The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा एकमेव खेळाडू आहे जो भारत आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळलाय!

by द पोस्टमन टीम
22 March 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी क्रिकेटला धर्माचा मान दिला जातो. जितके क्रिकेटवेडे लोक आपल्या देशात आहेत तितके जगाच्या पाठीवरील कुठल्याच देशात सापडणार नाहीत, अगदी क्रिकेटचा जन्मदाता असलेल्या इंग्लंडमध्ये देखील नाही. आपल्यावर राज्य करण्यासाठी आलेल्या ब्रिटिशांनी आपल्याला क्रिकेटची देणगी दिली. ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडलं. क्रिकेटला मात्र, आपण आपण जपून ठेवलं.

अगदी स्वातंत्र्यापूर्वीदेखील भारतामध्ये विविध क्रिकेट टीम तयार झाल्या होत्या. अनेक दिग्गजांनी क्रिकेटमध्ये नाव कमावलं होतं. अशाच क्रिकेटपटूंमध्ये एक नाव असं आहे, ज्या खेळाडूनं फक्त भारतासाठीच नाही तर इंग्लंडसाठीदेखील आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन-दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी व्यक्ती होती तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांच्या क्रिकेट कारनाम्यांबद्दल बरेच लिखाण झालेलं आहे. तुमच्यापैकी काहींनी कदाचित त्यांना खेळतानाही पाहिलं असेल. परंतु, त्यांचे वडील मोहम्मद इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. अतिशय मोजक्या लोकांना माहिती आहे की, टायगरचे वडील इफ्तिखार हेदेखील प्रतिभावान क्रिकेटर होते. त्यांनी १९३० आणि ४० च्या दशकात इंग्लंडमध्ये सर्व स्तरांवर मोठ्या उत्कटतेनं क्रिकेट खेळलं.

त्यानंतर ते भारतीय क्रिकेट संघात दाखल झाले होते. पतौडीचे आठवे नवाब असलेल्या इफ्तिखार यांच्याबद्दल आजच्या पिढीला फारसं काही माहिती नाही. बहुतेकजण तर त्यांना ओळखतही नाहीत.



सीनियर पतौडी हे एकमेव भारतीय क्रिकेटपटू होते ज्यांनी आपल्या छोट्याशा कसोटी क्रिकेट कारकीर्दीमध्ये इंग्लंड आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं. 

इफ्तिखार यांच्या काळात आणि त्यापूर्वी, क्रिकेट हा प्रामुख्यानं इंग्लंड आणि ब्रिटिश इंडियातील राजघराण्यांचा खेळ होता. इंग्लंड आणि भारतातील राजे, राजपुत्र आणि इतर उच्चभ्रू लोक आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी क्रिकेट खेळायचे. इफ्तिखार यांचा समावेश अशाच राजपुत्रांमध्ये होत होता.

इफ्तिखार अली पतौडी यांच्यापूर्वी नवानगरचे जाम साहेब, के एस रणजितसिंह आणि त्यांचे पुतणे के एस दुलीपसिंह यांनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळला होता. रणजितसिंह यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं होतं. शिवाय १८८० आणि १८९० च्या दशकात प्रथम श्रेणी काऊंटी क्रिकेटमध्येही ते खेळले होते. रणजितसिंहजी कधीही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले नाही.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

वेगवेगळ्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांचं प्रतिनिधित्व करणारे इफ्तिखार हे पहिलेच राजकुमार होते. 

१६ मे १९१० रोजी ब्रिटिश इंडियातील पंजाब प्रांतातील पतौडी येथे इफ्तिखारचा यांचा जन्म झाला होता. त्यांना आयएके पतौडी म्हणूनही ओळखलं जातं. इफ्तिखार हे पतौडीचे आठवे नवाब होते. सध्या पतौडी हरियाणामध्ये आहे. मुहम्मद इब्राहिम अली खान पतौडी आणि शहर बानो बेगम हे इफ्तिखार यांचे आई-वडील होते. ते महान उर्दू कवी मिर्झा गालिब आणि पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे नातेवाईक होते.

भारतातील शालेय शिक्षणादरम्यान, इफ्तिखार यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील क्रिकेटपटू एमजी स्लेटरकडून यांच्याकडून क्रिकेटमधील मूलभूत गोष्टी शिकल्या. १९२६-२७ मध्ये, तरुण इफ्तिखार पुढील शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील बलिओल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

बलिओल कॉलेजमध्ये शिकत असताना, त्यांनी विद्यापीठासाठी हॉकी आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये विजेतेपदं जिंकली. १९३२ मध्ये, इफ्तिखार वूस्टरशायर संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरले. त्यावेळी त्यांनी तीन सामने खेळले आणि सर्व सहा डावांत केवळ ६५ धावा केल्या. पण जुलै १९३२ मध्ये, त्यांनी लॉर्ड्सवर १६५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्यांचं फूटवर्क शानदार होतं.

त्यानंतर, १९३२-३३ ॲशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या कसोटी संघात या भारतीय नवाबाला स्थान मिळालं. त्यांनी सिडनी येथे पदार्पणातच, शतक (१०२) ठोकून इंग्लंडला १० विकेट्सने कसोटी जिंकण्यास मदत केली. त्याच वर्षी इफ्तिखारला ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून गौरवण्यात आलं.

१९३३ हे वर्ष इफ्तिखार यांच्यासाठी सर्वात चांगलं ठरलं. त्यावर्षी त्यांनी काउंटी क्रिकेटचा पूर्ण हंगाम खेळून काढला होता. नेत्रदीपक फलंदाजी करून, इफ्तिखार यांनी वॉर्सेस्टर येथे टिच फ्रीमनला अक्षरश: लुटलं होतं. याकाळात त्यांनी दोन द्विशतकंही केली होती.

मात्र, त्याच वर्षी इफ्तिखारची तब्येतही बिघडली. त्यानंतर ते फक्त १० मॅचेस खेळू शकले. जून १९३४ मध्ये, इफ्तिखार यांनी ट्रेंट ब्रिज येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी तिसरी आणि शेवटची कसोटी खेळली. तब्येत खराब असल्यानं इंग्लंडसाठी शेवटच्या सामन्यात त्यांनी फक्त १२ आणि १० धावा केल्या.

विशेष म्हणजे, इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळत असतानाही, १९३२ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी या नवाबचा विचार केला जात होता. मात्र, तेव्हा त्यांनी आपलं नाव वगळण्यास सांगितलं होतं.

नंतर १९३६ मध्ये, इफ्तिखारला इंग्लंड दौऱ्यावर जाणार्‍या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. दुर्दैवानं, प्रकृतीच्या कारणास्तव इफ्तिखार यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. 

१९३९ मध्ये, इफ्तिखारचा विवाह बेगम साजिदा सुलतानशी झाला. साजिदा ही भोपाळचा शेवटचा नवाब हमीदुल्ला खानची दुसरी मुलगी होती. १९४६ मध्ये, इफ्तिखार खरोखर भारताकडून खेळले. त्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं. या दौरा त्यांच्यासाठी अतिशय वाईट ठरला. पाच कसोटी डावात त्यांनी ४६.७१ च्या सरासरीनं फक्त ५५ धावा केल्या होत्या. मात्र, दोन्ही देशांसाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचा मान त्यांना मिळाला होता.

१९५२ मध्ये इफ्तिखार यांनी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी परत इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांना मृत्यू झाला. ५ जानेवारी १९५२ रोजी दिल्लीत कडाक्याची थंडी पडली होती. थंडीपासून बहुतेक दिल्लीकर घरांमध्येच होते. पण, इफ्तिखार अली खान पतौडी मात्र, सकाळीच आपल्या ११ वर्षाच्या मुलासह म्हणजेच मन्सूर अली खानसोबत दिल्ली पोलो ग्राऊंडवर पोलो खेळायला गेले होते.

त्या दिवशी मन्सूर अली खान पतौडी यांचा ११वा वाढदिवस होता. घरात त्यांच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. तिकडे इफ्तिखार अली खान पोलो खेळत होते तर लहानगा मन्सूर त्यांना पोलो खेळताना बघत होता. खेळताना इफ्तिखार घोड्यावरून खाली पडले. अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात अपयश आलं.

इफ्तिखार अली खान यांनी आपल्या अल्पकालीन कसोटी कारकिर्दीत जे काही केलं, त्यापेक्षाही त्यांचा मुलगा मन्सूर खूप पुढे गेला. मन्सूर म्हणजे टायगर पतौडी यांनी वयाच्या २१व्या वर्षी देशाचं नेतृत्व करत भारतातील सर्वात तरुण कर्णधार बनले. फलंदाजी करताना एक डोळा गमावल्यानंतरही त्यांनी क्रिकेट सोडलं नाही. इफ्तिकार आणि मन्सूर अली खान पतौडी यांचं क्रिकेटमधील योगदान नक्कीच मोठं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या चोऱ्यांच्या पुढे मनी हाईस्ट पण फिकं पडेल!

Next Post

या सौंदर्यवतीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर कित्येक ज्यूंना यमसदनी पोहोचवलं होतं!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

या सौंदर्यवतीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर कित्येक ज्यूंना यमसदनी पोहोचवलं होतं!

या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तब्बल ४ ऑस्कर जिंकले आहेत!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.