चीनने १९६२ मध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्यावर हल्ला केला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारत-चीनमधील सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या कित्येक दशकांपासून हा वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाल्याने या वादाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. याच प्रसंगामुळे १९६२ साली झालेल्या युद्धाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. किंबहुना भारताने १९६२चा धडा विसरू नये अशाप्रकारचे वक्तव्य चीनकडून करण्यात येत आहेत.

१९६२ साली असं काय घडलं होतं? कशाप्रकारे चीनने आपल्यावर धोक्याने हमला केला होता हेच आज जाणून घेऊयात.

तर झालं असं की, १९६२ला भारत आणि चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईपर्यंत भारताची अशी धारणा होती की चीन आपल्यावर हल्ला करणार नाही. चीनने देखील भारतावर हल्ला करायची कुठलीच इच्छा नसल्याचे वारंवार स्पष्ट केले होते.

परंतु एकीकडे अशी बतावणी करत असतानाच १९५९ पासून चीनने आपल्या सीमेतील घुसखोरी मात्र सुरूच ठेवली होती. याच कारणामुळे दोन्ही सैन्य दलात वेळोवेळी खटके उडत.

१९६२ च्या मध्यावर भारताच्या पूर्व आणि पश्चिम सेक्टरमध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. युद्धासाठी भारतीय सैन्य तयार नव्हते. पण चिनी सैन्य गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपल्या ताकद वाढवण्याचे काम करत होते. तिबेट चीनच्या घशात गेल्यामुळे दलाई लामा यांनी देखील भारतात शरणागती पत्करली होती. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये खटके कायमच उडत होते.

जेव्हा भारताने मॅकमोहन रेषा ओलांडुन आपल्या चौक्या उभारल्या तेव्हा मात्र चीनने गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती अगदी तशीच परिस्थिती आजही निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता यावेळी भारताने आपल्याच सीमा हद्दीत रस्तेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

१९१३ साली ब्रिटिश भारत आणि तिबेटमध्ये एक करार झाला होता. या करारानुसार एक मॅकमोहन सीमारेषा आखण्यात आली होती. परंतु जेव्हा चीनने तिबेटवर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी मॅकमोहन रेषा मानायला नकार देत, भारताचा एक मोठा भूभाग आपला आहे, असे आपल्या नकाशात दाखवले.

इतकंच नाही तर त्यांनी अक्साई चीनचा एक मोठा भूखंड जो भारताचा मालकीचा होता, तो गिळंकृत केला आणि तिथे रस्ता बनवला. याला प्रत्युत्तर म्हणून नेहरूंनी मॅकमोहन रेषेवर आपल्या चौक्या उभारण्याचे आदेश दिले. यानुसार लडाख क्षेत्रात पश्चिम सेक्टरमध्ये २४ आणि पूर्व सेक्टरमध्ये ६४ चौक्या तयार करण्यात आल्या.

चीनने ५० च्या दशकापासूनच हळूहळू लडाखचा भूभाग आपला असल्याचे दाखवायला सुरवात केली होती. अक्साई चीनचा भाग भारताचा असल्याचे भारताने आपल्या नकाशात दाखवले होते, हे चीन मानायला तयार नव्हता. परंतु भारत सरकारने त्यावेळी नरमाईचे धोरण स्वीकारले, याचाच फायदा उचलत चीनने आपल्या नकाशाचा आणि आपला त्या भूभागावरील दाव्याचा विरोध केला.

जेव्हा बीजिंगच्या एका सरकारी प्रकाशनाने उत्तर पूर्व लडाखच्या मोठ्या भूभागाला आपला भूभाग म्हणून दाखवले तेव्हा नेहरू हादरले. अशा प्रसंगी नेहरूंना फॉरवर्ड पॉलिसीचा स्वीकार करत चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला.

चीनने कधी हल्ला करणार नाही असं वचन दिलं होतं. परंतु ज्या प्रकारे चीनने आपली भूमिका बदलली त्यामुळे सर्वांना धक्का बसला. पंतप्रधान नेहरू आणि रक्षा मंत्री कृष्णा मेनन या भ्रमात होते की चीन आक्रमण करणार नाही. मेनन नेहमी चीन आक्रमण करणार नाही हे सांगण्यासाठी त्यांना जिनिव्हामध्ये चेन यी या चिनी साथीदाराने दिलेलं वचन प्रस्तुत करायचे ज्यानुसार चीन समस्या सोडवण्यासाठी कधीच बलप्रयोग करणार नाही. १९५९ सोव्हिएत रशियाने देखील चीन आक्रमण करणार नाही, असे म्हटले होते.

लढाईच्या काही महिन्याअगोदर चीनचे प्रधानमंत्री चाउ इन लई भारतात आले तेव्हा भारतात सीमावाद मोठ्या प्रमाणावर सुरू होता. तेव्हा वाटत होत की चर्चेतून हा विवाद सोडवला जाईल. परंतू चीनने मात्र अरुणाचल प्रदेशात घुसखोरी केली. लडाखमध्ये त्याने भूप्रदेश कसा जिंकला हे आपण बघितलेच. जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्यांना परत हाकलण्यासाठी भारताकडे न हत्यार होते, ना रसद होती. अरुणाचलमधील सैन्याला पुरेशी रसद पोहचत नव्हती.

१९६२ मध्ये जेव्हा चीन भारताच्या आतल्या भागात शिरला तेव्हा भारतीय सैन्याने त्यांना परत हाकलण्यासाठी संपूर्णपणे लढा देण्याची तयारी केली. परंतु हे घडण्याअगोदरच चीनने संपूर्ण ताकदीनिशी हल्ला केला.

११ ऑक्टोबरला पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात भारतीय सीमा क्षेत्रात घुसलेल्या चिनी सैन्याला परत हाकलणे कठीण असल्याचा निर्वाळा देण्यात आला, कारण सैन्याकडे शस्त्र होते ना सामान होता. या बैठकीत ठरवण्यात आले की पुढच्या उन्हाळ्यापर्यंत कुठलंही ऑपरेशन हाती न घेणे योग्य राहील, तसेच आदेश भारतीय सेनेला देण्यात आले.

१३ ऑक्टोबर १९६२ ला नेहरुना श्रीलंकेला जायचे होते. तेव्हा रस्त्यात त्यांनी चेन्नईला मीडिया समोर भूमिका मांडली की सैन्याला चिनी लोकांना हाकलण्याचे सैन्याला आदेश दिल्याचे म्हटले होते. पण यावर चीनकडून प्रतिक्रिया आली नाही. परंतू यानंतर केवळ आठच दिवसांत चीनने भारतावर आक्रमण केले. या आक्रमणाची तयारी त्यानी बरीच आधी केली होती.

चीनचे फार पूर्वीपासून हेच धोरण राहिले आहे. सैन्य शक्तीत वृद्धी करत करत छोटे छोटे प्रदेश ताब्यात घेत स्वतःचा विस्तार करणे आणि शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवू अशा बतावण्या करत हमला करणे. मग ते १९६२ असो नाही तर २०२०. चीन हा कुठल्याच दृष्टीने विश्वासपात्र नाही हेच यावरून स्पष्ट होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!