The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पॅसिफिक समुद्रात रंगांधळ्या लोकांचे बेट आहे

by द पोस्टमन टीम
15 May 2025
in आरोग्य, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. जगात अनेक अशा असंख्य जागा आहेत ज्या अत्यंत वेगेवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्या ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत, त्या गोष्टी एकतर प्रचंड भूषणावह आहेत नाहीतर अत्यंत विचित्र!

आपल्या पृथ्वीवर असंच एक बेट आहे, ज्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बेटावरील बहुतांश लोकांना रंगांधळेपणाचा विकार आहे. त्या लोकांना पांढरा आणि काळा हे दोनच रंग उमजतात, अर्थात त्यांना डोळ्यांना जे काही दृश्य दिसतं ते कृष्ण-धवल स्वरूपाचं असतं. त्यांना इतर रंगांधळ्या लोकांप्रमाणे लाल अथवा हिरव्या रंगाची दृश्ये दिसत नाहीत.

पिंगलेप अटॉल असे या द्वीपाचे नाव असून हे द्वीप पॅसिफिक महासागरात आहे.

या द्वीपाचे वैशिष्ट्य हे आहे की येथील लोकांना अक्रोमोटॉप्सिया या नेत्राच्या विकाराने ग्रासले आहे. या बेटावरील तब्बल १० टक्के लोकांना हा आजार असून जगभरात हा आजार ३० हजार लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला असतो.



शास्त्रज्ञांच्या मते हा आजार होण्याचे प्रमुख कारण हे उत्क्रांती नसून १७७५ च्या आसपास या बेटावर आलेलं एक चक्रीवादळ आहे.

या चक्रीवादळामुळे हे बेट पूर्णपणे उ*ध्वस्त झालं होतं. या बेटावर राहणाऱ्या बहुतांश लोकांचे या चक्रीवादळात प्राण गेले होते. फक्त एक व्यक्ती वाचला, ज्याला त्या बेटांचा राजा संबोधले जाते, तो या रंगांधळेपणाने ग्रस्त होता. त्याचाच वंश पुढे चालल्याने इथल्या बहुतांश लोकांना या आजराने ग्रासले आहे. हे अगदी माणसांत आढळून येणाऱ्या डावखुरेपणासारखे पसरले.

रंगांधळेपणा म्हणजे काय ? 

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

कलर व्हिजन हे डोळ्यातील तीन प्रकारच्या कोन आणि रॉड सेल्स कन्ट्रोल करत असतात. या सेल्स लाल, हिरव्या आणि निळ्या रंगासाठी संवेदनशील असतात. अक्रोमोटॉप्सियामध्ये डोळ्यातील एकही कोन सेल कार्यरत नसते. यामुळे रंगाची संवेदनाच नष्ट होते. यालाच मराठीत रंगांधळेपणा म्हणतात.

बऱ्याच वेळा व्यक्तीला एखाद्या रंगाच्या संवेदना देखील असतात. त्याला तोच रंग दिसत असतो. याचं एक उदाहरण म्हणजे फेसुबकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग होय!

झुकरबर्गच्या रंगांधळेपणामुळे फेसबुकच्या लोगोत त्याने निळ्या रंगाचा वापर केला असे म्हणतात, कारण त्याचा दृष्टीला निळा रंग पडत नाही.

अक्रोमोटॉप्सियाग्रस्त लोकांना कुठल्याच रंगाची संवेदना नसल्याने त्यांना रंगा-रंगात फरक करणे शक्य होत नाही. त्यांना दिसणाऱ्या  कृष्णधवल चित्रात समाधानी व्हावे लागते. पिंगलेप अटॉलच्या बहुसंख्य लोकांना हा विकार असून याची ओळख जगाला पटायला १९९६ उजाडावं लागलं.

या विकाराने त्या लोकांना दिवसाच्या तीव्र उन्हात बघायला त्रास होतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होत असून बहुतांश लोक दिवसा डोळे लुकलुकत बसलेले असतात. त्यांच्यातील रॉड सेल्स फक्त ग्रे स्केल लाईट्सला मॅनेज करतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की या रंगांधळेपणामुळे या बेटावरील लोकांची रात्रीची दृष्टी चांगली आहे. याचाच परिणाम म्हणून हे लोक रात्रीच्या वेळी मासेमारी करतात.

एका बेल्जीयन पत्रकाराने या बेटाला भेट दिल्यावर तिला आढळून आलं की इथल्या लोकांचे नुसते डोळे लुकलुकत नसून त्यांना समोरचं दिसतं फक्त त्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्रकाराने केलेल्या निरीक्षणात तिला आढळून आलं की त्या भागातील बहुतेक लोकांना लाल आणि निळ्या रंगाच्या काही छटा ह्या दृश्यमान आहेत. तर काही छटा नजरेस देखील पडत नाहीत.

तिने एक प्रयोग केला, तिने काही छायाचित्र काढले आणि त्यात काही छायाचित्राना तिने ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट दिला आणि काही फोटोना इन्फ्रारेड इफेक्ट दिला.

या बेटावर तिने केलेल्या अभ्यासामुळे तिने हे विशिष्ट फोटोग्राफ्स तयार केले. या फोटोग्राफ्समधून तिला रंगांधळ्या लोकांच्या दृष्टीचे दर्शन चित्रण करायचे होते.

तिचे हे फोटोग्राफ्स आता ॲमस्टरडॅम येथील एका संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. रंगांसोबतच मानवी विश्व आणि रंगाविना मानवी विश्व कसं आहे हे चितारण्याचा तिचा प्रयत्न आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका डेंग्यूग्रस्त जिल्ह्याला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्ह्यात परावर्तीत करणारी ‘देवसेना’

Next Post

या महिलेने आयएएस होऊनही रुग्णसेवेचा ध्यास सोडला नाही

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
Next Post

या महिलेने आयएएस होऊनही रुग्णसेवेचा ध्यास सोडला नाही

sikkim india featured

सिक्कीम भारतात सामील कसा झाला? भाग ६: सिक्कीम भारतात विलीन झाले

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.