The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यांनी फणसापासून एक दोन नाही तर तब्बल ४०० उत्पादने तयार केली आहेत..!

by Heramb
18 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


फिटनेसच्या वाढत चाललेल्या जागरूकतेमुळे आज अनेक लोक ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याकडे आकर्षित होत आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती करून रसायनविरहित फळे आणि भाज्या तर मिळतातच या शिवाय मातीचे आणि पर्यायाने जमिनीचे होणारे नुकसानही टाळता येते.

आज मोठ्या क्वांटिटीमध्ये उत्पन्न घेण्याच्या नादात क्वालिटी कुठेतरी हरवून बसलीये, किंबहुना, पुढच्या पिढीला ती “क्वालिटी” काय होती याची कल्पनाही नसेल. असं असलं तरी भारताच्या अनेक भागात आजही अन्न पदार्थांची ती “क्वालिटी” जपण्यात लोकांना यश आले आहे, अशाच एका क्वांटिटीबरोबरच क्वालिटी जपणाऱ्या शेतकरी महिलेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

फणस. भारताच्या जवळ जवळ सगळ्याच भागांमध्ये आढळणारे, आतून रसाळ, गोड पण बाहेरून काटेरी फळ. भारतात फणसाचे वार्षिक उत्पादन सुमारे १९० हजार टन आहे. पाश्चिमात्त्य देशांतून फणसाला मोठ्या प्रमाणात मागणी असून तिथे फणसाबद्दल एक विचित्र मतप्रवाह बनला आहे. पाश्चिमात्त्य देशातील अनेकांच्या मते, शाकाहारी जेवणामध्ये फणस मटणाचा, बीफचा किंवा पोर्कचा फील आणते. त्यांच्यामते कच्च्या फणसाचे टेक्सचर हे मटण किंवा तत्सम पदार्थांप्रमाणे असते. म्हणूनच अनेक ठिकाणी फणस मटण, बीफ आणि पोर्कला पर्याय म्हणून वापरले जाते. बर्गर पॅटी आणि करीमध्ये त्याचा उपयोग होतो.



असो. हे झालं पाश्चिमात्त्य देशांचं. पण आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये फणसांपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात हे काहीच जणांना माहिती असेल. तुम्ही कोकणी असाल तर तुम्ही नक्कीच फणसपोळी खाल्ली असेल. फणसाच्या बाहेरच्या काट्यांपासून ते बियांपर्यंत त्याच्या प्रत्येक भागापासून एक अन्नपदार्थ तयार केला जाऊ शकतो. हे सिद्ध करून दाखवलंय केरळ राज्यातील थिरुवनंतपुरम येथील शेतकरी तसेच कृषी उद्योजक राजश्री आर यांनी.

राजश्री आर. यांची फ्रुट एन रूट नावाची कम्पनी आहे. त्याद्वारे त्या फणसापासून बनवलेले तब्बल ४०० प्रॉडक्ट्स विकतात. पण हे सगळं कसं शक्य झालं याची याची कथाही रोमांचक आहे. राजश्री यांच्या लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. कालांतराने आपल्या पतीसोबत राहण्यासाठी त्यांनी कतार गाठले. त्या दरवर्षी सुट्टीत आपल्या घरी, केरळला येत असत. सुट्टीच्या वेळी त्यांच्या आई त्यांना फणसापासून तयार केलेले पदार्थ पॅक करून देत असत, ते पदार्थ वर्षभर टिकत. 

पण या संबंधित काही व्यवसाय सुरु करण्याची कल्पना त्यांना सुमारे आठ वर्षांपूर्वी भारतात परतल्यावरच आली. केरळमधील अलापुझ्झा जिल्ह्यातील नूरनाड या गावी त्यांचे कुटुंब आणि काही नातेवाईक आपापल्या शेतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फणसाचे उत्पन्न घेतात याची कल्पना त्यांना होतीच. फणसाची एवढी आवक असल्याने बहुतांश फणस वायाही जायचे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

फणसापासून नेहमीच तयार केल्या जाणाऱ्या पायसम, चक्कवरट्टी या पदार्थांशिवाय राजश्री यांना काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे होते. घरी फळांची शेती असल्याने फळांच्या क्षेत्रातच काहीतरी आगळेवेगळे आणि मोठ्या प्रमाणात करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी या स्वप्नपूर्तीकडे पाऊल टाकायचे ठरवले. पण काहीतरी नाविन्यपूर्ण केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही याची पूर्ण कल्पना त्यांना होती.

सर्वप्रथम त्यांनी फणसापासून उत्पादने तयार करण्याचा परवाना मिळवला आणि काम सुरु केले. त्यांना एक कल्पना सुचली, फणसाच्या पिठापासून तयार केलेला पास्ता. साधारणतः पास्ता हा प्रकार मैद्यापासून बनवला जातो. मैद्यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि त्यामुळे वजनही. याच कारणाने अनेक जण पास्तासारखे फास्ट फूड खाणे टाळतात. पण फणसाच्या पिठापासून तयार केलेला पास्ता चरबीचे प्रमाण वाढवत नाही, याशिवाय तो खव्वय्यांनाही आवडेल असा विश्वास राजश्री यांना आहे.

फणसापासून तयार केलेला पास्ता

त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी हेच अजून चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून केरळमधीलच कायमकुलममधील कृषी विज्ञान केंद्रात एक कोर्स केला. त्यात त्यांनी फणसाचे डिहायड्रेशन अर्थात निर्जलीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण घेतले. या कोर्समध्ये त्यांना फणसाचे डिहायड्रेशन करून त्याची पावडर कशी तयार करावी याचे धडे दिले गेले, जे त्यांच्या ‘पास्ता’ प्रोडक्टसाठी महत्त्वाचे होते.

याच संस्थेत त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. फणसापासून तेच तेच पदार्थ तयार न करता नाविन्याची कास धरून त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यामध्ये सूप, चपाती, बोन्डा, चॉकलेट, बर्गर पॅटी आणि लाडू असे अनेक पदार्थ त्यांनी तयार केले. या स्पर्धेत अर्थातच त्या विजयी झाल्या. अशाच अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला.

विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या कल्पनेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहूनच त्यांनी आपल्या मूळ कल्पनेवर, म्हणजेच फणसाच्या पिठापासून तयार होणाऱ्या पास्तावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. त्यांनी बल्क क्वांटिटीमध्ये पास्ता तयार करणाऱ्या मशिन्सचा शोध घेण्याचे ठरवले पण ते कुठे सापडेनाच.

शोध घेत असतानाच त्यांच्या कानावर ‘सेंट्रल ट्युबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट’चे नाव पडले. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील श्रीकार्यम येथे हे इन्स्टिट्यूट टॅपिओकापासून पास्ता तयार करण्यावर संशोधन करीत असतानाच यासाठी एक मशीन देखील तयार केले होते. टॅपिओका म्हणजे कसावा या झाडाच्या मुळातून काढलेला स्टार्च. कसावा झाडाचा उपयोग साबुदाणा तयार करण्यासाठी केला जातो. राजश्री यांनी त्वरित त्यांच्याशी संपर्क साधून मशीन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या कंपनीत पास्ता बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा करारही केला. सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारे त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली.  या युनिटमध्ये आजही फणसाचे पीठ आणि प्रिझर्वचे उत्पादन घेतले जाते. प्रिझर्व म्हणजे थोडक्यात लोणचे.

फणसाव्यतिरिक्त, राजश्री तांदूळ आणि इथक्का (केरळमधील केळी) यांचेही उत्पादन घेतात. फणसाच्या ४०० उत्पादनांमध्ये कोहल, पायसम, पोडी, चूर्ण, केक्स, चॉकलेट्स आणि अशीच बरीच उत्पादने आहेत. ४०० उत्पादनांपैकी एकाही उत्पादनात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रिझर्वेटिव्हचा उपयोग केला जात नाही. राजश्री यांनी आपली काही उत्पादने ऑनलाईन विकण्यासही सुरूवात केली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ती पाहता येतील. 

ही उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया किचकट, फार मोठी आणि वेळखाऊ असल्याने सरकारी अनुदान मिळत असूनही कंपनीला अपेक्षित नफा मिळत नाही. फणसाचा सीजन जुलै-ऑगस्टमध्ये असतो, त्यानंतर केरळच्या त्या भागात भात कापणीला सुरुवात होते. भात कापणी झाल्यानंतर काही दिवसांतच टॅपिओकांचे उत्पादन घेतले जाते. राजश्री यांच्या फ्रुट एन रूटमध्ये टॅपिओकापासून मुरुक्कू आणि पक्कवडा यांसारखे स्नॅक्स तयार केले जातात.

केरळ राज्य शासनाने राजश्री आर. आणि फ्रुट एन रूट या त्यांच्या कंपनीला फणसावर केल्या जाणाऱ्या प्रोसेसिंगसाठी पुरस्काराने सन्मानित केले आहे. यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, पण त्यांच्याकडे फक्त उत्पादनांची चौकशी करण्यासाठीच फोन आले. विक्री अगदी नगण्य स्वरूपात झाली.

या दर्जेदार उत्पादनांची निर्यात करणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. राज्य सरकारद्वारे आयोजित केलेल्या प्रदर्शनांना आणि मेळ्यांना ते नियमितपणे उपस्थित राहतात. ही उत्पादने लवकरच जागतिक स्तरावर जातील अशी आशा घेऊन आजही त्या अविरतपणे काम करताहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.  

ShareTweet
Previous Post

हे मेटाव्हर्स, मल्टिव्हर्स नक्की आहे काय?

Next Post

तोट्यात गेलेल्या स्वदेशी कंपनीसाठी वर्गणी जमा करून गांधींना पैसे दिले, पण तसे झालेच नाही..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

तोट्यात गेलेल्या स्वदेशी कंपनीसाठी वर्गणी जमा करून गांधींना पैसे दिले, पण तसे झालेच नाही..!

बड्या कंपन्यांचे क्लोन करून, पुन्हा त्याच कंपन्यांना विकून त्यांनी करोडो डॉलर्स कमावले आहेत

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.