The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिशातला वितळणारा चॉकलेट बार बघून त्याला मायक्रोव्हेव तयार करण्याची कल्पना सुचली

by द पोस्टमन टीम
26 December 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अंधुकसा दिसणारा हॅलोजनचा प्रकाश. मध्यात गोल फिरणारी काचेची प्लेट. गुणगुणण्याच्या आवाजाने होणारी सुरूवात आणि ‘बीप’सारख्या अवाजाने होणारी त्याची समाप्ती. आजच्या काळात मायक्रोवेव्ह बहुतेक लोकांना परिचित अशी वस्तू आहे. आजकाल ९० टक्के शहरी घरांमध्ये तर अगदी पॉपकॉर्न बनवण्यापासून ते सर्वच पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन सर्रास आढळतो.

प्रामुख्याने पदार्थ गरम करण्यासाठी किंवा बाकी प्रक्रिया करण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ आणि वापरण्यातली सुलभता या गोष्टींमुळे मायक्रोवेव्ह ओव्हन जास्त लोकप्रिय झाला. पण तुम्हाला तुमच्याच स्वयंपाकघरात अगदी गरजेच्या झालेल्या या उपकरणाबद्दल हे माहीत असलंच पाहिजे की सुमारे ७ दशकांपूर्वी मोठ्या अपघातामुळे याचा शोध लागला होता. पर्सी स्पेन्सर नावाचा एक इंजिनियर एके दिवशी ‘ग्रेड मॅग्नेट्रॉन’ नावाच्या विद्युतचुंबकीय उपकरणाने प्रयोग करत असताना मॅग्नेट्रॉनच्या वाढलेल्या तापमानामुळे शेजारी ठेवलेलं बिस्कीट वितळलेलं त्याला दिसून आलं.

हॉलंडच्या एका खेड्यात, गरिबीत वाढलेल्या या पोराने अगदी धडपडतच आपलं औपचारिक प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. बाकी लाखो लोक जे हल्ली या ओव्हनच्या मदतीने आपलं अन्न शिजवतात, गरम करतात, त्याच्या शोधकर्त्याला एकेकाळी वेळेवर खाणं मिळण्याचीही परिस्थिती नव्हती. मोटारगाडी आणि वीज यासारख्या आधुनिक सुविधा त्या लहान वयात त्याला ऐकूनही माहीत नव्हत्या, पण तरीही बऱ्याच कष्टाने त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. ज्याला कारण ठरलं ते त्याचं प्रदूषणकारण यांत्रिक गिरण्यांबद्दल असलेलं कुतूहल.

वयाच्या १२व्या वर्षी त्याला एका कापड गिरणीत नोकरी मिळाली. त्यानंतर १४व्या वर्षी दुसऱ्या कागदाच्या गिरणीत काम मिळालं. काहीच वर्षांत तो टायटॅनिकच्या रेडिओ ऑपरेटरच्या साहसी, नवनव्या कार्यांमुळे प्रेरित झाला आणि नौलदलात भरती झाला. लवकरच त्याने सगळं नवं तंत्रज्ञान शिकूनही घेतलं.



नंतरच्या काळात स्पेन्सरने सांगितलं की नौदलाच्या त्या नोकरीत रात्री गस्तीच्या वेळी त्याने बरीचशी पाठ्यपुस्तकं मिळवून स्वतःच सगळं शिकून घेतलं.

पहिल्या महायु*द्धानंतर स्पेन्सरला अमेरिकेत नव्याने स्थापन झालेल्या एका विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. या कंपनीचा सहसंस्थापक होता व्हॅनेवर बुश, जो अमेरिकेतील अ*णुबॉ*म्बनिर्मितीच्या मॅनहॅटन प्रोजेक्टसारख्या विविध प्रकल्पांसाठी ओळखला जातो. १९२५ साली या कंपनीचं ‘रेथिऑन उत्पादक संस्था’ असं नामकरण केलं गेलं, जी सध्या लष्करी उपकरणं, ह*त्यारं, मिसाईल्स, लष्करी प्रशिक्षण प्रणाली बनवणं यासाठी ओळखली जाते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

विशीत गेला तेव्हा तर स्पेन्सर रेथिऑनचा प्रमुख आणि सर्वांनाच परिचित झालेला इंजिनियर झाला होता. द्वितीय महायु*द्धात जेव्हा रेथिऑन कंपनी लष्करासाठी रडार तंत्रज्ञान विकसित करत होती तेव्हा तर स्पेन्सर हा तिथला अगदी हरकाम्या झाला होता, एखादी समस्या आली रे आली की लगेच स्पेन्सरला हाक मारली जात असे.

उदाहरणच द्यायचं तर स्पेन्सरचा कंपनीत बनलेल्या फ्यूज आणि डीटोनेटर बनवण्यात ज्याच्या मदतीने एखादं क्षेपणास्त्र सुरू करणं सुकर होतं ते बनवण्यात मोलाचा वाटा होता. सध्या रेथिऑनमध्ये इंजिनियर म्हणून काम करणारा आणि त्याच कंपनीचा इतिहास संकलक असलेला चेट मीचेलक म्हणतो की स्पेन्सरकडे कोणतीही समस्या सोप्या पद्धतीने सोडवण्याचं मोठं कसब होतं.

मोठ्या प्रमाणावर रडार मॅग्नेट्रॉन बनवण्याचा सुलभ आणि प्रभावी मार्ग शोधून काढण्यात आणि त्यावर काम करण्यात तर स्पेन्सरने कित्येक पेटंट्स मिळवली होती. मॅग्नेट्रॉन हे असं एक यंत्र असतं की जे काम करताना कंपित होणारा आवाज न करता कंपन पावणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करतं. यात मॅग्नेट्रॉनमध्ये काही बदल आणि सुधार करण्याच्या प्रयत्नात स्पेन्सर होता.

आणि १९४६ साली अशाच एका दिवशी स्पेन्सर एका मॅग्नेट्रॉनवर काम करत असताना त्याच्या हाताला खिशातलं काहीतरी चिकटलं, त्याने बघितलं तर लक्षात आलं की त्याच्या खिशातील शेंगदाण्यापासून बनवलेला एक चॉकलेट बार वितळलेला होता.

“एक चॉकलेट बार”
या कथेमुळे तसं फारसं काही घडलं नाही पण पुढे नक्कीच याचा उपयोग झाला. त्याच्याबद्दल तर असंही सांगितलं जातं की ते वितळलेलं चॉकलेट हा स्पेन्सरसाठी एक ‘युरेका क्षण‘ होता.

यावर स्पेन्सरचाच नातू ‘रॉड’ स्पेन्सर म्हणतो, ”स्पेन्सरला निसर्गात राहणं आवडत असे, खासकरून खार, शेकरू या त्याच्या छोट्या दोस्तांमध्ये तो फार रमत असे. त्यामुळे तो नेहमी एक शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेला चॉकलेट बार सोबत बाळगत असे आणि जेवणाच्या वेळेत या छोट्या दोस्तांना खायला देत असे. ” चॉकलेट बार खूपच कमी तापमानात वितळते (जवळपास ८० डिग्री फॅरेनहाईट), याचाच अर्थ असा की त्यावेळी स्पेन्सरच्या हातून चॉकलेट बार वितळणं ही नक्कीच उल्लेखनीय घटना होती.

कुतूहल चाळवण्याच्या हेतून स्पेन्सरने मॅग्नेट्रॉनच्या प्रयोगासाठी सोबत एक अंडं घेतलं, तेव्हा मॅग्नेट्रॉन तापल्यावर त्यातून बाहेर पडणाऱ्या लहरींमुळे काही वेळातच ते अंड फुटलं. यातली गमतीची गोष्ट अशी की त्यानंतर स्पेन्सरने काही कच्च्या लाह्या आणल्या आणि त्यांच्यावर मॅग्नेट्रॉनचा प्रयोग केला, जेव्हा त्यांचे ‘पॉपकॉर्न’ होऊन त्या व्यवस्थित भाजून निघाल्या तेव्हा त्याने ते मस्त पॉपकॉर्न ऑफिसमधल्या आपल्या मित्रांसोबत खाल्ले. आणि अशाप्रकारे मायक्रोवेव्ह ओव्हनचा जन्म झाला!

यावर तुम्ही म्हणाल की यातून स्पेन्सरला कसंकाय वाटलं की मायक्रोवेव्हचा वापर करून गरम केलेलं अन्न सुरक्षित, खाण्यालायक आहे की नाही ते. पण असं नव्हतं. हल्ली आपण बघतो की मायक्रोवेव्ह ओव्हनमधून दिलेला मायक्रोवेव्हचा छोटा डोससुद्धा अगदी पदार्थासाठी योग्य असतो. पण १९४० च्या काळात हे ज्ञान कुणालाच नव्हतं किंवा उपलब्धही नव्हतं. ज्याचा खरंतर स्पेन्सरला काही फारसा फरक पडला नाही.

१९४७ साली, स्पेन्सरच्या त्या अपघाती शोधानंतरच्याच वर्षी व्यवसायीक तत्वावर तयार झालेला मायक्रोवेव्ह ओव्हन बाजारात आला, ज्याची किंमत त्याकाळात २००० डॉलर इतकी होती. 

खरं सांगायचं तर त्याचा फारसा खपही झाला नव्हता. १९५५ साली आलेल्या घरगुती मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा फारसा खपला नाही कारण तो फार महागडा होता आणि त्यातही हे मायक्रोव्ह तंत्र कुणाला माहीतही नव्हतं. मायक्रोवेव्हच्या शोधानंतर जवळजवळ दोन दशकांनी ‘१९६७ साली खऱ्या अर्थाने मायक्रोवेव्ह ओव्हनला अमेरिकनांच्या घरात स्थान मिळवण्यात यश आलं. तेव्हा वर्षभरात १० ते १२ लाख मायक्रोवेव्ह ओव्हनचा विक्रमी खप झाला.

सध्या ‘रॉड’ स्पेन्सर स्वतः इंजिनियर म्हणून महत्त्वाच्या पदावर आहे आणि त्याच्या आजोबांवर पुस्तक लिहीत आहे. तो म्हणतो की,”मला त्यांच्या कहाण्या सांगायला फार आवडतं, आजोबांच्या या कहाण्या ऐकतच मी मोठा झालो त्यामुळे माझ्या डोक्यात त्यांचा मोठा साठा आहे. त्यापैकी काही बघितली तर दिसतं की आजोबा हुशार होते, वेडे होते आणि तेवढेच लोकप्रियही होते”. आणि हे चांगलं होतं की त्यांना खारींना चॉकलेट भरवायला आवडत असे, जे पुढे त्यांच्या पथ्यावरच पडलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पेप्सीने टायपिंगमध्ये केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे दं*गल उसळली होती !

Next Post

बलाढ्य अमेरिका व चीनी ड्रॅगनला या छोट्याशा देशाने यु*द्धाच्या मैदानात धूळ चारली होती!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

बलाढ्य अमेरिका व चीनी ड्रॅगनला या छोट्याशा देशाने यु*द्धाच्या मैदानात धूळ चारली होती!

पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचे संबंध नेमके कसे होते ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.