दिल की धडकन ऐकवणाऱ्या स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


डॉक्टरांकडे गेल्यावर सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतो तो त्यांचा स्टेथोस्कोप, हे उपकरण डॉक्टरांच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण घटक बनले असून, हृदयाची गती तपासण्यासाठी या उपकरणाचा हमखास वापर केला जातो. या स्टेथोस्कोपच्या संशोधानाची कथा देखील त्याच्या प्रमाणेच रंजक आहे.

प्रामुख्याने स्टेथोस्कोपचा वापर हृदयाची गती, रक्ताचा प्रवाह तपासण्यासाठी केला जातो. या उपकरणाचे तीन भाग असतात.

पहिला भाग असतो, रेसोनेटर ज्याच्या मदतीने हृदय आणि आतड्यामधील प्रवाह तपासला जातो, हा भाग छाती पोटाच्या भागावर ठेवण्यात येतो, दुसरा भाग असतो एका लांब नलिका आणि तिसरा भाग असतो ‘एयरपीस’ ज्याच्या मदतीने डॉक्टरांना प्रवाहातील स्पंदनांचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू येतो.

ही एका साधारण स्टेथोस्कोपची रचना आहे. या भागांच्या व्यतिरिक्त स्टेथोस्कोपमध्ये अजून बरेच प्रकार असतात.

स्टेथोस्कोप हा शब्द स्टेथेस आणि स्कोपियन या दोन ग्रीक शब्दांच्या संमिश्रणातून तयार झाला असून या शब्दांचा अर्थ स्तन आणि तपासणे असा आहे.

स्टेथोस्कोपच्या संशोधना अगोदर डॉक्टर लोकांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी त्यांच्या पोटावर अथवा छातीवर आपले डोके ठेवून त्यांच्या आतड्यातील प्रवाह आणि हृदयाचे ठोके इत्यादींचा अंदाज लावायचे. हा प्रकार फार किळसवाणा होता, शिवाय यात पूर्णपणे हृदयाच्या गतीची अचूक नोंद करता येत नव्हती.

महिला या प्रकाराला फार घाबरायच्या आणि डॉक्टरकडे उपचार घेणे थांबवायच्या. यावरच तोडगा म्हणून स्टेथोस्कोपचा शोध लागला.

इंटर रेने थियोफिले ह्यासिंथे लेनेक या डॉक्टर कम शास्त्रज्ञाने पॅरिसच्या इन्फन्ट्स मॉडेस इस्पितळात आजच्या आधुनिक स्टेथोस्कोपची निर्मिती केली. त्याला या स्टेथोस्कोपच्या निर्मितीची कल्पना त्यावेळी ज्यावेळी त्याच्या समोर खेळ खेळणाऱ्या मुलानी एक तारेचे संदेशवाहक यंत्र तयार केले होते.

एक मुलगा एकीकडून बोलायचा आणि दुसरा मुलगा दुसऱ्या बाजूने त्याचे म्हणणे ऐकायचा, दुसऱ्या बाजूच्या मुलाला पहिल्या बाजूच्या मुलाचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता.

एकदा त्याच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला रुग्ण उपचारासाठी दाखल झाली होती, तिच्या हृदयाची गती ऐकणे आवश्यक होते, पण त्यासाठी तिच्या छातीवर डोके ठेवावे लागणार होते, ती महिला काही यासाठी तयार होईना.

अखेरीस लेनेकने कागदांपासून त्या लहान मुलांप्रमाणे एक तारेचे संदेशवाहक यंत्र तयार केले आणि त्या माध्यमातून त्या महिलेच्या हृदयाची गती मोजली होती.

पुढे त्याने हेच उपकरण लाकडापासून तयार केले आणि अशाप्रकारे जगातील पहिला स्टेथोस्कोप अस्तित्वात आला. या स्टेथोस्कोपच्या बाबतीत फक्त एक समस्या होती, या मध्ये फक्त एका कानाने ऐकण्याची व्यवस्था होती.

१८५१ साली फिजिशियन आर्थर लेयार्ड यांनी पहिला दोन इयरपीस असलेला स्टेथेसस्कोप तयार केला. पण लेयार्ड यांनी तयार केलेला स्टेथोस्कोप हा प्लास्टिकचा होता, जो त्यांनी लंडनच्या एका एक्झिबिशनमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला होता.

पण यात अजून अनेक बदल घडवून आणायचे होते. हे बदल घडवून आणण्याचे व आजच्या सुधारित स्टेथेस्कोपच्या पहिल्या व्हर्जनच्या निर्मितीचे काम केले जॉर्ज कॅमन या शास्त्रज्ञाने, यात त्यांनी धातूच्या नळीचा वापर केला होता, सोबत हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेले एयरपीस वापरल्यामुळे हे उपकरण अधिक फायदेशीर बनले होते.

२० व्या शतकात देखील स्टेथोस्कोपवरील संशोधन सुरूच होते. १९४० मध्ये आलेल्या एका स्टेथेसस्कोपच्या दोन बाजू होत्या, यात एक बाजू श्वसननलीकेसाठी तर दुसरी बाजू रक्ताभिसरण संस्थेसाठी होती.

१९६० साली हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डेव्हिड लिटमन यांनी अजून आधुनिक कमी वजनाचा स्टेथोस्कोप तयार केला, याची श्रवणक्षमता उत्तम होती.

१९७० साली एक इलेक्ट्रोनिक स्टेथोस्कोप पण तयार करण्यात आला होता, परंतु तो इतका यशस्वी होऊ शकला नाही. नुकतच तर्के लोबुनी या शास्त्रज्ञाने डेव्हिड लिटमन यांच्या स्टेथोस्कोपमध्ये काही सुधारणा केल्या असून सध्या हा सर्वात किफायतशीर व अत्याधुनिक स्टेथोस्कोप मानला जातो.

सध्या बिपिओ कोअर नावाच्या अजून एका स्टेथोस्कोपचे संशोधन करण्यात आले असून हा स्टेथोस्कोप फक्त हृदयाचा विकारांना तपासण्यासाठी वापरला जाणार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!