The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाच्या ८९ व्या वर्षी तब्बल ४२ किमी धावून या आजी खऱ्याखुऱ्या ‘आयर्नमॅन’ बनल्या आहेत!

by द पोस्टमन टीम
6 March 2025
in ब्लॉग, क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखक –  मनोज शेडबाळकर


८९ वर्षांची एक (तरूण!) आजीबाई आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भाग घेते आणि यशस्वीरीत्या “आयर्नमॅन” होते..!!

हे वाचून डोक्याला झिणझिण्या आल्या ना?

बाय द वे, आयर्नमॅन ट्राएथलॉन म्हणजे ४ किलोमीटर पोहायचे, नंतर १८० किलोमीटर सायकल चालवायची आणि सर्वात शेवटी ४२ किलोमीटरची मॅरेथॉन धावायची. बस्स इतकेच.



फक्त हे सगळे प्रकरण १७ तासांत पूर्ण करायचेच..!

thepostman

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

तर, या आज्जींनी वयाच्या ८९व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

अरे हो, आणखी एक. हे त्या आजीबाईंचे ४५ वे आयर्नमॅन विजेतेपद होते. म्हणजे त्यांनी या आधी ४४ वेळा “पोहणे + सायकलिंग + मॅरेथॉन” यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. तसेच यांनी आत्तापर्यंत तब्बल ३९० वेगवेगळ्या ट्राएथलॉन स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. अशा जबरदस्त लोकांपुढे आणि त्यांच्या मानसिकतेपुढे आपण फक्त साष्टांग नमस्कार घालायचा. बस्स!!

या आहेत सिस्टर मडोना ब्युडर, वय वर्षे फक्त ९३. या एक कॅथलीक सिस्टर आहेत.

शरीर, आत्मा आणि मनाशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे व्यायामप्रकार यांच्या दैनंदिन वेळापत्रकातला आनंदाचा भाग आहे. याच सातत्याचा परिपाक म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर यशस्वीरीत्या जिंकलेल्या ट्राएथलॉन स्पर्धा.

वयाच्या ४८ व्या वर्षानंतर त्यांनी धावणे सुरू केले. त्या दिवसापासून आता ९३व्या वर्षापर्यंतचा हा प्रवास निव्वळ स्वप्नवत आहे. अर्थात हा प्रवासही सोपा नव्हता. एक-दोनदा आयर्नमॅन स्पर्धेसाठी वापरल्या जाणार्‍या खास सुटचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना स्पर्धा सोडावी लागली. एकदा सेकंदातल्या शतांश भागाच्या फरकामुळे विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली.

२०१३ साली बोस्टन मॅरेथॉन दरम्यान त्या फिनीश लाईनपासून दीडदोन किमी दूर असताना तेथे बाँबस्फोट झाला. वयाच्या ८२ व्या वर्षी ट्रेनिंग दरम्यान अपघात होऊन खुबा फ्रॅक्चर झाला. मात्र सहाच महिन्यात त्या पुन्हा पुढच्या ट्राएथलॉनसाठी सज्ज झाल्या होत्या.

thepostman

या सर्व अडचणींना यशस्वीपणे तोंड देऊन आणि अडचणींवर मात करून आजीबाईंचा प्रवास सुरूच आहे!

अरे हो, या आज्जीबाई सिनीयर ऑलिंपीयनसुद्धा आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये, विशेषतः आयर्नमॅनमध्ये यांच्या वाढत्या वयानुसार अनेक नवीन “एज-ग्रूप” वाढवावे लागले. तेंव्हापासून यांना सगळेजण “आयर्न-नन” म्हणून ओळखतात.

यांनी स्वत:वर “The Grace to Race” या नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. आणखी एक मानाची गोष्ट म्हणजे २०१६ साली नाईके या सुप्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडच्या कंपनीने “अनलिमीटेड युथ” नामक एक जाहिरात यांच्यावर चित्रीत केली.

thepostman

या आज्जीबाईंची एकंदर कामगिरी आणि त्याचा आवाका या गोष्टी शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करणे हे ही अवघडच आहे.

या ग्रेट आजीबाईंना आणखीन एकदा साष्टांग नमस्कार!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: sister madona buder
ShareTweet
Previous Post

इन्सेप्शन – या चित्रपटाचा क्लायमॅक्स अजूनही लोकांना समजलेला नाही

Next Post

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मिझोरममधील फुटीरतावादी बंड मोडून काढण्यासाठी इंदिराजींनी एअर फोर्सचा वापर केला होता

कोरियन यु*द्धात भारतीय सैनिकांनी शेकडो सैनिकांचे प्राण वाचवले होते.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.