The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

by द पोस्टमन टीम
10 December 2020
in इतिहास, मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home इतिहास

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जेवल्यानंतर दातात अडकलेले कण काढण्यासाठी टूथपिकचा हमखास वापर केला जातो. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तर जेवण झाल्यावर बडीशेपसोबत टूथपिक देण्याची फॉर्मालिटी पाळलीच जाते. जोपर्यंत दातात अडकलेले हे बारीकसारीक अन्नकण निघत नाहीत तोपर्यंत आपल्याला तरी कुठे चैन पडतो? त्यामुळे अनेकजण घरीही टूथपिक वापरत असतीलच. काही जणांना टूथपिकऐवजी अगरबत्तीची उरलेली काडी, सुई किंवा सेफ्टीपिनचे टोक घालून दात टोकरण्याची सवय असतेच, पण अशा धारधार वस्तूमुळे हिरड्यांना जखम होण्याची शक्यता असते. म्हणून अशा कोणत्याही वस्तू दातात घालू नका असा सल्ला आपल्याला दंतचिकित्सक देत असतात.

लाकडी टूथपिकचा तसा फारसा घातक परिणाम होत नसला तरी सतत टूथपिकचा वापर केल्यानेही दातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. दातात सतत टूथपिक घातल्याने दातातील फटी रुंदावतात आणि अजून मोठे अन्नकण या फटीत अडकून बसतात. टूथपिकमुळे दातातील अन्नकण निघतात त्यामुळे तोंड आणि दात दोन्ही साफ राहतात, हे खरे असले तरी त्याचा अतिप्रमाणात वापर करणे धोक्याचे ठरू शकते.

परंतु दातातील अन्नकण काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या टूथपिकसारख्या छोट्या वस्तूचाही एक इतिहास आहे, हे माहितीये का तुम्हाला? म्हणजे मानवाने नेमका कधीपासून या टूथपिकचा वापर सुरु केला असेल असे तुम्हाला वाटते? खरे तर हा इतिहासही खूपच मजेशीर आहे.

सामान्यत: असे मानले जाते की १७व्या शतकापासून टूथपिक हा सर्वसामान्याच्या दैनंदिन वापरातील एक भाग झाला. परंतु या टूथपिकचा शोध त्याच्याही आधी हजारो वर्षापुर्वीच लागला होता.

टूथपिकचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला अगदी अश्मयुगापार्यंतचा उलटा प्रवास करावा लागेल. म्हणजे सुमारे १.८ दशलक्ष वर्षापूर्वी जेंव्हा पृथ्वीवर निअँडरथल मानवाचा वावर होता तो काळ. या काळात माणसाला अन्न शिजवून खाण्याची क्लृप्ती नुकतीच गवसली होती. तसाही प्रामुख्याने मांस हाच याच्या आहारातील एक प्रमुख घटक होता. मग मांस खाताना ते दातात तर अडकणारच ना.

तेंव्हा या आपल्या पूर्वजाने काही झाडांच्या सालींच्या आतील मऊ भाग काढून त्याला अणकुचीदार आकार दिला आणि त्याच्या सहाय्याने दात साफ ठेवू लागला. तर अशाप्रकारे झाडाच्या थोड्या मऊ भागालाच टोकदार बनवून त्यापासून पहिला टूथपिक तयार करण्यात आला.

१९८६मध्ये फ्लोरिडामध्ये जे जुने मानवी अवशेष आढळून आले त्यावरुन ही बाब सिद्ध झाली आहे की, त्याकाळी माणूस आपले दात साफ करण्यासाठी काही ना काही अणकुचीदार वस्तू वापरत होता. ही वस्तू कधी लाकडापासून बनवलेली असे तर कधी ती मृत प्राण्यांच्या हाडापासूनही बनवलेली असे. म्हणजे मानवाचे भटके जीवन संपून स्थिर जीवन जगण्याच्या त्याच्या प्रयत्नात कधीतरी त्याला दात साफ करण्यासाठी या वस्तूची निकड भासली आणि त्याने त्यावर शोधही लावला.

हे देखील वाचा

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

या आदिमानावांचे जे अवशेष सापडले आहेत, त्यांच्या दातावर अशाप्रकारे एखाद्या अणकुचीदार हत्याराचे व्रणही सापडले आहेत. वर्षानुवर्षे टूथपिक वापरल्याने त्यांच्या दातांमध्ये फटी निर्माण झाल्या होत्या, असेही या अवशेषांवरून आढळून आले.

टूथपिक म्हणून ते कुठल्या एका विशिष्ट झाडाचीच साल वापरत होते का, याबद्दल काही माहिती मिळत नाही. पण, झाडाची कोवळी फांदी तोडून त्याची साल काढून त्याला टोकदार बनवून ती वस्तू दातातील अन्नकण काढण्यासाठी वापरत असत एवढे तरी निश्चित.

जसजशी मानवी संस्कृती विकसित होत गेली आणि मानवाचा अश्मयुगाकडून धातुयुगाकडे प्रवास सुरु झाला, तसतसा मानवाच्या वापरातील वस्तूंचा चेहरामोहराही बदलला. पूर्वी अश्मयुगात मानव दगडापासून बनवलेल्या वस्तू वापरत होता, तसेच धातूंचा शोध लागल्यावर त्याने धातूपासून वस्तुनिर्मिती करण्याची कला अवगत केली. मग टूथपिक बनवण्यासाठी देखील वेगवेगळ्या धातूचा वापर केला जाऊ लागला.

ADVERTISEMENT

होमो सेपियन्सच्या काळात हे बदल आणखी ठळक होत गेले. त्याकाळी युरोपीय लोक तर दातावरही सोन्याचा मुलामा चढवत असत. त्याकाळचे जे अवशेष मिळाले आहेत त्यावरुन हे उलगडले आहे.

इटलीच्या उत्तर भागात आणि पूर्वेकडील आल्प्सच्या डोंगर रांगात जे अवशेष मिळाले त्यामध्ये कास्यापासून बनवलेल्या टूथपिक आढळून आल्या आहेत. त्याकाळचे श्रीमंत लोक सोन्याचे आणि चांदीचे टूथपिक वापरत असल्याचेही आढळले आहे. आपल्या पूर्वजांची श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची ही एक अनोखी पद्धत होती. त्याकाळी मृतदेहसोबत त्याच्या काही वस्तूही पुरल्या जात. अशा मृतदेहासोबत पुरलेल्या वस्तुंमध्ये टूथपिकही आढळतात.

युरोपमध्ये अशी प्रथा आहे की लग्नाच्या दिवशी नवरा आपल्या होणाऱ्या नवरीला काही तरी विशेष आणि महागडी वस्तू भेट म्हणून देतो. ज्यावरुन त्याच्या श्रीमंतीचे दर्शन घडेल. मध्यकाळापासूनच कधीतरी या प्रथेला सुरुवात झाली असावी. १९व्या शतकात इटलीमध्ये लुईस मेरी थेरेसी डार्टोजा हिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सोन्याच्या टूथपिकचे एक बंडल भेट म्हणून दिले होते. ही भेट जरी १९ व्या शतकातील असली तरी टूथपिकला त्यापूर्वीच महत्वाच्या वस्तूंच्या यादीत स्थान मिळाले होते, हेही यावरुन स्पष्ट होते.

त्याकाळी गरीब लोक लाकडी टूथपिक वापरत असत. तर श्रीमंत लोक सोन्याचांदीचे टूथपिक वापरत असत. या टूथपिकच्या वरच्या टोकावर एखादा हिरा किंवा मौल्यवान खडा देखील बसवला जात असे. कधीकधी त्या घराण्याचे विशिष्ट प्रतिकही या टूथपिकवर कोरले जात असे. टूथपिकसारख्या छोट्या वस्तुवरूनही आपल्या श्रीमंतीचे आणि समृद्धीचे प्रदर्शन होईल याची खबरदारी घेतली जात असे.

खरे तर टूथपिकचा वापर त्याकाळी फक्त दातातील अन्नकण काढण्यापुरताच मर्यादित नव्हता. तर या अगदी छोट्याशा दिसणाऱ्या वस्तूचा वापर त्याकाळी शस्त्र म्हणूनही केला जात असे. प्रसिद्ध इतिहासकार डीडोरोस सिकुलस याने टूथपिकच्या अशा अनोख्या वापरावर बराच प्रकाशझोत टाकला आहे.

ग्रीसमध्ये अगाथोस नावाचा एक ग्रीक राजा होता. हा राजा इतका पराक्रमी होता की कुणीही त्याला युद्धात हरवू शकत नव्हते. त्याच्या शत्रूंना जेंव्हा समजले की अगाथोस दात साफ कारण्यासाठी टूथपिकचा वापर करतो तेंव्हा टूथपिकच्या टोकाला विषारी पदार्थ लावला आणि असे टूथपिक राजाला भेट म्हणून पाठवले.

नेहमीच्या सवयीप्रमाणे जेंव्हा राजा जेवण झाल्यानंतर टूथपिक दातात घालून अन्नकण काढू लागला तेंव्हा टूथपिकच्या टोकाला लागलेले विष त्याच्या संपूर्ण शरीरात भिनले आणि त्याचा मृत्यू झाला. ही एक प्रातिनिधिक गोष्ट आहे. खरे तर अशा कित्येक प्रसंगात टूथपिकसारख्या वस्तूचा वापर करुन शत्रूचा काटा काढल्याचे पाहायला मिळेल.

त्याकाळी टूथपिकचे डिझाइनदेखील एखाद्या रहस्यमय हत्याराप्रमाणे केले जात असे. टूथपिकच्या वरच्या टोकाला एखादे चिन्ह जोडलेले असे किंवा छोट्याशा डबीसारखी जागा असे. ज्यात तंबाखु, अफू, गांजा किंवा हल्ला करण्याची वेळ आलीच तर, किंवा सावधगिरी म्हणून, विष ठेवले जात असे. कधी कधी टूथपिकवरून एखादा गुप्त संदेशही पाठवला जात असे. टूथपिकने एक गुप्त हत्यार म्हणूनही चांगली कामगिरी बजावली आहे. कधीकधी टूथपिकच्या टोकाला विष लावून ते शत्रूच्या शरीरात टोचले जात असे.

युरोपमध्ये तर बहुतांश लोकांना टूथपिकचा वापर माहित होता. मात्र अमेरिकेत अजूनही लोकांना याबद्दल फारशी माहिती नव्हती. अमेरिकेतील एक व्यापारी चॉल्स फॉस्टर माशांचा व्यापार करत असे. याच व्यापाराच्या निमित्ताने तो एकदा ब्राझीलमध्ये गेला तेंव्हा त्याला दिसले की इथले लोक आपले दात अगदी स्वच्छ ठेवतात. त्यांचे दात स्वच्छ तर होतेच शिवाय आकर्षक आणि मजबूत होते.

\या लोकांचे दात इतके आकर्षक, चमकदार आणि सुंदर कसे दिसतात, याबद्दल त्याची उत्सुकता ताणली गेली. तेंव्हा त्याला टूथपिकविषयी माहिती मिळाली. त्याला वाटले की अमेरिकेतही आपण अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करुन तिचा व्यापार करायला हवा. या विचार मनात ठेवूनच तो अमेरिकेत परत आला. त्याने टूथपिकची निर्मिती केली आणि आपल्या दुकानात विकण्यासाठी ठेवली.

त्याचे टूथपिक विकले गेले पण, त्याला अपेक्षित होता तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो समुद्री माशांचा व्यापार करत असे. त्याने खास समुद्री पदार्थांसाठी एक रेस्टॉरंट उघडले.

समुद्री पदार्थ खाताना दातात हमखास कण अडकतातच म्हणून त्याने आपल्या रेस्टॉरंटमध्ये टूथपिकसुद्धा ठेवले. लोकांना यामुळे दात साफ करणे सोपे जाऊ लागले.

हळूहळू सगळीकडेच हॉटेलमधून टूथपिक ठेवले जाऊ लागले. अशाप्रकारे अमेरिकेत पहिल्यांदा हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून टूथपिक ठेवण्याची पद्धत सुरु झाली आणि फॉस्टरचा टूथपिकचा व्यवसायही जोमाने विस्तारला.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवण्यासाठी टूथपिकची मागणी वाढली तसा चार्ल्सचा व्यवसायही वाढला. वाढत्या मागणी बरहुकूम पुरवठा करण्यासाठी त्याला उत्पादनाचे प्रमाण वाढवणे गरजेचे होते. यासाठी त्याने हॉवर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मदत घेतली.

१८६९ साली मार्क सायनोरेलोने अशी एक मशीन बनवली ज्याच्या मदतीने मोठ्याप्रमाणात टूथपिक तयार करता येतील. या मशीनद्वारे डिझायनर टूथपिकही बनवणे शक्य होते. नंतर १८७२ मध्ये अमेरिकेच्याच सिलास नोबेल आणि जे. पी. कुली यांनी या मशीनचे पेटंट करवून घेतले.

१८७० मध्ये चार्ल्स फॉस्टरने तर टूथपिक निर्माण करणाऱ्या मशीनचा वापर करत टूथपिकचा एक प्रोडक्शन प्लांटच उभा केला. टूथपिकची निर्मिती करणारी ही जगातील पहिली कंपनी होती. त्यामुळे वाढत्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य झाले. तसेही लाकडी टूथपिक एकदाच वापरला जातो. वापरा आणि फेका अशा नीतीमुळे यांच्या मागणीत कधीच तुटवडा निर्माण होणार नाही याची चार्ल्सला खात्री होती. त्यामुळे टूथपिकची मागणी काही दिवसांतच १०० दशलक्षाच्या वर पोहोचली.

हळूहळू ही टूथपिक देशविदेशात पोहोचली. आत्ता तर अगदी जगभर याचा वापर केला जातो. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तर हा टूथपिक दिसतोच पण, हॉलीवूडपासून अगदी टॉलीवुडच्या चित्रपटातही या टूथपिकने एक वेगळेच स्थान निर्माण केले. अनेक चित्रपटातील खलनायकांना आपल्या दाताखाली टूथपिक दाबून ठेवण्याची सवय असल्याचे या चित्रपटातून दाखवण्यात आले.

हळूहळू ही टूथपिक फॅशन आयकॉन बनली. तरुणांमध्येही अशाप्रकारे दाताखाली टूथपिक दाबून धरण्याचा ट्रेंड निर्माण झाला. चित्रपट किंवा मालिकेतील खलनायकी पात्र रंगवताना त्याला टूथपिक चघळण्याची सवय असल्याचे दाखवले जाऊ लागले. दाताखाली टूथपिक ठेवणारी अशी व्यक्ती अधिक हुशार, स्मार्ट आणि पातळयंत्री वाटते. पण तरीही फॅशनच्या दुनियेतही या छोट्याशा टूथपिकने आपले एक दखलपात्र अस्तित्व निर्माण केले.

बघा इतक्या छोट्याशा वस्तूला ही किती मोठा आणि गमतीदार इतिहास आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

Next Post

हा ब्रिटीश अधिकारी युद्धात “अनकिलेबल सोल्जर” म्हणून ओळखला जायचा

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!
मनोरंजन

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021
इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
इतिहास

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

3 January 2021
इतिहास

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

3 January 2021
मनोरंजन

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

3 January 2021
Next Post
हा ब्रिटीश अधिकारी युद्धात “अनकिलेबल सोल्जर” म्हणून ओळखला जायचा

हा ब्रिटीश अधिकारी युद्धात "अनकिलेबल सोल्जर" म्हणून ओळखला जायचा

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण…

सीबीआयवाले इंदिराजींना अटक करायला गेले होते पण...

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!