The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

नासाने अवकाशात सोडलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपमुळे अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे..!

by द पोस्टमन टीम
28 December 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजपासून साधारण २५ वर्षांपूर्वी एखादी ‘नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोप’ तयार करणं हे बहुतेक सर्वात कठीण स्वप्न होतं. गुंतागुंतीच्या उपकरणांची रचना असणारी एक अशी टेलिस्कोप जी ‘हबल’पेक्षा जास्त शक्तिशाली असेल. २५ वर्षांपूर्वी आतापर्यंतची सर्वात शक्तशाली टेलिस्कोप तयार करण्याची फक्त कल्पना शास्त्रज्ञांच्या डोक्यात आली होती. आता डोक्यात आलेली कल्पना सत्यात उतरवणार नाहीत ते शास्त्रज्ञ कसले. त्यांनी शक्तीशाली टेलिस्कोप तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

काही वर्षांपूर्वी एका वेधशाळेत, सोन्यानं मढवलेले आरसे, संवेदनशील उपकरणं, एका अत्याधुनिक सन शील्डमध्ये असेंबल करण्यात आले आणि तयार झाली जगातील सर्वात शक्तीशाली टेलिस्कोप. काही दिवसांपूर्वी अटलांटिक ओलांडून दक्षिण अमेरिकेतील एका स्पेसपोर्टवर ही टेलिस्कोप आणली गेली.

ख्रिसमसची सकाळ खगोलशास्त्रज्ञांसाठी सर्वात मोठं गिफ्ट घेऊन आली. कारण, रॉकेटच्या सहाय्यानं हा शक्तिशाली टेलिस्कोप यशस्वीपणे अवकाशात पाठवण्यात आला. खगोलशास्त्रज्ञांनी या शक्तिशाली टेलिस्कोपला ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ असं नाव दिलंय.

२५ डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण तळावरून एरियन रॉकेटद्वारे, नासानं जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप प्रक्षेपित केली. ही टेलिस्कोप नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीनं संयुक्तपणे विकसित केली आहे. ही जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बीण आहे. इतकी की अवकाशातून पृथ्वीवर उडणारी चिमणी देखील ती सहज शोधू शकते.

१९९० मध्ये अवकाशात पाठवलेल्या ‘हबल’ टेलिस्कोपपेक्षा ती 100 पट अधिक शक्तिशाली आहे. जेम्सच्या मदतीनं विश्वाच्या सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या आकाशगंगा, उल्का आणि ग्रह यांचाही शोध घेता येईल. या दुर्बिणीद्वारे विश्वाची अनेक रहस्ये उलगडली जातील तसेच एलियन्सची उपस्थितीही शोधण्यास मदत होईल, अशा विश्वास खगोलशास्त्रज्ञांना आहे.

१९९६च्या दरम्यान सर्वात शक्तीशाली टेलिस्कोप तयार करण्याची योजना विचारात घेण्यात आली होती. त्यावर शास्त्रज्ञांनी कामही सुरू केलं. २००२मध्ये या टेलिस्कोपचं नामकरण करण्यात आलं. नासाचे माजी प्रमुख जेम्स वेब यांचं नाव टेलिस्कोपला देण्यात आलं.

अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या आग्रहावरून १९६१ मध्ये जेम्स वेब यांनी नासाची जबाबदारी स्वीकारली होती. नासाच्या ‘अपोलो मोहिमे’मध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका निभावली होती. जेम्सच्या पुढाकारामुळं अपोलो मोहिमेअंतर्गत नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिनच्या रूपानं मानव पहिल्यांदाच चंद्रावर पोहोचला होता. १९९२ मध्ये वेब यांचे निधन झालं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सर्वात शक्तीशाली टेलिस्कोपला त्यांचं नाव दिलं.

हे देखील वाचा

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

जेम्स वेब टेलिस्कोपची योजना आणि प्रक्षेपण यादरम्यान २५ वर्षांहून अधिक काळ लोटला. दरम्यानच्या काळात अनेकदा जेम्सच्या प्रक्षेपणाची योजना अयशस्वी झाली आहे. जेम्सच्या निर्मितीमध्ये ४ कोटी तास गेल्याचं म्हटलं जात आहे. ही जगातील सर्वात महागडी दुर्बीण बनवण्यासाठी १० अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे ७५ हजार कोटी रुपये) जास्त खर्च आला आहे.

ADVERTISEMENT

नासाच्या म्हणण्यानुसार, यामध्ये ३४४ छोटे भाग आहेत आणि जर त्यापैकी एकानं जरी नीट काम केलं नाही तर अंतराळात या दुर्बिणीचे काम करणं कठीण होईल. जेम्सच्या निर्मितीमध्ये १४ देशांमधील ३०० हून अधिक विद्यापीठे, संस्था तसेच युनायटेड स्टेट्सच्या २९ राज्यांतील शास्त्रज्ञांनी सहकार्य केलं आहे. शेवटी एरियन रॉकेटच्या मदतीनं तिचं लॉन्चिंग करण्यात आलं.

लॉन्च झाल्यापासून सुमारे सहा महिन्यांनंतर जेम्स पूर्णपणे कार्यरत होणार आहे. आपल्या निश्चित कक्षेत पोहोचल्यानंतर जेम्स थंड होईल आणि त्यानंतर ऑपरेशनमध्ये सामील असलेली टीम जेम्समधील उपकरणांना उघडण्याची कमांड देतील.

या दुर्बिणीचा व्यास 21 मीटर असून त्यामध्ये चार प्रमुख उपकरणं आहेत जी संशोधनासाठी मदत करतील. नियर इन्फ्रारेड कॅमेरा, नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ, मिड इन्फ्रारेड इंस्ट्रूमेंट आणि फाइन गाइडिंग सेन्सरसह नियर इन्फ्रारेड इमेजर अँड स्लिटलेस स्पेक्ट्रोग्राफचा यामध्ये समावेश होतो. टेलिस्कोपच्या ऑप्टिक्सवर सोन्याचा पातळ थर चढवण्यात आला आहे. हा थर दुर्बिणीला थंड ठेवून इन्फ्रारेड लाईटला डिफ्लेक्ट करेल.

सूर्याच्या उष्णतेपासून कॅमेऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यात टेनिस कोर्टच्या आकाराचे 5 थरांचे सनशील्ड बसवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जेम्स वेब ही पूर्णपणे फोल्ड होणारी पहिलीच टेलिस्कोप आहे. लॉन्चनंतर जेव्हा ती स्पेसमध्ये सेट होईल तेव्हा पूर्णपणे उघडेल.

प्रक्षेपणानंतर सुमारे एक महिना उलटल्यानंतर जेम्स वेब लँग्रेंज पॉइंट (एलटीओ) नावाच्या ठिकाणी पोहोचेल. जिथे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणाचा समतोल साधला जाईल. याच कक्षेत राहून जेम्स सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. त्यावेळी पृथ्वीपासून तिचं अंतर सुमारे 15 लाख किलोमीटर असेल. याच ठिकाणी जेम्स पूर्णपणे उघडली जाणार आहे. ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असून शास्त्रज्ञ त्याची वाट पाहत आहेत.

जेम्स वेब मोहिमेमध्ये काम करत असलेल्या शास्त्रज्ञ एम्मा कार्टिस लेक यांच्या मते, या दुर्बिणीच्या डेटाद्वारे आपण मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बनशी संबंधित तथ्यं शोधू शकू. जेम्स वेब टेलिस्कोप १२५ °C ते उणे २३३ °C तापमानात काम करू शकते. त्यामुळे ती इन्फ्रारेडशी संबंधित माहिती प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हबल टेलिस्कोपची उत्तराधिकारी असल्याचं मानलं जात आहे. एप्रिल १९९० मध्ये, नासानं आपली पहिली स्पेस टेलिस्कोप ‘हबल’ अंतराळात सोडली होती. या दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचे वय १३ ते १४ अब्ज वर्षांच्या दरम्यान असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी हबल स्पेस टेलिस्कोपने अचानक काम करणं बंद केलं. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हबलची जागा घेईल.

दोघींची तुलना केली असता जेम्स हलबपेक्षा कित्येक पटीनं सरस आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हबल ‘टॉडलर गॅलेक्सी’ किंवा ‘यंग गॅलेक्सी’ पाहण्याची क्षमता ठेवत होती तर, जेम्स अगदी ‘बेबी गॅलेक्सी’सुद्धा टीपू शकते. नासाच्या म्हणण्यानुसार जेम्स वेब विश्वातील सर्वात प्राचीन आकाशगंगा शोधण्याचं काम करू शकते.

हबल आणि वेब दोन्ही टेलिस्कोप भूतकाळात डोकावू शकतात. साधारण १२.५ अब्ज वर्षांपूर्वी विश्व कसे होते ते पाहण्याची क्षमता हबलमध्ये होती. तर जेम्स वेब ही इन्फ्रारेड व्हिजन असलेली एक शक्तिशाली टाइम मशीन आहे जी १३.५ अब्ज वर्षांपूर्वी विश्व कसं होतं हे शोधू शकते.

नासा आणि इतर अंतराळ संस्थांनी एकत्र येऊन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या रुपात पृथ्वीचे डोळे अंतराळात सोडले आहेत. अथक परिश्रम घेऊन या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. जोपर्यंत जेम्स पूर्णपणे कार्यरत होत नाही तोपर्यंत खगोलशास्त्रज्ञांच्या मनात धाकधुक असेल यात शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

‘पुतीन’सारखं कॅरेक्टर बनवलं म्हणून रशियाने ‘हॅरी पॉटर’लाच कोर्टात खेचायचं ठरवलं होतं

Next Post

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात तब्बल १२ कोटींची हाय सेक्युरिटी मर्सिडीज मेबॅक भरती झालीये

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

13 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

पहिला ‘आयफोन’ ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

23 March 2022
विज्ञान तंत्रज्ञान

गुगल ड्राईव्हवर फुकट होणाऱ्या व्हॉट्सॲप बॅकअपला आता पैसे मोजावे लागू शकतात!

17 March 2022
विज्ञान तंत्रज्ञान

आईनस्टाईनने १०० वर्ष आधीच गुरुत्वाकर्षण लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते

17 March 2022
Next Post

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात तब्बल १२ कोटींची हाय सेक्युरिटी मर्सिडीज मेबॅक भरती झालीये

ऑलिम्पिकमध्ये विजयाच्या जवळ पोहोचला असताना याने बदकांसाठी होडी थांबवली होती

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!