The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत कबीरांनी मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले

by द पोस्टमन टीम
5 May 2025
in भटकंती, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मानवी आयुष्यात जन्म व मृत्यू या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक सजीवाला या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं. मानवी देहातून आत्मा निघून जातो व माणसाला मृत्यू येतो असं म्हणतात. मग नंतर हा आत्मा जन्म घेतो. कोणाचा आत्मा स्वर्गात जातो तर कोणाचा नरकात. काही लोकांचा भटकत राहतो असंसुद्धा म्हणतात.

काशी हे ठिकाण मोक्ष मिळण्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तीस या ठिकाणी मृत्यू येईल त्याला पुनर्जन्म वगैरे या सगळ्या फेऱ्यातून मुक्ती मिळून तो थेट स्वर्गात जातो. पण जसं काशीमध्ये मृत्यू झाल्यावर माणूस स्वर्गात जातो तसेच आपल्या देशात मगहर हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी मृत्यू झाल्यात माणूस नरकात जातो असं म्हणलं जातं.

तर आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मगहर या अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे संत कबीर यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी एक शांत जागा जिथे तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही नरकात जाणार किंवा गाढवाच्या जन्मी जाणार अस बोललं जातं. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून संत कबिरांची समाधी असणाऱ्या मगहर या शहराची माहिती घेऊया.

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार.

या ओळी अशा एका संतांच्या आहेत ज्यांनी समाजाच्या धारणेला कायम चुकीचं ठरवलं. त्यांनी जिवंत असताना चुकीच्या गोष्टींवर नेहमी प्रहार केला. आपल्या शेवटच्या क्षणीसुद्धा ते एक मोठा संदेश देऊन गेले. वरचे काव्य हे संत कबीर यांचे आहे. संत कबिरांनी असं म्हटलं होतं की मनुष्य जन्म असा आहे जसं की एका झाडाच्या फांदीचे पान, जे एकदा गळून पडले की पुन्हा परत फांदीवर येत नाही. जीवनसुद्धा तसंच आहे, एकदा मृत्यू आला की पुन्हा जीवन नाही.



कबिरांचा जन्म काशीचा, ते वाढलेसुद्धा तिथेच. मग असं असूनसुद्धा त्यांनी अखेरचा श्वास हा मगहर इथे घेतला होता. हीच गोष्ट मगहर या ठिकाणाला महत्वपूर्ण बनवते. तर या लेखात आपण मगहर या शहराची माहिती घेत घेत संत कबीर यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया.

आज भारतासाठी मगहर हे एक खूप महत्त्वाचं शहर आहे त्याचं कारण हे की इथे संत कबिरांची समाधी आहे. ही जागा एकमेवाद्वितीय असण्याचं कारण या जागेने कबिरांचे विचार जिवंत ठेवले आहेत. हेच कारण आहे की ज्यामुळे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

उत्तर प्रदेशात असणारे मगहर हे शहर कुठल्याही धर्माच्या पलीकडचं शहर आहे. हे शहर गोरखपूर या शहरापासून केवळ ३० किलोमीटरच्या अंतरावर असून कौसंबी पासून ७० किलोमीटरवर आहे. या ठिकाणी आपण सार्वजनिक वाहनाने सुद्धा सहज पोहचू शकाल.

मगहर या शहराला घेऊन बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात. त्यातलीच एक अशी सुद्धा की बौद्ध भिक्षु लोक कपिलवस्तू, लुंबिनी, कुशीनगरसारख्या प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या दर्शनासाठी इथूनच जायचे. जाताना हे भिक्षु लोक या भागात चोऱ्या करत असायचे व याच गोष्टीमुळे या भागाचे नाव मार्गहर हे पडलं व नंतर त्याच रूपांतर मगहर या नावात झालं अस म्हणलं जातं.

दुसरी एक कथा अशी सुद्धा सांगितली जाते की या रस्त्यावरून जाणारा प्रवासी हरीकडे म्हणजेच देवाकडे जातो यावरून सुद्धा याच नाव मगहर अस पडलं.

एक काळ असा होता की ही जागा बदनाम होती. याच्या मागे खूप साऱ्या अंधश्रद्धा होत्या. मनुष्यसुद्धा कमाल असतात नाही, भलेही जगताना ते नरकयातना भोगत असतील पण मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग हवा असतो. इथे सुद्धा गोष्ट अशीच होती. इथे अशी अफवा पसरली होती की ज्याचा मृत्यू मगहरमध्ये होतो त्याला नरकात जावं लागत. किंवा त्याला गाढवाचा जन्म मिळतो.

फक्त हाच संत कबिरांचा उद्देश होता की ही अफवा आहे आणि ही अफवा आहे हे लोकांना पटावे म्हणून त्यांनी इथे आपले प्राण सोडणे पसंत केले. मगहर इथे आमी नदीजवळ एक गुहा आहे. या गुहेत बसून कबीर आपली ध्यानधारणा करत असत.

आता या जागेबद्दल बोलण्याआधी जरा कबिरांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया.

जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही,
सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही.

संत कबीर असं म्हणतात की जोपर्यंत ते आपल्या अहंकारात बुडाले होते तोपर्यंत त्यांना देवाचे दर्शन होत नव्हते. पण जेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांच्यात ज्ञानाचा दिवा पेटवला तेव्हा त्यांच्यातील अज्ञानाचा अंधार संपून गेला. ज्ञानाच्या ज्योतीने मनातील अंधार नष्ट झाला व त्यांना देवाचे दर्शन व्हायला लागले.

विचार करा ते दृश्य किती मनोहारी असेल जेव्हा काशीच्या लहान लहान गल्ल्यांमध्ये कबीर रोज एका नवीन विचारांनी आपल्या जीवनाला नवीन रंग देत होते. काशीच्या मातीतल्या या संताने अवघ्या जगाला आपल्या संदेशातून शिकवण दिली.

कबिरांच्या जन्माविषयी तसा संभ्रम आहे. असं म्हणलं जातं की कबिरांचा जन्म काशीजवळच्या एका ब्राम्हण बाईच्या पोटी झाला होता पण ती त्यांना सोडून निघून गेली. या नंतर एका मुस्लिम परिवाराने त्यांना दत्तक घेतले कारण त्यांना अपत्य नव्हते. थोडं मोठं झाल्यावर आपल्या सुरुवातीच्या जीवनातच संत कबीर हे रामानंद यांचे शिष्य झाले. हे रामानंद म्हणजे तेच जे सांगायचे की ईश्वर सर्वत्र व माणसाच्या देहातच आहे.

संत कबीर नेहमी धार्मिक रुढीपरंपरांच्या विरोधात होते, त्यांचं असं म्हणणं होत की जीवात्मा व परमात्मा यांचं जेव्हा मिलन होते तेव्हाच माणसाला मोक्ष प्राप्त झालेला असतो.

संत कबिरांचे जीवन हे काही शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. त्यांनी देवाला शोधण्यासाठी इतरत्र भटकण्याऐवजी स्वतःच्या शरीरात देव शोधण्याची शिकवण दिली. हा संदेश देण्यासाठी ते काशीच्या गल्ल्यांमध्ये आपले दोहे गात फिरायचे व लोकांची मनं जिंकायचे. तर ते काही लोकांच्या डोळ्यांत सुद्धा खटकायचे.

आपलं आयुष्य जगल्यानंतर ते या मगहर शहराच्या गल्ल्यांमध्ये पोहचले. तिथे जाऊन त्यांनी आपले उरलेले आयुष्य व्यतीत केले व पसरलेली अफवा नष्ट करण्यासाठी त्यांनी मगहर इथेच आपले प्राण सोडले.

कबिरांची खास गोष्ट ही होती की त्यांचे अनुयायी हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील होते. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा भांडणं झाली. हिंदूंना कबिरांना अग्नी द्यायचा होता तर मुस्लिमांना त्यांना दफन करायचे होते. कबिरांच्या दोन शिष्यांत हे वाद झाले होते. त्यातला एक मगहरचा राजा होता तर दुसरा वाराणसीचा राजा होता.

यावेळी जवळजवळ यु*द्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अस म्हटलं जातं की यावेळी एक आवाज आला की त्यांच्या मृत शरीरावरची चादर काढली जावी. तिथे असलेले लोक अचंबित झाले, त्यांनी चादर काढून पहिली तर ते अवाक झाले.

कारण त्यावेळी चादरीखाली मृतदेह नसून फक्त फुले उरली होती. संत कबिरांनी आपल्या मृत्यूनंतरसुद्धा धर्मात भांडणं होऊ दिली नाहीत. शेवटी तिथे असलेली फुले दोन्ही धर्मियांनी वाटून घेतली व नंतर हिंदू धर्मियांनी त्यांची समाधी बांधली तर मुस्लिमानी मजार बांधली आणि याच्यानंतर दोन्ही धर्मीय आपल्या पद्धतीने आराधना करू लागले.

मगहर येथील मजार व समाधीची जागा एकाच भिंतीने तयार झाली इथे हिंदू घंटी वाजवून फुले वाहून पूजा करतात तर शेजारी मुस्लिम चादर अर्पण करून नमस्कार करतात.

हे सगळं एवढं सुंदर आहे की हा लेख तुम्हाला मगहरपर्यंत नक्की घेऊन जाईल. तुम्हाला कुठे जायचा विचार असेल तर मगहर हे तुमच्या यादीत नक्की असुद्या. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणाला भेट दिली आहे. इथे ती शांती आहे, समृद्धी आहे, जी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात नसते व ते यासाठी भटकत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चेन मेसेजिंगमुळे आपल्या भारतात शैक्षणिक क्रांती झालीये

Next Post

लिंकन यांनी पॉप्युलर केलेल्या टॉपहॅटने एका प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवलं आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

लिंकन यांनी पॉप्युलर केलेल्या टॉपहॅटने एका प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवलं आहे

भारतात आढळलेल्या डायनासॉरची नावं काय आहेत तुम्हाला माहिती आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.