The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या घटनेमुळे दुसऱ्या महायु*द्धातील ब्रिटनच्या विजयावर धब्बा लागला होता..!

by Heramb
11 January 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


चुकीची माहिती आणि फेक न्यूज यांमुळे देशाचे आणि समाजाचे कसे नुकसान होते हे तुम्ही गेल्या काही वर्षांत देशामध्ये घडत असणाऱ्या अनेक घटनांवरून अनुभवलं असेलच. पण अशाच चुकीच्या माहितीमुळे दुसऱ्या महायु*द्धात विजयी झालेल्या ब्रिटनच्या ‘रॉयल एअरफोर्स बॉ*म्बर कमांड’ची जगभर नाचक्की झाली होती. त्यांच्या पराक्रमामुळे मित्र राष्ट्रांचा विजय शक्य झालेला असूनही या एका घटनेमुळे त्यांना यथोचित मानसन्मान मिळाला नाही. दुसरे महायु*द्ध संपल्यानंतर सुमारे ७५ वर्षांनी लंडनमध्ये रॉयल एअरफोर्सच्या ‘बॉ*म्बर कमांड’साठी स्मारकाला जागा मिळाली.

ब्रिटनने दुसरे महायु*द्ध जिंकल्यानंतर ‘सर विन्स्टन एस. चर्चिल’ने विजयानिमित्त भाषण केले. तेव्हा त्याने ब्रिटीश सैन्य दलातील एक तुकडी वगळता सर्वांचे आभार मानले. ही वगळलेली तुकडी होती रॉयल एअरफोर्सची बॉ*म्बर कमांड. बॉ*म्बर कमांडला मिळालेल्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चिलने हेतुपुरस्सर त्याचा उल्लेख टाळला. मित्र राष्ट्रांच्या विजयात बॉ*म्बर कमांडची महत्वाची भूमिका असली तरी, ना*झी प्रचारकांनी पसरवलेल्या खोट्या बातम्यांमुळे बॉ*म्बर कमांडला मोठ्या प्रमाणात कुप्रसिद्धीचा सामना करावा लागला.

सामान्य नागरिकांवर केलेली बॉ*म्बिंग:

डी-डे लँडिंगनंतर, जर्मन सैन्य माघार घेत होते. यावेळी एअर मार्शल ‘सर आर्थर ट्रॅव्हर्स हॅरिस’ या निर्दयी माणसाने रॉयल एअरफोर्सच्या बॉ*म्बर कमांडचा पदभार स्वीकारला. हॅरिसने स्वतः तयार केलेल्या नियमावलीसाठी नावलौकिक मिळवला होता. हॅरिसच्या मते, यु*द्धामध्ये जर्मन नागरीकांचासुद्धा मोठा वाटा होता. ही माहिती निश्चितच चुकीची होती. त्यामुळे तो नागरी अस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी बॉ*म्बर स्क्वॉड्रनचा वापर करीत असे.

जर्मनीत नागरिकांचा यु*द्धात मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे त्यांच्यावर ह*ल्ला केल्यास जर्मनीचे मनोधैर्य खचू शकते असे ‘सर आर्थर ट्रॅव्हर्स हॅरिस’चे मत होते. त्यामुळे १९४१ ते १९४२ पर्यंत जर्मन किनारी शहरांवर अंदाधुंद बॉ*म्बिंग सुरूच राहिली. तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांच्या हस्तक्षेपानंतर नागरी अस्थापनांवरील बॉ*म्बिंग थांबवण्यात आली आणि लष्करी इमारतींवर बॉ*म्बिंग सुरु झाली.

याल्टा कॉन्फरन्स: 

ब्रिटिश आणि अमेरिकन नेत्यांनी जर्मनीच्या सैन्याला कमकुवत करण्यासाठी त्यांच्या विशाल हवाई सैन्याचा वापर करावा असा आग्रह याल्टा कॉन्फरन्समध्ये सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिनने धरला. त्यामुळे हॅरिसला त्याची कुख्यात बॉ*म्बिंग सुरू ठेवण्यासाठी पुन्हा हिरवा कंदील मिळाला. त्याने पुन्हा अशीच सिव्हिलियन बॉ*म्बिंग करण्यास सुरुवात केली.



ड्रेस्डेन शहर:

अखेरीस ड्रेस्डेन हे गजबजलेले शहर बॉ*म्बिंगसाठी निवडले गेले. ड्रेस्डेनमध्ये अनेक जुन्या इमारती होत्या. तसेच ड्रेस्डेन शहरात युरोपमधील काही निवडक आणि मौल्यवान कलाकृती होत्या. त्यामुळे या शहराचे सांस्कृतिक महत्त्व आणि चर्चिलच्या काकू तेथे राहत असल्याच्या अफवांमुळे मित्र राष्ट्रे या शहरावर बॉम्बिंग करणार नाहीत असे ड्रेस्डेनच्या नागरिकांना वाटत होते. यु*द्धानंतर ड्रेस्डेन ही जर्मनीची नवी राजधानी असेल असाही काहींचा अंदाज होता.

ना*झी सरकारने ड्रेस्डेन शहराच्या अँटी-एअरक्राफ्ट आर्टिलरी (विमानविरोधी तोफा) रशियन रणगाड्यांविरुद्ध वापरण्यासाठी पूर्व आघाडीवर हलवल्या. शहराच्या सांस्कृतिक महत्त्वामुळे, मित्र राष्ट्रांचे हवाई दल ड्रेस्डेनवर बॉ*म्बिंग करणार नाही असे ना*झी नेत्यांना वाटले, त्यामुळे त्यांनी शहराच्या हवाई संरक्षणात सुधारणा करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला एक रेल्वे हब ड्रेस्डेनमध्ये होता. तसेच या शहराच्या सीमेवर अनेक शस्त्रास्त्रांचे कारखाने होते. त्यामुळे ना*झींचा अंदाज चुकीचा ठरला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

ड्रेस्डेन शहरावरील बॉ*म्बिंग:

१३ फेब्रुवारी १९४५ रोजी ‘264 रॉयल एअरफोर्स लँकेस्टर’ बॉ*म्बर्सनी ब्रिटनमधून उड्डाण केले. ड्रेस्डेनवर बॉ*म्बिंग करणे हे त्यांचे ध्येय होते. या बॉम्बर्सना लुफ्तवाफे हवाई दलाकडून कोणत्याही प्रतिकाराचा सामना करावा लागला नाही. कारण लुफ्तवाफे हवाई दल यूएसएसआरविरुद्धच्या यु*द्धामध्ये गुंतलेले होते. शिवाय, फेब्रुवारी १९४५ पर्यंत अमेरिकन आणि ब्रिटीश सैनिकांनी लुफ्तवाफेच्या बहुतेक लढाऊ विमानांना उ*ध्वस्त केले होते.

ब्रिटनच्या पाथफाइंडर्स एअरक्राफ्ट्सनी (मार्गदर्शक विमानांनी) शहराच्या मध्यभागी असलेल्या अल्टमार्केटला (ओल्ड मार्केट) लक्ष्य केले. सर्व 264 ‘रॉयल एअरफोर्स लँकेस्टर बॉ*म्बर्सने शहराच्या अगदी मध्यभागी बॉ*म्बिंग केले. यामध्ये इंफ्लेमेबल अर्थात आग लावू शकणारे बॉ*म्ब्स देखील होते. शहराच्या मध्यभागी लाकडापासून बनवलेली घरे सहज आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे निर्माण झालेल्या गरम हवेने जास्त ऑक्सिजन शोषून घेतल्याने आग आणखी वाढली. त्यामुळे शेकडो लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न करताच, ‘500 रॉयल एअरफोर्स बॉ*म्बर्स’च्या दुसऱ्या लाटेने ड्रेस्डेनवर बॉ*म्ब्सचा  वर्षाव केला. इमारती कोसळल्यानंतर शहर जळून राख झाले. दुसऱ्या दिवशी आलेल्या अमेरिकन बॉ*म्बर क्रूने उ*ध्वस्त शहर आणि धुराचे लोट पाहिले, म्हणून ते इतर लक्ष्यांकडे वळले. ड्रेस्डेन शहर सुमारे पाच दिवस जळत होते.

हल्ल्याचे परिणाम:

जर्मनीचे प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांनी ड्रेस्डेनची घटना उचलून धरली आणि त्याबद्दल बरीच चुकीची आणि वाढीव माहिती दिली. ड्रेस्डेन बॉ*म्बिंग आणि त्यातून उद्भवलेली भीषणता यांचे फोटो त्याने गुपचूप लीक केले. गोबेल्सने पीडितांची संख्या २५ हजार पासून थेट २ लाख ५० हजारांपर्यंत अतिशयोक्तीने वाढवली. ही संख्या त्याने तटस्थ असलेल्या देशांतील प्रेसमध्ये लीक केली.

मित्र राष्ट्रांतील लोकांनी या कृत्याचा निषेध केला आणि मृतांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यूएस आर्मी एअर फोर्स आणि चर्चिल यांनी बॉ*म्ब ह*ल्ल्यापासून स्वतःला दूर ठेवले आणि हॅरिसला बळीचा बकरा बनवण्यात आले. जर्मन सार्वजनिक लढाई चालू ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्सने मित्र राष्ट्रांच्या क्रू*रतेचे उदाहरण म्हणून ड्रेस्डेन बॉम्बिंग प्रकरणाचा वापर केला.

जर्मनीचा संपूर्ण नाश होऊ द्यायचा नसेल तर जर्मन लोकांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढाले पाहिजे असा दावा गोबेल्सने केला. रॉयल एअरफोर्सने सिव्हिलियन भागावर बॉ*म्बिंग केल्यामुळे गोबेल्सच्या बनावट बातम्यांना मोठे यश मिळाले. ड्रेस्डेन बॉ*म्बिंगमुळे मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नात बॉ*म्बर कमांडचे योगदान अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिले आहे. यु*द्धाच्या सुमारे ७५ वर्षांनंतर, बॉ*म्बर कमांडला अखेर युनायटेड किंगडममध्ये एक स्मारक मिळाले.

ब्रिटिश नेते नागरिकांच्या ह*त्येचे समर्थन कसे करतात यावर अजूनही वादविवाद सुरू आहेत. दुसऱ्या महायु*द्धा दरम्यानच्या चुकीच्या माहीतीचा हा सर्वांत मोठा परिणाम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चोरांनी अ‍ॅमेझॉन, फेडेक्सच्या सामानाच्या रेल्वे लुटून अक्षरशः हाहाकार माजवला आहे

Next Post

बेडूक, मासे, भाज्या – लोकांनी पाहिलेले सर्वांत विचित्र ‘पावसाळे’

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

बेडूक, मासे, भाज्या - लोकांनी पाहिलेले सर्वांत विचित्र 'पावसाळे'

अंटार्क्टिका नाही तर पृथ्वीवरच्या या ठिकाणी जीवन अशक्य आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.