The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ बनला

by अनुप देवधर
18 July 2024
in क्रीडा, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९८१-८२ साल असेल. त्यावेळी TV फक्त बाजारात आले होते. घरी क्वचितच. भारतात रणजीचा सिझन सुरू होता. रेडिओ म्हणजे सर्वकाही असण्याचा तो काळ. त्यावेळी एका १९ वर्षांच्या कोवळ्या मुलाने सगळ्यांच्या मनात घर केलं. क्रिकेट खेळून नाही, तर रेडिओवर कॉमेंट्री करून. नाव होतं हर्षा भोगले.

पुढे शिक्षण झालं. केमिकल इंजिनिअरिंग केलं. भारतातल्या सुप्रसिध्द IIM अहमदाबाद इथं मॅनेजमेंटमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. काही वर्षं जॉबही केला. पण मनातली आवड शांत बसू देत नव्हती. नोकरी सोडून पूर्णवेळ क्रिकेट कॉमेंट्री करण्याच्या निर्धारातून नोकरी सोडली.

आता काळ थोडा संघर्षाचा होता. त्यावेळी कॉमेंट्रीचे पैसे त्यामानाने कमीच मिळायचे. लग्न झालेलं. कुटुंबाची जबाबदारी होती. अनेक पेपरमध्ये वार्तांकन सुरूच होतं. साधारण १९९१-९२ साल असावं.

भारताची टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होती. त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनकडून कॉमेंट्रीसाठी एका भारतीय माणसाला बोलावणं आलं. अर्थातच हर्षा भोगलेंसाठी ते बोलावणं होतं.

पण पैसे त्या मानानं कमीच मिळणार होते. ऑल इंडिया रेडिओ देशाबाहेरच्या कॉमेंट्रीसाठी पैसे देत नसत. पण तरीही चांगली संधी आहे ही गोष्ट ओळखून ते ऑस्ट्रेलियाला गेले. तिथून एकाच वेळी पाच-सहा वृत्तपत्रांसाठी कॉलम लिहायचा. पुढे १९९३ साली आफ्रिका दौऱ्यावर खेळताना हाच प्रकार. कॉमेंट्री १५-२० मि. आधी थांबवून पटकन छोट्याशा बॅगेतल्या टाईपरायटरवर सगळा मॅच रिपोर्ट टाईप करायचा. त्याचा मराठीत अनुवाद करायचा आणि मीडिया सेंटर बंद होण्याच्या आत भारतात फॅक्स करायचा.



इकडे भारतात त्यांची पत्नी अनिता आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन एक ओळखीच्या गृहस्थांच्या ऑफिसमध्ये त्या फॅक्सची वाट बघत बसायची. रात्रीचे १० वाजून गेलेले असायचे. अशात तो फॅक्स घेऊन रात्री दुकानं हुडकून त्याचे ५-६ झेरॉक्स काढून परत त्या पेपरच्या ऑफिसला फॅक्स करायचा.

सोपं असतं का सगळं एवढं?

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

त्यामागे अपार कष्ट असतात. उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंबाची जबाबदारी असताना थोड्याशा बेभरवशाचा, त्या तुलनेनं कमी उत्पन्न देणाऱ्या या क्षेत्राची निवड करणं सोपं होतं का? नक्कीच नाही. मोठं धाडस होतं ते. पण काम आवडीचं आणि आनंद- समाधान देणारं होतं आणि असं काम कोणीही जर प्रामाणिक प्रयत्नांनी करत असेल, तर नक्कीच तो माणूस मोठा होतो. कित्येक वेळी परदेशात राहण्या-खाण्याचा खर्च त्यांनी स्वतः केला, पण संधी सोडली नाही.

आणि मग ऑस्ट्रेलियामध्ये सहज एका मॉलमध्ये आईस्क्रीम घेत असताना फक्त रेडिओ कॉमेंट्रीच्या आवाजावरून ऑस्ट्रेलियन माणसं ओळखतात, तेव्हा आश्चर्य वाटतं.

Do what you Love & Love what you Do… या वाक्याचं मूर्तीमंत उदाहरण कोणी असेल तर हर्षा भोगलेंचं नाव खूप वरच्या बाजूला असेल. स्वतःची ओघवती शैली, भाषेवर कमालीचं प्रभुत्व या जोरावर आज टोनी ग्रेग, रिची बेनॉ यांच्या रांगेत जाऊन भारतीय नाव असू शकतं, हे भारतीय म्हणून आपल्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.

TV आल्यावर पण त्याने या क्षेत्रावर वर्चस्व गाजवलंच; रेडिओच्या काळात क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या धृतराष्ट्रासारख्या लाखो श्रोत्यांसाठी हर्षा भोगले संजय होता.

आज हर्षा ६० वर्षांचा आहे. खरंतर आपल्याकडं ५८ हे रिटायरमेंटचं वय असलं, तरी अजून खूप वर्षं त्याच्या आवाजात क्रिकेट कॉमेंट्री ऐकायचं भाग्य मिळावं, अशी प्रार्थना!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या टीव्ही कंपनीने ‘ब्रँडिंग’ची संकल्पना भारतात रुजवली होती

Next Post

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
ब्लॉग

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026
इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
Next Post

जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे असूनही या देशातल्या लोकांचे खायचे वांधे आहेत..

व्ही पी सिंहांनी मंडल आयोगाच्या तरतुदी लागू करण्याची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आंदोलन पेटलं

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.