The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयम सेमानी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी..!

by Heramb
7 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पृथ्वीवर करोडोंच्या संख्येने जैवविविधता आढळून येते. आजमितीस आपण कित्येक प्राण्यांच्या प्रजाती लोप पावल्याचं ऐकतो. काही प्रजातींना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्नसुद्धा माणूस करत आहे.  पण जगात अनेक ठिकाणी असेही काही प्राणी पक्षी आढळून येतात जे त्या त्या ठिकाणीच उत्पन्न झाले आणि त्या ठिकाणीच त्यांची वाढ झाली. उदाहरणार्थ कांगारू ऑस्ट्रेलियामध्येच तयार झाले आणि आज तिथेच मोठ्या प्रमाणात आढळून येतात. असाच एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे आयम सेमानी नावाची कोंबडी. ‘आयम सेमानी’ हा संस्कृतमधून आलेला शब्द असून “काळाकुट्ट” असा त्याचा अर्थ होतो.

प्रामुख्याने इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या या कोंबड्या संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात. आता तुम्ही म्हणाल, त्यात वैशिष्ट्यपूर्ण असं काय?, भारतातील कडकनाथ कोंबड्यादेखील संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात. पण अनेक कडकनाथ कोंबड्यांवर पांढरे, सोनेरी रंगाचे चट्टे किंवा पांढरे पंख असल्याचे आढळून आले आहे. आयम सेमानी कोंबड्या मात्र आतून-बाहेरून संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात. याच आयम सेमानीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आयम सेमानी ही कोंबड्यांची प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून एका कोंबडीची किंमत सुमारे ६ हजार डॉलर्स म्हणजेच ५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. तर याच कोंबडीच्या एका अंड्याची किंमत सुमारे १६ डॉलर्स म्हण्जेच १५०० रूपये सांगितली जाते. या कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांची एवढी मोठी किंमत असण्याचे एक कारण म्हणजे त्या कोंबड्या दुर्मिळ असून सहजासहजी मिळत नाहीत, शिवाय त्यांचं पालन करणं हे एक अवघड आणि पूर्ण वेळ देऊन होणारं काम आहे.

इंडोनेशियातील जावा बेटावरील लोक या कोंबड्यांच्या देखभालीसाठी २ हजार डॉलर्स म्हणजेच १ लाख रुपये ते १.३ कोटी रुपये खर्च करतात. या कोंबड्यांमुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि संपत्ती आली असे त्यांचे मत आहे.



आयम सेमानी कोंबड्यांचे पंख, चोच, शरीरातील अवयव हे सगळं काळ्या रंगाचंच असतं. या कोंबड्यांचा काळा रंग त्यांना त्यांच्या जेनेटिक्समुळे प्राप्त झाला आहे. हा रंग त्यांना एका प्रबळ जनुकामुळे (जीन). हा जीन त्यांच्या उतींमध्ये (सेल्समध्ये) जास्त प्रमाणात पिगमेंटेशन (मेलॅनिन) तयार करतो आणि म्हणूनच त्या कोंबड्यांचा रंग काळा बनतो. अनेकदा रोगांमुळे त्यांचा काळा रंग फिका पडायला सुरुवात होते. तर संपूर्ण काळ्या रंगाची आयम सेमानी कोंबडी ९ ते १० हजार डॉलर्स म्हणजेच ८ ते ९ लाख रुपयांना विकली जाते.

बर्‍याच देशांमधील विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे, त्या देशांचे नागरिक या कोंबड्या सहजतेने खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारच्या कोंबड्या विदेशात न्यायच्या असतील तर त्याचा खर्च सुमारे ३५ हजार ते ९० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख ते ७० लाखांदरम्यान दरम्यान येतो. 

अनेक लोक या कोंबड्या खरेदी कशासाठी करत असतील असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उद्भवला असेल. तर जगातील अनेक लोक वेगवेगळ्या प्रजातींचे दुर्मिळ प्राणी-पक्षी संग्रहित करण्यासाठी म्हणून अशी खरेदी करतात. इंडोनेशियामध्ये आयम सेमानी कोंबड्या खरेदी करण्यासाठी चीन, तैवान, नेदरलँड आणि पाकिस्तानमधूनही अनेक लोक येत असतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आयम सेमानी कोंबड्यांच्या गडद काळ्या रंगामुळे त्यांना मानवी जगातून सुपरनॅचरल जगात प्रवेश करता येतो असाही अनेक लोकांचा विश्वास आहे. तसेच आयम सेमानी कोंबडीने दिलेलं पहिलं अंडं मूल होण्यास मदतगार ठरतं असाही एक समज असा आहे. विशेषतः इंडोनेशियामधील स्थानिक लोक यावर प्रचंड विश्वास ठेवतात. त्यासाठी पहिलं अंडं फोडून त्याची बारीक पावडर होईपर्यंत भाजून घेतात आणि दाम्पत्य एकत्र बसून मधाबरोबर त्या अंड्याची पावडर घेतात. अयाम सेमानी कोंबडीने दिलेलं पहिलं अंडं अत्यंत दुर्मिळ असून त्याला टेंबीन म्हणून ओळखले जाते.

अशा या कोंबड्यांचे पालन आणि व्यापार अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्येही होत आहे. पण या कोंबड्यांची अंडी एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाणेही तितकेच अवघड आहे. कारण एअरपोर्टवर सेफ्टी डिव्हायसेसमधील रेडिएशन्समुळे त्या अंड्यातील जीव नष्ट होतात. त्यामुळे ती अंडी देशात आणण्यासाठी तुम्हाला सरकार किंवा संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

त्या दाम्पत्याने स्वबळावर जगातील सर्वांत मोठा हॉटेलिंग ब्रँड सुरु केला..!

Next Post

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.