The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्र्याला १९८३च्या फायनलची दोन तिकिटं नाकारली, म्हणून इंदिरा गांधींनी डायरेक्ट वर्ल्ड कपच भारतात आणला

by द पोस्टमन टीम
11 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा विजय भारताच्या दृष्टीनं अनेक कारणांसाठी खास होता. भारतानं त्यावेळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करण्याचा भीम पराक्रम केला होता. ज्या ठिकाणावरून क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली त्या इंग्लंडच्या भूमीवर भारतानं आपली प्रतिभा सिद्ध केली होती.

जागतिक क्रिकेटमध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या दिशेनं ते पहिलं पाऊल होतं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताचं जगभर नाव झालं. खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. मायदेशी आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींनी खेळाडूंसाठी खास मेजवानीचं आयोजन केलं. ठिकठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले. एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये आनंदी-आनंद होता. 

मात्र, या सर्व गोंधळात एक व्यक्ती अशी होती. जी १९८३च्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अपमानित झाली होती. गोऱ्या साहेबांनी त्या व्यक्तीचा अपमान केला होता अन् तेही मॅचच्या तिकीटासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी.

१९८३ सालच्या वर्ल्डकप फायनलच्या केवळ दोन तिकीटांमुळं पुढील काही वर्षांत इंग्लंडला क्रिकेट साम्राज्याच्या सिंहासनावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामागे त्याच अपमानित झालेल्या भारतीय व्यक्तीची चाणक्यनीती होती. 

ही व्यक्ती कोण होती? तिनं असं काय केलं, ज्यामुळं जागतिक क्रिकेटमधील इंग्लंडच्या साम्राज्याला सुरुंग लागला? यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख…



अगोदर उल्लेख केल्याप्रमाणं ही गोष्ट सुरू होते १९८३ सालच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेपासून. ज्यावेळी वर्ल्डकप स्पर्धा सुरू होती तेव्हा, भारताचे क्रेंदीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. त्याच दरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये वर्ल्डकप फायनल खेळणार होता. वर्ल्डकप फायनलमध्ये आपल्या देशाच्या संघाला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते, असा विचार करून सिद्धार्थ रे यांनी फायनल पाहण्याचा विचार केला.

फायनलची तिकीटे मिळवण्यासाठी त्यांनी आपले सहकारी मंत्री आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांना फोन केला. साळवेंनी आयोजक असलेल्या इंग्लिश क्रिकेट बोर्डाशी संपर्क करून दोन एक्स्ट्रा तिकिटांची मागणी केली. साळवेंना मिळालेलं उत्तर अतिशय धक्कादायक होतं. सध्याच्या काळात जर एखाद्या देशाच्या क्रिकेट बोर्ड अध्यक्षाला असं उत्तर मिळालं, तर त्याचं नक्कीचं मोठं आंतरराष्ट्रीय भांडवलं होईल.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

आयोजकांनी बीसीसीआय अध्यक्ष साळवेंना दोन तिकीटं देण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्हाला तुमच्या वाट्याची दोन तिकीट अगोदरच देण्यात आलेली आहेत. पाहिजे तर ती तुम्ही वापरू शकता. यापलीकडे एकही एक्स्ट्रा तिकीट मिळणार नाही, असं आयोजकांनी साळवेंना सांगितलं.

ही गोष्ट नक्कीच धक्कादायक होती. इंग्लंड क्रिकेट बोर्ड साळवेंना दोन तिकिटं अगदी सहज उपलब्ध करून देऊ शकत होत. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी साळवेंचा अपमान केला. आपल्या बोर्डातील सर्व सदस्यांसाठी इंग्लंड तिकिट राखीव ठेवत असे. त्यांचं कारण देऊन ब्रिटिशांनी भारतीय मंत्र्याला तिकिट दिलं. प्रत्यक्षात पाहिलं तर, इंग्लंडचा संघ फायनलमध्ये नाही म्हणून इंग्लिश क्रिकेट बोर्डातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामना पाहण्यास नकार दिला होता.

फायनलचा सामना सुरू असताना व्हिआयपी स्टँडमधील अनेक खुर्च्या उताण्या पडलेल्या होत्या. साळवेंनी ही गोष्ट आपल्या मनात कोरून ठेवली होती. आपल्या अपमानाची मोठी किंमत वसूल करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांना क्रिकेटच मदत करणार होतं.

भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर इंदिरा गांधींनी एक मेजवानी आयोजित केली होती. त्याच वेळी साळवेंनी गांधींच्या कानावर आपल्यासोबत घडलेली घटना घातली होती. इंदिरा गांधी अतिशय खमकी बाई होती. आपल्या मंत्र्याचा झालेला अपमान नक्कीच त्यांना रुचला नव्हता. याबाबत शक्य त्या गोष्टी करण्याच्या सूचना गांधींनी साळवेंना दिल्या. १९८७चा क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणण्याची आपली तयारी आहे फक्त त्यासाठी पैसा पाहिजे असल्याचं साळवे गांधींना म्हणाले होते.

साळवेंचा एक शब्द आणि गांधींनी थेट उद्योगपती धीरूभाई अंबानींना फोन फिरवला. जर बीसीसीआयनं क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणला तर तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारणार का? हा एकच प्रश्न गांधींनी केला होता. त्यावर धीरूभाई अंबानींनी दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. क्रिकेट वर्ल्डकप भारतात यावा यासाठी धीरूभाई ब्लँक चेकवर सही करण्यास तयार होते.

देशाचे पंतप्रधान आणि क्रिकेटवेड्या उद्योगपतीचा पाठिंबा मिळवून साळवेंनी आपली मोहिम सुरू केली. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली. क्रिकेटवरील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्याला सहकार्य करावं, अशी विनंतीवजा सूचना साळवेंनी पाकिस्तानी एअर चीफ मार्शल नूर खान यांना केली. पाकिस्ताननं भारतासोबत मिळून वर्ल्डकप आयोजित करण्याची तयारी दर्शवली.

आयसीसीच्या मिटिंगमध्ये श्रीलंकेनं देखील भारताला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या तीन आशियाई देशांचा एक ब्लॉक तयार झाला होता. आता साळवेंना फक्त एक मोठा मासा गळाला लावायचा होता. तो मासा म्हणजे ‘व्हेटो’पावर असलेला देश ऑस्ट्रेलिया होता. जर १९८७मध्ये क्रिकेट वर्ल्डकप भारतामध्ये आला तर प्रस्तावित रोटेशन पॉलिसीनुसार त्यानंतर ऑस्ट्रेलियाला यजमान पद मिळेल, ही गोष्ट साळवेंनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या गळी उतरवली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं क्लोज बॅलेटमध्ये भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.

त्यानंतर साळवेंनी आयसीसीमधील पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इतर असोसिएट दर्जाच्या राष्ट्रांना हाताशी धरून वर्ल्डकप इंग्लंडबाहेर हलवण्याचा ठराव बहुमतानं जिंकला. या सगळ्या कामात साळवेंना जगमोहन दालमियांचं मोलाचं सहकार्य लाभलं.

भारतानं बहुमत जिंकल्यानंतर देखील इंग्लंडनं, सामन्यांचं थेट प्रेक्षपण, खेळांडूंची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था असे कितीतरी प्रश्न उपस्थित करून भारताची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतानं इंग्लंडच्या प्रत्येक प्रश्नाला पद्धतशीर प्रत्त्युतर तयार ठेवलं होत. शेवटी ब्रिटिशांना भारतासमोर हार पत्करावी लागली आणि १९८७ साली पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप इंग्लंडबाहेर खेळवण्यात आला.

१९८७ चा वर्ल्ड कप हा ट्रेंडसेटर ठरला. या विश्वचषकामुळं जागतिक क्रिकेटची पुनर्रचना झाली. आयसीसीमधील समीकरणं बदलली गेली. व्हेटो पावरच्या शस्त्रामुळं जागतिक क्रिकेटमधील निर्णयांवर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंडचा माज उतरवण्याचं काम या वर्ल्ड कपनं केलं.

पहिल्यांदा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर गेली. जागतिक क्रिकेटमधील इतर देशांनी पहिल्यांदा आयसीसीमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.

क्रिकेटच्या जन्मस्थानापासून वर्ल्ड कप दूर हलवणं नक्कीचं सोपं नव्हतं. त्यासाठी दोन प्रतिस्पर्धी राष्ट्रं, जागतिक नेते, राजकारणी, क्रिकेट प्रशासक आणि व्यावसायिक यांच्यात गुंतागुंतीची बोलणी आवश्यक होती. जगातील कोणत्याही देशाला वर्ल्ड कप स्पर्धा आपल्या दारापर्यंत नेण्यात यश आलं नव्हतं. मात्र, भारतानं ही गोष्ट साध्य करून दाखवली होती ते ही फक्त दोन तिकिटांचा परतावा म्हणून…!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सुरियाचा ‘जय भीम’ ‘शॉशंक रिडेम्पशन’ला मागे टाकून IMDb वरचा नं.१ चित्रपट बनलाय

Next Post

टी-ट्वेन्टीनंतर एकदिवसीय क्रिकेटचेही नेतृत्व रोहित शर्माकडेच येणार का?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

टी-ट्वेन्टीनंतर एकदिवसीय क्रिकेटचेही नेतृत्व रोहित शर्माकडेच येणार का?

चिंग शिह - एक वेश्या जी इतिहासातील सर्वात खतरनाक पायरेट बनली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.