The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

FBIने १९ वर्षे तपास केला पण हे तीन फरार कैदी शेवटपर्यंत सापडले नाहीत

by Heramb
17 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुरुंगातून पळून जाणे ही काही सामान्य गोष्ट नाही. जेल अधिकारी आणि रक्षकांच्या कडक पहाऱ्यातून सुटून बाहेर जाणे म्हणजे हर्क्युलियन टास्कच. हे हर्क्युलियन टास्क जरी पार पडलं तरी याचा परिणाम काय होईल काही सांगता येत नाही. कदाचित पोलिसांच्या हातून मृत्यू किंवा पुन्हा तुरुंगवास, तोसुद्धा वाढीव! अमेरिकेच्या मॅक्सिमम सिक्युरिटी प्रिजनमधून पलायन करणे तर सामान्य जेलच्या तुलनेने अधिक अवघड किंवा जवळ जवळ अशक्यच.

त्यात अल्काट्रेझसारख्या मॅक्सिमम सिक्युरिटी प्रिजनमधून पळून जाणे म्हणजे मृत्यूलाच आवाहन.. आजवर अशा बहुतेक मॅक्सिमम सिक्युरिटी प्रिजनमधून अनेक लोक पळून गेले आहेत. पण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे १ मैलावर असलेले अल्काट्रेझ जेल जगातील सर्वांत सुरक्षित आणि क्रू*र तुरुंगांपैकी एक मानलं जातं. सॅन फ्रॅन्सिस्कोचा उन्हाळाही एखाद्या बाहेरील पर्यटकासाठी भयाण हिवाळा ठरतो इतकं तिथलं हवामान थंड आहे. त्यामुळे इथल्या समुद्राचं पाणीसुद्धा हाडं गोठवणारंच आहे.

समुद्राच्या मधोमध २२ एकर बेटावर असलेल्या या तुरुंगात भलामोठा पहारा असे. अशा अवघड परिस्थितीतूनही तीन कैद्यांनी पलायन केले. पण त्यांचा पुढे काहीही पत्ता लागला नाही. याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. त्यांची योजना प्रचंड यशस्वी ठरली. १९३४ पासून ते १९६३ साली तुरुंग बंद होईपर्यंत, ३६ लोकांनी १४ वेळा पलायनाचा प्रयत्न केला. त्यातील बहुतेक लोक पकडले गेले किंवा त्यांच्या पलायनाच्या प्रयत्नांत अयशस्वी ठरले. पण जॉन अँजिलीन, क्लिअरन्स अँजिलीन आणि फ्रँक मॉरिस या तिघांच्या पलायनाचा प्रयत्न यशस्वी ठरला.

१२ जून १९६२ रोजी पहाटेच्या रेग्युलर तपासणीवेळी जेलच्या सुरक्षा रक्षकांना हे तिघे कैदी अद्याप जागे न झाल्याचे समजले. सकाळ होऊनही ते कैदी अजून जागे झाले नव्हते. एक सुरक्षा रक्षक त्यांतील एका कैद्याला उठवायला गेलेला असता झोपलेल्या कैद्याचे डोके जमिनीवर पडले. पण ते डोके “प्लास्टरपासून” तयार केलेले होते, सेलच्या बाहेरून पाहिल्यावर ते खरं वाटावं यासाठी त्याला माणसाचे खरे खुरे केस होते. अंथरुणाखाली उशा ठेवलेल्या होत्या.

जॉन अँजिलीन, क्लिअरन्स अँजिलीन आणि फ्रँक मॉरिस तिघेही कैदी आपापल्या सेलमध्ये नव्हते. हे तिघेही कैदी पलायन करण्यात यशस्वी ठरले आहेत हे लक्षात आल्यानंतर तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आणि कोणत्याही कैद्याला आपल्या सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. कैद्यांनी पलायन केलंय हे समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरु झाली.



कैदी पळून गेले आहेत हे कळल्यानंतर सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एफबीआय डिपार्टमेंटला कळवण्यात आले. एफबीआयने देशभरातील सर्व तुरुंगांतून माहिती मिळवायला सुरुवात केली आणि या तीन कैद्यांनी याआधीही अनेक कारागृहांमधून पळून जाण्याचे प्रयत्न केले असल्याचे त्यांना समजले. एफबीआयने या तिन्ही कैद्यांच्या कुटुंबांची कसून चौकशी केली, त्यांचे फोटोज सॅन फ्रॅन्सिस्कोच्या नावाड्यांना दिले गेले आणि एफबीआयनेसुद्धा त्याठिकाणी मोठी शोध मोहीम राबवली.

दोन दिवसांतच त्यांना समुद्रामध्ये बोट्सचे पेडल्स (वल्ले) आणि क्रॉनखाईट बीचवर एक घरगुती लाइफ-वेस्ट देखील सापडला. या दोन वस्तूंव्यतिरिक्त त्याठिकाणी प्रचंड प्रमाणावर चाललेल्या शोधानंतरही काहीही सापडलं नाही. एफबीआय, कोस्ट गार्ड, ब्युरो ऑफ प्रिजन ऑथॉरिटीज आणि अन्य सुरक्षा एजन्सीजनी तपास सुरु केला. या सर्व अधिकाऱ्यांबरोबरच आणखी एक मदतगार होता तो म्हणजे या तिघांचा साथीदार. पण त्याला वेळेत पलायन करता आले नाही.

त्या चौथ्या साथीदाराकडून अधिकाऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या. हे कैदी पळून गेले होते जून १९६२ मध्ये, पण त्यांचे नियोजन सुरु झाले होते डिसेंबर १९६१ मध्येच. या चारही कैद्यांनी आपल्या मित्रांना शेजारच्याच सेलमध्ये ठेवावे अशी विनंती जेल प्रशासनाला केली होती. विशेष म्हणजे त्यांच्या या विनंतीला मान्यता देण्यात आली.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

मग त्यांनी तुटलेल्या व्हॅक्युम क्लिनरची मोटर काढून ड्रिल मशीन तयार केले. जेलच्या प्रत्येक सेलमध्ये हवा खेळती राहावी यासाठी खिडकीवजा रचना असते. त्यालाच एअर वेन्ट्स असेही म्हणतात. एअर वेन्ट्सना सिमेंटची जाळी लावून खोलीमध्ये हवा खेळती राहील याचा बंदोबस्त केला जातो. इथूनच कैद्यांनी बाहेर निघायचे ठरवले होते आणि त्यानुसार ते अनेक दिवस या एअर वेन्ट्सच्या आजूबाजूला ड्रिलिंग करून ती भिंत कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत होते.

ड्रिलिंगमुळे आवाज तर होईलच. यावरही त्या कैद्यांनी उपाय शोधून काढला होता. या जेलमध्येही आठवड्यातील काही तास ‘हॅपी अवर्स’ असायचे. याकाळात कैद्यांना आपापल्या सेलमध्ये बसूनच संगीत वाद्ये वाजवण्याची परवानगी मिळत असत. यावेळी सहसा कोणीही सुरक्षा रक्षक कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी येत नसे. या प्रचंड आवाजाच्या कव्हरमध्ये हे कैदी शक्य तितके ड्रिलिंगचे काम उरकून घेत असत. एकदा काम झालं की ते लपवण्यासाठी पुठ्ठा, एखादं वाद्य इत्यादी साहित्याच्या मदतीने ते कैदी आपलं काम लपवत असत.

कैद्यांच्या सेल्सच्या भिंतीच्या मागे एक पॅसेज होता. या पॅसेजमध्ये कोणताही सुरक्षा रक्षक येत नसे. कैदी वेळ पाहून एअर वेन्टमधून बाहेर निघून या कॉरिडॉरद्वारे इमारतीच्या आत असलेल्या सेल ब्लॉकच्या छतावर चढत असत. याच ठिकाणी त्या चार कैद्यांनी एक एक गुप्त कार्यशाळाच उभारली होती. गुप्त कार्यशाळेचा वापर कैद्यांनी पळून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू तयार करण्यासाठी आणि लपविण्यासाठी केला. अशा वस्तू बनवण्यासाठी त्यांनी चोरी केलेल्या आणि जेल प्रशासनाद्वारे वितरित केलेल्या वैविध्यपूर्ण सामग्रीचा वापर अतिशय कल्पकतेने केला होता.

त्यांनी चोरलेले किंवा गोळा केलेले ५० पेक्षा जास्त रेनकोट लाईफ जॅकेट आणि ६ बाय १४ फूट राफ्ट तयार करण्यासाठी वापरले. त्यांनी या सर्व साहित्याची शिलाई उत्तमरीत्या केली होती आणि त्याचे व्हल्कनायझेशन तुरुंगातील गरम वाफेच्या पाइपवर असलेल्या लीकेजच्या साहाय्याने केले होते. व्हल्कनायझेशन ही रबर कडक करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. त्यांनी वाद्यांच्या सहाय्याने लाकडी बोट पेडल्स (वल्ल) देखील तयार केले. विशेष म्हणजे राफ्ट फुगवण्यासाठीही त्यांनी तुरुंगात मिळणाऱ्या वाद्यांचा वापर केला. 

याचवेळी ते ते इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते. इमारतीचे छत जमिनीपासून ३० फुटाच्या उंचीवर होते. परंतु पाईप्सच्या नेटवर्क्सचा वापर करून त्यांना वर चढता आले असते. ११ जूनच्या संध्याकाळी ते जाण्यासाठी तयार झाले. या कैद्यांच्या साथीदाराने त्याच्या सेलमधील एअर वेन्टचे ग्रिल पूर्णपणे काढून टाकले नव्हते आणि त्यामुळेच तो अडकला. इतर तिघे कॉरिडॉरमधून बाहेर गेले, त्यांनी आपल्या गुप्त कार्यशाळेतून साहित्य गोळा केले आणि ते व्हेंटिलेटर शाफ्टमधून वर चढून तुरुंगाच्या छतावर गेले.

त्यानंतर, ते सेल हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या बेकरीकडे उतरले, जवळच्या कुंपणावर चढले आणि बेटाच्या ईशान्य किनार्‍याकडे धावून त्यांनी आपली राफ्ट लाँच केली. पुढे काय झाले हे अद्याप गूढच राहिले आहे.

यानंतर तीन शक्यता निर्माण होतात, त्यांनी खाडी ओलांडली असेल, किंवा ते जवळच्या एंजेल बेटावर पोहोचले असतील किंवा रॅकून स्ट्रेट पार करून आपल्या मूळ योजनेप्रमाणे मारिन काउंटीमध्ये पोहोचले असतील. ते जिवंत आहेत हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी बरेच प्रयत्न केले. कारण इतक्या दिवसांनंतरही त्यांचे मृतदेह सापडले नाहीत. जर त्यांचा समुद्रातच मृत्यू झाला असता तर त्यांचे मृतदेह एक-दोन दिवसांत पाण्यावर तरंगले असते, पण तसेही झाले नाही.

या केसवर एफबीआयने तब्बल १७ वर्षे काम केले आहे. ३१ डिसेंबर १९७९ रोजी एफबीआयने अधिकृतपणे हे प्रकरण बंद केले आणि त्याची फाईल ‘यूएस मार्शल्स सर्व्हिस’कडे सोपवली. यूएस मार्शल्स सर्व्हिस ते कैदी जिवंत आहेत ही शक्यता समोर ठेऊन या केसवर तपास करीत आहेत. त्यांचा हा तपास त्या कैद्यांचे वय वर्ष ९९ होईपर्यंत सुरूच राहील. तरीही ते तीनही कैदी अमेरिका किंवा अन्य कोणत्याही परदेशात जिवंत असल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे समोर आले नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

क्युबाला व्हिलन बनवण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्याच भूमीवर द*हश*तवादी ह*ल्ले करण्याचा प्लॅन केला होता

Next Post

चोरांनी अ‍ॅमेझॉन, फेडेक्सच्या सामानाच्या रेल्वे लुटून अक्षरशः हाहाकार माजवला आहे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

चोरांनी अ‍ॅमेझॉन, फेडेक्सच्या सामानाच्या रेल्वे लुटून अक्षरशः हाहाकार माजवला आहे

या घटनेमुळे दुसऱ्या महायु*द्धातील ब्रिटनच्या विजयावर धब्बा लागला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.