गलवान खोऱ्याचं नामकरण ज्याच्यावरून झालं तो गुलाम रसूल गलवान कोण होता?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सध्या भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतीय हद्दीतील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. १५ जूनच्या रात्री गस्त घालायला गेलेल्या जवानांची चिनी सैन्यासोबत बाचाबाची झाली आणि त्यात भारताच्या २० जवानांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. 

चीनच्या बाजूने देखील तितक्याच प्रमाणात जवान मृत्युमुखी पडले. हा सर्व प्रकार गलवान खोऱ्यात घडला असून तो भाग भारताच्या सीमावर्ती भागात येतो. गलवान खोऱ्याचा नामकरणामागे देखील एक इतिहास असून आह पुन्हा तो इतिहास ह्या तणावामुळे चर्चेत आला आहे.

लडाखच्या इतिहासकारांच्या मते गलवान खोऱ्याचे नामकरण रसूल गलवान ह्या गुलामाच्या नावावरुन करण्यात आले होते. गुलाम रसूल गलवान हा १८९५ साली मध्य आशिया आणि तिबेटमधून खडतर प्रवास करून लडाखच्या ठिकसे या गावी आला आणि दुसऱ्या दिवशी तो लेहला आपल्या परिवाराला भेटला.

गलवान खोऱ्यात वाहणाऱ्या गलवान नदीचा उगम अकसाई चीनच्या प्रदेशात होतो आणि ती पुढे श्योक नदीला जाऊन मिळते जी पुढे भारतीय हद्दीत सिंधू नदीला जाऊन मिळते. ह्या नदीचे आणि ह्या खोऱ्याचे नामकरण गुलाम रसूल गलवान याच्या नावावरून करण्यात आले आहे. 

ह्या रसूल गलवानचा जन्म काश्मिरातील एका आदिम जमातीत झाला. त्याने पुढे भविष्यात मोठे नाव कमावले. तो त्याने लिहलेल्या ‘सर्वंट्स ऑफ साहिब’ ह्या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या ह्या पुस्तकाला सर फ्रान्सिस यंगहजबंड यांची प्रस्तावना मिळाली आहे.

आज जेव्हा गलवान खोऱ्याचे नाव चर्चेत आले आहे तेव्हा ह्या रसूल गलवानचा इतिहास देखील पुन्हा काश्मीरमध्ये जागा झाला असून ह्या भागातील लोकांत पुन्हा त्याचे पुस्तक वाचायला आणि लडाखचा इतिहास जागृत करायला सुरुवात केली आहे.

रसूल गलवानने लिहलेल्या पुस्तकात २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील लडाख व काश्मीर खोऱ्याचे चित्रण करण्यात आले आहे. एका मागास काश्मिरी कुटुंबात जन्मलेला रसूल गलवान हा सुशिक्षित नसून त्याने हे पुस्तक लिहले होते. अनेक युरोपियन प्रवाशांचा स्थानिक मार्गदर्शक म्हणून काम करत असताना तो त्यांची भाषा शिकला होता. त्याच्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन केंब्रिज विद्यापीठाने केले होते.

तरुण वयात रसूल गलवान सर फ्रान्सिस यंगहसबंड या युरोपियन प्रवाशासोबत प्रवासाला गेला होता. ह्या युरोपियन प्रवाशानेच तिबेटच्या पठाराचा संपूर्ण भागाचा दौरा करत मध्य आशियातील गोबी वाळवंटापर्यंत प्रवास केला होता. त्याच्या ताफ्यात रसूल गलवान पण होता. रसूल गलवान हा एक कुशल गिर्यारोहक होता. आपल्या प्रवासादरम्यान त्याने इंग्लिश आणि चिनी भाषांचे ज्ञान मिळवले. यातूनच एका गुलामाच्या दृष्टीकोनातून सर्व्हन्टस ऑफ साहिब हा ग्रंथ लिहला होता, ज्यात त्याने त्याचे अनुभव मांडले होते.

गलवानने अगदी तोडक्या इंग्रजीत लिहलेल्या ग्रंथात आपल्या कुळाचा इतिहास लिहला होता. कशाप्रकारे बाल्टिस्तानातून प्रवास करत त्याचे कुटुंबिय ह्या खोऱ्यात आले, कसे त्यांनी काश्मीरच्या डोग्रा राज्यांच्या लग्नात जाऊन लटूमार केली, त्यांचे नामकरण “कारा गलवान’ असे करण्यात आले, मग पुढे ते राजाच्या घोड्यांचे पालनकर्ते कसे झाले, असा सर्व इतिहास आपल्या पुस्तकात लिहला होता.

गलवानची जमात युरोपियन लोकांची गुलाम झाली. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यातील प्रवासासाठी कशी रसूल गलवानच्या जमातीने युरोपियन लोकांना सहाय्य केले याचे अगदीच परिपूर्ण वर्णन गलवान याने त्याच्या पुस्तकात केले आहे. एखाद्या अशिक्षित माणसाने परकीय भाषा आत्मसात करून त्या आधारे अशुद्ध का होईना पण लिखाण केले व ते पुढे त्याचा इंग्रजी मालकाने प्रसिद्ध केले हे एक प्रकारे अद्वितीय काम होते. 

गलवानने मध्य आशियाचा भाग, चीनच्या उइगर प्रांतात गेलेल्या त्याच्या नातेवाईकाना भेटण्याचे किस्से याचे वर्णन त्या पुस्तकात केले आहे. त्याने लिहलेले हे पुस्तक लडाख आणि मध्य आशियचा समाज जीवनाचा एका गुलामाच्या दृष्टीने उभा करण्यात आलेला एक आरसा आहे. 

त्याच्या या प्रामाणिक योगदानामुळे व त्याच्या जमातीच्या स्मृतींमुळे त्या भागातील नदीचे व खोऱ्याचे नाव ब्रिटिश लोकांनी गलवान खोरे ठेवले होते. आजही ते नाव कायम आहे. यंगहसबंड या गलवानच्या युरोपियन मालकाने त्याचा पुस्तकाच्या प्रस्तावनेत जगातील सर्वात प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ माणूस म्हणून त्याचा गौरव केला आहे.

गलवानच्या ह्याच खोऱ्यात चीनने अतिक्रमण केले असून आता भारतीय हद्दीचा हा भाग आपला आहे, असं नमूद केलं आहे. त्याला भारतीय सैनिक जोरदार पणे विरोध करत असून भारत सरकारने चिनी सैन्याला माघार घेण्यास सांगितली आहे. 

दोन्ही देश सध्या तरी चर्चेने हा प्रश्न सोडवण्याचा मार्गावर आहे. गलवानचा इतिहासावरून तरी हा भाग कायम भारताचाच मानला जात असून भारताने त्या भागावर आपले अस्तित्व ठणकावून सांगणे गरजेचे बनले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!