The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना नियमांचं उल्लंघन केलंय म्हणून जोकोविचला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते

by द पोस्टमन टीम
13 January 2022
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगावर असलेलं कोरोना महामारीचं संकट पुन्हा गडद होत आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन व्हेरियंटची दहशत सर्वत्र पसरत आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमिक्रॉनचा प्रसार जगभरात झाला असून तो वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं जगभरातील संशोधक, सरकारं आणि आरोग्य यंत्रणांची चिंता आणखी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन खेळवण्याचा धाडसी निर्णय टेनिस फेडरशेननं घेतला आहे. टेनिसच्या चार ग्रँडस्लॅम्सपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंटला अनन्य साधारण महत्त्व आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यात ऑस्ट्रेलियन ओपन खेळवली जाते. सालाबादाप्रमाणं यावर्षीही टूर्नामेंटची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी मॅचेस सुरू होण्यापूर्वीच टूर्नामेंट वादात सापडली आहे. सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचमुळं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मोठा ड्रामा सुरू आहे. हा सर्व ड्रामा समजून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

येत्या १७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपनचा थरार रंगणार आहे. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी ऑस्ट्रेलियन भूमीमध्ये जगभरातील दिग्गज टेनिस खेळाडू एकमेकांशी भिडणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहभागी खेळाडू, सपोर्टिंग स्टाफ आणि प्रेक्षकांसाठी ‘टेनिस ऑस्ट्रेलियानं’ कडक नियम लावले आहेत. ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे, अशाच व्यक्तींना टेनिस कोर्टमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

मात्र, दिग्गज सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविचनं ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ आणि ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमांना फाट्यावर मारत ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश केला. नोवाकनं ऑस्ट्रेलियन भूमीवर पाऊल ठेवल्यापासून जोरदार नाट्य रंगलं आहे अन् याला कारणीभूत ठरली आहे, कोरोनाची लस! हो, कोरोना लसीमुळं नोवाक आणि ऑस्ट्रेलियन ओपनची प्रतिष्ठा पणाला लागली.

नोवाक जोकोविचनं अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही. लस घेणं किंवा न घेणं ही खासगी बाब असल्याचं म्हणत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनचे नियम पाळण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय कारणांमुळं आपण सध्या लस घेऊ शकत नाही, असं नोवाक म्हणाला होता. या आधारावर त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.



परंतु, तो ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर त्याच्याकडे वैद्यकीय समस्यांचे पुरावे मागितले गेले. आपल्याला 16 डिसेंबर रोजीच कोरोना झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं घालून दिलेल्या नियमानुसार कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिने कोरोनाची लस घेता येत नाही. म्हणून मी लस घेतली नाही, असा युक्तिवाद नोवाकनं केला. मात्र, ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर थांबवलं आणि तत्काळ त्याचा व्हिसा रद्द केला. या प्रकारामुळं संतापलेल्या नोवाक जोकोविचनं व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं. कोर्टाने जोकोविचच्या बाजूनं निर्णय दिल्यामुळं त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण… हा तर फक्त संपूर्ण प्रकरणाचा ट्रेलर होता. संपूर्ण पिक्चर तर आणखी बाकी आहे.

कोर्टानं नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगी दिलीच होती की, एका ‘फोटो’ बॉम्बमुळं नोवाक पुन्हा अडचणीत आला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार दुसऱ्यांदा त्याचा व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत आहे. शिवाय समोर आलेल्या फोटोंमध्ये तथ्य असल्यास जगातील अव्वल मानांकित टेनिस खेळाडूला जेलची हवा खावी लागेल.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

25 डिसेंबर रोजी म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी सर्बियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये जोकोविच रस्त्यावर टेनिस खेळत असल्याचे फोटो समोर आले आहेत. याशिवाय, हँडबॉल खेळाडू पेटार जोर्डजिक आणि नोवाक जोकोविचचा त्याच दिवशीचा एक फोटो ट्विटरवर आढळला आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी त्यानं टेनिस खेळाडूंच्या एका ग्रुपसोबत फोटो काढला होता. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे ४ जानेवारी रोजीदेखील तो आपल्या भावासोबत फिरताना दिसला होता. नोवाकचे हे सर्व फोटो ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी १४ दिवसांच्या काळातील आहेत. याचाच अर्थ त्यानं नियमांचं उल्लंघन केलं आहे.

जोकोविचनं इमीग्रेशन फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्याचं या फोटोंवरून सिद्ध होतं. नियमानुसार, ऑस्ट्रेलियाला येण्यापूर्वी दोन आठवड्यांच्या काळात त्यानं प्रवास केलेला नसणं अपेक्षित होतं. इमीग्रेशन फॉर्ममध्ये प्रवासाची माहिती भरण्यासाठी जो कॉलम दिलेला आहे, त्यात त्यानं ‘प्रवास केलेला नाही’, या कॉलमसमोर टीक केलेली आहे. समोर आलेल्या फोटोंच्या तारखा पाहता, टेनिसस्टारनं खोटी माहिती पुरवल्याचं सिद्ध होतं आहे. 

हे प्रकरण फक्त फोटोपर्यंत मर्यादित नाही. १८ डिसेंबर रोजी कोरोनाबाधित असतानाही नोवाक जोकोविचनं फ्रान्समधील एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. जोकोविचनं या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. मात्र, फॉर्ममधील चुकीच्या माहितीसाठी त्यानं आपल्या एजंटला जबाबदार धरलं आहे. एजंटकडून नजर चुकीनं चुकीच्या कॉलमसमोर टीक करण्यात आली, असं टेनिसस्टारचं म्हणणं आहे. पण, त्याच्या या युक्तीवादावर ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ऍलेक्स हॉक समाधानी नाहीत. जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्यासाठी ते आपल्या विवेकाधिकारांचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत.

यासर्व गोंधळादरम्यानच हो-नाही करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉची घोषणा झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामध्ये नोवाक जोकोविचचा समावेश करण्यात आला आहे. जोकोविच आपल्या पहिल्या सामन्यात सर्बियाच्याच मियोमिर केकमानोविचशी भिडणार आहे. मात्र, जोकोविचच्या व्हिसाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारनं अद्याप स्थिती स्पष्ट केलेली नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जोकोविचच्या व्हिसा प्रकरणावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

नोवाक जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्यात आला तर दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचं त्याचं स्वप्न नक्की अपूर्ण राहिल यात शंका नाही. गेल्यावर्षी (२०२१) जुलैमध्ये त्यानं विम्बल्डन स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील विसावं ग्रॅण्डस्लॅम मिळवलं होतं. याबरोबरचं त्यानं नदाल आणि फेडरर या दिग्गजांच्या ग्रॅण्डस्लॅमशी बरोबरी केली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फ्रेंच राज्यक्रांतीने आधुनिक रसायनशास्त्राच्या जनकाचा जीव घेतला होता..!

Next Post

जैवयुद्धाच्या पुढची पायरी- मोसादने बनवलेत किलर डॉल्फिन्स!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

जैवयुद्धाच्या पुढची पायरी- मोसादने बनवलेत किलर डॉल्फिन्स!

एकेकाळची मिठाची खाण ओस पडली, आज तिथे जगप्रसिद्ध थीम पार्क आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.