The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ब्रिटीश गुप्तहेराने शेवटपर्यंत रशियासाठी काम केलं

by द पोस्टमन टीम
18 May 2025
in मनोरंजन, ब्लॉग, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आज आपण एका अशा गुप्तचराबाबत जाणून घेणार आहोत जो मुळात ब्रिटिश होता पण तो काम सोव्हिएत रशियाचे करायचा! त्याला ब्रिटिश सरकारने ‘ऑर्डर ऑफ एम्पायर’ हा किताब दिला होता आणि १९६५ साली रशियाकडून त्याच्या निष्ठेसाठी ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ प्रदान करण्यात आला.

त्या दुहेरी गुप्तचराचे नाव होते ‘हेराल्ड रसेल किम फिलबी’, हा एजंट कधीकाळी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख अधिकारी होता. त्याने डबल एजंट म्हणून काम केलं होतं.

फिलबीने रशियाच्या एनकेव्हीडी आणि केजीबी या दोन्ही संस्थांसोबत काम केलं होतं. फिलबीला सर्वांत सफल गुप्तचर मानले जाते. त्याच्यामुळे अनेक गुप्त गोष्टी रशियापर्यंत पोहचू शकल्या होत्या.

रशियन हुकूमशहा जोसेफ स्टॅलिनला भीती होती की फिलबी हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना रशियाची माहिती देणारा गुप्तचर असावा, पण हे कधीच सिद्ध झालं नाही.

फिलबीचा जन्म १९१२ साली भारताच्या अंबाला शहरात झाला. त्याचे वडील जॉन फिलबी एक सेनाधिकारी आणि मुत्सद्दी होते. यामुळे किमचे बालपण अत्यंत ऐषाआरामात गेले. किमने शालेय शिक्षण वेस्टमिन्स्टर स्कुलमध्ये पूर्ण केले. ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याने आपले पुढील शिक्षण घेतले.



कॉलेजात शिक्षण घेत असताना त्याच्या मनात कम्युनिस्ट विचारधारेचे आकर्षण निर्माण झाले. १९३३ साली शिक्षण पूर्ण होताच तो एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून काम करू लागला. पुढे तो व्हिएन्नाला गेला. त्याठिकाणी त्याची भेट लिटझी फ्रॉईडमनशी झाली आणि तो बघताक्षणी तिच्या प्रेमात पडला. ती दिसायला खूप सुंदर होती. लिटझी ज्या गटासाठी काम करत होती तो जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये  ना*झी गटाच्या समर्थनार्थ काम करत होता.

thepostman

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

त्याने बराच काळ त्या ग्रुपमध्ये काम केले, पण नंतर तो ग्रुपला राम राम ठोकून निघून गेला. त्याने लिटझीशी लग्न केले आणि दोघे ब्रिटनला परतले. दुर्दैवाने दोघांचा थोड्याच दिवसांत घटस्फोटही झाला.

१९३३ साली किम सोव्हिएत रशियाची गुप्तचर संस्था केजीबीत सामील झाला. स्वतःची ओळख लपवून तो अँग्लो-जर्मन फेलोशिप ग्रुपचा भाग बनला. पुढे तो पत्रकार म्हणून टाईम्ससाठी रिपोर्टिंग करू लागला. तो स्पॅनिश गृहयु*द्धासंबंधित घटनांचे वार्तांकन करायचा.

आपल्या लेखात तो फ्रॅंको आणि राष्ट्रवादी शक्तींचं खूप कौतुक करायचा. त्याच्यावर प्रसन्न होऊन फ्रॅंकोने त्याला १९३८ साली रेड क्रॉस पुरस्कार देऊन सन्मानित केलं. किमने आपल्या गुप्तचर म्हणून असलेल्या ओळखीला अत्यंत प्रभाविपणे लपवले. त्याला ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा देखील ओळखू शकली नव्हती. १९३९ साली त्याला ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नोकरी मिळाली. त्याच्या ओळखीची खातरजमा करून ब्रिटिश गुप्तचर संस्थेने त्याला नोकरी दिली होती. तो सोव्हिएत एजंट आहे ही गोष्ट त्याने अत्यंत प्रभावितपणे लपवली होती. त्याने ब्रिटिश गुप्तचर संस्थेच्या ‘सेक्शन डी’मध्ये प्रशिक्षण घेतले.

thepostman१९४१ साली किमने ब्रिटिश गुप्तचर संस्थेत मोठे पद प्राप्त करण्यात यश मिळवले. काही काळात तो ब्रिटनचा सर्वात प्रसिद्ध एजंट बनला. त्याने दुसऱ्या महायु*द्धा दरम्यान हि*टल*रच्या विरोधात सोव्हिएत आणि ब्रिटिश दोन्ही माध्यमातून ऑपरेशन चालवले होते. यु*द्ध संपल्यानंतर तो रशियाला ब्रिटिश लोकांची गुप्त माहिती पुरवू लागला.

किमवर ब्रिटिश लोकांनी दुहेरी एजंट असण्याचा आक्षेप घेतला आणि त्या प्रकरणाची चाचणी केली पण तो निर्दोष सिद्ध झाला. मग त्याची रवानगी अमेरिकेत करण्यात आली, ज्याठिकाणी त्याने ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या गोपनीय व्यवहारांचे कार्य बघितले व त्याची माहिती सोव्हिएत रशियाला पोहचवली.

इतकेच नाही ब्रिटिश गुप्तचर म्हणून रशियाच्या गोपनीय अहवालाचा खुलासा देखील ब्रिटिशांसमोर केला, जेणेकरून त्याची प्रामाणिकता सिद्ध होईल.

पुढे १९६३ पर्यंत त्याच्या प्रामाणिकपणावर कोणी संशय घेतला गेला नाही, पण त्यावेळी त्याच्याविषयी कुजबुज ब्रिटिश गुप्तचर संस्थेत सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मग त्याने रशियन एजंटच्या सहाय्याने ब्रिटिनमधून पळ काढून रशिया गाठलं. मग तो कायम तिथेच राहिला.

thepostman१९६८ साली त्याने किमने आपलं आत्मचरित्र लिहलं ज्याचं नाव होतं ‘माय सायलेंट वॉर : सोव्हिएत मास्टर स्पाय स्टोरी’. त्याचं हे पुस्तक प्रचंड गाजलं. त्याच्या या पुस्तकाने ब्रिटिश गुप्तचर संस्थेची झोप उडवली. त्याच्या पुस्तकावर आधारित एक चित्रपट देखील रशियात दाखवण्यात येतो.

१९८८ साली त्याचा रशियाची राजधानी मॉस्को येथे मृत्यू झाला. रशियन सरकारने शासकीय गॅलरीत त्याचा फोटो लावला असून त्याच्या गुप्तचर म्हणून आणलेल्या ९०० ब्रिटिश दस्तावेजांचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: kim philby
ShareTweet
Previous Post

आपल्या लल्लनटॉप स्टाईलने लोकांची मनं जिंकणाऱ्या सौरभ द्विवेदीची कहाणी

Next Post

महाराष्ट्रातील शेतकरी नवरा बायकोने लॉकडाऊनमध्ये विहीर खोदून पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
Next Post

महाराष्ट्रातील शेतकरी नवरा बायकोने लॉकडाऊनमध्ये विहीर खोदून पाण्याची समस्या कायमची सोडवली आहे

कोल्हापुरी चपलेचा रॉयल इतिहास

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.