वुडमधील नवीन ग्रामीण मैदानावर आपलं कार्यालय हलवलं. आजही याच ठिकाणी एमसीसीचं मुख्यालय आहे. साधारण एका दशकानंतर, थॉमस लॉर्ड ७० वर्षांचे असताना त्यांनी हे मैदान बँक ऑफ इंग्लंडचे संचालक, विल्यम वॉर्ड यांना ५ हजार ४०० पाउंड्ला विकलं. लॉर्ड्स यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लबला ३८ वर्षे मैदान उपलब्ध करून दिलं होतं. लॉर्ड्सचं योगदान लक्षात घेता विल्यम वॉर्ड यांनी मैदानाचं नाव न बदलण्याचा निर्णय घेतला. वॉर्डच्या या निर्णयामुळंच जागतिक क्रिकेटच्या पटलावर लॉर्ड्सचं अस्तित्त्व मोठ्या दिमाखात मिरवताना दिसत आहे.

१८७०च्या दशकात, एमसीसीनं काउंटी क्रिकेटमध्ये सामील व्हायचं ठरवले. कारण, काउंटी क्रिकेटची लोकप्रियता वाढत होती. एमसीसीनं १८७७ मध्ये लॉर्ड्सला काउंटी क्रिकेट मैदान म्हणून दत्तक घेण्यास मिडलसेक्सला आमंत्रित केलं. त्याचवर्षी एमसीसीनं जेम्स लिलीव्हाईट आणि इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला पाठवला. या संघानं पहिला अधिकृत कसोटी सामना खेळला होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

एमसीसीच्या सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आणि ब्रिटनमधील सुरुवातीच्या स्पोर्टिंग सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या डॉ. डब्ल्यू.जी. ग्रेस यांनी क्लबला त्यांच्या अतुलनीय कामगिरीद्वारे चांगली ओळख मिळवून दिली. डॉ. डब्ल्यू.जी. ग्रेस हे महान खेळाडू होते. आर्किबाल्ड स्टुअर्ट-वॉर्टले यांनी काढलेलं त्यांचं एक पेंटिंग अजूनही प्रसिद्ध लाँग रूममध्ये लटकलेलं आहे.

१८व्या शतकाच्या शेवटी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वाढीसाठी टेस्ट मॅच कंट्रोल बोर्ड, अडव्हायजरी काउंटी क्रिकेट कमिटी आणि इम्पीरियल क्रिकेट काउन्सिलची स्थापना करण्यात आली. १९६८मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेटची मोठी पुनर्रचना झाली तेव्हापर्यंत एमसीसीच्या या विविध घटक संस्था अस्तित्वात होत्या.

एमसीसी हा खासगी क्लब असल्यामुळं त्याला सार्वजनिक निधी मिळू शकला नाही. म्हणून, त्यानं व्यावसायिक खेळाचं व्यवस्थापन करण्यासाठी क्रिकेटची प्रशासकीय संस्था आणि टेस्ट अँड काउंटी क्रिकेट बोर्ड (TCCB) या नावानं क्रिकेट परिषद स्थापन केली.

मनोरंजनात्मक खेळाची देखरेख करण्यासाठी क्लबनं एमसीसी क्रिकेट असोसिएशनचं राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशन (NCA) मध्ये रूपांतर केलं. त्यामुळं क्रिकेटला शासनाकडून आर्थिक मदत मिळू लागली. पुढे, १९९०च्या दशकात, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB), TCCB, NCA आणि क्रिकेट कौन्सिलकडून इंग्लंडमधील सर्व क्रिकेटची जबाबदारी आपल्याकडे घेतली.

सध्या एमसीसीचे १८ हजार पूर्णवेळ आणि पाच हजार असोसिएट सदस्य आहेत. या सदस्यांकडे ग्राउंड आणि एमसीसीची सर्व मालमत्ता आहे (सर्वात प्रसिद्ध ऍशेस अर्नचाही यात समावेश आहे). हे सदस्य विविध समित्यांमधून क्लबचं संचालन करतात आणि त्यांच्यापैकी सुमारे दोन हजार सदस्य दरवर्षी खेळाच्या मैदानावर प्रत्यक्षपणे एमसीसीचं प्रतिनिधित्व करतात.

इतर कोणत्याही क्रिकेट क्लबपेक्षा एमसीसी जास्त सामने खेळतो. युकेमधील शाळा, विद्यापीठे आणि क्लब विरुद्ध दरवर्षी एमसीसीच्या सुमारे ४८० मॅचेस होतात. याशिवाय परदेशात क्रिकेटचा विकास करण्याच्या उद्देशानं दरवर्षी २० ते ३० सामने परदेशात खेळवले जातात. एमसीसी दरवर्षी खेळामध्ये सुमारे दोन दशलक्ष पाउंडची गुंतवणूक करतो. या क्लबच्या तिजोरीतून सहा एमसीसी विद्यापीठं आणि तरुण क्रिकेटर्सच्या एलिट यंग क्रिकेटला निधी पुरवला जातो.

आतापर्यंत विविध ब्रिटिश खेळाडूंनी आणि व्यक्तींनी एमसीसीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. २०१९मध्ये माजी श्रीलंकन खेळाडू कुमार संगकाराच्या रुपात एसीसीला पहिला नॉन ब्रिटिश अध्यक्ष मिळाला होता.

त्यानंतर वर्षभरानं इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमच्या माजी कर्णधार असलेल्या क्लेअर कॉनर यांनी इतिहास रचला. क्लबच्या २३३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेच्या गळ्यात एमसीसीच्या अध्यक्षपदाची माळ पडली. १ ऑक्टोबर २०२१ पासून कॉनर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतलेली आहे.

अष्टपैलू असलेल्या कॉनर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या महिला संघानं २००५ मध्ये 42 वर्षांनंतर ऍशेस मालिका जिंकली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना एमसीसीचं आजीवन सदस्यत्व देण्यात आलं होतं.

गेल्यावर्षी (2021) ऑक्टोबर महिन्यात एमसीसीनं १८ खेळाडूंना मानद आजीवन सदस्यत्व दिलं. त्यामध्ये माजी भारतीय स्पिनर हरभजन सिंग आणि माजी फास्ट बॉलर जवागल श्रीनाथ यांचाही समावेश होता.

भारताच्या या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी चार खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला. तर वेस्ट इंडिजचे तीन, ऑस्ट्रेलियाचे दोन आणि न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला मानद सदस्यत्व देण्यात आलं होतं. आतापर्यंत जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंना एमसीसीनं मानद आजीवन सदस्यत्व दिलेलं आहे. माजी भारतीय कर्णधार अंजूम चोप्रा यांचादेखील यामध्ये समावेश आहे.

गेल्या दोन शतकांपासून एमसीसी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याचं काम करत आहे. एमसीसीइतकं विस्तृत काम करणारी क्रिकेटमधील दुसरी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान फिनलंडमधून ८०००० मुलांना असं बाहेर काढण्यात आलं!

Next Post

शेजारील देशांनी वाळीत टाकूनही हा देश स्वबळावर उभा राहिला आहे!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

शेजारील देशांनी वाळीत टाकूनही हा देश स्वबळावर उभा राहिला आहे!

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.