The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याने १८५७ साली अटलांटिक महासागरात केबल्स टाकून अमेरिका आणि युरोपला जोडलं आहे

by द पोस्टमन टीम
17 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आजकाल इंटरनेटमुळे एकमेकांशी संवाद साधणे अतिशय सोपे झाले आहे, नाही? काही सेकंदांमध्ये तुम्ही तुमचा संदेश समोरच्याला पाठवू शकता आणि काही सेकंदातच तुम्हाला त्याचे प्रत्युत्तरही येते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही क्षणांतच तुमच्यापर्यंत पोहोचते. संवादाचे आणि दळणवळणाचे अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केल्यानेच आज या सगळ्या गोष्टी अगदी आपल्या हातात आल्या आहेत.

आता कोरोनाबद्दलच पहा, जगात कुठे काय चालू होतं? कोण कोण काय उपाययोजना करतं होतं? हे आपल्याला टीव्ही किंवा मोबाईलवर लगेच कळत होतं, कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच कळते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? जेव्हा हे काहीच नव्हतं तेव्हा लोक कसे संपर्क करत असतील एकमेकांशी? ना तेव्हा इंटरनेट होतं, ना टेलीफोन, अहो एवढंच काय, देशांतर्गत बातमी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायला कितीतरी दिवस लागायचे. मग विचार करा ब्रिटनमधून अमेरिकेत बातमी पोहोचवण्यासाठी किती वेळ आणि कष्ट लागत असतील. कारण दोन्ही देशांमध्ये पसरलेला आहे अथांग अटलांटिक महासागर.

त्यावेळी दोन्ही देशांमध्ये दळणवळणाचे साधन एकच होते – ‘जहाज.’ त्यामुळे एखादी खबर जर ब्रिटन मधून अमेरिकेत पोहोचवायची असेल तर तिला कमीतकमी १० दिवस लागायचे. कारण तिला प्रवासच तेवढा करावा लागायचा, लंडन ते न्यूयॉर्क जहाजाने आणि मग तिथून पुढे घोड्यावर जाऊन ज्या माणसाला ती बातमी द्यायची आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवली जायची. याचाच फटका बसला होता १८१२च्या यु*द्धात.

१८१२ साली ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेत यु*द्ध सुरू झाले, २ वर्षे चाललेल्या या यु*द्धात आर्थिक आणि जीवितहानी खूप झाली. शेवटी दोन्ही देशांनी शांती करार केला आणि यु*द्ध संपवलं. पण खरा घोळ तर पुढे झाला शांती करार झाला २४ डिसेंबर, १८१४ रोजी तरीसुद्धा ८ जानेवारी १८१५ मध्ये लुईसियानामध्ये अमेरिका आणि ब्रिटनची लढाई चालू झाली. अमेरिकेकडून मेजर जनरल अँड्रे जॅकसन नेतृत्व करत होता, तर ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करत होता जनरल पाकेंहाम. एका दिवसात लढाई निकाली काढत जॅकसन ने विजय मिळवला होता.



तुम्ही म्हणाल शांती करार होऊनसुद्धा ही लढाई झालीच कशी? तर त्याचं कारण असं आहे शांतीकरार झाला होता 24 डिसेंबरला “घेन्ट” मध्ये जे आहे बेल्जियम या देशात. तर या देशातून कराराची प्रत जॅकसन पर्यंत जो की लुईसियानामध्ये होता,  पोहोचायला लागले होते १८ दिवस. तोपर्यंत भाऊंनी लढाई मारली पण होती. त्याच्या याच कर्तृत्वाने त्याला पुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवलं. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर शांतीकरार झालाय ही गोष्ट लवकर जॅक्सनला कळली असती तर २००० लोकांचे प्राण वाचले असते.

thepostman

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

औद्योगिक क्रांतीने जेव्हा युरोप आणि अमेरिकेत वेग पकडला तेव्हातर या संदेशवहनाची समस्या अजूनच भेडसवायला लागली. कारण एक बातमी पोहोचवण्यासाठी काही दिवस खर्च करणे कारखानदारांना परवडणारं नव्हतं. फक्त संदेशवहनामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागत होते.

यातूनच प्रेरित होऊन सॅम्युएल मोर्सने १८३० साली टेलिग्राफचा शोध लावला. टेलिग्राफमधून कमीत कमी शब्दांत जास्त संदेश पोहोचवण्यासाठी किंवा समजण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र लिपी तयार केली त्यालाच “मोर्स लिपी” किंवा “मोर्स कोड”म्हणून ओळखतात.

मोर्स हा जरी युरोपियन असला तरी टेलिग्राफच्या संशोधनात गुंतवणूक मात्र अमेरिकन सरकारने केली होती. म्हणूनच टेलिग्राफचे पहिले संदेशवहन अमेरिकेत झाले आणि बघता बघता टेलिग्राफच्या केबलचे जाळे पूर्ण अमेरिकेत पसरलं आणि नंतर पूर्ण जगात पसरलं. १८४४ मध्ये टेलिग्राफचा शोध लागल्यानंतर फक्त दहाच वर्षांत अमेरिकेने ३०००० किलोमीटरच्या केबल पूर्ण अमेरिकेत पसरवल्या होत्या.

टेलिग्राफने देशांतर्गत संदेशवहन सोपे केले होते. पण अजूनही आंतरदेशीय संदेशवहन करण्यासाठी काहीच पर्याय मिळाला नव्हता. युरोपीयन देशांमधून अमेरिकेत संदेश यायला अजूनही आठवडा लागत होता. अमेरिकन व्यावसायिक “सायरस वेस्ट फिल्ड ” यानेसुद्धा टेलिग्राफच्या व्यवसायातुन बरेच पैसे कमावले होते. पण समुद्रामार्गे केबल पसरवून युरोप आणि अमेरिकेत टेलिग्राफची सर्व्हिस सुरू करता येईल असा विचार त्याचा चालू होता आणि ही सुवर्णसंधी पाहून त्याने गुंतवणूकदारांचा एक समूह एकत्र आणला ज्याला “The Cable Cabinet” म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

यामध्ये आगीच्या इंजिनाचा जनक “पीटर कूपर”, १८व्या शतकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक “मोसेज टेलर”, सिंगल लाईन टेलिग्राफचा जनक “सॅम्युएल मोर्स” ह्यांचा समावेश होता. “The Cable Cabinet”ने न्यू फाऊंडलँड आणि नोवा स्कोशिया मध्ये ४०० मैल टेलिग्राफ तारा पसरवण्याचे कंत्राट मिळवले. इथून पुढे ते अमेरिका आणि ब्रिटनला जोडण्याचा प्रयत्न करणार होते. हाच विचार डोक्यात घेऊन फील्डने युरोपियन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे चालू केलं. “The Cable Cabinet” मध्ये असणाऱ्या आधीच्या साथीदारांना घेऊन त्याने नवीन कंपनीची स्थापना केली ज्यामध्ये आता युरोपमधले गुंतवणूकदारसुध्दा भागीदार होते.

नवीन कंपनीच नाव होतं ” The Atlantic Telegraph कंपनी.” या कंपनीचे ध्येय होते, Nova scotia ते Ireland पर्यंत अटलांटिक महासागराच्या तळाला समांतर केबल अंथरायच्या.

आता Nova Scotia ते आयर्लंड हे अंतर आहे १६०० मैल आणि तेसुद्धा अटलांटिक महासागरामधून. म्हणजे हे केबल पसरवण्याचे काम त्यावेळी अशक्यच वाटत होते. पण फिल्ड हा हाडाचा व्यावसायिक होता, त्याने सर्व गुंतवणूकदारांना पटवून दिले होते, “हे काम अवघड नक्कीच आहे पण अशक्य नाही आणि एकदा का आपण ध्येयपूर्ती केली त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्या याच कामाचा गौरव केला जाणार आहे.” फिल्डच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सर्वांनी मोठ्या प्रमाणात “The Atlantic Telegraph” कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

thepostman

गुंतवणूक आल्या आल्या सर्वांत आधी फिल्डने अमेरिका आणि युरोपच्या नौदलातील जहाजांना अटलांटिक महासागरात केबल पसरवण्याच्या कामाला लावले. इन्सुलेटेड केबलचे बंडलचे बंडल जहाजांवर भरण्यात आले . दोन्ही बाजुंनी जहाजांना ठराविक मार्ग ठरवून दिला होता. त्यांनी ठरलेल्या मार्गाने पुढे जात केबल महासागरात सोडायची होती. पण ही प्रक्रिया जेवढी वेळखाऊ होती तेवढीच महागही होती आणि फक्त एवढंच नाही, महासागरात केबल पसरवायची म्हणल्यावर सगळ्यांत मोठे अडथळे होते अतिशय खराब हवामान आणि त्यामध्ये रिले व्यवस्थित सेट करणे. कारण रिलेच्या गणितावरच सगळा प्रयोग अवलंबून होता.

१८५७ च्या सुरुवातीला पहिला प्रयत्न केला गेला, दोन्ही दिशेकडून जहाजांनी मार्गक्रमण सुरू केले पण काही मैल गेल्यावरच केबल तुटायला लागल्या. तुटलेल्या केबल पुन्हा जोडताही येत नव्हत्या. असे करता करता पहिले तीनही प्रयत्न वाया गेले. आता मात्र लोकं ह्या प्रयोगाला नावं ठेवायला लागली होती. गुंतवणूकदार सुद्धा आता वैतागले होते.

फिल्डलासुद्धा काय करावं तेच सुचत नव्हतं. “हा प्रयोग वेडेपणा आहे बंद करा.” पण एवढ्यातच एक आशेचा किरण दिसला, चौथ्या प्रयत्नात ३८५ nautical mile एवढी केबल पसरवण्यात आली तेवढी पुरेशी नव्हती पण यामुळे लोकांना आता विश्वास बसायला लागला होता की हे काम अशक्य नक्कीच नाहीये. ५ ऑगस्ट १८५७ मध्ये अमेरिका आणि ब्रिटिश नौदलाचे जहाज शेवटी त्यांना ठरवून दिलेल्या जागी पोहोचलेच. अटलांटिक महासागराच्या मध्यात असलेल्या मध्यबिंदूवर एकूण  ४ जहाजे एकमेकांसमोर उभे होते.

https://spectrum.ieee.org/

१८१२ मध्ये जर असं कोणी हे पाहिलं असतं तर १००% तो म्हणाला असता “यु*द्ध चालू असणार आहे म्हणून ही जहाजे एकमेकांवर आक्रमण करण्यासाठी एकेमकांच्या समोर उभी ठाकली आहेत.” पण यु*द्धाचा काळ गेला होता हा काळ होता हातात हात घालून नवीन संशोधन करण्याचा.

जी चार जहाजे तिथे उभी होती त्यात अमेरिकी नौदलाचे USS Niagara आणि USS Gorgon यांचा समावेश होता, तर ब्रिटिश नौदलाचे HMS Valorous आणि HMS Agamemmon यांचा समावेश होता. या ४ जहाजांनी २००० मैलापेक्षा अधिक केबल अटलांटिक मध्ये पसरवल्या होत्या. ५ ऑगस्ट १८५७ रोजी इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आज पूर्ण झाला होता.

“सायरस वेस्ट फिल्ड” ने पाहिलेलं वेडं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. अमेरिका आणि युरोप कधी नव्हे ते एवढे जवळ आले होते आज. या केबल्समुळे आता येणारं भविष्य हे पूर्ण वेगळं असणार आहे याची कल्पना कोणी तरी केली असेल का तेव्हा. तारा जोडून झाल्यानंतर जहाजे पुन्हा आपल्या बंदरावर परत आली. बंदरावर परत आल्यानंतर पुन्हा एकदा केबलची तपासणी झाली.

thepostman

१६ ऑगस्ट १८५७ रोजी पहिला “Trans-atlantic telegraphic” संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकानन आणि ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया ह्यांच्यामध्ये झाला. दोन्ही खंडामध्ये तो दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. “सायरस वेस्ट फिल्ड ” आता दोन्ही खंडांना जोडणारा हिरो झाला होता. प्राथमिक यश मिळूनही काही आठवड्यातच पहिली trans-atlantic केबल पुन्हा अयशस्वी झाली. पण त्याचा कोणालाही धक्का बसला नाही कारण आता त्यांना मार्ग कळला होता पुन्हा नव्याने केबल टाकण्यास सुरुवात झाली.

आजसुद्धा तुम्हाला आम्हाला येणारं इंटरनेट हे “फील्ड” ने तयार केलेल्या प्रणालीवरच आधारित आहे. आजही ९९% data हा महासागरात पसरलेल्या केबल्समधूनच हस्तांतरित होतो. आज जरी कितीतरी terabytes data काही क्षणांत हस्तांतरित होत असला तरी त्याचे मूळ १८५७ साली हस्तांतरित झालेल्या काही शब्दांशीच आहे. मोर्स आणि एडिसनला इतिहासाने जेवढा मान दिला, तेवढा मान इतिहासाने फिल्डला नाही दिला. पण त्याचे कार्य हेसुद्धा या दोघांच्या तुलनेचेच होत कदाचित त्याहूनही जास्त महत्वाचे होते.

Reference 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: cyrus west field
ShareTweet
Previous Post

कादंबिनी गांगुली : रूढी-परंपरांचा पगडा मोडून सामाजिक क्रांती करणारी पहिली महिला डॉक्टर

Next Post

पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून एका मुख्यमंत्र्याचं विमान पाडलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून एका मुख्यमंत्र्याचं विमान पाडलं होतं

जब्याची आईची भूमिका करणाऱ्या छाया कदमच्या अभिनयाविषयी थोडं..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.