The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या नॅशनल पार्कमध्ये चिंपांझींच्या दोन गटात यु*द्ध झालं होतं, ते तब्बल चार वर्षं चाललं

by द पोस्टमन टीम
19 December 2024
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“एक कमकुवत नेता आपली सत्ता टिकवण्यासाठी झगडत आहे, त्याच वेळी एखादा महत्त्वाकांक्षी सदस्य सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो. या गोंधळात हळूहळू संघर्ष वाढत जातो आणि समुदायाचे दोन भाग पडतात. सत्ता संघर्षात रक्ताचे पाट वाहू लागतात. येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी हा हलकल्लोळ सुरू राहतो… “

हे वर्णन ऐकून तुम्हाला नक्की महाभारताचं यु*द्ध किंवा एचबीओ वाहिनीवरील एखादा ड्रामा आठवला असेल! मात्र, हे वर्णन मानवी संघर्षाचं नाही तर, टांझानियाच्या ‘गोम्बे स्ट्रीम नॅशनल पार्क’मधील चिम्पांझींचं आहे.

७०च्या दशकात चार वर्षं चिम्पांझींचा आपापसांत संघर्ष सुरू होता. आपला मानवी समुदाय माकडांचा वंशज आहे, हेच यावरून सिद्ध झालेलं आहे. माकडांच्या प्रजाती आणि मानवांमध्ये अनेक समानता आहेत. गोम्बेमधील यादवीसुद्धा मानवी इतिहासाशी साधर्म्य दाखवणारी ठरली.

तर, टांझानियामधील ‘गोम्बे स्ट्रीम नॅशनल पार्क’मधील चिम्पांझीच्या दोन समुदायांच्या संघर्षाला ‘गोम्बे चिम्पाझी यु*द्ध’ म्हणून ओळखलं जातं. १९७४ ते ७८ या चार वर्षांच्या काळात हा हिंसक संघर्ष सुरू होता. एकेकाळी ‘कासाकेला'(चिम्पांझीच्या वसतीस्थानाच्या प्रदेशाचं देखील हेच नाव होतं) नावानं एकत्र असलेला चिम्पांझींचा एक गट या संघर्षात विभागला गेला. समुदायामध्ये फूट पडत असल्याचं, ब्रिटिश संशोधक जेन गुडॉल यांच्या प्रथम लक्षात आलं. जेन या एक प्रायमेटॉलॉजिस्ट आणि ॲन्थ्रोपॉलॉजिस्ट होत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चिम्पांझीच्या संशोधन, संगोपन आणि संवर्धनासाठी खर्च केलं.

कासाकेलामध्ये काहीतरी बिनसल्याचं जेन गुडॉलच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिशय बारकाईनं चिम्पांझींवर लक्ष केंद्रित केलं. आठ महिन्याच्या काळातचं कासाकेला समुदायामध्ये मोठी फूट पडली. त्यातील काही चिम्पांझींनी गोम्बेच्या दक्षिण भागात आपला वेगळा संसार थाटला. संशोधकांनी त्यांना ‘कहामा’ समुदाय असं नाव दिलं होतं. ‘कहामा’मध्ये ६ प्रौढ नर, ३ प्रौढ मादी आणि त्यांच्या पिलांचा समावेश होता. तर ‘कासाकेला’मध्ये ८ प्रौढ नर, १२ प्रौढ मादी आणि त्यांची पिले होती. चार वर्षांच्या संघर्षामध्ये कहामा समुदायातील सर्व नरांचा मृत्यू झाला आणि बाकीचे चिम्पांझी विखुरले गेले. त्यानंतर विजयी कासाकेला समुदायानं पुढील प्रदेशात आपल्या वस्तीस्थानाचा विस्तार केला.



मानवी इतिहासातील यु*द्धांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की, वर्चस्ववाद सिद्ध करण्यासाठीच सर्व यु*द्ध होतात. मग, यात मानवाचे पूर्वज तरी कसे मागे राहतील. गोम्बेमधील संघर्ष देखील वर्चस्ववादातूनचं झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. याला काही प्रादेशिक पार्श्वभूमीदेखील आहे.

राष्ट्रीय उद्यान होण्यापूर्वी ‘गोम्बे नॅशनल पार्क’ हे ‘गोम्बे स्ट्रीम रिसर्च सेंटर’ म्हणून ओळखलं जात असे. ‘काकोम्बे व्हॅली’च्या सखल भागात हा पार्क वसलेला आहे. याठिकाणी चिम्पांझीच्या संशोधनाला वाव आहे, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं होतं. जेन गुडॉल यांनी या संधीचा सर्वांत प्रथम उपयोग करून घेतला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पार्कच्या विविध भागांमध्ये चिम्पांझी समुदायानं राहत. एका समुदायामध्ये जवळपास ४० सदस्य असतात. संघर्षातील एक गट असलेला ‘कासाकेला’ हा पार्कचा उत्तरेकडील प्रदेश आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या चिम्पांझींच्या समुदायाला कासाकेला या नावानंच ओळखलं जात असे. याशिवाय पार्कच्या मध्य आणि दक्षिण भागात देखील काही समुदाय वास्तव्याला होते. गोम्बेमधील चार वर्षांच्या संघर्षाला प्रादेशिकतावाद देखील जबाबदार असल्याचं जेन यांच्या लक्षात आलं. काही चिम्पांझींचा पाठलाग केल्यानंतर हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं होतं. संशोधन करत असताना जेन गुडॉल यांनी पार्कमधील चिम्पांझींना नावं दिली होती.

नव्यानं तयार झालेल्या ‘कहामा’ समुदायाचं नेतृत्व दोन भावांनी केलं होतं. ह्यू आणि चार्ली अशी त्यांची नावं होती. त्यांच्या गटात गोदी, डे, गोलिएथ आणि एक तरूण चिम्पांझी (स्निफ) होता. तर, कासाकेला समुदायात फिगन, सटान, शेरी, रुडॉल्फ, एवर्ड, जोमिओ आणि हम्फेरी या नरांचा समावेश होता.

कासाकेला समुदायानं गोम्बेतील रक्तरंजित संघर्षाला सुरुवात केली. ७ जानेवारी, १९७४ रोजी चिम्पांझीचा पहिला बळी गेला. कासाकेला समुदायातील हम्फेरी, फिगन, जोमिओ, शेरी, एवर्ड आणि रुडॉल्फ या ६ नरांनी मिळून कहामा समुदायातील गोदी नावाच्या चिम्पांझीवर ह*ल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

एखाद्या चिम्पांझीनं जाणीवपुर्वक दुसऱ्या चिम्पांझीचा बळी घेण्याची ती पहिलीच घटना होती. विशेष म्हणजे गोदीच्या मृत्यूनंतर विजयी गटानं प्रचंड गोंधळ घातला होता. त्यांनी झाडांच्या फांद्या तोडत आरडाओरड देखील केली होती. अगदी मानव जसा आपल्या विजयाचा आनंद साजरा करतो तशी वर्तणूक त्यावेळी चिम्पांझींनी केल्याचं संशोधक सांगतात.

गोदीला मारल्यानंतर ‘कासाकेला’ समुदायानं डे आणि ह्युला देखील रस्त्यातून हटवलं. त्यानंतर सर्वात ज्येष्ठ असलेल्या गोलिएथचा नंबर लागला. वास्तविक पाहता गोलिएथ हा सर्वांत शांत होता आणि त्याचे कासाकेला समुदायातील चिम्पांझींशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, त्याचा देखील जीव गेला.

कहामा समुदायात फक्त चार्ली, विली आणि स्निफ हे तीनचं नर शिल्लक राहिले. त्यातील विलीला पोलिओची लागण झाली. त्यानंतर लगेचचं चार्लीचा खू*न झाला. असं सांगितलं जातं, चार्लीच्या मृत्यूनंतर विली अचानक नाहीसा झाला आणि पुन्हा कधीही दिसला नाही. स्निफ हा कहामा समुदायातील सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेला तरुण नर होता. मात्र, कासाकेलांनी त्याला देखील दया दाखवली नाही. कहामातील प्रौढ आणि तरुण मादींपैकी एकीला मारण्यात आलं, दोघीजणी बेपत्ता झाल्या होत्या तर तिघींना कसाकेला समुदायातील चिंपांझींनी मारहाण करून सोबत घेऊन गेले होते.

गोम्बेतील चिम्पांझीमध्ये झालेली यादवी लढाई जेन गुडॉल यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. मानव आणि चिम्पांझींमध्ये साम्य आहे मात्र, ते मानवापेक्षा काहीसे कमी हिं*सक असल्याचं त्यांचं आजवरचं निरीक्षण होतं. झालेल्या हिं*साचारानं प्रथमच चिम्पांझीच्या हिं*सक वर्तनाची काळी बाजू उघडकीस आणली होती. या घटनेविषयी त्यांनी आपल्या स्मरणिकेमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे.

गोम्बेतील चिम्पांझींच्या संघर्षानं मानव आणि प्राणी यांच्यातील हिंसक प्रवृत्ती किती सारखी आहे, हे अधोरेखित झालं. या घटनेनंतर जगभरातील मानववंशशास्त्रज्ञ आणि प्राणी अभ्यासकांना आपल्या संशोधनाची दिशा बदलावी लागली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

यु*द्ध झालं ब्रिटिश आणि जर्मन सैनिकांत पण जिंकल्या मात्र मधमाशा..!

Next Post

शाळेत आपण रोज म्हणायचो ती राष्ट्रप्रतिज्ञा नेमकी कोणी लिहिली आहे..? जाणून घ्या..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

शाळेत आपण रोज म्हणायचो ती राष्ट्रप्रतिज्ञा नेमकी कोणी लिहिली आहे..? जाणून घ्या..!

प्राचीन 'रोम'मध्ये लोक नशा करण्यासाठी या माशाचं सेवन करायचे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.