The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲन फ्रँकला दगा कोणी दिला याचा एवढ्या वर्षांनी का होईना पण उलगडा झालाच!

by द पोस्टमन टीम
21 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


दुसरं महायु*ध्द म्हणलं की आठवतो हुकुमशहा हि*टल*र आणि त्याचे अननन्वित अ*त्याचार, ज्यूंच्या निर्दयीपणे केलेल्या क*त्तली. आणि हजारो लाखो ज्युंचे दुर्दैवी मृत्यू म्हटलं की आठवते पंधरा सोळा वर्षांची ॲन फ़्रॅन्क आणि तिची अजरामर झालेली डायरी.

आज अनेक वर्षांनी ही डायरी आणि ॲन फ़्रॅन्क पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. तब्बल सात दशकांहून अधिक काळ सरल्यानंतर ॲन फ़्रॅन्कच्या दुर्दैवी अंताला कारणीभूत असणार्‍या माणसाचा शोध लागला आहे. लपून बसलेल्या ॲनचा विश्वासघात नेमका कोणी केला? याच्या आजवर अटकळी बांधल्या जात होत्या मात्र आता या चर्चांना विराम मिळण्याची चिन्हं आहेत, कारण अखेरीस ही व्यक्ती नेमकी कोण याचा शोध लावण्यास तपासयंत्रणेला यश लाभलं आहे.

या नवीन घडामोडीबाबत विस्तृतपणे जाणून घेण्याआधी ॲन फ़्रॅन्कबद्दल जाणून घेऊया.

ॲन फ़्रॅन्कचा जन्म १९२९ साली जर्मनीतल्या फ़्रॅन्कफ़र्ट ॲममेनमध्ये झाला. ॲनला तिच्याहून तीन वर्षांनी मोठी एक बहिणही होती. जर्मनीत त्या काळात प्रचंड बेरोजगार आणि गरिबी होती. एकीकडे हि*टल*र आणि त्याचा पक्ष मोठे होत होते आणि त्याचा ज्युंबाबतचा द्वेषही वाढत होता. देशातील सर्व समस्यांसाठी ज्यू कारणीभूत आहेत असं त्याचं अजब तर्कट होतं. हा द्वेष नुसताच द्वेष न रहाता त्यानं ज्युंचा छळ करण्यास सुरवात केली.



जर्मनीतले ज्यु या प्रकारानं हादरून गेले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे आणि उदरनिर्वाहासाठी म्हणून ॲनच्या कुटुंबानं ॲमस्टरडॅमला स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला. ओटो आणि एडिथ फ़्रॅन्क यांनी ॲमस्टरडॅमला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओट्टोने तिथे जम बनविण्यासाठी जो जेलिंग घटक लागतो त्या पेक्टिनचा व्यापार करणारी एक कंपनी स्थापन केली.

नेदरलॅण्डसमध्ये ॲनला पहिल्यांदाच घरात राहिल्यासारखे वाटू लागले. सतत अनिश्चित आणि अस्वस्थ वातावरणात राहिल्यानंतर इथलं मुक्त वातावरण तिला आवडू लागलं. तिनं तिथली भाषा पटकन आत्मसात केली आणि नवीन मित्रमैत्रीणी बनविल्या. घराजवळच असणार्‍या डच शाळेत ती जाऊ लागली. सगळं सुरळीत होईल हा फ़्रॅन्क कुटुंबाचा आशावाद लवकरच मावळू लागला कारण ॲनच्या वडिलांचा धंद्यात म्हणावा तसा जम बसत नव्हता. तिच्या वडिलांनी इंग्लंडमध्येही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ऒट्टोनं पेक्टिनच्या सोबतीनं मसाले आणि औषधी वनस्पती विकायला सुरवात केली.

ॲन आता १० वर्षांची होती आणि १ सप्टेंबर १९३९ रोजी ना*झी जर्मनीनं पोलंडवर आक्र*मण केल्यामुळे दुसर्‍या महायु*ध्दाला तोंड फ़ुटलं. यानंतर १० मे १९४० रोजी ना*झींनी नेदरलॅण्डसवर आक्र*मण केलं. पाच दिवस कडवा विरोध केल्यानंतर अखेर डच सैन्यानं माघार घेतली आणि आत्मसमर्पण केलं. ना*झींनी आता ज्युंसाठीचे जगण्याचे नियम बदलले. हे नियम हळूहळू बदलले असले तरिही ते कडक आणि जाचक होते. सर्व ज्युंना हे नियम पाळणं अनिवार्य होतं. उदाहरणार्थ, इथून पुढे ज्युंसाठी सार्वजनिक उद्यानं बंद करण्यात आली. तसेच सिनेमागृहं आणि गैर ज्यु दुकानांतही ज्युंना जाता येणार नव्हतं. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

या सगळ्यात फ़्रॅन्क कुटुंबियांवर संकटाची कुर्‍हाड कोसळली कारण एक नियम असाही होता की, इथून पुढे कोणाही ज्युला स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. तसेच सर्व ज्यु मुलांना केवळ ज्युंसाठी असणार्‍या शाळेतच शिकणं बंधनकारक होतं. मागोमाग अशीही अफ़वा उठली की आता सर्व ज्युंना नेदरलॅण्डस सोडून जावं लागणार होतं. अशातच ॲनची बहिण मार्गोटला एक फ़ोन आला आणि तिला ५ जुलै १९४२ या दिवशी जर्मन श्रम शिबीरात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. आता फ़्रॅन्क कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी शिबीरात न जाता लपण्याचा निर्णय घेतला. १९४२ च्या वसंत ऋतूत ॲनच्या वडिलांनी प्रिन्सेनग्राक्ट येथे लपण्यास योग्य अशी जागा सुसज्ज करण्यास सुरवात केली. त्यांना इतरही काही जणांची मदत मिळाली आणि ही जागा अरुंद झाली.

ॲनच्या तेराव्या वाढदिवसादिवशी म्हणजेच भूमिगत होण्यापूर्वी एक डायरी भेट देण्यात आली होती. लपून राहण्याच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात ॲनानं त्या सिक्रेट ॲनेक्समधील वास्तव्य आणि आजूबाजूला घडणार्‍या घटनांबाबत नोंदी नोंदविल्या. याशिवाय तिनं तिच्या मनातल्या भावना आणि चक्क लघुकथा, कादंबरी लिहायला सुरवात केली. या लिखाण कामामुळे तिचा भूमिगत असतानाचा वेळ चांगला जात होता.

४ ऑगस्ट १९४४ रोजी ॲनला आणि तिच्यासोबत दोन वर्षं लपलेल्या सात जणांना पोलिसांनी शोधून काढलं. आजवर ॲन लपलेली जागा कोणी फ़ोडली याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते.

तब्बल दोन वर्षं ज्या जागेचा पत्ता ना*झींना लागला नव्हता तो अचानक कसा लागला? 

या रहस्याची आता सात दशकांनंतर उकल झाली आहे. एका ज्यु नोटरीला मुख्य संशयित म्हणून बघितले जाऊ लागले. निवृत्त एफ़बीआय एजंट व्हिन्सेंट पॅनकोक आणि सुमारे २० इतिहासकार, संशोधक, गुन्हेगारी शास्त्रज्ञ, तपास कार्या दरम्यान संकलीत केलेला प्रचंड माहिती संग्रह आणि यातले तज्ज्ञ यांच्या चमुनं अविरत तपास करत अखेर इतक्या वर्षांनंतर या प्रश्नाची उकल केलेली आहे.

अरनाल्ड व्हॅन डेन बर्ग नावाच्या ज्यु व्यक्तीनं स्वत:च्या कुटुंबाला वाचविण्यासाठी ॲमस्टरडॅममधील ॲनचे रहाण्याचे गुप्त ठिकाण उघड केले असावे असे या तपासात उघडकीस आले आहे. ॲनचे वडील ओट्टो यांना आलेल्या एका निनावी चिठ्ठीच्या आधुनिक तंत्राच्या सहाय्यानं कसून केलेल्या तपासणीत या चिठ्ठीत व्हॅन डेन बर्ग याचं नाव होतं. या नावाचा मागोवा घेत गेलं असता असं लक्षात आलं की सदरची व्यक्ती ही ना*झींना ज्युंच्या लपण्याची ठिकाणं सांगणारी होती.

महायु*ध्द संपल्यानंतर लगेचच ॲनच्या वडिलांनी गुप्तहेर यंत्रणेला सांगितलं होतं की १९६४ साली त्यांना एक चिठ्ठी मिळाली होती ज्यात बर्ग याच्या नावाचा उल्लेख होता, ज्यानं फ़्रॅन्क कुटुंबियांचा विश्र्वासघात केलेला होता. पोलिस अधिकार्‍यांच्या जुन्या कागदपत्र संग्रहात ही नोंद आढळल्यानंतर तपासाला नवीन दिशा मिळाली आणि सात दशकांहून अधिक जो प्रश्न अनुत्तरीत होता त्याचं उत्तर अखेरीस मिळालं आहे.

ॲन लपलेल्या गुप्त ठिकाणावर घातलेल्या धाडीमधेही ॲनची डायरी, तिच्या लिखाणाचा काही भाग हा सुरक्षित राहिला. सगळ्या उलथापालथीनंतरही ओट्टोनं मित्रांच्या सांगण्यावरून ॲनची डायरी प्रकाशित केली. जून १९४७ साली ‘हेट अक्टरहूइस’च्या (द सिक्रेट ॲनेक्स) ३ हजार प्रती छापण्यात आल्या. अल्पावधीतच ही दैनंदिनी जगभारत इतकी लोकप्रिय बनली की तिचे ७० भाषांत अनुवाद झाले. महायु*ध्दानंतर जगभरातून पर्यटक ॲन लपलेल्या जागेला भेट देण्यासाठी येऊ लागले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

Next Post

या परदेश मंत्र्यांनी युएनमध्ये चुकून चक्क पोर्तुगीज मंत्र्याचं भाषण वाचलं होतं!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या परदेश मंत्र्यांनी युएनमध्ये चुकून चक्क पोर्तुगीज मंत्र्याचं भाषण वाचलं होतं!

या मुलीने अवघ्या १९व्या वर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.