The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या रक्त*रंजित यु*द्धाच्या पाऊलखुणा आजही अंगावर शहारे आणतात..!

by द पोस्टमन टीम
9 September 2023
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगाने गेल्या काही शतकांत बरीच मोठी यु*द्धं आणि नर*संहार बघितला आहे. त्यात विसाव्या शतकातील दोन महत्वाच्या महायु*द्धांचा समावेश होतो. याची सुरवात झाली पहिल्या महा*युद्धातून. या महा*युद्धाला वेगवेगळ्या बाजू आहेत, विविध ठिकाणी विविध देशांनी आपापल्या कुवतीनुसार यु*द्धाच्या आगीत तेल ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

यु*द्धात जर्मन, ब्रिटिश, फ्रेंच, अमेरिकन सैन्यांची ताकद बऱ्यापैकी मोठी होती. यामध्ये अर्थातच युरोप सगळ्यात जास्त पेटला होता, ज्याचा फटका इतर देशांनाही मोठ्या प्रमाणात बसला. आपण आत्ता ज्या लढा*ईची माहिती बघणार आहोत त्यात लढलेल्यांच्या मृत*देहांचे अवशेष आजही त्या युद्धभूमीत सापडतात.

१९१६ साल हे याच पहिल्या महा*युद्धामध्ये मोठ्या घातपाताचं ठरलं.

१९१६ च्या फेब्रुवारीमध्ये जर्मन सैन्याने फ्रांसमधल्या व्हर्डन शहराला वेढा घातला. जर्मन सैन्याचा जनरल एरिच वॉन फाल्केनहेन याने फ्रेंच सै*न्याला गारद करण्यासाठी “bleed them white” ही रणनीती वापरली.

प्रचंड मोठ्या फौज*फाट्यानिशी जर्मन सेनापती पुढे सरकत होता. त्याला आशा होती की व्हर्डन शहर आपण जिंकून घेतलं तर ते फ्रांसपासून वेगळं करू शकू आणि असं झालं तर फ्रेंच सैन्य स्वतःचा जीव आणि मनोबल गमावून बसेल.

एवढं सगळं करूनही फाल्केनहेनचा अंदाज चुकला. कारण त्याला पुरून उरण्यासाठी त्याच्या विरोधात असलेलं सैन्य सज्ज होतं. व्हर्डनची ल*ढाई सुरू होत असताना ब्रिटिशांची तयारीसुद्धा पक्की होती. उत्तर फ्रान्समधील सोम नावाची भली मोठी नदी सुमारे २४५ किलोमीटर पसरलेली असून ती इंग्लिश खाडीच्या दिशेने वाहते. या नदीवर सैन्याला आपण एकत्रितपणे अडवून ठेऊ अशा इराद्याने फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्य पुढे गेले. ब्रिटीश सैन्याने जर्मन सैन्यावर मोठा हल्ला चढवला.

ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्याने जर्मन सैन्याचा प्रतिकार चालू ठेवला होता आणि युद्धात ऐन मोक्याच्या क्षणी जर्मन सैन्य एका मोठ्या अडचणीच्या ठिकाणी पश्चिम आघाडीवरच अडकून पडलं. जिथून पुढे जायला काहीच मार्ग नव्हता. हा त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला.

हे देखील वाचा

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी ‘मॅकडॉनल्ड्स्’ने ‘ड्राइव्ह थ्रू’ सुरु केला होता..!

फ्रेंचांना हरवण्यासाठी आलेलं जर्मन सैन्य स्वतःच फ्रेंच-ब्रिटन सैन्याच्या सापळ्यात अडकून पडलं. या ल*ढाईत दोस्त राष्ट्रांचा गट विजयी झाला असला तरी यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.

फ्रांसच्या सोम नदीच्या दोन्ही तीरांवर लढल्या गेलेल्या या ल*ढाईत एकूण तीस लाख सैन्याने लढा दिला ज्यात दहा ते बारा लाख सैन्य हे जखमी झालं किंवा मारलं गेलं. या ल*ढाईला जगात जे काही अगदी कमी वेळात झालेले मोठे नरसंहार आहेत त्यात सगळ्यात जास्त प्राणघातक लढाई अशी ओळख मिळाली.

युद्धात सहभागी झालेले सैन्य

१ जुलै ते १८ नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही लढाई मानवी इतिहासातील सर्वात रक्त*रंजित लढाई ठरली, ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला.

खरंतर ही त्यांच्यावर लादली गेलेली ल*ढाई होती ज्यामध्ये अनेक छोट्यामोठ्या संघर्षांचा समावेश होता आणि यातलीच एक होती डेलव्हिल वूडची ल*ढाई ! जिचा उल्लेख नंतरच्या काळात डेव्हील वूडची ल*ढाई असाही केला जातो एवढा त्याचा परिणाम दिसून आला.

१४ जुलैची पहाट तोफांच्या आवाजाने गर्जून गेली. तोफांचा हल्ला सुरू असताना, १३ व्या आणि १५ व्या कॉर्प्सच्या ब्रिटीश सैन्याने ‘नो मॅन्स लँड’मध्ये प्रवेश केला. त्यांना जर्मन सैन्याविरुद्ध आघाडी तयार करण्यासाठी आणि लाँग्वेव्हल शहर ताब्यात घेण्यासाठी पाठवले गेले.

तीव्र ल*ढाईनंतर ते शहराच्या चौकापर्यंत पोहोचले. यामुळे ब्रिटीशांना बराच फायदा झाला पण जर्मन फौजा अगदी जवळच्या वाटेवर होत्या. मोठा तळ त्या ठिकाणी निर्माण केल्यामुळे ब्रिटीशांसाठी समस्या निर्माण झाली आणि त्याच ब्रिटिशांवर आता अनेक बाजूंनी गोळी*बार केला जात होता. कॉर्प्सचा डेलव्हिल वूडवर हल्ला करण्याचा हेतू होता, परंतु ब्रिटिशांना बाहेरून जास्तीची कुमक, नव्या दमाचं सैन्य बोलवावं लागलं.

३४३३ क्रमांकाची ‘दक्षिण आफ्रिका इन्फंट्री ब्रिगेड’ डेलव्हिल वूडच्या जंगलात लाकूड घेण्यासाठी जाईल, काही झाडं कापून आपल्याला सोयीचं मैदान तयार करेल आणि आपली आवश्यक मदत देईल अशी रचना केली गेली. पण त्यांना जर्मन सैन्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले.

सुरुवातीला तिथे असलेल्या तोफांनी आणि बंदुकांनी केलेल्या गोळीबारामुळे त्यांना निश्चितच फायदा झाला पण दक्षिण आफ्रिका इन्फंट्री ब्रिगेडला टिकून राहून मग प्रतिकार करण्यासाठीच दीर्घकाळ लढा द्यावा लागला. डेलव्हिल वूडच्या परिसरातली झाडे पाडल्यानंतर आणि जर्मन बंदूकधारी सैनिकांना धूळ चारल्यानंतर त्यांनी जर्मनांना शहरात अधिकच आत ढकलले. या सैन्याने खंद*कांमध्ये, झाडाआड नाही, तर युद्ध*भूमीवर, मोकळ्या आकाशाखाली, उघड्या मैदानात लढा दिला.

पण दिवसाच्या अखेरीस, इंग्रज लाँग्वेव्हल आणि जंगलाचा एक भाग जिथपर्यंत सैन्य पोहोचलं होतं असे दोन्ही आपल्या नियंत्रणाखाली आणले. पण ही लढाई इथपर्यंतच न राहता पुढे चालतच राहिली.

ही लढाई फक्त सोमच्या भागात, त्या प्रदेशात झाली. तरी नुसतं लढणं एवढंच यात नव्हतं किंवा काही लोक मारले गेले, जखमी झाले असं नाही घडलं. हा एक फार महत्वाचा मुद्दा होता, यातून मोठे वाईट परिणाम दिसून आले. सोम ऑपरेशन हे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत चालले आणि त्यात दहा लाख लोक मारले गेले. पण १०६ वर्षांपूर्वी, ते शूर सैन्य शत्रूच्या सीमा ओलांडून पुढे जायला सज्ज होऊन यु*द्धात उतरले होते.

आजही आपण जेव्हा पहिल्या महायुद्धाच्या यु*ध्दक्षेत्रांमध्ये, ज्या ठिकाणी यु*द्ध लढली गेली त्या भागात जरी गेलो तरीही आपल्याला शंभर वर्षांपूर्वीच्या या महायुद्धाच्या खुणा ठळकपणे दिसून येतात. बहुतेक जंगलात तोफांचे मोठे अवशेष, तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात.

१०० वर्षांनंतरही, आज, जगाला या युद्धामुळे धगधगलेल्या या प्रदेशात, त्या युद्धाच्या खुणांसह तिथले लोक कसे राहिले, लढले आणि मारले गेले, हे आपण पाहतोय जर त्या युद्धाचे अवशेषच इतके भयावह आहेत तर त्या काळात लढाई झाली तेव्हा किती भयावह असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मैत्रीच्या नात्याला एक वेगळी उंची देणारी अघोरी प्रथा!

Next Post

इस्राएलमध्ये सापडली १२०० वर्षे जुनी वैभवशाली हवेली..

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

25 September 2023
इतिहास

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

16 September 2023
इतिहास

अमेरिकेन सैन्याच्या सोयीसाठी ‘मॅकडॉनल्ड्स्’ने ‘ड्राइव्ह थ्रू’ सुरु केला होता..!

9 September 2023
इतिहास

कोलंबस नाही तर यानं पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं होतं!

9 September 2023
इतिहास

इस्राएलमध्ये सापडली १२०० वर्षे जुनी वैभवशाली हवेली..

9 September 2023
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2023
Next Post

इस्राएलमध्ये सापडली १२०० वर्षे जुनी वैभवशाली हवेली..

त्यांच्या दृष्टीने 'असं' करणे म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)