आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्यापासून अनेक उद्योगपतींनी ह्या क्षेत्रात उडी घेतली आहे. १९९१ सालच्या जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास होण्यास सुरुवात झाली.
आज भारताच्या अर्थव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मोलाची भूमिका बजावते आहे.
आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा होणाऱ्या विकासाबरोबरच भारतातील अनेक शहरांचा आयटी हब म्हणून विकास झाला आहे.
असंख्य तरुणांना आज आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळून त्यांच्या विकासाची संधी मिळाली आहे. भारतात आयटी क्षेत्राचा विकास करण्यात भारत सरकार देखील आग्रही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून आयटी क्षेत्राचा विकास करण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात अनेक भारतीय उद्योगपतींचा मोठा वाटा आहे. अनेक तंत्रज्ञान विषयक प्रकल्प राबवून ह्या कंपन्यांनी देशभरातच नव्हे तर जगभरात नाव कमवलं आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील १० दहा सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपतींची माहिती घेऊन आलो आहोत ज्यांनी भारताला माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बलाढ्य बनवलं आहे.
१) अझीम प्रेमजी
विप्रोचे चेयरमन अझीम प्रेमजी हे देशातील सर्वात मोठे तंत्रज्ञान क्षेत्रातील कोट्याधीश आहेत. त्यांची किंमत १,१७,००० कोटी रुपये इतकी असून त्यांची सरासरी संपत्ती ५,३०० कोटी इतकी आहे.

परंतु त्यांना श्रीमंतीची कुठलीही हाव नसल्याने त्यांनी आपली जवळ जवळ ३० % हून अधिक संपत्ती दान केली आहे. त्यांच्या ह्या संपत्तीचा वापर आज विविध सामजिक संस्थांच्या संचलनासाठी केला जातो आहे.
त्यांनी तब्बल १,४३,९२५ कोटी रुपयांची संपत्ती समाजकार्यासाठी दान केली आहे.
२) शिव नादार
‘एचसीएल’ ह्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीचे संस्थापक असलेले शिव नादार, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती आहेत. त्यांची किंमत ही ४३,५०० कोटी रुपये इतकी आहे.
त्यांना भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मभूषण पुरस्कार २००८ साली त्यांच्या आयटी क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे.

त्यांना देखील आपल्या संपत्तीचा गर्व नसून टे देखील त्या संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रातील समाजोन्नतीसाठी करत आहेत. त्यांनी देखील तब्बल ७,०९१ कोटी रुपयांची संपत्ती समाजकार्यासाठी अर्पण केली आहे.
३) रोशनी नादार
शिव नादार यांची कन्या रोशनी नादार ह्या देखील तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठं नाव असून त्यांनी स्वतची एक नवीन ओळख निर्माण आहे.

त्यांची एकूण मालमत्ता ही ३६,८०० कोटी रुपये इतकी असून सध्या त्या एचसीएलच्या सीइओ म्हणून काम करत आहेत. त्या २०१७ साली फोर्ब्ज मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत ५१ व्या स्थानी आहेत.
४) जय चौधरी
हे भारतातील नामांकित तंत्रज्ञान कंपनी असलेल्या झिस्केलर ह्या कंपनीचे चेयरमन आणि सीईओ आहेत. ही जागतिक स्तरावरील क्लौडबेस्ड माहिती संरक्षण संस्था असून जय चौधरी आज भारतातील चौथे सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान क्षेत्रातले कोट्याधीश आहे.

सायफर ट्रस्ट, एयर डिफेन्स, कोअर हार्बर आणि सिक्युअर आयटी ह्या कंपन्यांची स्थापना देखील त्यांनी केली आहे. ट्यान्कची एकूण मालमत्ता ३६,७०० कोटी इतकी आहे.
५) विजय शेखर शर्मा
हे पेटीएम ह्या भारतातील पहिल्या आणि प्रसिद्ध ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. हे भारतातील पाचवे सर्वात मोठे तंत्रज्ञान क्षेत्रातील कोट्याधीश आहेत.
त्यांच्याकडे एकूण २०,४०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे यश मिळवणारे ते पहिले आंत्रप्रन्योर असून त्यांनी ह्या माध्यमातून मोठ्या यशाची प्राप्ती केली आहे.

त्यांनी आज संपत्तीच्या बाबतीत एयरटेलच्या सुनील मित्तल आणि महिंद्रा ग्रुपच्या आनंद महिंद्राना मागे टाकले आहे.
६) दिव्यांक तुरखिया
Media.net चे संस्थापक असलेले दिव्यांक तुरखिया हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या नावावर १३,००० कोटींची मालमत्ता आहे.

त्यांनी एका चीनी कंपनीला ९० कोटी डॉलर्सला आपली कंपनी विकली होती. ती जगातील तिसरी सर्वात मोठी ऍड टेक डील होती. त्यावेळी त्यांचं वय फक्त ३७ वर्ष इतकं होतं. ते ह्या यादीतील सर्वात तरुण कोट्याधीश आहेत.
७) कविर्तक राम श्रीराम
कविर्तक हे भारतातील सातवे सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती असून त्यांच्या कडे ११,८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी गुगलच्या संस्थापक सदस्यांसोबत काम केलं आहे.

त्यांनी नेटस्केप, जंगली आणि अमेझॉन ह्या कंपन्यात देखील काम केले आहे. २००० साली त्यांनी शेर्पालो नावाची स्वतःची टेक इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली असून त्यांनी त्या माध्यमातून अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यात गुंतवणूक केलेली आहे.
८) रमेश टी वाधवानी
रमेश टी वाधवानी हे आठवे सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती असून त्यांच्या नावावर तब्बल ११,४०० कोटींची मालमत्ता आहे. ते सिंफनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक असून त्या माध्यमातून ते इंटरनेट, सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी सर्व्हिस कंपनीत गुंतवणूक करतात.

तंत्रज्ञान क्षेत्रातील ते खूप मोठे व्यक्तिमत्व असून त्यांनी आजपर्यंत आयबीएस एमएससी सॉफ्टवेअर, डोज डेटा आणि अनॅलिटीक विंडशटल ह्या मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगात गुंतवणूक केली आहे.
९) संजीव बिखचंदानी
इन्फो एज ह्या कंपनीचे ते संस्थापक आणि सहसंचालक आहेत. ह्या कंपनीने नोकरी.कॉम ला जन्म दिला आहे.

संजीव बिखचंदानी हे भारतातले नववे सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान क्षेत्रातील कोट्याधीश असून त्यांच्याकडे १०,७०० कोटींची मालमत्ता आहे. इन्फो एज हि भारतातील सार्वजनिक होणारी पहिली आयटी कंपनी आहे.
१०) थॉमस कुरियन
थॉमस कुरियन हे गुगल क्लाउडचे सीईओ असून, याआधी ते ओरॅकलच्या उत्पादन विकास विभागाचे अध्यक्ष होते. ते दहावे सर्वात श्रीमंत तंत्रज्ञान क्षेत्रातले भारतीय कोट्याधीश असून त्यांच्या नावावर १०,६०० कोटींची मालमत्ता आहे.

ते २०१० साली अमेरिकेतले १८ वे सर्वात जास्त पगार असलेले व्यक्ती होते. ते २०१० साली तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात जास्त पगार असलेले संचालक देखील होते.
तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नावलौकिक मोठे करण्यात सोबतच जगभरात नवीन तंत्रज्ञान कंपन्यांचा विकास करण्यात ह्या उद्योगपतींनी महत्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कर्तृत्वामुळे आज भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान वाढीस लागले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









