The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बड्या कंपन्यांचे क्लोन करून, पुन्हा त्याच कंपन्यांना विकून त्यांनी करोडो डॉलर्स कमावले आहेत

by Heramb
23 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकविसाव्या शतकात वेगाने आर्थिक भरभराट होत आहे. शिक्षण, भांडवल इत्यादी व्यवसाय-पूरक संसाधने मिळणं पूर्वीपेक्षा सध्या सुलभ झालं असून अनेक लोक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. संसाधनांच्या उपलब्धतेमुळे आणि विकसित तंत्रज्ञानामुळे बरेच व्यवसाय, प्रामुख्याने इ-कॉमर्स संबंधित व्यवसाय जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात चालू शकतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात, मग ते जस्टडायल असो किंवा नोकरी आणि छोकरी शोधून देणाऱ्या वेबसाईट्स असो.

पण हे सगळं सहज शक्य होतं ते इंटरनेटमुळे. अगदी सुरुवातीपासून अमेरिकेत इंटरनेट सहजतेने उपलब्ध झाल्याने तिथे असे अनेक व्यवसाय निर्विघ्नपणे चालतात. अमेरिकन माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात “ऑनलाईन” माध्यमाने शिरकाव केलेला दिसतो. या आणि अशाच अनेक कारणांमुळे अमेरिकेत इबे, ॲमेझॉनसारख्या कंपन्या उत्तम कमाई करतात.

पण हेच व्यवसाय जसेच्या तसे इतर देशांमध्ये उपलब्ध असतीलच असं नाही. तेव्हा अमेरिकेत चालणारे ऑनलाईन व्यवसाय जसेच्या तसे, फक्त वेगळे नाव आणि वेबसाईटला वेगळे डिझाईन देऊन तयार करण्यात जास्त नफा मिळू शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला. जर्मनीमधील तीन भावांनी याच तंत्राचा वापर करून करोडो रुपये मिळवले. किंबहुना “स्टार्टअप आयडिया स्टीलिंग”चे हे तंत्र त्यांनीच विकसित केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी नेमकं काय केलं हे या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..

गोष्ट आहे १९९८ सालची. जर्मनीमधील मार्क सॅम्सवर, ऑलिव्हर सॅम्सवर आणि अलेक्झांडर सॅम्सवर या तीन भावांनी अमेरिकेतील इबे नावाच्या कंपनीचा झपाट्याने उदय होताना पहिले होते. १९९३ साली इबे कंपनीची स्थापना झाली होती. इबे कंपनीची वेबसाईट आपल्या इ-कॉमर्स सेवांसाठी अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय ठरली होती. जर इबे कंपनीने पुरवलेल्या इ-कॉमर्स सेवा अमेरिकेत जोमाने चालू शकतात तर तशाच सेवा जर्मनीमध्ये सुरु केल्या तर का चालणार नाहीत काय? निश्चितच चालू शकतात, हा विचार या तिन्ही भावांच्या डोक्यात आला.



ही नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी इबेपर्यंत पोहोचवली. तुमची कंपनी जर्मनीमध्ये सुरु करून ती कंपनी तिथे चालवण्याचे काम आम्हांवर सोपवा असा प्रस्ताव त्यांनी इबेसमोर मांडला. त्यांनी आपले मत इबेच्या एक्झेक्युटिव्ह्ससमोर ठेवण्याचा शक्य तितका चांगला प्रयत्न केला खरा, पण त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. या तीन भावांनी मात्र आपल्या या कल्पनेवर पाणी न सोडता आपापल्या परीने ती सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. 

पुढच्याच वर्षी म्हणजेच १९९९ साली त्यांनी अलांडो नावाची वेबसाईट लाँच केली. अलांडो इबेचंच क्लोन होतं, म्हणजेच ज्या सेवा इबे ज्या प्रकारे पुरवत असत, तशाच सेवा अलांडो देखील पुरवत असत. फरक फक्त वेबसाईट डिझाईन आणि ब्रँडमध्ये होता. आश्चर्याची बाब म्हणजे लाँचनंतर केवळ १०० दिवसांत ही वेबसाईट एवढी प्रचंड लोकप्रिय झाली की इबेलाच त्यांना विकत घ्यावे लागले, जेणेकरून इबेला कोणत्याही मोठ्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागू नये. अलांडो ब्रँड इबेने तब्बल ४ करोड ३ लाख डॉलर्सना विकत घेतला होता.  

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

सॅम्सवर बंधूंनी या निधीचा उपयोग केला रॉकेट इंटरनेट नावाची कंपनी सुरु करण्यासाठी. २००७ साली रॉकेट इंटरनेट कंपनी बाजारात आली. या कंपनीचे काम तेच होते जे १९९८-९९ साली सॅम्सवर बंधूनी केले. अमेरिकेतील आघाडीच्या इंटरनेट ब्रॅण्ड्सचा क्लोन विविध देशांमध्ये तयार करण्यास रॉकेट इंटरनेट आर्थिक मदतीपासून सर्व प्रकारची मदत पुरवते. जेव्हा या नव्या कंपन्यांचे रूपांतर एका ब्रँडमध्ये होते तेव्हा मात्र अमेरिकेतील बड्या कंपन्या येऊन आपल्या पोटेन्शियल कॉम्पिटिटरला खरेदी करतात. 

रॉकेट इंटरनेटची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी अनेक ब्रॅण्ड्सचा क्लोन यशस्वीरीत्या तयार केला. यामध्ये उबेरचा क्लोन इजी टॅक्सी, ॲमेझॉनचा क्लोन जुमीया, एअरबीएनबीचा क्लोन विमडू अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या क्लोन कंपन्यांसाठी मूळ कंपनी लाखो-करोडो डॉलर्स खर्च करायलाही तयार असते.

आज त्याच एका कल्पनेच्या आणि “आउट ऑफ द बॉक्स” विचाराच्या जोरावर या तिन्ही भावांची संपत्ती प्रत्येकी १२० करोड एवढी प्रचंड आहे. एका कल्पनेवर सातत्याने काम करून या भावांनी व्यवसायाचे एक नवीन विश्वच खुले केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तोट्यात गेलेल्या स्वदेशी कंपनीसाठी वर्गणी जमा करून गांधींना पैसे दिले, पण तसे झालेच नाही..!

Next Post

आपल्या सर्वांचं आवडतं टेलिग्राम लाँच झालं त्यामागे पुतिनला झालेला विरोध होता..

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

आपल्या सर्वांचं आवडतं टेलिग्राम लाँच झालं त्यामागे पुतिनला झालेला विरोध होता..

दोन दशके रखडलेली स्कायबस अखेर ट्रॅकवर येतीये..!

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.