The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानच्या पहिल्या कायदेमंत्र्यांना ‘हिंदू’ असल्यामुळे पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं

by Tushar Damgude
27 January 2026
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


स्वतंत्र भारताची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हे सर्वश्रुत आहेच. परंतु स्वतंत्र पाकिस्तानचा पहिला कायदामंत्री देखील एक दलित होता त्याचे नाव म्हणजे “जोगेंद्रनाथ मोंडल”.

जोगेंद्रनाथ मोंडल हे देखील दलितांच्या हक्कासाठी लढा देणारे एक नेते होते. मुस्लिम आणि दलित युती करून स्वतंत्र देशात मानाने रहायचं स्वप्न जोगेंद्रनाथ आपल्या बांधवांसाठी पहात होते, या स्वप्नाच्या पुर्ततेसाठी त्यांनी मुस्लिम लीग हा पक्ष निवडला आणि थोड्याच काळात मोहम्मद अली जिना यांच्या बरोबर त्यांची जोडी जमली.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घडलेल्या एका घटनेचे उदाहरण देतो. बंगालमधील सिल्हेट या गावात हिंदू आणि मुस्लिम संख्या समान असल्याने भारतात की पाकिस्तानात सामील व्हायचे यावर तोडगा निघत नव्हता अशावेळी जिनांनी जोगेंद्रनाथांना सिल्हेटमध्ये पाठवलं आणि दलितांची मते पाकिस्तानच्या पारड्यात फिरवली आणि सिल्हेट पाकिस्तानमध्ये सामिल झालं यावरून जोगेंद्रनाथांचे महत्व आणि पाकिस्तान घडवण्यातील भूमिका लक्षात यावी.

पुढे पाकिस्तानचा पहिला कायदामंत्री बनल्यावर हळूहळू परिस्थिती त्यांच्या लक्षात आली परंतु तोवर उशीर झालेला होता कारण सर्वधर्मियांसाठी समान न्याय हे स्वप्न दाखवणारे जिन्हा मृत्युपंथाला लागलेले होते. स्वतः जिनांच्या भगिनीवर भारतीय गुप्तहेर असल्याचा संशय घेत पहारे बसले होते तिथे जोगेंद्रनाथांची काय कथा.



“मुस्लिमांसाठी पाकिस्तान” हे विचार डोक्यात असणारे नोकरशहांना हिंदु कायदामंत्री कसा खपावा?

त्यांनी जोगेंद्रनाथांबरोबर असहकार सुरू केला, त्यांना अपमानकारक वागणूक दिली जाऊ लागली, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला आणि अशात मोहम्मद जिना यांचा देखील मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युवेळी जोगेंद्रनाथ म्हणतात “कायदे आझम अशावेळी आम्हाला सोडून गेलेत ज्यावेळी आम्हाला सर्वात जास्त त्यांची गरज आहे”.

पुढे त्यांना सर्व प्रकार सहन होईनात तेव्हा त्यांनी विस्तारपुर्वक एक राजीनामा पत्र लिहिले “त्यात नोकरशहांच्या वागणुकी बरोबरच काही घटनांचा त्यांनी उल्लेख केला आहे त्यात दलित हिंदू जनतेची मालमत्ता पोलिसांच्या सहकार्याने लुटणे तसेच लष्करी तळावर हिंदू महिलांना रात्रीच्या मनोरंजनासाठी उचलून नेणे, तसेच १९५० साली बंगालमध्ये झालेल्या धार्मिक दं*गलीत जवळपास दहा हजार हिंदूंची क*त्तल अशा घटना घडून देखील प्रशासनाने दुर्लक्ष करणे आदींचा उल्लेख आहे, पाकिस्तान सरकार पद्धतशीरपणे मुस्लिमेतर धर्मियांना देशोधडीला लावण्याचा कट आखत असल्याचा उल्लेख त्या राजीनाम्यात आहे”.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

मनाशी बाळगलेल्या स्वप्नांचा झालेला चुराडा पाहत जोगेंद्रनाथांनी भारत सरकारकडे शरणागती मागितली आणि भारताने ती त्यांना दिली. पण यात एक गोष्ट म्हणजे या माणसाच्या अंगातली मस्ती जिरली नव्हती किंवा हा माणूस भिकेला लागण्याच्याच लायकीचा होता, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण भारतात परतल्यावर एका पत्रकाराने “आपण भारतात परत आल्यावर कसे वाटतेय?” हा प्रश्न विचारल्यावर हा माणूस “मी बंगाल मध्ये परत आलो आहे” असे उत्तर देऊन मोकळा झाला म्हणजे याच्यासाठी भारत अस्तित्वात नव्हता तर बंगाल हाच देश होता.

असो, एकाच परिस्थिती आणि पार्श्वभूमीतुन निघालेली दोन माणसं, एकाच्या आयुष्याच सोनं झालं तर दुसऱ्याच्या आयुष्याची माती, माणसाची निवड चुकली की काय होते त्याचे उत्कृष्ट उदाहरण.


स्त्रोत- https://en.m.wikisource.org/wiki/Resignation_letter_of_Jogendra_Nath_Mandal


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. |

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: India Vs Pakistan
ShareTweet
Previous Post

२२०० किलोमीटरचे अंतर कापत इस्त्राईली विमानांनी इराकचा आण्विक कार्यक्रम उध्वस्त केला होता

Next Post

चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून हा मराठी शेतकरी वर्षाकाठी 1 कोटींचा नफा कमावतोय

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून हा मराठी शेतकरी वर्षाकाठी 1 कोटींचा नफा कमावतोय

तेराव्या शतकात संजीवनी शोधून काढणारा 'अल्केमिस्ट'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.