आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लॉस एंजेलिस काऊंटी, कॅलिफ़िर्नियामधले रेल्वे पटर्यांची छायाचित्रं सध्या व्हायरल झाली आणि पटर्यांवरचा हा कचरा साधा नसून ऍमेझॉन, युपीएस आणि फ़ेडेक्स सारख्या कंपन्यांच्या खोक्यांचा आहे. दुसरीकडे या शिपिंग कंपन्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या रेल्वेमार्गानं जाणार्या त्यांच्या मालाच्या चोरीत अलीकडील काही महिन्यात नाट्यमय वाढ झाल्याचं म्हटलं आहे. ट्रेन थांब्याचा फ़ायदा घेत चोरटे या मालवाहू गाड्या फ़ोडत आहेत.
अलीकडील काही वर्षांत ऑनलाईन खरेदीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यात जगभरातल्या लॉकडाऊनमुळे यात आणखीनच वाढ झालेली आहे. विविध कंपन्यांतून हा ऑनलाईन माल शिपिंगसाठी रेल्वेचा वापर केला जातो. अमेरिकेसारख्या संपन्न देशात अशा प्रकारे या कार्गोवरच हल्ला बोल करत चोरट्यांनी जो कहर माजवला आहे त्यानं जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
लॉस एंजेलिसमध्ये डिसेंबर २०२० पासून अशा चोरीच्या घटनांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढ झालेली सांगण्यात येतंय.
हा माल ज्या मालवाहू रेल्वे डब्यांतून भरलेला असतो नेमके ते डबे हेरून चोर या डब्यांवर हल्ला करतात. रेल्वे थांब्यावर रेल्वे थांबली की चोर गाड्या बंद होईपर्यंत थांबतात आणि नंतर कंटेनरवर चढून कुलूप तोडून मालाची लूट करतात. खोकीच्या खोकी वाहून न्यायला नकोत म्हणून खोकी फ़ाडून मोकळी करत आतला माल फ़क्त लंपास केला जातो आणि खोकी रेल्वेमार्गावर फ़ेकून दिली जातात. अशा रिकाम्या खोक्यांचा खच रेल्वेमार्गावर पडल्याची छायाचित्रं व्हायरल झाली आणि एकच खळबळ माजली.
ऍमेझॉनवरून मागविलेल्या वस्तू उशिरानं मिळण्याचं किंवा अजिबातच न मिळण्याचं, फ़ेडेक्समधून पाठविलेली वस्तू रहस्यमयरित्या गायब होण्यामागचं रहस्य अशा तर्हेनं उकललं.
केवळ लूटमार करून चोर थांबत नाहीत तर यूपीच्या (युनियन पॅसिफ़ीक रेव्ल्वे सेवा) कर्मचार्यांवर हल्ले करणं, सशस्त्र दरोडे घालणं अशा घटनांतही वाढ झालेली आहे. २०१२१ च्या अखेरच्या तिमाहीत एलए काऊंटीत ९० अधिक कंटेनर फ़ोडण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे कंपनीचंही अपरिमित नुकसान होत आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी की या चोरीत पकडलेल्या गुन्हेगारांना पकडताना आरोप कमी केले जाता आणि त्यांचा लहान गुन्हा दाखवत त्यांना मामुली शिक्षा होते. नाममात्र दंड भरल्यानंतर २४ तासाच्या आत हे लुटारू पुन्हा नवी लूट करायला मोकळे होतात. या सगळ्यामुळे चोरट्यातलं, धारिष्ट्य वाढत आहे. या चोर्यांमुळे २०१२१ या वर्षात पाच दशलक्ष डॉलर्स इतके नुकसान झालेले आहे.
कोरोनाकाळात वाढलेल्या बेरोजगारी आणि गरिबीला या चोरांच्या वाढत्या संख्येस कारणीभूत धरलं जात आहे.
आजच्या घडीला अशी एकही वस्तू नाही जी ऑनलाईन जात नाही. यात महागड्या सेलफ़ोनपासून ब्रॅण्डेड पर्स, कपडे, खेळ्णी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. आणखीन एक चित्र या खोक्यांच्या कचर्यानं भरलेल्या रेल्वेरूळांवर दिसून येतं. ते म्हणजे कचरा वेचणारे लोक. गेल्या दोन-तीन वर्षांत यांच्याही संख्येत वाढ झालेली आहे. याचं कारण आहे, चोरट्यांनी खोकी उचकटताना घाईत टाकलेला काही माल. नशीब बलवत्तर असेल तर कधी कधी प्रचंड महागडी ब्रॅण्डेड गोष्टही या कचर्यात सापडते आणि मग तिची काळ्या बाजारात विक्री केली की पुढचे काही दिवस खिसा गरम रहातो. एक वेगळीच इको सिस्टिम या लूटमारीनं निर्माण केलेली आहे आणि अमेरिकेतील ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या डोक्याला नवीनच ताप निर्माण झालेला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.