The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

by Heramb
20 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९४० साली जपानने इटली आणि जर्मनीच्या सरकारांशी करार करून युद्धात सहभाग घेतला. जपानच्या सक्रिय सहभागानंतर जगाचा पूर्व भाग आणि पॅसिफिक प्रदेश रक्तरंजित होऊ लागला. जपानने अनेक ठिकाणी यु*द्धकैद्यांवर तर अनन्वित अ*त्याचार केलेच पण त्यांनी सामान्य जनतेवरही असेच अ*त्याचार केले.

जपानने चीनची तत्कालीन राजधानी नानकिंगमध्ये सामान्य नागरिकांवरही अनन्वित अ*त्याचार केले. त्यांनी लहान मुले, महिला आणि वृद्धांनाही सोडले नाही. देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे यु*द्धांत सहभागी झालेल्या जपानी सैनिकांच्या दुसऱ्या महायु*द्धातील मोहिमांचे वर्णन करण्यासाठी क्रू*र आणि अविवेकी हेच शब्द वापरता येतील.

नानकिंगसारखीच एक दुसरी रक्तरंजित घटना म्हणजे ‘बतान डेथ मार्च’. या अ*त्याचारी मार्चने अनेकांचे जीव घेतले. ही घटना ‘लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्मा’च्या अपमानजनक पराभवामुळे घडली. आपल्या पराभवाचा सूड उगवण्यासाठी त्याने अनेक फिलिपिनो आणि अमेरिकन सैनिकांचे हाल केले. बतान डेथ मार्चच्या या रक्तरंजित घटनेबद्दल जाणून घेण्यासाठी हा प्रपंच..

‘लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्मा’चा अपमानजनक पराभव

२२ डिसेंबर १९४१ रोजी जपानी सैन्याने फिलिपिन्सवर आक्र*मण केले. फिलपीन्स द्वीपसमूहाच्या आसपास अमेरिकन आणि फिलिपिनो सैन्याला पराभूत करण्याची जबाबदारी जपानी शाही सैन्यावर होती. या जपानी शाही सैन्याचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्मा करत होता. अमेरिकन आणि फिलिपिनो सैन्याचे नेतृत्व जनरल डग्लस मॅकआर्थरकडे होते. यु*द्धासाठी त्याने मोठ्या प्रमाणावर सैन्याची डिप्लॉयमेंट केली. यामुळे फिलिपिन्समधील नऊ प्रमुख बेटांभोवती असलेल्या विशिष्ट युनिट्सची संख्या कमी झाली.



फिलिपिन्समधील मोक्याच्या ठिकाणावरील सैन्यतुकड्यांची संख्या कमी झाल्याने लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्माला आपले सैन्य अतिशय कमी वेळेत फिलिपिन्समध्ये उतरवून ह*ल्ला करता येऊ शकणार होता. फिलिपिन्सभोवतीच्या बेटांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जनरल होम्माला बतान द्वीपकल्पातील गड ताब्यात घेणे आवश्यक होते.

त्यामुळे सर्व प्रमुख लढाया प्रामुख्याने बतान द्वीपकल्पातील या गडावर आणि आजूबाजूच्या परिसरातच होत असत. दुर्दैवाने जनरल डग्लस मॅकआर्थर आणि त्याच्या सैन्याचा रसद पुरवठा काही कारणाने बंद झाला. त्यामुळे सैन्यातील काही सैनिकांना अतिशय कमी प्रमाणात आहार मिळू लागला.

कमी रसद पुरवठा असूनही जनरल डग्लस मॅकआर्थरच्या नेतृत्वाखालील सैन्याने शत्रूंविरुद्ध मोठा लढा दिला आणि जपानी शाही सैन्याच्या वीस हजार सैनिकांना रोखले. दोन महिन्यानंतर लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्माच्या सैन्यातील अतिशय कमी भाग शिल्लक राहिला, आणि या प्रचंड पराभवामुळे त्याला माघार घ्यावी लागली. माघार घेऊन आलेल्या लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्माचा टोकियो येथील सैन्याधिकाऱ्यांनी प्रचंड अपमान केला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

लेफ्टनंट जनरल मासाहारू होम्माने जपानचे प्रचंड सैनिकी नुकसान केल्यामुळे फिलिपिन्सची मोहीम आता जनरल यामाशितावर सोपवण्याचा निर्णय जपानने घेतला. तरीही ३ एप्रिल १९४२ रोजी नव्या जोमाच्या सैन्यासह जपानने जनरल यामाशिताबरोबरच जनरल होम्माला देखील पुन्हा फिलिपिन्सच्या मोहिमेवर पाठवले. यावेळी दोन्ही जनरल्सकडे भूदलाबरोबरच रणगाडे, हवाई दलाची गरज लागल्यास त्यांची मदत मागण्याचा अधिकार आणि प्रचंड प्रमाणात तोफखाने होते.

अपमानजनक पराभवाचा बदला: 

जपानी जनरल होम्मा आपल्या नव्या जोमाच्या वाढीव सैन्यासह पुन्हा फिलिपिन्समध्ये आला होता. पण फिलिपिन्समधील सैन्यमात्र शारीरिकदृष्ट्या लढण्यास सक्षम नव्हतं. कमी रसदपुरवठ्यामुळे फिलिपिनो आणि अमेरिकन सैन्यातील अनेकांना रोगराईचा सामना करावा लागला आणि भूकमारीमुळे काहींची अवस्था बिकट होती.

आपला पराभव समोर दिसत असल्याने फिलिपिनो आणि अमेरिकन सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या मेजर जनरल एडवर्ड किंगने शरणागतीचा पर्याय स्वीकारला. दोन प्रबळ आणि नव्या जोमासह आक्र*मण केलेल्या जपानी जनरल्सना बतान देऊन टाकल्याने आपल्या सैन्याला कमी त्रासाचा सामना करावा लागेल असा विचार मेजर जनरल एडवर्ड किंगने केला होता. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही. मेजर जनरल एडवर्ड किंगने शरणागती पत्करल्याने सगळे सैनिक ‘यु*द्धकैदी’ बनले.

सूड घेऊ इच्छिणार्‍या जनरल होम्माची “दया” म्हणजे फक्त दिखावा होता. त्याच्या मनात अजूनही अपमानजनक पराभवाच्या आठवणी  ताज्या होत्या. त्यामुळे त्याने फिलिपिनो-अमेरिकन सैन्यातील यु*द्धकैद्यांना शिक्षा देण्यासाठी बराच विचार करून एक भयानक पर्याय निवडला. होम्माने सर्व कैद्यांना अनवाणी चालवत कॅम्प ओ’डोनेल येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, कॅम्प ओ’डोनेल तेथून सुमारे १६१ किमी अंतरावर होता.

हा निर्णय जाहीर झाल्यानंतर जनरल एडवर्ड किंगने होम्माला कमी शिक्षा देण्याची विनवणी केली. त्याचे सैन्य वर्षाच्या सुरुवातीपासून अतिशय कमी रसदीवर होते. बरेच सैनिक आजारी आणि उपाशी होते. दुर्दैवाने, त्याची विनंती नाकारली गेली आणि सुरु झाला नरकयातनांनी भरलेला ‘बतान डेथ मार्च’.

डेथ मार्च:

जपानी सैन्याने प्रथम कैद्यांची झडती घेतली. जपानी सैन्याला जर कोणतीही डायरी किंवा विद्युत, सैनिकी उपकरणे सापडली तर कैद्याला जागीच गोळ्या घालण्यात येत असत. हे सर्व यु*द्धकैदी १० एप्रिलच्या दिवशी त्याठिकाणाहून निघाले आणि सलग सात दिवस कॅम्प ओ’डोनेलकडे चालत राहिले. वाटेत चालताना मौजमजेसाठी, जपानी सैनिक भुकेल्या आणि आजारी यु*द्धकैद्यांना मारहाण करीत असत. पाण्याची विनंती करणाऱ्या अमेरिकन किंवा फिलिपिनो यु*द्धकैद्यांना गोळी घातली जात असे.

जर एखादा कैदी तळपत्या उन्हामुळे खाली पडला आणि त्याच्याबरोबर चालणाऱ्या कैद्यांपैकी त्याला कोणीही उचलले नाही तर खाली पडलेल्या यु*द्धकैद्यालाही गोळी झाडण्यात येत असे. कैद्यांना अन्न म्हणून दूषित तांदूळ देण्यात आले. रात्रीच्या वेळी यु*द्धकैद्यांना छोट्या छोट्या जागांमध्ये विश्रांती घ्यायला मिळत असे, पण या जागेमध्ये थोडी हालचाल करणेही शक्य नव्हते.

प्रचंड जीवितहानी

जसजसे ते पुढे जात होते तसतसे कैद्यांची संख्या कमी होत गेली आणि मृतदेहांची संख्या वाढली. आठवड्याच्या अखेरीस, या मार्चमुळे ६५० अमेरिकन यु*द्धकैदी आणि सुमारे सात हजार फिलिपिनो यु*द्धकैदी मारले गेले होते. जपानी सैन्याने फिलिपिनो सैनिकांचे भरपूर हाल केले.

कारण फिलिपिनो सैनिकांनी अमेरिकन मदत मिळवून यापूर्वी जपानी सैन्याचा अपमानजनक पराभव केला होता. पॅसिफिकच्या प्रदेशातील दुसऱ्या महायु*द्धादरम्यान जपानी सैनिकांनी सुमारे २० हजार अमेरिकन सैनिकांना कैद केले. उपासमार, आजारपण आणि छळामुळे त्यातील जवळ जवळ अर्ध्या अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला.

जपानच्या अंतिम पराभवानंतर, सरकारी वकिलांनी जनरल होम्मावर बतान डेथ मार्च आणि फिलिपाइन्समधील कैद्यांशी केलेल्या वागणुकीसाठी यु*द्ध गुन्हेगार म्हणून आरोप लावले. न्यायाधिकरणाने त्याला दोषी ठरवले आणि १९४६ साली त्याच्या गुन्ह्यांसाठी होम्माला फाशी देण्यात आली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायु*द्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

Next Post

ना कुठे नोंदणी ना कुठे मुख्यालय, तरीही बायनान्स जगातील सर्वांत मोठं क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज बनलंय

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ना कुठे नोंदणी ना कुठे मुख्यालय, तरीही बायनान्स जगातील सर्वांत मोठं क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज बनलंय

ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.