The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आखाती देशातील या प्रश्नाने आजवर तब्बल ३० लाख लोकांना निर्वासित बनवलंय…!

by Tushar Damgude
22 July 2024
in ब्लॉग, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


हा विषय सुरू करण्याआधी “मध्यपूर्व” ही संकल्पना समजून घेऊ. मध्यपूर्व म्हणजेच आखाती राष्ट्रं. यामध्ये सौदी अरेबिया, इराक, कतार, येमेन, बहरीन, इराण, कुवेत ही प्रमुख राष्ट्रं येतात. इराण आणि सौदी अरेबिया यामध्ये सुन्नी-शिया या कट्टर धार्मिक वादाबरोबरच मध्यपुर्वेत वर्चस्व कोण गाजवणार हा देखील मुद्दा आहे.

२००९ मध्ये एका छोट्या घटनेतून या घडामोडींना सुरुवात झाली. मध्यपुर्वेतील बहुतांश राष्ट्रांमध्ये हुकूमशाही राजवट वर्षानुवर्षे सुखाने नांदत होत्या, परंतु जनतेमध्ये असंतोष ठासून भरला होता. ट्युनिशीयातील मोहम्मद बाऊअजीजी नावाच्या एका फळविक्रेत्याने हुकूमशहाच्या जुलूमशाही कारभाराविरोधात स्वतःला पेटवून घेतले आणि या घटनेने जनतेमध्ये भडका उडाला.

जनतेने रस्त्यावर उतरून २३ वर्षांची हुकूमशाही राजवट उलथून टाकली आणि हे लोण हळूहळू इतर अरब राष्ट्रांत पसरले.

फेसबुक, व्हॉटस्ॲपचा वापर करून लाखोंचे मोर्चे निघू लागले तर काही ठिकाणी गृहयु*द्धांना सुरुवात झाली. यामध्ये होस्नी मुबारकची इजिप्तमधील आणि गद्दाफीची लिबियामधील राजवट लोकांनी उखडून फेकली. या क्रांतीकारी घटनांनाच “Arab Spring” म्हणतात. या बंडखोरांना आणि हुकूमशहांना शस्त्रास्त्रं विकून फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकने पैसा कमावला.



पण अरब स्प्रिंग ही चळवळ सगळ्या देशांत यशस्वी झाली नाही, त्याची कारणं वेगळीच होती.

सिरीयामध्ये शिया पंथिय राष्ट्राध्यक्ष-हुकूमशहा असादला हटवण्यासाठी अमेरिकने सुन्नी बंडखोरांना मदत सुरु केली आणि अमेरिकन बाहुला सिरीयामध्ये सत्तेवर यावा हे व्लादिमीर पुतीनला कसे रूचावे?

रशियाने असादला आपला पाठिंबा पैसा व शस्त्रास्त्रांच्या रूपात सुरू केला. आज देखील सिरीया गृहयु*ध्दाने पेटलेलेच आहे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

येमेनमध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता (याने आपल्या कार्यकाळात अंदाजे दोन ते चार लाख कोटी रुपये कमावले) आणि २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले.

येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्यामध्ये विभागली गेली आणि येमेनमध्ये आंतरिक गृहयु*द्ध सुरु झाले, परिणामी लष्कराचा धाक कमकुवत झाला. याचा फायदा घेण्यासाठी हौदी वंशाचा बंडखोर अब्दुल मलीक हौदी उभा राहिला कारण हौदी लोकांबरोबर पक्षपात केला जातो आणि त्यांचा विकास झाला नाही ही त्यांची मुख्य तक्रार होती. हौदी लोक शिया पंथीय आहेत आणि हुकूमशहा सुन्नी, हौदी बंडखोरांनी शिया बहुसंख्याक राज्यं हस्तगत करायला सुरुवात केली ज्यामध्ये येमेनची राजधानी “सना” देखील येते.

इराणने आपली लढाऊ जहाजं येमेनच्या ‘एडन’जवळील समुद्रात आणून, शस्त्रास्त्रं, पैसा याद्वारे शिया पंथीय हौदींना पाठिंबा द्यायला सुरुवात केली त्यामध्ये जातीबरोबर आणखी एक कारण म्हणजे येमेन सौदी अरेबियाच्या सीमारेषांना भिडलेले आहे.

उत्तरेतून हिजबुल्ला तसेच कतीफीसारख्या अतिरेकी संघटनांद्वारे व दक्षिणेला आपला समर्थक सत्ताधारी येमेनमध्ये आणुन सौदी अरेबियावर दबाव ठेवणे ही इराणची उत्कृष्ट खेळी होती.

हे लक्षात आल्यावर सौदी अरेबिया, इराण म्हणजेच हौदींना रोखण्यासाठी येमेन हुकूमशहा सालेहच्या मागे उभे राहिले. सौदी अरेबियाने हौदी बंडखोरांच्या प्रदेशात हवाईहल्ले सुरु केले. यात सालेहविरुध्द अहमार यु*द्ध सुरुच होते. सालेहने हौदी बंडखोरांचे ठिकाण म्हणून अहमार असलेले ठिकाण दाखवले आणि सौदी विमांनानी बाँ*ब टाकले या ह*ल्ल्यात अहमार सुदैवाने बचावला. यामधून धडा शिकलेल्या लष्करप्रमुखाने हौदी बंडखोरांशी हातमिळवणी केली म्हणजे आता हौदी बंडखोर तसेच अहमार यांच्या युती विरुध्द हुकूमशहा सालेह असा लढा सुरु झाला.

यामध्ये काही घटनांनंतर महत्त्वाची घटना म्हणजे हुकूमशहा सालेह मशिदीत नमाज पढत असताना बाँ*बस्फो*ट झाला आणि तहाच्या कागदावर सह्या करण्यास टाळाटाळ करणारा सालेह चाळीस टक्के भाजल्यावर तयार झाला. २०११ मध्ये सालेहने पद सोडले मन्सूर हादी या व्यक्तीसाठी.

हादीने आधीचा लष्करप्रमुख बडतर्फ करून मुबारक नावाचा नवीन लष्करप्रमुख घोषित करुन येमेन एकसंध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मन्सूर हादीने असंतोष मिटवण्यासाठी सहा राज्यांना पुर्ण स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु अल हौदीने तो धुडकावून लावला व शस्त्रांच्या बळावर २०१४ मध्ये राजधानीचे पुर्ण राज्य ताब्यात घेतले.

हा लाजीरवाणा प्रसंग टाळण्यासाठी येमेन राष्ट्रपतीने आपले सगळे सैन्य उत्तरेला हौदी बंडखोरांच्या विरोधात उतरवले आणि याचा फायदा घेत दक्षिणेला अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली.

इकडे आड आणि तिकडे विहीर अशा संकटात असलेल्या राष्ट्रपतीने शेवटी युनोच्या मदतीने अल हौदीबरोबर एक शांतता करार केला. ज्यामध्ये हौदींना सत्तेमध्ये मोठा वाटा मिळाला. परंतु सत्तेमध्ये असलेल्या हौदींनी हळूहळू पुर्ण येमेन गिळंकृत करु नये म्हणून मन्सूर हादीने अहमद मुबारक या लष्करप्रमुखाला पंतप्रधान करण्याचा घाट घातला परंतु अल हौदीने हा कट उधळला, संविधान देखील धुडकावून लावले आणि लष्करप्रमुखाला अटक केली. मन्सूर हादीने कंटाळून राजीनामा दिला व त्यांना हौदी बंडखोरांनी तात्काळ नजरकैदेत टाकले.

२०१५ मध्ये मन्सूर हादी यांनी सगळ्यांना तुरी देत पळून जाऊन सौदी अरेबिया गाठले व सौदी अरेबियाच्या मदतीने मन्सूर हादीकडून सुरू झाले Operation Decisive Storm.

आता सौदी अरेबिया या ऑपरेशन अंतर्गत येमेनमध्ये हवाईह*ल्ले करते. या छुप्या यु*द्धात सौदी अरेबियाबरोबर छुप्या पद्धतीने जॉर्डन, सुदान, इजिप्त, मोरोक्को, सेनेगल ही सुन्नी राष्ट्रं तसेच यांना शस्त्रास्त्रं विकणारे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड सामील आहेत तर दुसऱ्या बाजूला हौदी बंडखोरांच्या मागे इराण उभा आहे.

सौदी अरेबियाचे ह*ल्ले बेभरवशी आहेत त्यामुळे हॉस्पिटल, शाळा, औद्योगिक इमारती यांचे अपरिमीत नुकसान तर झालेच, परंतु हजारो नागरिक देखील मृत्युमुखी पडले आहेत. २०१५ मध्ये अल हुदायधाह बंदर उ*द्ध्वस्त झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे दळणवळण ठप्प आहे. याचा परिणाम म्हणून भूकबळींची संख्या इतकी आहे की कदाचित एकविसाव्या शतकातील हे सर्वात मोठे मानव निर्मित संकट आहे.

जवळजवळ तीस लाख लोक निर्वासित आणि भूकबळींच्या छायेत आहेत त्यात चार लाख मुलं आहेत व जवळपास दहा हजार मुलं मृत्युमुखी पडली आहेत.

पाश्चिमात्त्य मिडियामध्ये येमेन प्रश्नाला आपापल्या लागेबांध्यांमुळे कवरेज मिळत नाही. जे मिळते ते हौदींना खलनायक म्हणून मिळते कारण अमेरिकन प्रभाव. अमेरिका जगात प्रतिवर्षी ३३% शस्त्र विकते. फक्त २०१५ मध्ये अमेरिकने सौदिअरेबियाला जवळपास सव्वा लाख कोटी रूपयांची शस्त्रास्त्रं विकली आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Iraniran war
ShareTweet
Previous Post

सिक्कीम भारतात सामील कसा झाला ? भाग- ५: चोग्यालचा पेच

Next Post

एका डेंग्यूग्रस्त जिल्ह्याला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्ह्यात परावर्तीत करणारी ‘देवसेना’

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
Next Post

एका डेंग्यूग्रस्त जिल्ह्याला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्ह्यात परावर्तीत करणारी 'देवसेना'

पॅसिफिक समुद्रात रंगांधळ्या लोकांचे बेट आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.