आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
द*हश*तवाद ही आजच्या जगात फार मोठी समस्या बनली आहे. द*हश*तवादाची संकल्पना सुरु होते फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळापासून. या कालखंडाला ‘रीन ऑफ टे*रर’ किंवा द*हश*तीचे राज्य’ असेच म्हटले जाते. या काळात कोणत्याही राज्यकर्त्याला त्याच्या ‘राज्यकर्त्याचा’ स्टेटस अबाधित ठेवायचा असल्यास गिलोटिनखाली त्याचा शिर*च्छेद होत असे. या द*हश*तीमुळे कोणताही खानदानी माणूस आपला राज्यकर्त्याचा स्टेटस अबाधित ठेवण्यास धजावणार नाही राज्यक्रांतीच्या नेत्यांचे मत होते. यातूनच द*हश*तवादाची व्याख्या तयार झाली ती म्हणजे, ‘आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी द*हश*तीचा वापर’.
एका विद्वानाचा शिर*च्छेद:
याच फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान एके दिवशी, फ्रेंच लोक चौकाभोवती जमले होते आणि एक असाच खानदानी माणूस पायऱ्या चढून गेल्यानंतर त्यांनी जल्लोष केला. त्याने नुकतेच आपल्या सासऱ्याचा शि*रच्छेद होताना पाहिले होते आणि आता त्याची पाळी होती. जेव्हा तो गिलोटिनच्या चौथऱ्याच्या पायऱ्या चढून वर गेला तेव्हा त्याने एक नजर आपला शिर*च्छेद करणार असलेल्या लोकांकडे टाकली. त्याने क्षणभर पाहिलं आणि डोळे मिटले. तो गिलोटिन खाली आला आणि त्याचा शिर*च्छेद झाला.
कालांतराने एका फ्रेंच गणितज्ञाने या विशिष्ट शिर*च्छेदाबद्दल खेद व्यक्त केला होता. तो म्हणतो, “हे डोके कापण्यासाठी त्यांना फक्त एक क्षण लागला पण त्याच्यासारखी बुद्धिमत्ता तयार करण्यासाठी शंभर वर्षेही पुरेशी नाहीत!” तो माणूस सामान्य नव्हता किंवा फक्त एक खानदानी माणूस नव्हता. तर तो ‘अँटोइन-लॉरेंट डी लॅव्होइसियर’ होता. अँटोइन-लॉरेंट डी लॅव्होइसियरला आधुनिक रसायनशास्त्राचे जनक मानले जाते.
फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वीचा अँटोइन-लॉरेंट डी लॅव्होइसियर:
लॅव्होइसियरचा जन्म एका श्रीमंत आणि खानदानी फ्रेंच कुटुंबात झाला होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती असतानाही त्याने आपले आयुष्य अध्ययनात व्यतीत केले. लॅव्होइसियरने पॅरिस विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. अफाट संपत्ती आणि प्रभावाच्या जोरावर त्यांनी आपल्या घरी रसायनशास्त्राची अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली होती. लॅव्होइसियरने कोणत्याही नवीन घटकांचा शोध लावला नाही परंतु इतर निष्कर्षांवर पुन्हा काम केले.
लॅव्होइसियरने या काळातील अनेक भ्रम खोडून काढले. याचे एक उदाहरण म्हणजे रसायनशास्त्रज्ञांच्या मते धातूला गंज लागल्याने त्याचे वजन वाढते. धातूला गंज लागल्याने त्याचे वजन वाढते हे चुकीचे असल्याचे लॅव्होइसियरने सिद्ध केले. लॅव्होइसियर ऑक्सिजन एक्सट्रॅक्ट करण्याची पद्धत देखील शोधून काढली आणि या वायूचे नामकरण देखील लॅव्होइसियरनेच केले आहे. लॅव्होइसियरने रसायनशास्त्रातील अनेक गैरसमजांचे निराकरण केले होते.
याशिवाय मेट्रिक प्रणालीच्या निर्मितीमध्येसुद्धा लॅव्होइसियरचे बहुमूल्य योगदान आहे. लॅव्होइसियर जरी विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या क्षेत्रात काम करत असला तरी अधिकृतपणे तो पॅरिसचा कर संकलन अधिकारी होता. सीमाशुल्क संकलनासाठी पॅरिसभोवती भिंत बांधण्यात त्याचा मोठा वाटा होता. याच भिंतीमुळे त्याला पुढे बराच त्रास सहन करावा लागला होता.
फ्रेंच राज्यक्रांती:
जीन-पॉल मॅरेट हा शाही समाजाचा सदस्य होता. मॅरेटचा चुंबकत्वाच्या शक्तीवर आणि या चुंबकीय शक्तीचा मेस्मेरिझमसाठीच्या वापरावर प्रचंड विश्वास होता. मेस्मेरिझम ही मानव, प्राणी आणि भाज्यांसह सर्व सजीवांमध्ये असलेली एक अदृश्य नैसर्गिक शक्ती आहे, असे तत्कालीन काही शास्त्रज्ञांचे मत होते.
मॅरेटने फ्रेंच रॉयल सोसायटीमध्ये या विषयावर एक रिसर्च पेपर सादर केला. या काळात चुंबकत्वाचा वापर करून हिप्नोटिझम करणे प्रसिद्ध होते. बेन फ्रँकलिन देखील या सिद्धांताचे चाहते होते. पण फ्रेंच रॉयल सोसायटीचा अध्यक्ष असलेल्या लॅव्होइसियरने मॅरेटचे संशोधन नाकारले.
या नकारामुळे मॅरेट भलताच संतापला आणि या नकारामुळे आपला वैयक्तिक अपमान झाला असा पूर्वग्रह त्याने धरला. फ्रान्समधील राजकीय लाटाही लॅव्हॉइसियरच्या विरोधात वळत होत्या. पुढे फ्रेंच नागरिकांनी सत्ताधारी वर्गाविरुद्ध शस्त्रे उचलली. आंदोलकांनी चॅटीयू-डू-व्हर्सेल्स याठिकाणी धडक दिली.
‘किंग लुई फोर्टीन्थ’ला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पॅरिस शहरात आणले गेले. फ्रेंच जनतेने राजघराण्यावर गरिबांवर कर लादल्याचा आणि त्या करावरच आपले घर चालवत असल्याचा आरोप केला होता. मॅरेट हा त्या क्रांतिकारकांपैकीच एक होता.
मॅरेटने कट्टरपंथी विचारांचे वृत्तपत्र सुरु करून हिं*सेचे समर्थन केले. लॅव्होइसियरचा सूड घेण्याची यापेक्षा उत्तम संधी मॅरेटला पुन्हा मिळणार नव्हती. मॅरेटने लव्हॉइसियरवर तंबाखूमध्ये भेसळ केल्याचा आरोप केला आणि त्यातून बरीच संपत्ती कमावली असाही दावा केला. पॅरिसमध्ये विकल्या जाणार्या तंबाखूच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी लव्हॉइसियरला नियुक्त करण्यात आले होते. पॅरिसच्या लोकांनी लव्हॉइसियर विरुद्ध खटला चालवण्याची मागणी केली.
दरम्यान, शार्लोट कॉर्डेने मॅरेटची ह*त्या केली. मॅरेटला ‘शहीद’ घोषित करण्यात आले आणि लॅव्हॉइसियरच्या मृत्यूला आणखी उत्तेजन मिळाले. खटल्यात, लॅव्हॉइसियरला मृत्युदंडाची शिक्षा झाली. ८ मे १७९४ रोजी फ्रेंच क्रांतिकारकांनी गिलोटिनने लॅव्हॉइसियरचा शिर*च्छेद केला.
फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा गौरव:
फ्रेंच राज्यक्रांती संपुष्टात आली आणि श्वेत द*हश*तवादाने फ्रान्सवर ताबा मिळवला. श्वेत द*हश*तवादाने फ्रेंच राज्यक्रांतीत ह*त्या झालेल्या शाही, खानदानी आणि प्रतिष्ठित वर्गाला दोषमुक्त केले. नवीन फ्रेंच सरकारने लॅव्हॉइसियरची मालमत्ता त्याच्या विधवा पत्नीला परत दिली. रसायनशास्त्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून फ्रेंच सरकारने पॅरिसमध्ये त्यांचा पुतळा बसवला. पण तो पुतळा लॅव्हॉइसियरसारखा दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला. शिल्पकारानेही आपली चूक मान्य केली.
दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीपर्यंत हा पुतळा काही वर्षे त्या ठिकाणी उभा होता. दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीला फ्रेंच सैन्याने शस्त्रे बनवण्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यासाठी हा पुतळा वितळवला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










