The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या पुण्यातील प्रसिद्ध पेठांचा इतिहास

by शंतनू परांजपे
11 April 2025
in भटकंती, इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पुणे म्हटल्यावर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येतो तो इथला इतिहास आणि त्या इतिहासाला जपणाऱ्या इथल्या पेठा. आज यातल्याच तीन पेठांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

सदाशिव पेठ

ही पेठ पानिपतवीर सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ वसवण्यात आली. पूर्वी इथे नायगाव नावाचे एक खेडे होते. सन १७६९ च्या सुमारास आप्पाजी मुंढे यांनी माधवरावांच्या सांगण्यावरून येथे वसाहत निर्माण केली.

सुरुवातीची ७ वर्षे येथे जकात माफ होती. ही जकात किमती वस्तूंवर माफ असल्याने व्यापारी, सावकार, सरदार यांनी याचा फायदा घेतला आणि पेठेत आपले वाडे बांधले.

सन १७६५ साली येथे फक्त ८७ घरे होती व सन १८१८ मध्ये हीच संख्या ७५२ पर्यंत जाऊन पोहोचली.

पेठेत पाणी पुरवठा करण्याचे काम नाना फडणीस यांनी पार पाडले. आंबेगाव येथून नळाद्वारे पाणी आणून ते पेठेतील हौदात सोडले. त्यावेळी या योजनेला सुमारे ८ हजार रुपये इतका खर्च आला होता.



सदाशिव पेठेचा विस्तार पुढे मोठ्या प्रमाणात झाला. विश्रामबागवाडा, सेनापती गोखले यांचा वाडा तसे गद्रे सावकारांची बाग ही याच पेठेतली. गद्रे सावकारांच्या बागेच्या परिसरातच खुन्या मुरलीधराचे मंदिर आहे.

सदाशिव पेठेत तब्बल ३२ मंदिरे आहेत. मंदिरांच्या संख्येत या पेठेचा क्रमांक हा कसबा आणि शुक्रवार यांच्या खालोखाल लागतो. उपाशी विठोबा, भिकारदास मारुती, चिमण्या गणपती, तळ्यातला गणपती (सारसबाग), लक्ष्मी नरसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर ही काही देवतांची अजब नावेसुद्धा याच पेठेतली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर भर घालणारी संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ. ही संस्थासुद्धा याच पेठेत आहे याचा सदाशिव पेठकरांना अभिमान असला पाहिजे.

“शनवार” पेठ

या पेठेचा गाजावाजा झाला तो पेशव्यांनी उभारलेल्या त्यांच्या वाड्यामुळे. पेशवाईमध्ये त्या वास्तूला थोरला वाडा असे नाव होते. अर्थात शनिवार पेठेत असल्याने त्याला पुढे शनिवार वाडा असे म्हणले जाऊ लागले आणि हीच पुण्याची खरी ओळख बनली.

रामशास्त्री प्रभुणे यांचा वाडासुद्धा याच पेठेत होता. पूर्वीच्या काळी शनिवारवाड्याच्या समोरील पटांगणात भाजी मंडई भरत असे.

सन १७६४ साली या पेठेत सुमारे ३७४ घरे होती पण पुढे जसे जसे शनिवार वाड्याचे महत्त्व कमी होऊ लागले तशी या पेठेतील वस्तीसुद्धा कमी होऊ लागली. सन १८२६ मध्ये या पेठेत फक्त १५९ घरे होती.

शनिवार पेठेतेच ओंकारेश्वर आणि अमृतेश्वर यांसारखी सुंदर पेशवेकालीन शिव मंदिरे आहेत. ओंकारेश्वर मंदिराच्या इथे पूर्वी स्मशान होते. पेठेतील अमृतेश्वर मंदिर हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या बहिणीने बांधले आहे. शनिवार पेठेत अनेक प्रसिद्ध सरदारांचे वाडे होते. यात सांगलीकर, रास्ते, नातू, मेहेंदळे, गोळे, बिवलकर, थत्ते, राजमाचीकर, नाना फडणीस, सरदार बिनीवाले यांचा समावेश होतो.

रविवार पेठ

रविवार पेठेचे मुळ नाव हे ‘मलकापूर’ पेठ. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या नावावरून ही पेठ वसवण्यात आली. पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होण्याच्या आधीपासून या पेठेत व्यापारी लोकांची वस्ती होती.

पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात म्हणजे सन १७४०-१७४१च्या दरम्यान या पेठेची पुनर्रचना महाजन व्यवहारे-जोशी यांनी केली.

या पेठेत पूर्वीपासूनच सावकारांचे आणि व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. खालच्या मजल्यावर दुकान आणि वर घर अशी साधारण या पेठेतील घरांची रचना होती. ज्या प्रकारचे जिन्नस येथे विकले जात त्यावरून या पेठेतील भागांना नावे पडली. उदाहरणार्थ मोती चौक, सराफ आळी, बोहरी आळी, कापड गंज.

येथे तांबे आणि पितळ या दोन धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा व्यापार होत असे. ही भांडी बिदर, हैदराबाद तसे भारतातील इतर शहरातसुद्धा विकली जात. या पेठेत सर्व जातीचे आणि धर्माचे लोक राहत असत.

सन १८००मध्ये या पेठेत सुमारे २००० घरे होती यावरून पेठ किती गजबजली असेल याचा अंदाज येतो. पुढे इंग्रजांच्या आमदनीत पेठेतील रहिवाशांची संख्या रोडावली आणि सन १८३०मध्ये हीच संख्या २००० वरून ६६६ वरती आली.

या पेठेत सरदार हरिपंत फडके यांचा वाडा होता. हा वाडा सन १७९४-९९च्या दरम्यान बांधण्यात आला. वाड्यात तब्बल ७ चौक होते आणि वाड्यात असणाऱ्या भाडेकरुंकडून वर्षाकाठी तब्बल १५०० रुपये इतके उत्पन्न मिळत असे. यावरून वाड्याची भव्यता कळून येते. वाड्यात कात्रज येथील तलावातून पाण्याचा पुरवठा होत असे.


संदर्भ – पुण्याचे पेशवे, अ. रा. कुलकर्णी
Pune Gazetteer, Part 3, Pg. no. 280


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: ravivar pethsadashiv pehshaniwar peth
ShareTweet
Previous Post

कोरोनाने आपल्या आवडत्या क्रिकेट सम्राटचा देखील बळी घेतलाय

Next Post

“धर्मनिरपेक्ष” या शब्दावर आपल्या संविधान सभेत नेमकी काय चर्चा झाली होती?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

"धर्मनिरपेक्ष" या शब्दावर आपल्या संविधान सभेत नेमकी काय चर्चा झाली होती?

या अमेरिकन राजदूतामुळे चीनसोबत झालेल्या यु*द्धात भारताला अमेरिकेची मदत मिळाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.