The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतः उभारलेल्या कंपनीतून हकालपट्टी झालेला सॅम अल्टमन पहिलाच नव्हता..!

by Heramb
7 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१७ नोव्हेंबर २०२३ रोजी ओपन एआयचे सीईओ आणि संस्थापक सॅम अल्टमन आणि ग्रेग ब्रोकमन यांना संचालक मंडळाने काढून टाकले. अक्षरश: गुगल मीटच्या व्हिडीओ कॉलवर त्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली. कंपनीमध्ये सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी वरिष्ठांपासून लपवल्या जात असल्याच्या आरोपावर त्यांना काढून टाकण्यात आले.

कंपनीचे संस्थापक आणि सीईओ असून त्यांना काढून टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशाच अनेक घटना घडल्या आहेत. कॉर्पोरेट विश्वात अशा उलथा पालथी होत राहतात. या स्पर्धेत सगळेच एकमेकांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच अवस्था. जगातील काही काही अग्रगण्य लोकांना देखील या वृत्तीचा सामना करावा लागला. अशाच काही अग्रगण्य व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेणारा हा लेख..

स्टीव्ह जॉब्स

या परंपरेची सुरुवात झाली ॲपलपासून. स्टीव्ह जॉब्सने अनेक प्रयत्नांती १९७६ साली कम्प्युटर्स बनवणारी कंपनी सुरु केली खरी पण, पण दशकभराच्या आतच डायरेक्टर्स बोर्डशी मतभेद झाल्याने त्याला काढून टाकण्यात आले.

पण स्टीव्ह जॉब्ससारखा माणूस शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्याने ॲपलला राम राम ठोकून आपली एक नवी कंपनी सुरु करायचे ठरवले. त्या कंपनीचे नाव नेक्स्ट. पुढे १९९७ साली ॲपलने नेक्स्ट विकत घेतली आणि स्टीव्ह जॉब्स पुन्हा ॲपलमध्ये दाखल झाला. यावेळी तो स्वतः ॲपलचा चीफ एक्झेक्युटिव्ह बनला. त्याने जोनाथन इव्ह या डिझाइनरबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि आय-मॅक, आय-पॉड, आय-ट्युन्स, आय-फोन, आय-पॅड अशा प्रोडक्टसची सुरुवात झाली. 



इलॉन मस्क

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नाव येतं सुप्रसिद्ध इलॉन मस्कचं. ओपन एआयच्या प्रकरणातही इलॉन मस्क हे नाव महत्त्वाचं आहे. ओपन एआयची स्थापना करण्यात इलॉन मस्कचा सिंहाचा वाटा असून त्याच्याबरोबर देखील असाच प्रकार घडला होता.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सुरुवातीच्या काळात पे-पाल या ऑनलाईन पेमेंट कंपनीचे अनेक को-फाउंडर्स होते. सुरुवातीला पेपालचे नाव होते एक्स.कॉम. या को-फाउंडर्सपैकी एक होता इलॉन मस्क. त्याची नेमणूक व्हायच्या आधीची ही गोष्ट. त्यावेळी इलॉन विशीत होता. एक्स.कॉमने (एक्स.कॉम नावाची फायनॅन्शियल सर्व्हिस, जी पुढे पेपाल नावाने प्रसिद्ध झाली) कॉन्फिनिटी कंपनी विकत घेतली आणि इलॉनला चीफ एक्झेक्युटिव्ह म्हणून नेमण्यात आले. तो फार काळ टिकला नाही.

सप्टेंबर २००० मध्ये मस्क हनिमूनसाठी ऑस्ट्रेलियाला चालला होता. विमानांमध्ये फोन वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचा फोन बंद होता. तब्बल १० पेक्षा अधिक तास त्याने फोनद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कोणालाही उत्तर दिले नव्हते. याच क्षुल्लक कारणाने कंपनीच्या डायरेक्टर बोर्डने त्याची हकालपट्टी केली. त्याच्या जागी पीटर थिएलची नेमणूक करण्यात आली आणि कंपनीचे नाव बदलून पेपाल असे ठेवण्यात आले.

त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी पेपालला राम राम ठोकून आपापले व्यवसाय सुरु केले. त्यांनाच पेपाल माफिया म्हटले जाते.

डेव्हिड नीलमॅन

अमेरिकेत जेट-ब्लू नावाची एक विमान कंपनी होती. या कंपनीला आणि कंपनीचा संस्थापक डेव्हिड नीलमॅनला मीडियाने प्रचंड डोक्यावर घेतलं होतं. ही कंपनी अतिशय कमी किंमतीत विमान प्रवास उपलब्ध करून देत असे. शिवाय या विमानांमधील स्टाफ अतिशय मैत्रीपूर्ण होता आणि तुम्हाला पाहिजे तितके खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात. यांशिवाय कंपनीच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या असं अगदी क्वचितच होत असे. 

सगळं काही अतिशय उत्तमरीत्या सुरु होतं, पण २००७ साली उत्तर अमेरिकेत भयानक हिमवादळ आलं. यामुळे जेट-ब्लूचे कामकाज विस्कळीत झाले. हिमवादळामुळे कधीही फ्लाईट्स रद्द न करणाऱ्या जेट-ब्लू कंपनीला अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. यामुळे प्रवाशांवर विमानतळांवरच थांबण्याची नामुष्की ओढवली. जे प्रवासी फ्लाईट रद्द होण्याची घोषणा होण्याआधीच विमानात बसले होते त्यांना कंपनीने अनेक तास विमानांतच बसवून ठेवले होते. त्यांना विमान सोडण्याची देखील परवानगी नव्हती.

या प्रकरणामुळे कंपनी आणि डेव्हिड नीलमॅनची प्रचंड नाचक्की झाली. त्यानंतर त्याने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल क्षमा मागितली देखील, पण डायरेक्टर्स बोर्डाने त्याला काढून टाकले. त्यानंतर तो ब्राझीलला गेला आणि अझुल नावाची दुसरी एअरलाइन सुरू केली.

मार्टिन एबरहर्ड

टेसला ही इलेक्ट्रिक कार्स तयार करणारी कंपनी इलॉन मस्कनेच सुरु केली असावी असे अनेकांना वाटत असेल, पण तो या कंपनीचा देखील को-फाउंडर होता. मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी २००३ साली कंपनीची स्थापना केली. त्यांनीच लिथियम-आयन बॅटरीने होणाऱ्या क्रांतीची अचूक भविष्यवाणी केली होती. इलॉन मस्क टेसला कंपनीच्या डायरेक्टर्स बोर्डचा चेअरमन होता.

२००७ साली इलॉन मस्कनेच मार्टिन एबरहार्डला काढून टाकले. यामागचे कारण आजवर कोणालाही माहिती नाही.

एबरहार्डने याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्याने टेसला कंपनी आणि इलॉन मस्कवर त्याची बदनामी आणि निंदा केल्याच्या विरोधात खटला दाखल केला. त्यानंतर कंपनीने मार्टिन एबरहार्डला पुन्हा रुजू करवून घेतले.

नोहा ग्लास आणि जॅक डॉर्से

नोहा ग्लास, जॅक डोर्सी, इव्हान विल्यम्स आणि बिझ स्टोन यांनी एकत्र येऊन सध्या एक्स.कॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरची सुरुवात केली होती. ट्विटर सुरु व्हायच्या आधी नोहा ग्लास एका मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रोजेक्टमध्ये जॅक डॉर्सेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नोहा आणि जॅक हे दोघेही ओडिओ नावाच्या स्टार्ट-अपमध्ये काम करीत होते.

नोहा ग्लास

त्यांनतर जॅक डॉर्सेने इव्हान विल्यम आणि बिझ स्टोन यांच्यासोबत ओडिओचे काही ॲसेट्स खरेदी केले, ज्यांमध्ये ट्विटरचा देखील समावेश होता. यावेळी डॉर्से, विल्यम आणि स्टोन यांनी नोहा ग्लासला कंपनीतून काढून टाकले. त्यानंतर जॅक डॉर्सेच्या काही कृत्यांमुळे नाराज झालेल्या विल्यम्सने २००६ साली डॉर्सेला कंपनीतून काढून टाकण्याचे षडयंत्र रचले, त्यामुळे २००८ साली डॉर्से देखील कंपनीतून बाहेर पडला. 

जॅक डॉर्से

डॉर्से सध्या एक्स.कॉम अर्थात ट्विटरमध्ये शेअरहोल्डर असून त्यांचा प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्म ब्लूस्कायमध्ये देखील गुंतवणूकदार आहे.

जेरी यांग

१९९४ साली डेव्हिड फिलो आणि जेरी यांग या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी “जेरी अँड डेव्हिड्स’ गाईड टू वर्ल्ड वाईड वेब” या वेबसाईटची सुरुवात केली. हे एक सर्च इंजिन होते. काहीच काळात त्यांनी याचे नाव “याहू!” (Yahoo) ठेवले, तर ते दोघे स्वतःला कंपनीचे “चीफ याहूज” म्हणत असत. २००७ साली जेरी यांग कंपनीचा चीफ एक्झेक्युटिव्ह बनला. यावेळी गुगलचे सर्च इंजिनदेखील प्रचंड प्रसिद्ध होते. याहूचा गुगलसमोर टिकाव लागू शकला नाही. 

या कठीण परिस्थितीत मायक्रोसॉफ्टकडून याहू खरेदी करण्याची ऑफर आली, पण जेरीने ती ऑफर स्पष्टपणे नाकारली. तेव्हा कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी त्याच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

२०१७ साली व्हेरिझॉन या कंपनीने याहू विकत घेतली. सध्या जेरी यांग अशा प्रकारच्या स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, तसेच गुंतवणूकही करतात.

या सर्व डायरेक्टर्सनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि बुद्धिचातुर्याच्या बळावर यशस्वी उद्योग सुरु केले. पण काही अनपेक्षित कारणांनी त्यांना कंपनीमधील लोकांनीच काढून टाकल्याचे दिसते. असे असले तरी त्यांनी पुन्हा स्वसामर्थ्यावर काही ना काही उभे केले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर टेस्लाचा सायबरट्र्क लाँच झाला..!

Next Post

या पठ्ठ्याने आपला फ्लॅट विकून मोफत हेल्मेट द्यायची मोहीम हाती घेतलीये..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या पठ्ठ्याने आपला फ्लॅट विकून मोफत हेल्मेट द्यायची मोहीम हाती घेतलीये..!

या घटनेला तीन वर्षे झाली तरी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरू शकली नाही..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.