The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टीव्ह जॉब्सने पहिल्या आयफोनच्या लॉंचिंगवेळी सगळ्यांच्याच डोळ्यात धूळ फेकली होती

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आयफोन किंवा स्मार्टफोन हा आज बहुतांश लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ॲपलने २००७ साली पहिला आयफोन लॉंच केला. तेव्हा ॲपलचे सीइओ स्टीव्ह जॉब्ज यांनी म्हटले होते की, हा फोन बाजारात आल्यानंतर सगळं जग बदलून जाईल. अर्थात, त्यानंतर या आयफोनमध्ये प्रचंड वेगाने बदल होत गेले. जग आहे तिथेच असले तरी, माणसांची जीवनशैली मात्र या आयफोनमुळे नक्कीच बदलली.

पण जेव्हा पहिला आयफोन लाँच करण्यात आला. तेव्हा तो यशस्वीरित्या बनवला गेला होता का?

खरंतर ज्यावेळी आयफोन लाँच करण्यात आला तेव्हा तो पूर्णतः तयार नव्हता. आयफोनमध्ये बऱ्याच त्रुटी राहिल्या होत्या. पण, तरीही ॲपलने आयफोनच्या लाँच होण्याची तारीख आधीच जगजाहीर केली होती. कंपनीची नाचक्की टाळण्यासाठी आयफोन यशस्वीरित्या बनवून तयार होण्याआधीच त्याचे प्रेझेन्टेशन करण्यात आले.

अर्थात, ९० मिनिटाच्या या प्रेझेन्टेशनमध्ये स्टीव्ह जॉब्जने हातोहात लोकांच्या डोळ्यात कशी धूळ फेकली याची कथा मोठी रंजक आहे.



२००७ हे वर्ष ॲपल कंपनी आणि स्टीव्ह जॉब्ज दोघांसाठीही अतिशय महत्त्वपूर्ण होते. कारण त्यावर्षी ॲपलला जगातील एक अद्भुत गोष्ट बाजारात आणायची होती. ज्यामुळे संपूर्ण जग बदलून जाईल असा खुद्द ॲपलचाच दावा होता. ॲपलने हे प्रॉडक्ट बाजारात आणण्याआधीच त्याची एवढी चर्चा घडवून आणली होती की प्रत्येकाला ॲपलच्या या नव्या प्रॉडक्टविषयी उत्सुकता होती. अनेकांना असेच वाटत होते की कदाचित ॲपलच्या आयपॉडमध्येच काही नवी सुधारणा करून ते बाजारात आणणार असेल.

मात्र इकडे स्टीव्ह जॉब्जच्या डोक्यात आयपॉडपेक्षाही पुढच्या तंत्रज्ञानावर आधारलेले नवे प्रॉडक्ट आणण्याचा विचार होता. आयफोन हे स्टीव्ह जॉब्जचे एक स्वप्न होते. आधीच सांगितल्यानुसार ॲपलने आपल्या या नव्या उत्पादनाविषयी बाजारात बरीच चर्चा घडवून आणली होती आणि हे उत्पादन कधी लाँच करायचे याची तारीख देखील जाहीर केली होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

पण लाँचींगची तारीख जवळ आली तरी, स्टीव्हच्या कल्पनेतील आयफोन काही तयार झाला नव्हता. त्याच्या इंजिनियर्सनी जेव्हा अजूनही त्याला हवा तसा आयफोन बनला नसल्याचे सांगितले तेव्हा स्टीव्हच्या डोळ्यासमोर अक्षरश: चांदण्या चमकल्या. कारण हा त्याच्या आणि कंपनीच्या इभ्रतीचा प्रश्न होता. त्याचे इंजिनियर्स त्याला विनवत होते की, स्टीव्हने लाँचींगची तारीख काही दिवस नव्हे तर काही आठवडे पुढे ढकलावी. पण स्टीव्हला हे अजिबात मान्य नव्हते.

कारण, तो जे उत्पादन बाजारात आणणार होता त्यामुळे लोकांच्या तंत्रज्ञानविषयक सवयी तर बदलणार होत्याच पण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे आणि त्याच्या कंपनीचे भविष्य या एका गोष्टीमुळे पूर्णतः बदलणार होते.

ॲपलच्या इंजिनियर्सनी तयार केलेला आयफोन पूर्णतः निर्दोष नव्हता. त्यात अनेक बग्ज होते, पण तरीही ठरलेल्या तारखेलाच स्टीव्हने त्या अर्धवट आयफोनचे यशस्वी लाँचींग केले. या कार्यक्रमासाठी हजारो लोक, हजारो ग्राहक, त्यांचे भागीदार आणि टेक्नो मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांसमोर स्टीव्हला त्याचा अर्धवट स्थितीतला आयफोन कसा भन्नाट चालतो हे दाखवून त्यांना संमोहित करायचे होते. कारण, त्याच्याकडे तोपर्यंत आयफोनची जी आवृत्ती उपलब्ध झाली होती, त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या.

या फोनमध्ये इतक्या त्रुटी होत्या की कुठलेही एक फिचर सुरु केले की, अक्षरश: फोन क्रॅश होत असे. साधं एक गाणंही पूर्ण वाजू शकत नव्हतं, अर्ध गाणं झाल्यावरच फोन क्रॅश होत असे. इमेल उघडला तरी पुढील कोणतीच क्रिया त्याच्यावर झटपट करता येत नव्हती. कारण, इमेल उघडल्या उघडल्याच फोन बंद. आयफोनवरील एक-दोन फिचर सोडल्यास प्रत्येक फिचरबाबत हाच प्रॉब्लेम होत असे.

इतकेच नाही तर या फोनवर इंटरनेटही फुल स्पीडने चालत नव्हते. यावर उपाय म्हणून स्टीव्हने डेव्हलपर्सना आधीच सूचना देऊन ठेवल्या होत्या की, इंटरनेट कितीही स्लो असले तरी, त्यावर नेटवर्क फुल दिसेल असाच डिस्प्ले बनवा.

आयफोनचा कुठलाही फिचर फेल झाल्यास या डेव्हलपरला स्टीव्ह अगदी भंडावून सोडत असे. तरीही स्टीव्हला त्याच दिवशी तो आयफोन लाँच करायचा होता. स्टीव्हसह सगळ्यांनाच धाकधूक होती की, लाँचींग करताना कसलीही गडबड होऊ नये. अर्थात, इतक्या मोठ्या समूहासमोर जाण्यापूर्वी स्टीव्हने चांगली तयारी केली होती. पण, त्याने नेमके हे कसे केले, हे त्याच्या सहकाऱ्यांना देखील कळू शकले नाही.

स्टेजवर जातानाच स्टीव्हने आपल्यासोबत चार-पाच आयफोन घेतले. म्हणजे एक फोन बंद पडल्यानंतर तो लगेच दुसरा फोन काढून पुढील फिचर लोकांना दाखवत असे. पण, त्याच्या समोरील प्रेक्षक तर सोडाच त्याच्या कर्मचाऱ्यांनाही कळू शकले नाही की, स्टीव्हकडे एकापेक्षा जास्त आयफोन आहेत.

एकेका फिचरबद्दल सांगून झाल्यावर फोनमधील इंटरनेटबद्दल सांगण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनाच वाटले की, आत्ता आपले पितळ उघडे पडेल. पण, आयफोनमधील इंटरनेट नेटवर्क फुल्ल दिसावे म्हणून स्टीव्हने ऍपलसोबतच्या AT&T कंपनीला हॉलमध्ये पोर्टेबल टॉवर बसवायला सांगितले होते. ज्यामुळे स्टीव्ह जवळच्या आयफोनला फुल स्पीड इंटरनेट दाखवत होते.

त्यानंतर स्टीव्हने तब्बल ९० मिनिटे न थकता आपल्या स्मार्टफोनचे लाँचींग केले. आयफोनने स्मार्टफोनचा पहिला पाया रचला आणि त्यानंतर यामध्ये जे काही बदल घडत गेले ते तर आपण सर्वच जण अनुभवत आहोत.

त्यादिवशी जर आयफोनचे लाँचींग अपयशी ठरले असते तर, टच-कीबोर्ड आणण्याचा कुणी विचारही केला नसता आणि ऍपल कंपनीचे आजचे वर्तमान काही वेगळेच असते. पण, त्यानंतर कंपनीने जी काही उंची गाठली ती आश्चर्यजनक होती. त्या दिवशी स्टीव्हच्या हातचलाखीमुळे आयफोनने एक नवा इतिहास रचला हे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: iphone
ShareTweet
Previous Post

आणि म्हणून भारतीय फुटबॉल संघाला ‘आशियाचा ब्राझील’ म्हटलं जायचं

Next Post

अवघ्या एकविसाव्या वर्षी हुतात्मा होत या वीराने व्हिक्टोरिया क्रॉसवर आपलं नाव कोरलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

अवघ्या एकविसाव्या वर्षी हुतात्मा होत या वीराने व्हिक्टोरिया क्रॉसवर आपलं नाव कोरलं होतं

एका ब्रिटीशाने बनवलेला रेडिओ भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.