The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी भारतीय लोकांनी लावलेल्या या शोधांना तोड नाही

by द पोस्टमन टीम
30 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


‘गरज शोधाची जननी आहे’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीची गरज निर्माण होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी माणूस प्रयत्न सुरू करत नाही. जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा या गरजेतून माणूस अनेक गोष्टी साकार करत असतो. मानवी सभ्यतेचा इतिहास आज ह्याची प्रत्यक्ष साक्ष देतो आहे.

आपल्या देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शहरात व निमशहरी भागात वास्तव्यास असलेल्या आणि खुर्चीवर बसून काम करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी व त्यांना आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी करावे लागणारे कष्ट याची अनुभूतीच येणारच नाही. आपल्याला जे सहज उपलब्ध होते त्यासाठी त्या लोकांना द्रविडी प्राणायम करावे लागतात.

पाण्यासाठीच हे लोकं तब्बल २-३ किलोमीटरची पायपीट करत असतात. पण याच आणि अशा अनेक अडचणींवर मात करत या ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या समस्येवर समाधान शोधायला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली आहे, यातूनच अनेक शोध या लोकांनी लावले आहेत. या शोधांबद्दल आज शहरातील जनता पूर्णपणे अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागातील लोकांनी कुठल्याही विज्ञानाचे ज्ञान नसतांना असे शोध लावले आहेत की आजच्या विज्ञान विभूषित लोकांना देखील लाजवल्या खेरीज राहणार नाहीत.

आज आम्ही तुम्हाला ग्रामीण भागातील अशा दहा संशोधनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी भारतातच नव्हे तर जगभरात कीर्ती मिळवली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था ह्या ग्रामीण भागातील संशोधकांचा गौरव करत आहेत.



१) मिट्टीकुल

 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

mitticool-the postman
Pinterest

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या मनसुखभाई प्रजापती यांनी इको फ्रेंडली रेफ्रिजरेटर तयार केले असून त्याला मिट्टीकुल असे नाव दिले आहे. मनसुखभाई हे कुंभार असून मडके बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रेफ्रिजरेटरच्या रचनेला लक्षात घेऊन त्यांनी मातीच्या रेफ्रिजरेटरची निर्मिती केली असून पदार्थं थंड करण्यात हे मातीचे रेफ्रिजरेटर देखील महत्वपूर्ण भूमिका बजावतात, यासाठी वीजेची देखील गरज नाही. हे पर्यावरणपूरक रेफ्रिजरेटर आता ऑनलाइन उपलब्ध आहे.

२) कापणी आणि काढणी यंत्र

 

windowing machine-the postman
The Hindu

शेतकऱ्याचा बहुतांश वेळ हा शेतीची मशागत करण्यात आणि आलेल्या पिकाची काढणी व कापणी करण्यात जात असतो. भगवान सिंह डांगी यांच्या मते लहान शेतकऱ्यांना यासाठी कष्ट करावे लागतात. अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणूनच त्यांनी कापणी काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. यामुळे शेतीशी निगडित दोन्ही प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडल्या आहेत.

३) मिल्किंग मशीन

 

milking machine-the postman
Medium

राघव गौडा ह्या कर्नाटकच्या शेतकऱ्याने एका अशा यंत्राचा आविष्कार केला आहे ज्याच्या मदतीने लोक अत्यंत सहजपणे गायी म्हशीचं दूध काढू शकतात. हे काही प्रमाणात स्वयंचलित यंत्र असून याच्या मदतीने एकाच वेळी दोन पशूंचे दूध काढणे सहज शक्य होते. गौडा यांना त्यांच्या या संशोधनासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. क्षीरा एंटरप्राइज या नावाखाली त्यांनी या यंत्रांच्या निर्मितीचे पेटंट आपल्या नावी देखील करून घेतले आहे.

४) गॅसवर चालणारी इस्त्री

lpg gas iron-the postman

ग्रामीण भागातील लोकांना प्रामुख्याने विजेचा आणि कोळश्याचा तुटवडा असतो, त्यामुळे इस्त्रीसाठी आता गॅसचा वापर करण्याचा नवीन मार्ग के लिंगा ब्राम्हण यांनी पुढे आणला असून त्यांनी गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचे संशोधन केले आहे. त्यांच्या या उपकरणाला राष्ट्रीय संशोधन संस्थेने आर्थिक सहाय्य प्रदान केले. त्यांच्या या गॅस इस्त्रीमुळे एका तासाला इस्त्रीसाठी फक्त १.८ रुपये इतका क्षुल्लक खर्च येतो. टेलर आणि ड्रायक्लिनिंग करणाऱ्या लोकांसाठी हे उपकरण फायदेशीर ठरू शकतं.

५) विना वीज आणि विना डिझेल चालणारी पाणचक्की

water pump-postman

उत्तर प्रदेशातील भैलोनी या अत्यंत छोट्या गावचे निवासी असलेल्या मंगल सिंग नामक व्यक्तीने एका अल्प खर्चात एका अशा पाणचक्कीची निर्मिती केली आहे, जिच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या विहिरीतून वीज व इंधनाचा वापर न करता पाणी काढणे सहज शक्य होते आहे.

६) परपेच्युअल पेंटब्रश

perpetual paintbrush-the postman

रंगकाम करताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्याला पेंट ब्रश पुन्हा पुन्हा रंगात बुडवावा लागतो. पण आता ही समस्या दूर होणार आहे. जहांगीर अहमद नावाच्या एका व्यक्तीने असा पेंट ब्रश बनवला आहे जो पेंट पंप करतो, ज्यामुळे आपोआप त्याच्या दर्शनी भागात रंग जमा होतो, ज्यामुळे त्याला रंगाच्या बादलीत पुन्हा पुन्हा बुडवण्याची गरज पडत नाही.

७) नारळ तोडणी यंत्र

coconut plucker-postman

 

दिवंगत एम जे जोसेफ नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला झाडावरून नारळ तोडायला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अशा उपकरणाची निर्मिती केली आहे, ज्याच्या मदतीने झाडावर न चढता सहजतेने नारळ तोडणे शक्य होणार आहे. यात वेळ आणि श्रम दोन्हीची बचत तर होतेच सोबत जीव धोक्यात घालावा लागत नाही.

८) पायांच्या गतीवर चालणारे वॉशिंग मशीन

washing mahcine-the postman
The Logical Indian

रेम्या जोस या एका शाळकरी मुलीची आई हाताने कपडे धुते म्हणून सतत आजारी पडायची, तिच्या आईची अडचण लक्षात घेऊन या मुलीने एका अशा वॉशिंग मशीनची निर्मिती केली जे सायकलप्रमाणे कार्य करते. तुमच्या पायांच्या गतीवर या वॉशिंग मशीनचे काम होते. यासाठी ना वीज लागते ना इंधन. रेम्याच्या या संशोधनाचे सर्वत्र कौतुक होते आहे.

९) वॉटर वॉकर्स

water walkers-postman

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील द्वारका प्रसाद या व्यक्तीने एका स्पेशल पाण्यावर चालण्यासाठी उपयोगी येणाऱ्या बुटांची निर्मिती केली आहे, यासाठी थर्माकोलचा वापर केला आहे. त्यांचे हे संशोधन पाणथळ जागेत चालण्यासाठी उपयुक्त असून त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, कारण या प्रकारचे संशोधन आजपर्यंत जगात फार कमी झाले आहे.

१०) १४० उपकरणांचा जनक

uddhab bharali-the postman
The Better India

उद्धब भराली नावाच्या एका गृहस्थाने पीक लागवडीपासून ते त्या पिकाला खाण्यायोग्य बनवण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अशा तब्बल १४० कृषी संबंधित उपकरणांची निर्मिती केली असून त्यांच्या या संशोधनाचा अमेरिकन स्पेस एजन्सी नासाकडून गौरव करण्यात आला आहे.

हे ग्रामीण भागातील १० शोध हे सिद्ध करतात की कुठल्याही प्रकारच्या संशोधनासाठी दरवेळी विज्ञान तंत्रज्ञान याविषयी ज्ञान असणे आवश्यक नसते, काहीवेळा आपल्याला फक्त कुठल्यातरी समस्येवर उपाय शोधण्याची एक निकड निर्माण झाली पाहिजे. एकदा ती गरज निर्माण झाली की मनुष्य शोधांना जन्म देत असतो.

हे ग्रामीण संशोधक आज प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अडचणींवर मात करत आहेत, हे निश्चितच प्रेरणादायी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एवढ्याश्या इस्त्राईलने आठ अरब राष्ट्रांना फक्त सहा दिवसांत धूळ चारली होती..!

Next Post

“नॉट सो कन्वेन्शनल” कपूरला भावपूर्ण श्रद्धांजली!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

"नॉट सो कन्वेन्शनल" कपूरला भावपूर्ण श्रद्धांजली!

यांनी बास्केटबाॅलमध्ये जगभर भारताचा दबदबा निर्माण केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.