The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आपण सर्रास वापरतो त्या इमोजीज आल्या कुठून हे माहिती आहे का?

by द पोस्टमन टीम
6 September 2023
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या संकल्पना, आणि भौतिक गोष्टींचा वारंवार नामोल्लेख किंवा शब्दाने उच्चार करण्यापेक्षा त्यासाठी काही चित्रात्मक, प्रातिनिधिक खूण, ‘सिम्बॉल’ निश्चित करण्याची पूर्वापार परंपरा आहे. उदाहरणार्थ जगभरातल्या सर्व देशांच्या चलनाला आपापलं स्वतंत्र सिम्बॉल आहे. त्या सिम्बॉलनेच ते चलन जगभरात ओळखलं जातं. प्रत्येक देशाचा ध्वज हे देखील त्या देशाची ओळख पटवून देणारं एक व्यवच्छेदक चिन्ह किंवा खूण असते.

जगभरच्या बाजारपेठांमध्ये लोकप्रिय असलेले ब्रँड्स हे देखील उत्पादक कंपनीच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या नावापेक्षाही चिन्हाने ओळखले जातात. त्यामुळेच त्या त्या ब्रँड्सच्या चिन्हाला ‘स्वामित्व हक्क’ देण्याची पद्धत रूढ झाली आहे. याचा अर्थ अशा चिन्हाची एकदा नोंदणी केल्यानंतर तशा प्रकारचंच काय; त्याच्याशी साधर्म्य असलेलं चिन्हंही अन्य कोणी वापरू शकत नाही.

मात्र, ही चिन्हं कशी ठरवली जातात? ती कोण ठरवतं? त्याचा उगम कुठून होतो; अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं हे मनोरंजक आहे आणि तितकंच उद्बोधकही! या लेखात अशाच काही विशिष्ट चिन्हांची ओळख आपण करून घेणार आहोत.

अमेरिकन डॉलर

अमेरिकन डॉलर हे सध्या तरी जगभरातील बहुतांश आर्थिक व्यवहाराचं चलन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पराभूत देश बेचिराख झाले आणि विजयी दोस्त राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थाही कोलमडल्या. त्यामुळे उशीरा युद्धात उतरलेल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत सक्षम अर्थव्यवस्था बनली आणि अमेरिकन डॉलर हे आंतरराष्ट्रीय व्यवहाराचं चलन!

या डॉलरसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘$’ या चिन्हाचा नेमका उगम कसा झाला याबाबत अनेक प्रवाद आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मान्यता असणारी थिअरी स्पॅनिश पेसो या चलनाशी संबंधित आहे. अमेरिका ही पाश्चात्य राष्ट्रांची वसाहत असताना तिथे साधारणपणे सन १७०० च्या अखेरपर्यंत पेसो हे चलन वापरलं जात असे. ते अल्पाक्षरात PS असं लिहिलं जायचं.

पेसो म्हणजे आठ भाग. ते लिहिताना बऱ्याचदा P च्या पुढे S लिहिण्याऐवजी P च्या वर S लिहिलं जायचं.. तेच डॉलरच्या चिन्हाचं प्राथमिक स्वरूप असल्याचं मानलं जातं.

छापील स्वरूपात डॉलरचा उल्लेख $ या चिन्हाने सन १८०० नंतर केल्याचं आढळून आलं आहे. अमेरिकन चलनात $ ही खूण वापरून छापण्यात आलेली नोट सर्वप्रथम १८७५ मध्ये वापरात आली.

हे देखील वाचा

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

डॉलरच्या चिन्हांबाबत आणखी एक लोकप्रिय थिअरी अशी आहे की, हे चिन्ह सन १७०० पूर्वी शेकडो वर्षांपासून वापरलं जात आहे. त्याची सुरुवात स्पेनमध्ये १५ व्या शतकात झाली. अरॅगॉनचा राजा फर्डिनांड (दुसरा) याने सन १९४२ मध्ये मूर्सला पराभूत करून स्पेनमधून बाहेर काढले. या विजयाचं स्मरण म्हणून त्याने हर्क्युलसच्या स्तंभांचं प्रतिनिधित्व करणारे दोन स्तंभ जोडून त्याच्याभोवती रिबन गुंडाळली. त्यातून $ चिन्ह तयार झालं.

स्पॅनिश दर्यावर्दींनी शोधलेल्या नव्या भूप्रदेशातून सन १४९२ नंतर सोनं आणि चांदी आणली. त्यातून नवी चलनी नाणी तयार करण्यात आली. त्या नाण्यांवर स्पॅनिश विजयाचं चिन्ह छापण्यात आलं. त्यामध्ये हर्क्युलसच्या दोन खांबांऐवजी प्रतिनिधीकरित्या एक खांब आणि त्यावर गुंडाळलेली रिबीन असं $ हे चिन्ह छापण्यात आलं. ही नाणी अमेरिकेत वापरात आली.

शांततेचं चिन्ह

सध्या शांतता चिन्ह म्हणून सन १९६० पासून वापरण्यात येणारं चिन्ह प्रत्यक्षात १९५८ मध्ये अणुयुद्धाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. ‘डायरेक्ट ऍक्शन कमिटी अगेन्स्ट न्यूक्लियर वॉर’ नावाच्या तत्कालीन चळवळीने लंडनमध्ये ‘बॅन द बॉम्ब’ ही मोहीम हाती घेतली. अणुबॉम्बच्या विध्वंसकतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी लंडन शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

लंडनमधील जेराल्ड हॉलटॉम नावाच्या ‘टेक्सटाईल डिझायनर’ने या मोर्चात वापरण्यासाठी हे चिन्ह तयार केलं.

होल्टॉम हा दुसर्‍या महायुद्धापासून युद्ध आणि हिंसेचा कट्टर विरोधक बनला. त्याचा अण्वस्त्रविरोधी चळवळीला सक्रिय पाठिंबा होता. अण्वस्त्रविरोधी मोर्चाचं बोधचिन्हाची आकृती तयार करण्यासाठी त्याने फ्लॅग सेमाफोर अल्फाबेट्सचा वापर केला. त्यामध्ये ‘N’ म्हणजेच Nuclear हे अणूचे निदर्शक आहे. तर, ‘D’ म्हणजेच Disarmament हे नि:शस्त्रीकरणाचे द्योतक आहे.

 

लंडनमध्ये दिनांक ४ एप्रिल १९५८ रोजी अण्वस्त्रविरोधी मोर्चा काढण्यात आला. वृत्तपत्रांनी या मोर्चाचं वार्तांकन करताना अण्वस्त्रविरोधी प्रतिमा जगभर प्रसिद्ध केली. ‘लाइफ मॅगझिन’ने अमेरिकेत सर्वप्रथम ही प्रतिमा प्रकाशित केली होती. हे चिन्ह ६० च्या दशकात प्रतिसांस्कृतिक, शांततावादी चळवळीचं प्रतीक बनलं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याचा वापर केला जात आहे.

लिंगवाचक चिन्ह

स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिंगवाचक चिन्हाची मुळं मध्ययुगात सापडतात. ही चिन्हं रोमन पौराणिक कथांमधील संकल्पनांवर आधारित आहेत. मध्ययुगात खगोलशास्त्रज्ञांनी प्रत्येक ग्रहासाठी काही चिन्हांचा वापर केला. त्यामध्ये शुक्रासाठी स्त्री चिन्ह आणि मंगळासाठी पुरुष चिन्ह वापरण्यात आलं.

रोमन पौराणिक कथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे व्हीनस म्हणजे शुक्र ही प्रेमाची देवता तर मार्स म्हणजे मंगळ युद्धाची देवता होती. या रोमन देवतांवर आधारित नर आणि मादीशी संबंधित लिंगवाचक चिन्हं तयार करण्यात आली.

ही चिन्हं जशी दिसतात तशी ती का आहेत; त्याचा संदर्भ काय; हे मात्र पुरेसं स्पष्ट नाही. एक धारणा अशी आहे की ते जननेंद्रियाचं प्रतिनिधित्व करतं. आणखी एका मान्यतेनुसार मादी चिन्ह आरशासारखं दिसतं आणि त्याला ‘शुक्राचा आरसा’ म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की, मादी चिन्ह हे ग्रीक अक्षर ‘फि’ची क्रूड आवृत्ती आहे. त्याच्या स्वरूपाबाबत संदिग्धता असली तरी आजही त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

@ चिन्ह

@ या चिन्हाचा वापर सर्वप्रथम केला गेल्याची नोंद सन १५३६ मध्ये आढळते. फ्लोरेंटाईन व्यापाऱ्याने वाइनची संख्या दर्शविण्यासाठी या चिन्हाचा पहिल्यांदा वापर केला होता. त्याला ‘एम्फोरे’ ,म्हटलं जायचं. मात्र, त्यासाठी हा आकार का वापरण्यात आला, हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही.

त्यानंतर या चिन्हाचा वापर झाल्याची नोंद थेट १९७१ मध्ये सापडते. रे टॉमलिन्सन यांना संगणक प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेल्या व्यक्तींना संपर्क करण्यात अडचण निर्माण झाली. या प्रोग्रॅमर्सना दूरध्वनी आणि टेलिटाइप मशीनद्वारे (बिल्ट-इन प्रिंटरसह कीबोर्ड)  जोडणं आवश्यक होतं. त्यांचे संगणक एकमेकांशी थेटपणे जोडलेले नव्हते. त्यामुळे त्यांना एकमेकांशी संपर्क ठेवण्यात अडथळा येत होता.

आजच्या इंटरनेटची प्राथमिक आणि मर्यादित आवृत्ती असलेली ‘अर्पानेट’ यंत्रणा विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारने टॉमलिन्सनच्या कंपनीला नियुक्त केलं होतं. त्यासाठी अर्पानेटवरून दुसऱ्या व्यक्तीच्या संगणकापर्यंत जाऊ शकतील अशा पत्त्यांची आवश्यकता होती.

संगणकांना एकमेकांच्या संपर्कात जोडण्यासाठी प्रणालीद्वारे आधीपासूनच वापरात असलेल्या चिन्हाचा उपयोग नव्हता. अचानक टॉमलिन्सनला त्याच्या टेलिटाइप मशीनवर @ चिन्ह दिसलं. त्याने त्याचा वापर करून संगणकांना एकमेकांच्या संपर्कात जोडलं आणि त्याने स्वतःला पहिला ईमेल संदेश पाठवला. तो टेलिटाइपवरून पुढे गेला आणि त्याच खोलीतल्या नेटवर्कने जोडलेल्या दुसर्‍या टेलिटाइपवर परत आला.

टॉमलिन्सनने त्या पूर्वी आपल्या संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पाठवलेल्या पहिल्या-वहिल्या ईमेल संदेशासाठी @ च्या जागी कोणत्या चिन्हाचा वापर केला ते आता त्यालाही आठवत नाही. मात्र, त्याला त्यावेळी आलेल्या अडचणीतुन मार्ग शोधण्यासाठी त्याने वापरलेल्या त्या छोट्याशा @ या चिन्हाचा वापर मानवी संवाद यंत्रणेमध्ये क्रातिकारक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरला.

यूएसबी

सध्याच्या संगणक युगात ‘युनिव्हर्सल सीरियल बस’ (यूएसबी) हे आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाएवढंच महत्वाचं साधन बनलं आहे. इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना संगणकाशी जोडण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. यूएसबीद्वारे कितीही उपकरणं संगणकाशी थेट जोडली जाऊ शकतात आणि ‘हॉट स्वॅप’ अर्थात, संगणक चालू असतानाच ती जोडली किंवा काढली जाऊ शकतात.

यूएसबीसाठी वापरण्यात येणारं चिन्ह हे रोमन संस्कृतीतला समुद्राचा रोमन देव नेपच्यून याच्या त्रिशूळाच्या आकारावरून तयार करण्यात आलं आहे. हे त्रिशूळ म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. वापरकर्त्याला यूएसबीद्वारे त्यांची अन्य उपकरणं संगणकाशी जोडण्याची शक्ती! या त्रिशुळाच्या प्रत्येक पात्याच्या टोकाला असलेले वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस हे आकार म्हणजे यूएसबी वापरून संगणकाला जोडता येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या उपकरणांचे प्रतीक आहे.

पॉवर बटण

संगणक किंवा इतर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण चालू आणि बंद करण्यासाठीच्या बटणासाठी एका विशिष्ट चिन्हाचा वापर करण्यात येतो. चालूसाठी 1 आणि बंदसाठी 0 या अंकांचा वापर करून हे चिन्ह तयार करण्यात आलं आहे.

१९७३ साली ‘इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन’ने उपकरणांवर वापरण्यासाठीच्या ग्राफिकल चिन्हांमध्ये पॉवर चिन्हांचं प्रथम वर्णन करण्यात आलं आहे. उपकरण पूर्णपणे सुरू असल्याचं दाखवणारा 1 आणि बंद असल्याचं दाखवणारा 0, याशिवाय या चिन्हांमध्ये एक अर्धवट तुटलेलं अर्धवर्तुळ आणि त्यातून जाणारी एक रेषा यांचाही समावेश आहे. त्याचा अर्थ आहे ‘स्टँडबाय’. म्हणजेच उपकरण बंद आहे पण वीजपुरवठा सुरूच आहे. काही आधुनिक उपकरणांमध्ये ‘स्टँडबाय’साठीच्या अर्धवर्तुळाची जागा चंद्रकोरीने घेतली आहे. त्याचा अर्थ झोपायची वेळ झाली आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या संकल्पना, आणि भौतिक गोष्टींचा वारंवार नामोल्लेख किना शब्दाने उच्चार करण्यापेक्षा त्यासाठी काही चित्रात्मक प्रातिनिधिक खूण, ‘सिम्बॉल’ निश्चित करण्याची पूर्वापार परंपरा आहे. उदाहरणार्थ जगभरातल्या सर्व देशांच्या चलनाला त्यांची त्यांची स्वतंत्र खूण आहे. त्या खुणेनेच ते चलन जगभरात ओळखलं जातं. प्रत्येक देशाचा ध्वज हे देखील त्या देशाची ओळख पटवणार एक व्यवच्छेदक चिन्ह किंवा खूण असते.

स्माइलीज्

संगणक आणि मोबाईलमध्ये मश्गुल असलेल्या सध्याच्या तरुणाईची भाषा शब्दांपेक्षा ‘स्माइलींची बनली आहे. आपल्या भावना प्रत्यक्ष शब्द वापरून व्यक्त करण्यापेक्षा संगणकावर किंवा मोबाईलवर उपपलब्ध असलेल्या शब्दाश: शेकडो इमोजीज्-स्वरूपातील स्माइलीज्-ने  व्यक्त करण्यावर नेटकऱ्यांचा भर असतो.

या स्माइलीज् तयार करण्याचं श्रेय मुख्यत्वे जाहिरात कंपन्यांसाठी काम करणाऱ्या हार्वे रॉस बॉल या अमेरिकन ग्राफिक डिझायनरला दिलं जातं. त्याने एका विमा कंपनीसाठी स्माइलीज तयार केल्या. 

कंपनीने त्यात अनेक बदल करून आणि भर घालून त्याचा उपयोग आपल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी केला. बॉलने केवळ दहा मिनिटांत अनेक स्माइलीज रेखाटल्या. या कामाचा मोबदला त्याला मिळाला केवळ ४५ डॉलर्स.

विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या परस्पर संवादातून या स्माइलीज् सर्रास वापरल्या गेल्याच. मात्र, कालांतराने त्या कंपनीच्या बाहेरच्या लोकांमध्येही पसरल्या आणि लोकप्रिय ठरू लागल्या. या स्माइलीज्-चे स्वामित्व हक्क (कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क) घेण्याची तसदी ना बॉलने घेतली ना विमा कंपनीने! त्यामुळे इतरांना या स्माइलींचं हवं ते करण्याची मुभा मिळाली.

बर्नार्ड आणि मरे स्पेन या दोन हॉलमार्क दुकानांचे मालक असलेल्या बंधूंनी एका दुकानात या स्माइलीज् पहिल्या. त्यांना त्याचं कौतुक वाटलं. बॉलने त्या स्माइलीज् रेखाटल्याचं त्यांना माहीत होतं. मात्र, त्यांनी त्यावर ‘हॅव अ हॅपी डे’ हे वाक्य चिकटवलं आणि सन १९७१ मध्ये कॉपीराइटसाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांनी त्या वर्षाच्या अखेरीपर्यंत स्माइलीज्-चा समावेश असलेल्या ५ लाख १० हजार वस्तू विकल्या.

प्रत्यक्षात ही स्माइलींची संकल्पना आली बॉलच्या डोक्यातून. त्यानेच ती कागदावरही उतरवली. मात्र, स्पेन बंधूंनी त्यावर रग्गड पैसाही कमावला आणि श्रेयही लाटलं!

युरोपमध्ये सन १९७२ मध्ये असाच प्रकार घडला. फ्रँकलिन लूफ्रानी नावाच्या फ्रेंच पत्रकाराने या चिन्हावर ‘ट्रेडमार्क’ मिळवला. त्यानेच प्रथम या चित्रांना अधिकृतपणे ‘स्माइली’ हे नाव दिलं. त्याच्या स्माइली कंपनीने जगभरात स्माइली वापरण्याचे परवाने द्यायला सुरुवात केली. आजही ती स्माइलींच्या वापराचे परवाने देणारी एक यशस्वी कंपनी आहे.

स्माइलीज्-च्या वापराचे हक्क विकून लूफ्रानीने प्रचंड माया कमावली. मात्र, त्याचा मुलगा निकोलस यानेच त्याच्या या उद्योगाला विरोध केला. स्माइलीज्-चं डिझाइन हे खूप मूलभूत आणि प्राथमिक स्वरूपाचं आहे आणि कोणत्याही एका व्यक्तीला किंवा कंपनीला त्याचं श्रेय दिलं जाऊ शकत नाही, असं निकोलसचं म्हणणं होतं. 

वॉल मार्टने त्यांचा लोगो आणि प्रचार मोहिमेचा, जाहिरातीचा भाग म्हणून स्माइलीज्-चा वापर केला तेव्हा स्माइली कंपनीने सन १९९७ मध्ये वॉल मार्टच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू केली. तब्बल १० वर्षांनंतर दोन्ही कंपन्यांमध्ये समझोता झाला आणि या कायदेशीर लढाईला पूर्णविराम मिळाला. समझोत्याच्या अटी मात्र जाहीर करण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे सध्याच्या तरुणाईची भाषा बनलेल्या स्माइलीज्-च्या मागे कडवटपणाचा इतिहास दडलेला आहे.

एखाद्या संकल्पनेला, उत्पादनाला किंवा व्यवसायाला ओळख मिळवून देण्यासाठी, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या मनात ठसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हांच्या निर्मितीचा आणि निर्मितीनंतरच्या वेगवेगळ्या घडामोडींचा मागोवा एक इतिहास समोर मांडणारा ठरतो हे मात्र निश्चित! तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने स्वखर्चातून आपल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली आहे!

Next Post

जहाजांचा इतिहास आपल्याला वाटतो त्यापेक्षाही कित्येक पट जुना आहे..!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

26 September 2023
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

25 September 2023
मनोरंजन

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

25 September 2023
मनोरंजन

तब्बल नऊ तास वाहतुक कोंडी निर्माण करणारा ‘बर्निंग मॅन’?

11 September 2023
मनोरंजन

या भारतीय बियरने अमेरिकेतील तरुणाईलाही वेड लावलंय!

5 September 2023
Next Post

जहाजांचा इतिहास आपल्याला वाटतो त्यापेक्षाही कित्येक पट जुना आहे..!

आपल्याला मिळणारा ऑक्सिजन खरंच झाडांपासून तयार होतो का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)